Home Blog Page 547

“अर्जुन देशपांडेंच्या जेनरिक आधार च्या माध्यमातून अमरावती मध्ये स्वस्तात औषधं उपलब्ध होणार “

1

 

अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक

अमरावती – जेनरिक आधार ही एक औषधांची विक्री करणारी कंपनी आहे. अर्जुन देशपांडेने ही कंपनी वयाच्या १६व्या वर्षी स्थापन केली. ही कंपनी उत्पादकांकडून थेट औषधांची खरेदी करते आणि ग्राहकांना विकते. यात २०-८० टक्के अधिक फायदा मिळतो.

मा. पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत vocal for local अभियान व श्री रतन टाटांच्या स्वप्नं जेनरिक आधार चे तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे हे साकारणार आहेत व त्यांनी हे उपक्रम वयाच्या १६व्या वर्ष पासून सुरू ही केले आहे…..

माननीय श्री रतन टाटांसारख्या मोठ्या व्यक्तीने जेनेरिक आधार मध्ये आर्थिक तसेच नैतिक समर्थन केले. देशात सध्या करोना व्हायरस विरुद्धची लढाई सुरू आहे.

जेनरिक कंपनीच्या माध्यमातून अर्जुनने एक मिशन हाती घेतले आहे. ४ महिन्यात ठाण्यातून सुरू झालेली फार्मा कंपनी जे स्वस्तदरात औषध १०० हून जास्त शहरात देशभरात उपलब्ध करून दाखवली आहे. ४ महिन्याच्या लॉक्डाऊन काळात लोकांना रोजगार संधी मिळाली….

ज्येष्ठ नागरिक आणि पेशनवर जगणाऱ्या लोकांना औषधे कमीत कमी किमतीत मिळावी. भारतातील ६०% लोकांना आज औषधं परवडत नसल्यामुळे विकत घेता येत नाही पण ८५ ते ९०% औषधें ही भारतातच बनतात ज्यांना जेनरिक म्ह्टले जाते.

त्यामुळे जेनरिक औषधे किमत कमी दरात उपलब्ध करण्याचा अर्जुन देशपांडेंचा प्रयत्न आहे.

येत्या काही महिन्यात जेनरिक आधार चे केंद्र फक्त मुंबईच नाही तर अमरावती व नागपूर, वर्धा, बुलढाणा, जळगाव, भंडारा, यवतमाळ, अकोला आणि नाशिक, महाराष्ट्राच्या व देशाच्या ग्रामीण शहरात ही सुरू करण्याचा ध्यास मी आपल्या हाती घेतला आहे…- अर्जुन देशपांडे

अनेक पुरस्काराने ही १८ वर्ष अर्जुन देशपांडेंना सन्मानित करण्यात आले आहे..

भारतातल्या टॉप १० कंपन्यांनी ही अर्जुन सोबत व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे व दिल्लीतून थेट ठाण्यात येऊन अर्जुन ची भेट घेतली

कृषी कायद्याच्या विरोधात संग्रामपुर तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडी मार्च धडकला…!

0

संग्रामपूर ः- दिल्ली येथे कृषी कायद्यांच्या, विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज २६ जानेवरी गणतंत्र दिनी संग्रामपुर तहसिल कार्यालयावर बैलगाडी मार्च काढण्यात आला. . संग्रामपुर बस स्टॅंड ते तहसिल कार्यालयापर्यंत बैलगाडीने हा मोर्चा काढण्यात आला . शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत .याकरीता संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने आज २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांचे पारंपारिक वाहन बैलगाडीचा मार्च काढून तहसीलदार मार्फत मा.राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले . निवेदनात असे नमुद केले की, देशात तीन कृषी विधेयक लागू करण्यात आले असून हे तिन्ही कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. तिन्ही कृषी विधेयकात एकही मुद्दा शेतकरी हिताचा नाही उलट हि संपुर्ण विधेयक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारी आहेत. आम्ही संग्रामपुर तालुक्यातील शेतकरी आहेात आज आमची शेतीची कामे सोडुन आम्ही आमच्या बैलगाडया घेऊन हे निवदेन द्यायला आलो आहोत.तिन्ही कृषी विधेयक कायदे तात्काळ रद्द करावेत अशा स्वरुपाचे निवेदन सादर केले. हे कायदे रद्द झाले नाही तर आम्ही सुध्दा तालुक्यात तीव्र आंदोलन करुन अशा इशाराही या निवेदनातुन देण्यात आला आहे.हयावेळी भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम अश्या घोषणा देत, बैलगाडी सह तिरंगा घेऊन मोर्चा शांततेत काढण्यात आला. हया आंदोलनात बहुसंख्य़ शेतकरी सहभागी होते.

किनगाव येथील त्या महीलेवर चाकुहल्ला करणाऱ्यानी व्यक्तिने त्याच शेतातील विहीरीत केली आत्महत्या

0

 

 

यावल तालुक्यातील किनगाव येथे एका व्याक्तिने शेतात काम करणाऱ्या महीलेवर चाकुहल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असता आज त्या घटनेतील चाकुहल्ला करणाऱ्याने विहीरीत आत्महत्या च्या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की काल दिनांक २५ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास आडगाव शिवारातील विनय पाटील यांच्या शेतात काम करणाऱ्या एका २८ वर्षीय महीलेवर चाकुनेवार करून गंभीर जख्मी करून घटनास्थळावरून निघुन गेल्याची घटना घडती होती .आज मात्र या संपुर्ण घटनेला वेगळे स्वरूप प्राप्त झाले असुन, यात महीलेवर हल्ला करणारा चंद्रकांत वसंत खलसे वय४५ वर्ष या शेतमजुरी करणाऱ्याने त्याच हनुमागडी आडगाव शिवारातील विनय पाटील यांच्या शेतातील विहीर उडी घेवुन पाण्यात बुडुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन , याबाबत हल्ला केल्यानंतर सदर चंद्रकांत खलसे हा आपण आता आत्महत्या करणार असुन माझ्या मजुरीचे तिनहजार रुपये हे माझ्या वयोवृद्ध आईला द्यावे असे तो सांगुन घटनास्थळावरून निघुन गेला ज्यांनी त्याचे बोलणे ऐकले त्यांनी त्याच्या बोलण्यास गांर्भीयाने घेतले नाहीत . दरम्यान आज सकाळी दिनांक २६ जानेवारी रोजी मजुर शेतात कामास गेले असता सदरच्या चाकु हल्यातील चंद्रकांत खलसे यांचा मृतदेह हे विहीरीत आढळुन आले असुन , पोलीस या घटनेच्या स्थळी पंचनामा करण्यासाठी रवाना झाले असल्याचे वृत्त आहे . चंद्रकांत खलसे हा४५ वर्षीय व्यक्ति आपल्या वयोवृद्ध आई बरोबर किनगाव गावात राहात होता .

यावल शहरातील स्वस्त धान्य दुकानात केली अज्ञात चोरटयांनी धान्याची चोरी पोलीसात गुन्हा दाखल

0

 

 

यावल येथील एका स्वस्त धान्य दुकानात अज्ञात चोरटयांनी दुकानातील धान्य चोरून नेल्याची घटना घडली असुन याबाबत दुकानदारांने पोलीसात तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल शहरातील म्हसोबा परिसरातील मेन रोडला असलेली यावल सहकारी ग्राहक भंडार दुकान क्रमांक१o८ यांच्याव्दारे संचलीत स्वस्त धान्य दुकानात दिनांक २५ जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरटयांनी दुकानाचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून सर्वसामान्य लाभार्थी नागरीकांच्या वितरणासाठी ठेवलेल्या धान्यातील पाच क्विटंल गहु अडीच क्विटंल मका असे भरडधान्य शासकीय किमत सुमारे चार हजार रुपये तर बाजार भाव किमत अंदाजीत१०हजार रुपये किमतीचे गहु तर सुमारे ३ हजार रुपये किमतीचा मका असे साहीत्य चोरीस गेले असुन , याबाबत दुकान संचालक केशव प्रल्हाद बढे यांनी यावल पोलीस तक्रार दाखल केल्याने अज्ञात चोरटयांच्या विरूद्ध चोरीचा गुन्हा नोदंविण्यात आला असुन , तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस करीत आहे .

वडाळी बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरी

0

 

प्रतिनिधी- सचिन पगारे
नांदगांव नाशिक

नांदगाव तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथील ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संघाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरी करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष डॉ सागर भिलोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.शिक्षक के.टी.पाटोळे व एस. टी.वाघ यांनी विद्यार्थीनींकडून राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन केले.उपाध्यक्ष मधूकरअण्णा नंद,सचिव पोपटरावजी कोरडे,संचालक नारायण जोरवर ,तूळशीराम पाटील, व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन बैरागी,पत्रकार सिताराम पिंगळे,व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.पी. सदगीर,पी.एस.डफाळ यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य एम. ए.वाघ यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी समस्त विद्यार्थी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रहार संघटनेकडून विशेष सत्काराचे आयोजन

0

 

प्रतिनिधी-सचिन पगारे
नांदगांव नाशिक

प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील सैन्यात नव्याने नियुक्त झालेल्या यूवकांचा जाहिर सत्कार करण्यात आला. येथील प्रहार संघटनेकडून या विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले.
नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरी करण्यात आला. गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच ग्रामपालिका येथे ही ध्वजारोहण करण्यात आले.तसेच या विशेष दिवसाचे औचित्य साधून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर येथे प्रहार संघटनेने सत्कार समारंभाचे आयोजन केले. या सत्कार समारंभासाठी नव्याने सैनिक म्हणून नियुक्त झालेले वैशाली वाल्मिक पवार व समर्थ विलास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.वैशाली पवार ही परिसरातील पहिली महिला सैनिक म्हणून ओळखली जात आहे. वैशाली पवार व समर्थ चव्हाण यांनी नुकतेच स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेत यश मिळवले आहे. यांचे विशेष कौतुक करण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेकडून या समारंभाचे आयोजन करण्यात आले.या समारंभाचे सुत्रसंचालन संदीप पवार यांनी केले. प्रहार संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सुर्यवंशी यांनी या दोघांचा सत्कार केला तसेच देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.नारायण पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रहार संघटना अध्यक्ष जनार्दन भागवत, चंद्रभान झोडगे,वैभव शिंदे,गणेश पवार, राहूल पवार, दिपक पगारे, सचिन पगारे,वाल्मिक वर्पे,भरत पाटील,अशोक पगारे,वाल्मिक पवार, विलास चव्हाण,गणेश जूंधरे आदी उपस्थित होते.

कोरोना लॉकडाऊन काळात,विद्युत ग्राहकाची फसवणूक केल्याबाबद ऊर्जा मंत्री श्री,नितीन राऊत व विद्युत कंपन्यांचे संचालक यांच्या वर विद्युत ग्राहक जनतेची फसवणूक केल्या बद्दल – फ़ोजदारी गुन्हा दाखल करा

0

 

 

अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य भर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे,

त्या अनुसंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया जिल्हयाच्या वतीने कोरोना काळात तीन महिन्याच्या लॉक डाऊन काळातील राज्यातील विद्युत ग्राहकांना अवास्तव अशी भरमसाठ वाढीव वीजबिल पाठविण्यात आले, वीज ग्राहकांना वीज बिला मध्ये दिलासा देण्याचा खोटा आश्वासन देऊन सर्व सामान्य जनतेला महिनो महिने झुलवत ठेवणे व त्यानंतर विद्युत ग्राहकांना वीज खंडित करण्याच्या धमक्या देऊन बेहिशोबी वीज बिल वसूल करणे हि केवळ राजकीय आश्वासनाची फसवणूक नाही तर वीज कंपन्यांशी संगमत करून करण्यात आलेली जनतेची आर्थिक लूट आहे,व फसवणूक करण्यात आली या करिता मा, राज साहेबा यांच्या आदेशाचे पालन करत गोंदिया जिल्ह्या तर्फे हि ऊर्जा मंत्री श्री,नितीन राऊत याच्या सह महावितरण कम्पनी प्रमुख अधिकारी यांच्या विरोधात फसवणूक व मानसिक आघात पोहोचविण्याचा फ़ोजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गोंदिया जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले,या प्रसंगी गोंदिया जिल्हा अध्यक्ष मनिष चौरागडे,जिल्हा अध्यक्ष हेमंत लिल्हारे,जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा,गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे,तिरोडा तालुका अध्यक्ष श्रीकांत ढबाले,गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे,तिरोडा तालुका अध्यक्ष फटींग क्षितिज वैध, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते,

अनेक तरुनांचा, महाराष्ट्र नवनिर्माण,सेनात,जाहीर, पक्ष,प्रवेश

0

 

सुनील, पवार, नांदुरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक,अध्यक्ष, माननीय, राजसाहेब, ठाकरे यांच्या विचाराशी, प्रेरित,होउन,तशेच,महाराष्ट्र च्या, नवनिर्माणासाठि,अनेक, तरुणाचा,मनशेत,जाहीर, प्रवेश,दि,26जानेवारी, प्रजाकसताक,दिनाचे, औचित्य साधून, स्थानिक,रेस्टहाउस,नांदुरा येथे,अनेकांचा,मनसे,सरचिटनीस, सहकार,विभाग,तथा,मनसे,शाडो,मंत्री विठलराव,लोखंडकार,जिल्हा, अथक्ष, मदनराजे,गायकवाड, यांच्या, सूचनेनुसार, म,न,रा,प,का,सेना, प्रदेश,सचिव, प्रदिप,गायकी, तालुकाध्यक्ष भागवत उगले, ता,उपा,काडेंलकर,या च्या, उपस्थितित,मनशे,शहर,अध्यक्ष, सागरजगदाळे,व,शहर संघटक, विशाल बगन,यांच्या नेतृत्वात,अनेक तरुनांचा, मनशेत,भव्य, पक्षप्रवेश,या,वेळी, थनंजय,देशमुख, गनेशअवचार,अकित,अवचार,भागवत,बगाडे,प्रशांत, साबे,सतोश,सोनवाल,आकाश,ईगळे,अजय,गोहर,,तमाम, मनशे सौनिक,व,पदाधिकारी, उपस्थित, होते

कोरोना काळात रक्तदान शिबिर घेऊन ८१ बॉटल रक्त रक्तपेढीला दिल्याबद्दल अमर पाटील यांचा सत्कार

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

कोरोना काळात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे सरकारने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत संभाजी ब्रिगेडच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त नांदुरा येथे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांनी त्यांचे सहकारी व मां जिजाऊ सावित्री विचारमंच मिळून रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात तब्बल ८१ बॉटल रक्तदान झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणत रक्तासाठी उपलब्ध करून शासकीय रुग्णालय खामगाव यांना सहकार्य केल्याबद्दल या कार्याची दखल घेत शासकीय रक्तपेढी खामगाव यांच्या मार्फत अमर रमेश पाटील यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

राष्ट्रीय सल्लागार पदी ऊर्मिलाताईं ठाकरे यांची नियुक्ती

0

 

खामगाव नुकतेच दि.२३-०१-२०२१ रोजी नाशिक येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी समाज कल्याण मंत्री मा.श्री.बबनरावजी घोलप
(नानासाहेब) यांनी खामगाव स्थित रहिवासी असलेल्या मुलूख मैदानी तोफ,वीरांगना झलकारीबाई राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त..अनेक शैक्षणिक,
सामाजिक,साहित्यिक पुरस्काराच्या राजश्री.. वनश्री ऊर्मिलाताईं ठाकरे यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ,महिला आघाडीच्या राष्ट्रीय सल्लागार पदी निवड केली आहे.
या अगोदर गेल्या दहा वर्षापासून त्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कार्यन्वित होत्या.गेल्या सव्वीस वर्षापासून त्या या चळवळीत कार्ये करित असून त्यांनी आपल्या
कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे.म्हणूनच मा.श्री.बबनराव घोलप उर्फ नानासाहेब यांनी त्यांच्या कामावर विश्वास टाकून संघटनेचे सर्वोच्च पद राष्ट्रीय सल्लागार पदी नियुक्ती करून गौरन्वित केले आहे.

या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.