Home Blog Page 545

मध्यप्रदेशातील विवाहिता बनली वासनेचा शिकार 

0

 

अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक

भर दुपारी सोनाळा शिवारात बलात्काराच्या घटनेने सातपुडा परिसर हादरला आरोपीला एक दिवसाचा पि सि आर                 संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील सोनाळा शिवारामध्ये 40 वर्षीय मध्यप्रदेशातील विवाहितेवर बलात्कार 28 जानेवारी दुपारी दोनच्या सुमारास झाल्याने सातपुडा परिसर हादरला सदर महिला विष्णू तळोकार  त्यांच्या शेतामध्ये भंडारा असल्यामुळे विवाहितेचे मुले त्या भंडारा मध्ये गेले होते दोन अनोळखी इसम बकरीला चारा नेण्यासाठी  पीडित महिला काम करत असलेल्या शेतामध्ये आले आम्हाला बकरी साठी चारा द्यायचा आहे असे म्हणत बकरीचा चारा नेण्यासाठी महिलेला बळजबरी  करू लागले त्या वेळी महिला माझे शेत मालक तुम्ही चारा नेला तर मला कामावरून कमी करतील असे म्हटले अज्ञात दोन व्यक्तीने विवाहितेचे एकाने तोंड दाबून महिलेला उचलू शेतामध्ये नेले बळजबरीने विवाहितेवर बलात्कार केला सदर घटना विवाहितेने तिच्या घरच्यांना सांगितले त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून सोनाळा पोलिसांनी आरोपी इस्राईल मिक अंदर मासरे वय 23, रा आलेवाडी, अमर उर्फ उमर अकबर पाले राहणार आलेवाडी वय 20 वर्ष जलद गतीने तपास चक्र फिरून आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली सदर आरोपी वर भारतीय दंड संहिता1860 नुसार 376 डी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सोनाळा पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार अमर चोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पवार करीत आहेत सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस उपविभागीय अधिकारी मलकापूर दिलदार तडवी यांनी घटनास्थळी भेट दिली

जळगाव जामोद तालुक्यातील अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर महिला भूषवणार सरपंचपद

0

 

गजानन सोनटक्के

महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत 29 जानेवारीला काढण्यात आली त्यानुसार जळगाव जामोद तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीला पैकी पंचवीस ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाचा मान जिजाऊ सावित्रीच्या लेकींना मिळणार आहे जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाभरातून आलेल्या सदस्य पदाधिकारी व त्यांच्या साक्षीने महिलांचे आरक्षण निर्धारित करण्यात आले त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पळशी वैद्य मडाखेड खुर्द कुरणगाड खुर्द चावरा पळसखेड खेर्डा खुर्द मरा खेड बुद्रुक मांडवा वडगाव गड उमापूर काजेगाव अकोला खुर्द गाडेगाव खुर्द सावरगाव वडगाव पाटण टाकळी पारस्कार पळशी सुपो मानेगाव गाडेगाव बु जामोद रसुलपूर सुलज धानोरा भेंडवड बु या ग्रामपंचायतींचा समावेश आहे

शेतकऱ्यांनी शासकीय तुर खरेदी चा लाभ घ्यावा-आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री राजेश एकडे, यांच्या हस्ते नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विदर्भ कॉ. ऑप.मार्केटिंग फेडरेशन संलग्नित नांदुरा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या वतीने शासकीय तुर खरेदी चा शुभारंभ झाला.रु.६,०००/- प्रतिक्विंटल या हमीभावाने शेतकऱ्यांनी शासकीय तुर खरेदी चा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आमदार राजेश एकडे यांनी केले.या तुर खरेदी समारंभात नांदुरा तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री.पदमभाऊ पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य श्री.वसंतराव भोजने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहनराव पाटील,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री भगवानभाऊ धांडे,डॉ.प्रदीप हेलगे,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तम झाल्टे,नांदुरा ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी च्या श्री. अमोल पाटील, व्ही.सी.एम.एस. चे संजय नाशिककर,नादुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. संजय पाटील,दुय्यम निबंधक कार्यालयाचे श्री.दहिभाते याच्यासह नांदुरा तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावल चोपडा रोडवर वेगाने जाणाऱ्या अयसर वाहनाने जाणाऱ्या पादचाऱ्यास उडविले पोलीसात गुन्हा दाखल

0

 

यावल प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील यावल चोपडा मार्गावरील डॉ झाकीर हुसैन उर्दू हायस्कुल फाटया जवळ एका मोटर वाहनाने धडक देवुन झालेल्या अपघात एक व्याक्ती गंभीर जखमी झाला आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी आज दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी ८ .३० वाजेच्या सुमारास यावल चोपडा रोडवर चोपडयाकडे जाणाऱ्या अयसर ट्रक वाहन क्रमांक एचआर ७३ए६३१९यावरील वाहनचालक याने भरधाव वेगाने ट्रक चालवुन रस्त्यावर साईटने जाणारे अब्दुल हमीद शेख मोहम्मद वय ७० वर्ष राहणार डांगपुरा, यावल यांना जोरदार धडक दिल्याने ट्रकचालक हा पोलीसांना अपघाताची सुचना न देता घटनास्थळावरून पळुन गेला , घटनास्थळी उपस्थित नागरीकांनी समय सुचकता बाळगुन तात्काळ जख्मी अब्दुल हमीद शेख मोहम्मद उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात पाठविले असुन , याबाबत जख्मी सोबत असलेले शेख मुस्ताक शेख हसैन यांनी पोलीसात तक्रार दिल्याने वाहनचालका विरूद्ध भाग ५ गुरन५० / २०२१ भादवी कलम२७९ , ३३८ , मोटर वाहन कायदा कलम१८४, १३४ ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, घटनेचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नितिन चव्हाण हे करीत आहे . दरम्यान उशीरा मिळालेल्या माहीतीनुसार अडावद पोलीसांच्या मदतीने अपघातास कारणीभुत वाहनचालकास ट्रकासह पकडण्यात आले आहे .

किनगाव येथे एका कांदा उत्पादक शेतकऱ्याची कांदा खरेदी करून व्यापाऱ्याकडुन लाखो रूपयात फसवणुक पोलीसात गुन्हा दाखल

0

 

(प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल तालुक्यातील किनगाव बु येथील एका कांदा खरेदी करून खोटे धनादेश देवुन उत्पादक शेतकऱ्याची लाखो रुपयात फसवणुक करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार छगन प्रमोद चौधरी वय५२ वर्ष शेतकरी ,राहणार किनगाव बु यांच्याकडुन किनगाव खुर्द येथील जय मातादी ट्रेडर्स किनगावचे संचालक संदीप सुधाकर कोळी , आणी घनःश्याम सुधाकर कोळी यांनी सन् २०२०च्या फेब्रुवारी ते मार्च २०२०या कालावधीत चौधरी यांच्या शेतात उत्पादीत केलेले ३६टन कांदे किमत६ लाख११ हजार२५९चे विकत घेवुन त्यापैक्की २लाख५२ हजार रुपये रोख देवुन उर्वरीत रक्कम ३ लाख६३ हजार२३९ रूपये त्याचे पैसे न देता तिन धनादेश स्वरूपात स्टेट बँक ऑफ इंडीया चे दिले मात्र संबधीतांच्या खात्यात रक्कम नसल्याने तिघ धनादेश बाऊंस झालेत , धनादेश अनादर झाल्याबाबत संशयीत आरोपींना विचारणा केली असता त्यांनी आपणास जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद छगन प्रमोद चौधरी यांनी दाखल केल्याने त्यांच्या विरुद्ध भाग ५ गु .र .न.५२ / २०२१ भादवी कलम४२०, ५०६ , ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस कर्मचारी करीत आहे .

डोंगर कठोरा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या सर्व निकृष्ठ विकास कामांची चौकशी नव्या कारभाऱ्यांनी करावी ग्रामस्थांची अपेक्षा

0

 

 

( प्रतिनिधी )विकी वानखेडे . यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावात झालेल्या लाखो रुपयांच्या विविध कामांचा खेळखंडोबा निविदा अटीशर्ती नियम धाब्यावर ठेवुन बांधण्यात आलेल्या कामांची वरीष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे . यावल तालुक्यातील डोंगर कठोरा या गावात मागील वर्षी २०२०मध्ये १४ व्या वित्त आयोग , दलीत वस्ती सुधार योजना, रोजगार हमी योजना असो अशा विविध शासन पातळीवरील योजनांच्या माध्यमातुन लाखो रुपयांचे निधी जिल्हा परिषद आणी पंचायत समितीच्या माध्यमातुन उपलब्ध झाला होता . दरम्यान या योजनांच्या कामांना ग्रामपंचायत पातळीवर करण्यात आले असुन गावातील झालेली सर्व विकासकामे ही गुणवत्ता नसलेली व अत्यंत निकृष्ठ प्रतिची झालेली आहे .डोंगर कठोरा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच वगळता सर्व सदस्यांची झालेली अपात्रता त्यावर प्रशासकाची नेमणुक अशा गोंधळलेल्या कारभारात संधीसाधु ठेकेदार व आर्थिक स्वार्थाला बळी पडणारे पंचायत समितीचे भ्रष्ठ अधिकारी यांच्या संगमताने झालेल्या या विकास कामांची पुर्ण वाट लावण्यात आली असुन गावात नुकत्याच संपलेल्या निवडणुकीत सर्व नवख्यांना संधी मिळाली असुन या विजयी झालेल्या नव र्निवाचित ग्रामपंचायत कारभाऱ्यांनी झालेल्या या कामांची गुणवत्ता तपासावी व शासनाचे नियम धाब्याव ठेवुन निकृष्ठ कामे करणाऱ्या संबधीत ठेकेदारावर कारवाई करावी अशी अपेक्षाकृत मागणी ग्रामस्थांकडुन करण्यात येत आहे .

लय भारी साहित्य समूह आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिले राज्यस्तरीय ऑनलाईन लेखी कवी संमेलन यशस्वीरित्या संपन्न

0

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिले ऑनलाइन राज्यस्तरीय कवी संमेलन घेण्यात आले होते.

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर कवींनी लिहिलेल्या कवितांचे सादरीकरण करण्यासाठी टेज कार्यक्रम बंद असल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने काव्यसंमेलन घेण्यात येतात त्याच पद्धतीने लय भारी साहित्य समूह यांच्यावतीने ही प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिली राज्यस्तरीय ऑनलाइन लेखी कवी संमेलन व्यवस्थित रित्या ऑनलाइन पद्धतीने पार पडले.

 

 

या पहिल्याच राज्यस्तरीय कवीसंमेलनाला सर्व कवी मित्रांकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व स्वरचित लिहिलेल्या कविता या प्रसिद्धी करण्यासाठी त्यांना संधी मिळाली त्यामुळे आनंदाई पद्धतीने हे ऑनलाईन लेखी काव्यसंमेलन संपन्न झाले.

 

या काव्य संमेलनाचे संचालक , अनिल शामराव केंगार सांगोला , संचालक प्रमोद सूर्यवंशी मुंबई , संचालिका सौ , किरणताई मोरे चव्हाण गोंदिया यांनी खूप नियोजनबद्द कार्यक्रमाचे आयोजन केले होते. , व या कवीसंमेलनाला श्री. संतोष बाजीराव रायबान मंगळवेढा , यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले . व सर्व कवींच्या कवितांना दाद देत त्यांच्या कवितांचे परीक्षण करून सहभागी कवींचे नंबर काढून त्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र देऊन सर्वांचे अभिनंदन केले.

 

 

शब्दांचे धारदार वार
थेट काळजात भिडले
गोडी लागली कवितेची
आणि मन कवितात रमले

सर्व क्रमांक पुढील प्रमाणे काढले आहेत. सर्वोत्कृष्ट – सौ , वैभवी मराठे , उत्कृष्ट – प्रा . सौ , कल्पना निंबोकार अंबुलकर , प्रथम – शुभांगी देशमुख , द्वितीय – हरिदास गौतम , तृतीय – चित्तरंजन महादेव भगत , उत्तेजनार्थ – पी . जी . ठाकूर , राकेश प्रभावती बुधाजी डाफळे , संगीता महाजन ,

सहभागी – वसंत गवळी , सुमित राठोड , पंकज रा कासार काटकर , संजय बुऱ्हाडे , बबिता तोरणे , गणेश मगर , अमीर पटेल , रत्ना मनवरे , संध्या देशपांडे , बालाजी नाईकवाडी , सुरेश वडर , विद्या शरद श्रॉफ , मधुकर गायकवाड , रुकसाना मुल्ला , उषा चौधरी सातपुते , अमित अनंत कडव , मीनाक्षी परशुराम काळेले , अथर्वा मनचेकर , अस्मिता सावंत , रेखा बावा , मंदाताई वाघमारे , शशिकला गुंजाळ ह्या सर्व कवी / कवयित्री यांनी कार्यक्रमाची आपल्या काव्यातून शोभा वाढवली.

१३ जानेवारी ते २३ जानेवारी पर्यन्त चालनारी ही काव्यमय श्रखंला आनंदमय प्रेमाने आणि शांततापणे पार पडली. आणि
सगळ्या कविता बहरदार असल्याने आनंद गगनात मावत नव्हता .

 

कामात सगळे व्यस्त होऊन सुद्धा ही काव्य स्पर्धा पार पडली.
मला माझ्या लयभारी साहित्य समूहाचा अभिमान आहे. असे सांगत कार्यक्रमाच्या मान्यवरांनी सर्व कवींना
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे 30 जानेवारी 2021 अंतिम मुदत

0

 

अजहर शाह मोताळा

बुलडाणा:-दि. 28 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाद्वारे समाजात महिला सशक्तीकरण, समाज व राष्ट्र निर्माण करण्याचे कामात उत्कृष्ट योगदान देणारी व्यक्ती , संस्था यांना दरवर्षी नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येते. या पुरस्काराकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
या पुरस्कासाठी दि. 1 जुलै 2020 रोजी ज्या व्यक्तींचे वय किमान 25 वर्ष पुर्ण केलेले आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही. तसेच ज्या संस्था, गट, संघटना यांनी किमान 5 वर्षे संबंधीत क्षेत्रात काम केलेले आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार , स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, असे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत.
कौशल्य विकासासाठी महिलांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण महिलांसाठी मुलभुत सुविधा सुकर करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रिडा, कला, संस्कृती आदी क्षेत्रांमध्ये ठोसपणे व सार्थपणे बचाव व सुरक्षा, आरोय, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य महिला सक्षमीकरणाचा व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना यांना अनुभव असावा. राज्य अथवा केंद्रशासी प्रदेशात बाल लैंगिक गुणोत्तर अचुकपणे सुधारणा करण्याचे काम करणाऱ्यांचा या पुरस्कारासाठी प्रथम प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.
अर्जदाराने नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज, नामनिर्देशन केवळ ऑनलाईनव्दारे केंद्र शासनाचे www.narishakti puraskar.wcd.gov.in या वेबसाईटवर भरायचे आहेत. सदर वेबसाईटची लिंक महिला व बाल विकास मंत्रालयाच्या www.wcd.nic.in या कार्यालयीन वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या कागदपत्रांसह नामांकने सादर करावे. नामांकने सादर करावयाची अंतिम तारीख ही 30 जानेवारी 2021 आहे. नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र इच्छुक व्यक्ती किंवा संस्था / गट / संघटना यांना उपरोक्त वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरविंद रामरामे यांनी केले आहे.

स्व. गोविंदभाऊ शेंडे इनकी स्मृति में पप्पल क्रिकेट क्लब मरारटोली द्वारा जिल्हा स्तरीय क्रिकेट टू्र्नामेंट का उद्घाटन आज जिला क्रीड़ा संकुल में किया।

0

 

स्थानीय स्तर पर ऐसे खेल आयोजनों से ही प्रतिभावंत खिलाडियों को नए अवसर प्राप्त होते है। हम सभी को अपने व्यस्त दिनचर्या में से कुछ समय निकालकर ऐसे खेलो के माध्यम से उत्साही और निरोगी रहने का प्रयास करना चाहिए।

जिसमे प्रमुख रूप से पूर्व विधायक श्री राजेंद्र जी जैन, जिला क्रीड़ा अधिकारी श्री राठौड़, आयोजक श्री सचिन शेंडे (पार्षद) श्री बबनराव जी शेंडे, बाराई सर, सहारे सर, मेश्राम सर, वहाब सर, तूरकर सर, ठाकुर सर उपस्थित थे।
[28/01, 5:57 pm] Gondiya Sailesh Rajnkar: स्व गोविंदभाऊ शेंडे यांच्या स्मरणार्थ, पप्पल क्रिकेट क्लब मराराटोली यांच्या हस्ते आज जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले.

स्थानिक पातळीवर अशा खेळाच्या स्पर्धांमुळे केवळ प्रतिभावान खेळाडूंना नवीन संधी मिळतात. आपण सर्वांनी आपल्या व्यस्त नित्यक्रमामधून थोडा वेळ काढून अशा खेळांद्वारे उत्साही व निरोगी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

ज्येष्ठ आमदार श्री. राजेंद्र जी जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. राठौर, आयोजक श्री. सचिन शेंडे (नगरसेवक) श्री बबनराव जी. शेंडे, बरई सर, सहारे सर, मेश्राम सर, वहाब सर, तुरकर सर, ठाकूर सर हे उपस्थित होते. उपस्थित.

पाचवी ते आठवी पर्यंत शाळा सुरू . साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची कोरोना स्टेस , सर्व निगेटिव्ह

0

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
जिल्हा परिषद आणि माध्यमीक शाळा मधील पाचवी ते आठवी पर्यंत चे वर्ग सुरु करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिल्यानंतर प्रत्येक शिक्षकांची कोरोना स्टेस सुरु आहे . साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची कोरोना स्टेस करण्यात आली असता सर्व शिक्षकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत . अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संदिप सुरुशे यांनी दिली .
महाराष्ट्र शासनाने दिवाळी नंतर ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु केले होते . ते वर्ग सुरु करतांना पालकांची सहमती आवश्यक ठेवण्यात आली होती . त्यावेळी प्रथम दोन टप्प्यांत वर्ग भरविण्यात आले होते . परंतू सुरवातीला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला नाही . केवळ १० टक्के उपस्थिती होती . त्यानंतर मात्र उपस्थिती वाढली .आणि विद्यार्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला . कोरोना संक्रमणाची भिती दुर सारत सोशल डिस्टनचे अंतर राखून आणि तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून विद्यार्थी आले . शाळांमध्ये सेनिटाझरचा वापर करण्यात आला . दररोज तपासणी करण्यात आली . त्यामूळे साखरखेर्डा , शेंदुर्जन मलकापूर पांग्रा येथील शाळेत एकही विद्यार्थी कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आला नाही . शिक्षक आणि संस्था चालक यांनी घेतलेली खबरदारी उपयोगी आली . तोच धागा धरुन पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून प्रथम पाचवी ते आठवी पर्यंत शिकवीणीचे कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा मधील साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत असलेल्या साखरखेर्डा , सवडद , मोहाडी , राताळी , तांदूळवाडी , दरेगाव , शेंदुर्जन , शिंदी , पिंपळगाव सोनारा , सावंगी भगत , गुंज , वरोडी , राजेगाव , सायाळा , लिंगा , जागदरी , जनुना तांडा , बाळसमुद्र , गोरेगाव , उमनगाव , पांग्रीकाटे ,राताळी या २२ गावातील २५० शिक्षकांची कोरोना स्टेस करण्यात आली . या स्पेस मध्ये सर्व शिक्षक निगेटिव्ह आले आहेत .
——————————————————–
सर्व शिक्षक निगेटिव्ह आले असले तरी पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवितांना तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून शाळेत पाठवावे . कोरोना संसर्गजन्य आजार कमी झाला असला तरी भिती कायम आहे .
डॉ संदिप सुरुशे
वैद्यकीय अधिकारी , प्राथमिक आरोग्य केंद्र साखरखेर्डा