Home Blog Page 544

नुकसान भरपाई मिळाण्यासाठी शेतकऱ्यांचे धरणावर उपोषण सुरूच…

0

 

अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक

आज उपोषणाचा सहावा दिवस…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पाणी बंद करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी रोखले

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्प प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी धरणाच्या भिंतीवर आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज सहावा दिवस असून काल पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी या उपोषणास पाठिंबा देत आज रविवारी कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी यावेळी त्यांना रोखले.मात्र या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे…

खामगाव तालुक्यातील निमकवळा,काळेगाव आणि दिवठाना शिवारातील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 बाधित शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या अधिकृत करण्यात आले आहे परंतु नुकसानभरपाईची त्यांना मिळाली नाही यासंदर्भात संबंधित विभागाकडे दाद मागितली असता अधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप करत या शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे प्रशासनाच्या आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी थेट धरणाच्या काठावर 26 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू आहे. या बुलडाण्यातील निमकवळा,काळेगाव आणि दिवठाना शिवरातील काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा देताच आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज कालव्याचे पाणी बंद करू असा इशारा दिला होता. मात्र पोलिसांच्या उपस्थितीमुळे आंदोलनास स्थगित करण्यात आले आहे. यावेळी संपादित केलेल्या जमिनीच्या फळझाडांचा मोबदला मिळावा, डुबित शेत जमिनीचा मोबदला मिळावा तसेच प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष श्याम अवथाळे यांनी दिला आहे.. गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण धरणाच्या काठावर सुरू आहे त्याठिकाणी ज्ञानगंगा अभयारण्य आतील पाण्याचा धोकाही या उपोषणकर्त्यांची शेतकऱ्यांना आहे अद्याप पर्यंत सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या उपोषण मंडपाला भेट दिली नाही या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे जोपर्यंत सरकार याची दखल घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी घेतली आहे

 

तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिम अंतर्गत १३६ बुधवर १२८९८ बालकांना पोलीओ डोस दो बुंद जिंन्दगीके ९२ % उदिष्ट पुर्ण

0

 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिम अंतर्गत आरोग्य विभागा करवी १३६ बुध वर ३६९ आरोग्य कर्मचारीची नियुक्ती करण्यात आली होती तालुक्यात पातुर्डा , सोनाळा, वानखेड , संग्रामपुर या गावात ग्रा प , अंगणवाड्या , शाळा , विद्यालयात पोलीओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती यात तालुक्यात १३७६३ बालकांना पोलीओ डोस अपेक्षीत होते त्यात पाच वर्षा वरिल १३९ बालकांना तर पाच वर्षा खालील १२७५९ असे एकुण १२८९८ बालकांना पोलीओ डोस देण्यात आले पातुर्डा येथे ग्रा प कार्यालयात बुथ वर लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई भोंगळ , प्रा आरोग्य केंन्द्रात बुथ वैधकिय अधिकारी अंभोरे यांचे हस्ते बालकांना पोलीओ डोस देऊन शुभारंभ करण्यात आला सकाळी ८ वाजे पासुन ५ वाजे पर्यत पोलीओ डोस बालकांना देण्यात आले
संग्रामपुरात तालुका आरोग्य अधिकारी रोजतकार नगर पंचायतचे सहाय्यक अधिकारी कोल्हे यांनी बालकाना पोलीओ डोस दिले तर गाव निहाय लोकप्रतिनिधी, समाज सेवक , ग्रा प सदस्य यांच्या बालकांना पोलीओ डोस देऊन शुभारंभ करण्यात आला यावेळी ता वै अधिकारी रोजतकार , वैधकिय अधिकारी डॉ उजवणे , वैधकिय अधिकारी डॉ अंभोरे गाव निहाय आरोग्य कर्मचारी , अंगणवाडी सेविका , ग्रा प सदस्य , सामाजीक कार्यकर्ते , ग्रामस्थ उपस्थीत होते

सोमवारी भरणाऱ्या नांदुरा येथील आठवड़ी बाजारा संमंधी महत्वाची सूचना

0

 

नांदुरा येथील आठवड़ी बाजारात व्यापारी प्रतिष्ठाने लावणाऱ्या व्यापारी बंधुनो आणि समस्त सन्माननीय नागरिक बंधुना विनंती की गेल्या मार्च महिन्यापासुन कोरोना मुळे आठवड़ी बाजार हा वेगवेगळ्या जागेवर आणि रोडवर भरत आहे.कोरोनाच्या काळात रोडवर असणारी वाहतूक बंद होती त्यामुळे बाजारास कोणतीही अड़चन नव्हती.पण आता पुर्ण वाहतूक सुरु झालेली आहे.त्यामुळे रोडवर लावलेली दुकानें आणि असणारी वाहतूक यामुळे अनेक अडचणी येत आहे.छोटे मोठे अपघात होण्याची भीती आहे.म्हणून उदया सोमवार च्यां बाजारात आपण आपली दुकाने आठवड़ी बाजाराच्या ठरलेल्या ठीकानावरच लावावे ही विनंती. *या करीता आज आठवड़ी बाजार नांदुरा ची पुर्ण साफ सफाई करण्यात आली आहे.

बंधुनो कोरोनाच्या संकट काळात आपण सर्वानी जे सहकार्य केले त्याबद्दल आपले खुप खुप आभार यापुढे देखील आपण आपली व्यापारी प्रतिष्ठाने आठवड़ी बाजारात लावून सहकार्य करावे ही विनंती

दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय मिळावा वेळोवेळी

0

 

नांदुर:-(प्रफुल्ल बिचारे पाटिल )

आज रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी आरोग्य विभाग तर्फे ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहीम राबविण्यात आली.प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा यांच्या सौजन्याने ओमसाई फाउंडेशन नांदुरा यांच्या पोलिओ डोस बुथवर मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांनी चि.रनविरसिंग निलेश वतपाळ याला पोलिपो डोस देऊन या अभियानाचा शुभारंभ केला.या कार्यक्रमात नांदुरा नगर परिषद चे पाणीपुरवठा सभापती श्री.अजय घनोकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिलाष खंडारे, डॉ.लक्ष्मीनारायण जैस्वाल,
ओमसाई फाउंडेशन चे श्री.विलास निंबोळकर,पत्रकार श्री.प्रवीण डवंगे , श्री.यशवंत पिंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.

शिंदी येथे पल्स पोलिओ अभियान !सरपंचाच्या हस्ते डोज पासून सुरुवात !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी या गावांमध्ये 31 जानेवारीला 0 ते 5 वर्षा खालील वयोगटातील लहान बालकांना पल्स पोलिओ पाजण्याचे काम प्राथमिक आरोग्य उपकेंद्र शिंदी येथे सुरू झाले !या वेळी शिंदी गावचे प्रथम नागरिक सरपंच विनोद खरात यांच्या हस्ते पल्स पोलिओचा डोज पाजून पोलिओ लसीकरणाला सुरुवात करण्यात आली !येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये ‘तसेच शिंदी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुद्धा ‘ पल्स पोलिओच्या लसीकरणाची तयारी करण्यात आली होती ‘यावेळी शिंदी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत वायाळ ‘सेविका ज्योती चांगडे .आशा स्वयंसेविका उर्मिला बुरकुल ‘ पिटिएल ‘ गीता बुरकुल ‘पत्रकार सचिन खंडारे ‘अजय खंडागळे ‘आदी आरोग्य कर्मचारी व मान्यवर यावेळी हजर होते ‘यावेळी गावातील जवळपास अंदाजे ५०० मुलांना पोलिओ चा डोज पाजण्यात आला !

चिचगड येथे महिला कांग्रेस तर्फे हळदी कुंकू व महिला मेळ्याव्याचे यशस्वी आयोजन .

0

 

चिचगड येथील वीर बिरसा मुंडा स्मारका जवड आयोजन

प्रतिनिधी :- आमगाव
प्रज्ञा बागडे

देवरी ता.30 महिला कांग्रेसच्या सीमाताई कोरोटे व देवरी तालुका महिला कांग्रेसच्या संयुक्त विध्यमानाने मकर संक्रांत नियुक्त महिलाकरीता सामूहिक हळदी कुंकू व महिला मेळ्याव्याचे यशस्वी आयोजन रविवार ( ता. 30 जानेवारी ) रोजी चिचगड येथील वीर बिरसा मुंडा यांच्या स्मारका जवळ करण्यात आले .

या कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमाचे संयोजिका सीमाताई कोरोटे यांचा हस्ते आणि जी. प . च्या माझी अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्या हस्ते पार पाडले . या प्रसंगी देवरी तालुका कांग्रेसच्या जिल्हाध्येक्ष उषाताई शहरे हस्ते पार पाडले या प्रसंगी देवरी तालुका कांग्रेस अध्यक्ष संदीप भाटिया , माजी जी. प. सदस्य मधुरिताई कुंभारे , आमगाव तालुका महिला कांग्रेस अध्यक्ष छबूताई उके , चिचगड चे सरपंच कल्पनाताई नरवरे , किरनताई राऊत , पूजाताई कटकवार , पिंपरखारी चे सरपंच धनश्रीबाई गंगासागर , वानदराचे सरपंच मीराबाई कुंजाम , उपसरपंच प्रमिलाताई गावळ ,माजी सरपंच आनंद उत्तगडे , गवडेवरचे सरपंच कविताताई वलद , सरपंच लालाबाई मुंदी फलवंताबाई बगडेरिया , देवरी तालुका महिला कांग्रेस अध्यक्ष सुभद्रताई अगडे कलाबाई सारटे , पिंडकेपारची सरपंच प्रमिलाबाई घासले माजी सरपंच जसवंतबाई भारद्वाज सामाजिक कार्यकर्ता निशा परिहार यांच्या सह चिचगड क्षेत्रातील शेकडो महिला वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते .
यावेळी उपस्थितीत महिलांना संदीप भाटिया छबुताई ऊके , उषाताई शहरे , उषाताई मेंढे व सीमाताई कोरोटे यांनी अमूल्य मार्गदर्शक केले . दरम्यान महिला कांग्रेस तर्फे उपस्थित महिलाना हळदी कुंकू लावला वान चे वाटप केले . सोबतच महिलांसाठी संगीत खुर्ची व उखान म्हणले स्पर्धात विजयी स्पर्धांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार विवरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन चिचगडच्या ग्रा. प. सदस्य अस्मिताताई राऊत यांनी तर उपस्थितीचे आभार महिला कांग्रेस अध्यक्ष सुभद्राताई अगडे यांनी मानले . या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता चिचगड च्या ग्रा. प. सदस्य शाईनताई सैय्याम , सीमाताई राऊत , सुनीता नंदागवडी , राधिकाताई धरमगुळे , वत्सलबाई लटये , निताताई कोल्हारे , नसीम शेख , किरणताई राऊत , प्रीती सलामे सुमनताई सलामे , लक्ष्मीताई गायधने , पूजा कोल्हारे , शोभाताई तोमर , सुश्मिता गायधने , ममता कोल्हारे यांच्या सह देवरी व चिचगड क्षेत्रातील महिला कांग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले .

नदी पात्रात मिळाला इसमाचा मृतदेह

0

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव: सगोडा शिवारात पूर्णा नदीच्या पात्रा मध्ये इसमाचा मृतदेह मिळाल्याची घटना आज 30 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता पूर्वी घडली याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केशर सिंग सुपडा डाबेराव यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे की माझा भाचा किस्ना सूर्यभान चव्हाण वय 30 हा सगळा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रात आज 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजे पूर्वी पाण्यात बुडून मरण पावलेल्या स्थितीत आढळून आला फिर्यादीवरून पोलिसांनी कलम 174 नुसार मर्ग दाखल केला आहे

पोलीसांची अवैध वाहतुकी विरोधात धडक कारवाई, ११,६५,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त. 33 जनावरे सह लाखोंचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया, दिनांक – 30 जानेवारी 2021 – मा. श्री. विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांनी पो. स्टे. हद्दीतील अवैद्य धंदे समुळ नष्ट करणे या उद्देशाने ऑपरेशन क्रॅकडाऊन मोहिम राबविणे चे आदेशित झाल्याने दिनांक ३०/०१/२०२१ रोजी गुप्त बातमीदांरा कडून सपोनि अजित कदम ठाणेदार पोलीस स्टेशन देवरी यांना माहीती प्राप्त झाली की, छत्तीसगड वरुन नागपुरकडे चिचगड मार्गाने ट्रक क्र. सिजी १५ ए – ७४१७ अवैधरित्या प्राण्यांची वाहतुक होत आहे.

अशी खबर प्राप्त होताच वरिष्ठांना माहिती देवुन व मा. पोलीस अधिक्षक गोदिया, मा. अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनात पो,उ,प,नि उरकुडे व पो.स्टे. स्टॉपसह चिचगड पॉईन्ट येथे नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदी दरम्यान वरील क्र. चे ट्रक क्र. सिजी १५ ए -७४१७ यास थांबविण्यचा प्रयत्न केले असता सदर ट्रक चालकांनी ट्रक न थांबवता सदरचा ट्रक आमगांव रोडनी वळवल्याने आम्ही सपोनि अजित कदम व पो.स्टे. स्टॉपसह ट्रक
चा पाठलाग करुन मौजा लोहारा येथे सदर ट्रक ला अडवुन ताब्यात घेतला.

सदर वाहनाचा वाहन चालकास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने आपले नाव मोहम्मद नसीम मोहम्मद यासीम अंसारी वय -३० वर्ष रा. प्लॉट क्र. १०९ हमीदर नगर, नागपुर असे सांगीतले. सदर वाहनाची पाहणी केली असता, त्यामध्ये लाल, काळ्या, पांढ-या रंगाचे एकुण ३३ गोवंश जातीचे जनावरे प्रती नग किंमती ५०००/ -रु. प्रमाणे एकुण १,६५०००/ -रु. २) टाटा कंपनीचा ट्रक किंमती १०,०००००/- रु. असा एकुण ११,६५,०००/ -रु. चा माल
वाहतुक बिना परवाना दाटी वाटीने जनावरे कोंबुन निर्दयतेने व निष्ठुरतेने वागणुक देवुन चारापाण्याची सोय न करता व वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त न करता वाहतुक करीत असतांनी मिळुन आल्याने पोलीस स्टेशन देवरी येथे अप क्र. २३/२०२१ कलम ११ (१,) (ड)
प्रा.नि.वा.का .१९६० सहकलम, ५ (अ), ९ म.रा. प्राणि संरक्षण कायदा सन -१ ९९५ सह कलम १८४, मो.वा.का.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आले. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि उरकुडे पोस्टे देवरी हे करीत आहेत.

सावंगी टेकाळे येथिल सिद्धार्थ गायन पार्टीचा समाजासमोर आदर्श,

0

 

भिम गित गायनाच्या माध्यमातून गावातील बुद्ध विहारासाठी १ लाख रु चे दिले धम्मदान !
महाराष्ट्राच्या गाव खेड्यातील भिम गित गायनाच्या माध्यमातून भजनी मंडळ जोपासतात आंबेडकरी चळवळ

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

* देऊळगाव राजा तालुक्यातील जिल्हा बुलढाणा येथिल सिद्धार्थ गायन पार्टी च्या महिला पुरुषांनी गावातील वाढदिवस , पुण्यानोमोदन व डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती बौद्ध जयंती व ईतर कार्यक्रम करत धम्म दान जमा केले माञ सदर*
धम्मदानातून भजनी साहित्य घेतले व ऊरलेला पैसा या मंडळाने वाटुन घेतला नाही १० रु ५० असे मिळणारी रक्कम जमा केली व याच पार्श्वभूमीवर गावातील कार्यकर्त्यांने व बौद्ध कर्मचारी अधिकारी यांनी निर्णय घेतला की गावात बुद्ध विहार बांधायचे प्रतेक घरामधुन वर्गणी सुरु याच भजनी मंडळी आपआपल्या घराची सामाजिक वर्गणी दिली माञ धम्म चळवळीला ऊर्जा मिळवुन देणारे क्षेत्र*
म्हणजे बुद्ध विहार आणी याच बुद्ध विहारामधे आपण सामुहिकपणे धम्मदान दिले पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेऊन त्यांनी भिम गिताच्या माध्यमातून जमवलेला निधी गावात साकारत असलेले दुमजली बुद्ध विहाराला १ लाख रु चे धम्मदान दिले खरोखर सावंगी टेकाळे येथिल भजनी मंडळाचा आदर्श घेण्यासारखे आहे . महाराष्ट्रात अनेक गायक प्रसिध्द आहेत त्यांचा जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर लाखो रु करावे लागतात आणी समाजातील ‘कार्यकर्त्यांना परिश्रम घ्यावे लागतात परंतु डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व बौद्ध जयंती निमित्ताने महिना दोन महिने तारखा बुक असणाऱ्या गायकांना लाजवेल असे काम या सावंगी टेकाळे येथिल गायन पार्टीने केले आहे. महाराष्ट्रातील शेकडो भिम शाहिर गायक कवी यांनी कमावलेला पैसा*
यापैकी काही हिस्सा समाजासाठी खर्च केला काय हे ज्या भागात कवी गायक राहतात तेथील कार्यकर्त्यांना च माहिती असावे परंतु सावंगी टेकाळे येथिल सिद्धार्थ गायन पार्टीने आपला आदर्श महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील भजनी भंजनी मंडळी समोर ऊभा केला आहे याच अनुषंगाने म्हणावेसे वाटते की,*
डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हा तुम्हाला जगाला शांती चा संदेश देणारा बौद्ध धम्म दिला आणी त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला संपुर्ण हक्क बहाल केलेत . परंतु डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला धम्म म्हणजे च आंबेडकरी चळवळ महाकवी वामनदाद कर्डक यांनी आयुष्याची शेवट होईपर्यत गायनाच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्र पायाखाली घालत गावा गावात गायन केले आणी आंबेडकरी चळवळीला ऊर्जा प्राप्त करुन दिली .याच चळवळीच्या ऊर्जेने गावा गावात कवी गायक तयार झाले आणी प्रतेक गावात याच कवी गायकांनी भजनी मंडळ तयार करुन आंबेडकरी चळवळ जोपासण्याचे काम सुरु झाले तेव्हा पासुन आजपर्यंत प्रतेक गाव खेड्यात भिम गित भजनी मंडळ समाजात जागृती करण्याच काम करत आहेत आणी याच मुळे कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली आणी तालुका व जिल्हा पातळीवर चळवळीत काम करणारे नेते पुढे आले* *त्यामुळे या भिम गित गायन पार्ट्या ना जोपासण्याच काम कार्यकर्त्यांने कराव जेणेकरुन त्यांचा होशला वाढुन धम्म चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळीला गती प्राप्त होईल हेच या निमित्ताने सांगावेसे वाटते !

सिंदखेडराजा तालुक्यामध्ये ८० ग्रामपंचायत पैकी ४१ ग्रामपंचायत वर महिलाराज !तर ३९ ग्रामपंचायतवर पुरुष !साखरखेर्डा येथे पुरुष सर्वसाधारण !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

बहुप्रतिक्षित सरपंच पदाचे महिला आरक्षण सोडत दिनांक 29 जानेवारीला जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालय मध्ये जिल्हाधिकारी एस राममुर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली .उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाभरातून आलेल्या सदस्य पदाधिकारी यांच्या साक्षीने महिलांचे आरक्षण काढण्यात आले !

ज्या ठिकाणी महिला आरक्षण आहे ते गावे पुढील प्रमाणे !
सोयदेव ,कोनाटी ‘ गोरेगाव ‘ मोहाडी ‘ वाघोरा ‘ धांदरवाडी ‘ पिंपळगाव सोनारा .पिंपळगाव लेडी . वडाळी ‘ निमगाव वायाळ ‘चिंचोली जहागीर . पिंपळगाव कुडा ,गुंज, विझोरा, देऊळगाव कोळ, जांभोरा, जागदरी, हनवतखेड (सिदखेडराजा ), नाईकनगर, -वरुडी ,आडगाव राजा, ताड शिवनी ,रताळी ,वाघाळा, दरेगाव, देवखेड ,सायाळा, खैरव ,मलकापूर पांग्रा ,महारखेड,साठेगाव, खामगाव, कंडारी, हिवरखेड पूर्णा , उमरद,आंबेवाडी ,पोफळ शिवणी, कुंबेफळ, गारखेड,तर रूम्हणा येथील एकमेव अनुसूचित जमाती साठी महिला आरक्षण आहे –
तर पुरुषासाठी सुटलेली आरक्षण पुढील प्रमाणे गावे ‘

जळगाव, सवडद , चांगेफळ, हिवरा गडलिंग, उमनगाव, तांदुळवाडी , जऊळका, वाघजाई, शिंदी, डावरगाव, बाळ समुद्र, सोनोशी ,सावरगाव माळ, नशिराबाद ,किनगाव राजा ,साखरखेर्डा ,भंडारी, वसंतनगर, दत्तापूर,धानोरा, सावखेड तेजन, पांग्री उगले ,पिंपळखुटा, शिवनी टाका, वरदडी बुद्रुक, ढोरवी, हनवतखेड (मलकापूर पांगरा ),पिंपरखेड बुद्रुक,केशव शिवणी, झोटींगा, तढेगाव, दुसरबीड, शेंदुर्जन, राजेगाव, लिंगा (पांगरी काटे ) राहेरी बुद्रुक, पळसखेड चक्का, सुलजगाव, भोसा,

,,एकूण सिंदखेडराजा तालुक्यामध्ये महिला राज जो वर्चस्व येणार हे नक्की आहे 41 ग्रामपंचायत वर सावित्रीबाई फुले व माँ जिजाऊ च्या लेकी राज करणार आहेत !