Home Blog Page 551

न प जळगाव जामोद च्या शिक्षण समितीच्या सभापती पदी महाविकास आघाडीचे नगरसेवक मा श्री रमेश ताडे यांची निवड

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

स्थानिक न प सभागृहात दिनांक 21 जानेवारी 2021 रोजी पार पडलेल्या सभेत महाविकास आघाडीचे गटनेता तथा काँगेस कमिटी शहर अध्यक्ष अर्जुन घोलप यांनी रमेश ताडे यांचे नाव सुचविले तर नगरसेवक श्रीकृष्ण केदार यांनी अनुमोदन दिले.

 

ही बातमी नक्की पहा

https://www.suryamarathinews.com/post/8170

 

पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार मा शिवाजी मगर साहेब यांनी संख्याबळानुसार रमेश ताडे यांची शिक्षण समिती सभापती म्हणून घोषणा केली.

काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा राहूल भाऊ बोन्द्रे तसेच काँग्रेसच्या पक्षनेत्या मा डॉ सौ स्वातीताई वाकेकर, प्रदेश प्रतिनिधी मा रमेशचंद्र घोलप, जिल्हा उपाध्यक्ष मा प्रकाश पाटील,काँग्रेस नेते मा रामविजय बुरुंगले,महिला काँग्रेस अध्यक्षा मा ज्योतीताई ढोकने,

तालुकाध्यक्ष मा अविनाश उमरकर यांच्या सोबत तसेच आघाडीचे सर्व नगरसेवक यांच्यासोबत चर्चा करुन व शिवसेना गटनेते मा गजानन वाघ यांना माहिती देऊन अर्जुन घोलप यांनी उपरोक्त निर्णय घेतला व शिवसेना नगरसेवक रमेश ताडे यांचे नाव सुचविले.

सभेनंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवडीबद्दल जल्लोष केला तसेच शिवसेना तालुका प्रमुख तथा गटनेता गजानन वाघ यांनी आघाडी धर्म पाळल्याबद्दल काँग्रेस गटनेता अर्जुन घोलप तथा काँगेस चे सर्व नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

याप्रसंगी नगरसेवक श्रीकृष्ण केदार,नितीन ढगे, कलीम खा हुसेन खा,सौ चित्राताई इंगळे, ऍड संदिप मानकर व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शासनाने कोरोना काळातील वीज बिल माफ करावे.जनसाण्याचा अंत बघु नये.-गोपाल तायडे.

0

 

वैश्विक कोरोना महामारीमोळे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता शासनाला प्रतिसाद म्हणून सर्वसामान्य जनता ही घरी राहून व कुठल्याही कमावर्ती न जाता लोकडाऊन चे संपूर्ण पालन केले.

एक क्लिक वर बातमी पहा

https://www.suryamarathinews.com/post/8165

 

तसेच सर्वसामान्य जनता रोजगारावर न गेल्या मुळे आर्थिक संकटात सापळली होती.

अश्यातच वीज बिलात सवलत देण्याचे आश्वासन मा.नितीन राऊत
(ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य) यांनी दिले व्होते.

परंतु मध्यंतरी वीज बिलात कोणतेही सूट मिळणार नाही असे घूमजाव करीत. जनतेची दिशा भूल केली.

सध्या शेगाव शहरात महावितरण कंपनीने वीज बिल वसुलीची मोहीम हाती घेतल्या मुळे .

शेतकरी व सर्वसामान्य जनता धास्तावलीली आहे. ऊर्जा मंत्र्यांनी आपल्या आश्वासनावर कायम राहत शासनाने कोरोना काळातील सर्व सामान्यांचे वीज बिल माफ करावे. सर्वासामान्याचा अंत बघू नये.

वीज बिल माफ व्हावे करिता स्वाभिमानी शेतकरी संघटना वारंवार पाठपुरावा करीत असून शासनाने जनसंण्याच्या मांगणी मान्य करून त्वरित वीज बिल माफ करावे.

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथे ग्रामपंचायत सदस्य पळवापळवीच्या राजकारणाला वेग

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्रा प्रमाणे येत्या 27 जानेवारी रोजी ग्रामपंचायत सरपंच पदाचेआरक्षण जाहीर होणार आहे त्यानंतर दोन दिवसांनी महिला आरक्षणाची सोडत.

जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे परंतु सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्यांची पळवापळवी सुरू झाली आहे त्यामुळे अगदी समसमान जागा असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या गटाचा सरपंच होईल.

ही बातमी पण पहा

https://www.suryamarathinews.com/post/8165

 

याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे अशातच सूनगाव येथे भाजपा समरथीत पॅनलचे 8 व आघाडी समरथीत 8 असे सदस्य विजयी झाले.

व एक अपक्ष व अपक्ष सदस्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्याने आघाडीचा सरपंच होईल असे चित्र तयार झाले असतानाच आघाडी गटाचा एक सदस्य 15 जानेवारी रात्रीपासून भूमिगत असल्याची चर्चा आहे .

असे चित्र कमी-अधिक प्रमाणात अन्य ग्रामपंचायतीमध्ये ही सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर दिसणार आहे ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्याने हा पक्षांतराचा कायदा लागू होत नाही .

त्यामुळे एका गटाच्या सदस्यांनी दुसऱ्या गटाला सहकार्य केले तर त्याचे सदस्यत्व रद्द होत नाही त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर हे फोडाफोडीचे राजकारण पाचही वर्ष चालत राहणार आहे

अमरावती विभागातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र घा _ कुणाल ढेपे यांची मागणी _

0

 

 

सीईटी , बीबीए , एमसीए आवश्यक असलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्र साठी विद्यार्थ्यांना मध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे.

या प्रमाणपत्रा अभावी राज्य भारतील शेकडो विद्यार्थ्यांनावर उपरोक्त शाखेतील प्रवेशपसुन वाचिंत राहण्याची वेळ आली आहे तरी हे प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी कुणाल ढेपे यांनी केली.

आरक्षित जागेवर प्रवेश मिळावा यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांना अमरावती येथील जात पडताळणी विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो .

 

ही बातमी नक्की पहा

https://www.suryamarathinews.com/post/8162

 

या प्रमाणपत्रासाठी किमान 30दिवस किवा त्यापेक्षाही अधिक कालावधी लागतो .

त्यामुळे राज्य भारतील हजारो विद्यार्थ्यांचे प्रेवेश सादर प्रमापत्राअभावी थब्लेला आहे. विविध मुदतीच्या आत हे प्रेवेष दिले जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना कमी दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवणे शक्य नाही.

राज्यातील 99कॉलेज साठी 10 हजार 45 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरत होते .

परंतु जातवैधता डबयू . एस . प्रमाणपत्र वेळेत मिळाले नाही .त्यामुळे हजारो विद्यार्थी प्रेवेशा पासुन वंचित
राहणार असल्याची भीती व्यक्त होत आहे .

जात पडताळणी विभागाकडून हे प्रमाणपत्र प्रस्ताव सादर केल्या नंतर होत होत द्यावे अथवा उप्योगत्य शखे साठी प्रेवेश मुदतवाढ मिळावी अशी मागणी कुणाल ढेपे , शुभम आमडरे , यांनी सरकार कडे केली

सरपंच पदांचे महिला आरक्षणाची सोडत 29 जानेवारी रोजी काढणार

0

 

अजहर शाह मोताळा

बुलडाणा:- ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2020 ते 2025 दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या सरपंच पदांचे आरक्षण 27 जानेवारी 2021 रोजी तहसिल स्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार हे निश्चित करणार आहे.

 

बातमी आवश्यक पहा

https://www.suryamarathinews.com/post/8158

तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रीयांकरीता व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रीयांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 29 जानेवारी रोजी स. 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे.

तरी याबाबतची नोंद सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरीकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

नवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता- अहवाल सादर

0

 

 

भंडारा,दि.20ः- महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला चटका लावणारी घटना भंडारा जिल्हा रुग्णालयात घडली होती. 9 जानेवारी रोजी रुग्णालायतील नवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.

सुन्न करणारी घटना ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

त्या घटनेचा अहवाल तब्बल 11 दिवसांनी सादर झाला,तो सुध्दा दोन नर्सेसवर जबाबदारी सोपवून.

 

ही बातमी वर क्लिक करून पहा

https://www.suryamarathinews.com/post/8150

09 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयामधील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला होता.

या प्रकरणी सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात आली.

त्यांनी हा 50 पानांचा अहवाल सादर केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज घडना घडली त्यावेळी वर्तवण्यात आला होता. अहवालातही शॉर्ट सर्किटचाच उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच, दोन परिचारकांच्या बेजबाबदारपणामुळे आग लागल्याचे नमूद करण्यात आले आहे. ज्या दिवशी नवजात बाळांच्या अतिदक्षता युनिटमध्ये आग लागली होती.

तेव्हा तिथे कुणीही नव्हते. जर त्यावेळी युनिटमध्ये दोन्ही परिचारिका थांबल्या असत्या तर ही दुर्घटना घडलीच नसती, असे मत समितीने नोंदवले.

दुर्लक्ष करणाऱ्यांना शिक्षा होणारच- राजेश टोपे
याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री म्हणाले की, ‘रिपोर्टचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभागस्तरावर केली जाईल.

रिपोर्टच्या फायन्डींगच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणार्‍यांना शिक्षा होईलच यात शंका नाही मात्र ही सगळी सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासनही राजेश टोपे यांनी दिले.

ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खरात यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

0

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील कंडारी येथील नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खरात यांनी काँग्रेस पक्षावर तसेच काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला ।तसेच दुसऱ्यांदा सलग ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल .महिला व बालकल्याण सभापती ज्योती अशोकराव पडघन यांनी त्यांचा निवासस्थानी सत्कार केला ‘यावेळी सिंदखेडराजा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दरेगाव ग्रामपंचायत सदस्य राहुल भाऊ साबळे ।सिंदखेड राजा तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस समाधान काकडे इतर कार्यकर्ते यावेळी हजर होते !

सिंदखेडराजा तालुक्यामध्ये वीजचोरी करणाऱ्या ७७ जणांविरुद्ध महावितरणची धडक कारवाई .12 लाखाचा दंड वसूल !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा वीजचोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढले.

असून ही वीज चोरीअकोला येथील विशेष पथकाने महिनाभरात 77 जणांविरुद्ध कारवाई करत जवळपास 12 ते 13 लाखाचा दंड वसूल केला आहे सिंदखेड राजा तालुक्यात सह शहरात वीज चोरी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत असून नेहमी रोहित्रात बिघाड होत आहे ‘परिणामी महावितरण ज्यांच्याकडे मिटर आहे अशांना अंदाजी अव्वाच्यासव्वा बिल आकारते .

एक क्लिक वर पूर्ण बातमी

https://www.suryamarathinews.com/post/8147

वीज चोरी करणाऱ्या मुळे मीटर वाल्यांना त्रास सहन करावा लागतो ‘रोहित्र बिघडलं की गावात महिना महिना अंधार असतो

।त्यामुळे अकोला येथील विशेष पथकाने सिंदखेडराजा तालुक्यामध्ये धडक मोहीम हाती घेतली यामध्ये मीटरमध्ये छेडछाड करणे मेन लाइनवर अकोडा टाकणे ‘विविध प्रकारच्या वि चोरीच्या घटना.

अकोला येथील विशेष पथकाने उजेडात आनून ‘तालुक्‍यातील 77 जणांविरुद्ध कारवाई करून जवळपास 12 ते 13 लाखाचा दंड वसूल केला आहे यामध्ये शहरातील सहा वाइन बार ‘ लॉज या ठिकाणी कारवाई केली आहे विज चोरी करणे हा कायद्याने गुन्हा असून त्यामुळे विजेची चोरी न करता रीतसर मीटर घेऊन महावितरणला सहकार्य करावे असे आव्हान महावितरण तर्फे करण्यात आली आहे !

वीज चोरी करणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही ही मोहीम प्रत्येक गावात राबविण्यात येणार असून वीजचोरी करणाऱ्या लोकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असे सुद्धा महावितरण’ने सांगितले आहे !

साखरखेर्डा येथे दोन गटात हाणामारी , एक गंभीर जखमी

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

ग्राम पंचायत निवडणूक निकाल लागल्यानंतर १८ ला रात्री दोन गटात हाणामारी झाली असता एक गंभीर जखमी झाला आहे .

त्याला तातडीने चिखली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . दोन्ही गटातील परस्पर विरोधी तंक्रारीवरून पोलीसांनी गुंन्हा दाखल केला आहे .

साखरखेर्डा येथील शे . रशिद शेख निसार यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये तंक्रार दिली की , शे तौफिक शेख गुलशेर यासह आठ व्यक्तींनी घरात घुसून लाठ्या काठ्यांनी शे रशिद यास आणि पत्नी , बहीन यांना मारहाण केली .

या हाणामारीत शेख रशिद हा गंभीर जखमी झाला . त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने पोलीसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले .

परंतू मार जबर असल्याने डॉक्टरांनी तातडीने चिखली येथे हलविण्याचा सल्ला दिला .

काल १९ ला चिखली येथे जाऊन पोलीसांनी जबाब नोंदवला असता घरात घुसून मारहाण केली. आणि घरातील सामानाची नासधूस करुन कपाटातील ३५ हजार रुपये चोरुन नेल्याची माहिती शे . रशिद यांनी पोलीसांना दिली .

ही बातमी पण पहा आवर्जून

https://www.suryamarathinews.com/post/8143

त्याच्या जबाबावरुन पोलीसांनी आठ व्यक्ती विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत .

तर विरुध्द गटातील रिझवानाबी या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीसांनी शेख रशिद सह सात ते आठ व्यक्तींविरोधात विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत .

पुढील तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक दीपक राणे करीत आहेत .

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष – माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक

0

 

 

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांपैकी 5 हजार 721 ठिकाणी यश मिळवत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे.

तीनही सत्ताधारी पक्षांपेक्षा अधिक जागा मिळवत भाजपाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे, अशी प्रतिक्रिया माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी व्यक्त केली.

श्री. पाठक यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, 14 हजार 228 ग्रामपंचायतीपैकी 13 हजार 866 जागांचे निकाल हाती आले असून त्यापैकी भाजपाने 5 हजार 721 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

एक क्लिक वर दुसरी बातमी आवश्यक ओपन लिंक

https://www.suryamarathinews.com/post/8140

 

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निर्विवाद यश मिळवले होते.

त्याच यशाची पुनरावृत्ती यावेळी झाली आहे. भाजपाचे ग्रामीण भागातील वर्चस्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून पुन्हा सिध्द झाले आहे.

सत्तेत असलेल्या तीनही पक्षांनी एकत्रित निवडणुक लढवूनही त्यांना भाजपाच्या आव्हानांचा सामना करता आलेला नाही असेच हे निकाल सांगतात, असे श्री. पाठक यांनी पत्रकात नमूद केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ग्रामीण भागाच्या विकासासाठी आखलेल्या योजना तसेच मोदी सरकारने प्रत्यक्षात आणलेल्या अंत्योदयाची योजना यामुळे ग्रामीण भागातील जनतेने भाजपावर विश्वास प्रकट केला आहे असेही श्री. पाठक यांनी म्हटले आहे.