Home Blog Page 550

हिवाळी परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या यासाठी फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे जीवन चेके यांचे अमरावती कुलगुरूंना निवेदन !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

कोरोनाच्या महामारी मुळे संपूर्ण देशामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून ऑनलाइन शिक्षण हे राबवले जात आहे बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण देणे हे सुद्धा सुरू झालेले आहे ‘कोरोना सदृश्य पूरस्थितीचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णता संपलेला नाही सध्या तरी सर्वच महाविद्यालय हे ऑनलाईन शिक्षण पद्धती राबवत आहेत ।शाळा महाविद्यालय वर्षभरापासून बंद आहेत .त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर जास्तीत जास्त भर देण्यात येत आहे .हिवाळी परीक्षा तोंडावर आलेली आहे .अशातच अमरावती विद्यापीठाने मार्च महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन चालवले आहे .त्याला फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे जिल्हा संपर्कप्रमुख जीवन चेके यांनी विरोध दर्शवला आहे यासंबंधी त्यांनी प्र-कुलगुरू अमरावती राजेश जयपुरकर यांना रीतसर निवेदन दिले आहे !तरी अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्या याचा सारासार विचार करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेवटी फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे जिल्हा !संपर्कप्रमुख जीवन चेके यांनी दिला आहे !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लग्नपत्रिका घरोघरी न देता व्हाट्सअप वरून पाठवण्याचा नवीन फंडा !सोशल मीडियाचा पुरेपूर वापर !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मागील एक वर्षापासून कोरोना विषानू या जीवघेण्या महामारी मुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते .

ठरलेले लग्न हे लोकांनी रद्द केले होते तर काहींनी फक्त चार ते पाच लोकांच्या उपस्थितीत तोंडाला मास्क लावून हाताला सॅनिटायझर लावून लग्न लावले होते !

परंतु मागील महिन्यापासून लॉक डावून पूर्णतः खुले झाल्यानंतर कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक ठिकाणी लग्नसराईला सुरुवात झाली आहे .

 

दुसरी बातमी वर पण एक क्लिक

https://www.suryamarathinews.com/post/8209

 

अनेकांनी लग्नपत्रिका सुद्धा छापलेल्या आहे ‘परंतु सुरक्षितता म्हणून अजूनही नातेवाईक हे पाहिजे तसे फिरत नाहीत ।याचाच परिणाम म्हणून घरातील सदस्यांचे लग्नपत्रिका ह्या घरोघरी न देता !

समोरच्या व्यक्तीच्या व्हाट्सअप क्रमांकावरून त्यांना पाठवण्यात येत आहेत !हा नवीन फंडा सध्या चोहीकडे सुरू झाला आहे !व्हाट्स अप व फेसबुक वरून लग्नपत्रिका हे टाकल्या जात आहेत .

!कारण सोशल मीडियाचा जमाना आहे अनेक लोक हे पुरेपूर सोशल मीडियाचा वापर करतात आणि त्याचाच परिणाम म्हणून अनेक व्यक्ती ह्या लग्न पत्रिका व्हाट्सअप च्या माध्यमातून नातेवाईकांना पाठवितांना आपल्याला दिसत आहेत .

!परंतु व्हाट्सअप वरून पाठवलेली लग्न पत्रिकेला नातेवाईक मित्रमंडळी कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल !

नव्यानेच रुजु झालेल्या तहसीलदार कु.कोरे यांचा दणका, अवैध रेती माती वाहतूक करणाऱ्या मध्ये भरली धडकी.

1

 

 

अनिलसिंग चव्हाण

मुख्य संपादक

– तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध रित्या रेती ,माती वाहतुक चालू होती,.

याकडे महसुल विभागाचे दुर्लक्ष होते .त्यात निवडणुका असल्यने तर खुलेआम अवैध रेती ,मातीची वाहतुक सुरु होती.परंतु नव्यानेच रुजू झालेल्या तहसीलदार कु.कोरे यांनी आल्या आल्या आल्याच दखल घेवुन अवैध रित्या मातीने भरलेले ट्रॕक्टर पकडले.

 

ब्रेकिंग बातमी

https://www.suryamarathinews.com/post/8204

 

त्यामुळे अवैध रेती ,माती वाहतूक करणाऱ्यांमध्ये धडकी भरली.
वरवट बकाल येथे गेल्या एक महिन्या पासुन अवैध रेती व मातीची वाहतूक चालू होती तरी महसूल विभाग पथक कुंभकर्णी झोपेत होते ,

अखेर आज दि.२२/जानेवारी रोजी नव्यानेच रुजू झालेल्या तहसीलदार कु.तेजश्री कोरे यांना माहिती मिळाल्यावरुन त्यांनी दखल घेवून त्यांनी

ना.तहसीलदार प्रविणकुमार वराडे यांना सोबत घेवून पाहणी करण्या करीता गेले असता वानखेड शिवारातून अवैध मातीचे उत्खनन सुरु आहे.त्यावरुन रिंगणवाडी रोडवर मातीने भरलेले ट्रॕक्टर पकडले .

वृत्त लिहे पर्यंत ट्रॕक्टर मालकाचे व चालकाचे नाव समजले नाही.

कार्यवाही सुरु झाल्याने अवैध रेती माती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांमध्ये धडकी भरल्याचे समजते.आतातरी संबधीत पथकाने दखल घेणं आवश्यक असल्याची चर्चा सुरु आहे.

धक्कादायक घटना, जावयाने सासू वरच केला बलात्कार

0

 

एका महिलेस तुझ्या मुलीबरोबर माझ्या मुलाचा विवाह लावुन देतो, असे सांगून लग्नाचे अमिष दाखवून.

महिलेकडून १ लाख ६० हजाराचे सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज घेवून.

महिलेला विश्‍वासघात घेउन होणारा जावई पांडुरंग अंकुश खोरे याने घरात घुसून ४५ वर्ष वयाच्या सासू विवाहित महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरजस्ती बलात्कार केला.

या खळबळजनक प्रकरणी भिटेवाही परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षाच्या विवाहित महिलेने बेलवंडी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी पांडुंरग अंकुश खोरे, अंकुश खोरे, दोघे रा. काष्टी, ता. श्रीगोंदा व त्याच्या ओळखीचा एक अनोळखी इसम यांनी संगनमताने आरोपी ला साथ अंकुश खोरे हा पीडित महिलेस म्हणाला.

की, पांडुरंग अंकुश खोरे याच्याचरोबर तुमच्या मुलीचे लग्न लावून देतो, असे अमिष दाखवून पीडित महिलेकडून दागिने व रोकड असे मिळून ७ लाख १५ हजार रुपये घेतले.

 

 राजकारण बातमी कोण मारणार बाजी पहा

https://www.suryamarathinews.com/post/8181

पांडुरंग खोरे व अंकुश खोरे यांनी सदर महिलेस विश्वासात घेवून ते पेसे परत दिलेच नाही. दागिनेपण घेवुन गेले.

आरोपी नं. ३ हा घराच्या बाहेर उभा राहिला व आरोपी पांडुरंग अंकुश खोरे हा महिलेच्या घरात घुसला व ४५ वयाच्या महिलेकडून शरीरसुखाची मागणी करून.

तिला बळजबरीने झोपण्याच्या खोलीत नेवून तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्त बळजबरीने बलात्कार केला व तू कोणाला काही सांगितले तर तूझ्या कुटुंबाला जिवे ठार मारून टाकील, असे धमकी दिली.

या सर्व प्रकरणाची चौकशी करून आरोपी ने अशी धमकी दिली. ४.६.२०१८ त्यानंतर एक महिन्याचे काळात व १७.१.२०२१९ च्या रात्री ८ च्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला.

याप्रकरणी पिडील महिलेने काल बेलवंडी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी पांडुरंग अंकुश खोरे, अंकुश खोरे व एक अनोळखी अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या सर्व प्रकारची चौकशी सुरू केली आहे ही घटनाने गावात चर्चा होत आहे

दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा अन्यथा रस्त्यावर उतरू – ऋषिकेश म्हस्के

0

 

दि. 20 जानेवारी ला जिल्हा नियोजन समिती सभागृहात मा.अप्पर जिल्हाधिकारी गीते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा.सुनील शेळके साहेब.

उपजिल्हाधिकारी(पुनर्वसन) आणि नितीन सुपेकर साहेब मा.अधीक्षक अभियंता बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलडाणा यांच्या उपस्थितीत तातडीने एक बैठक बोलविण्यात आली.

 ही बातमी नक्की पहा

https://www.suryamarathinews.com/post/8188

गोर गरीब शेतकऱ्यांनाच्या जमिनीचे भूसंपादन होऊन देखील त्यांना मोबदला अदा करण्यात आला नाही.
गेल्या 17 ऑगस्ट 2020 रोजी मा.अधीक्षक अभियंता बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलडाणा यांच्या दालनात खडकपूर्णा प्रकल्प विभाग.

देऊळगाव राजा अंतर्गत गांगलगाव वितरीकेवरील संबंधित कास्तकार यांच्या मागण्या विभागीय स्तरावरुन पूर्ण न झाल्यामुळे मा.अधीक्षक अभियंता यांच्या दालनात.

ऋषिकेश म्हस्के व संबंधित कास्तकार यांच्यासोबत दुपारी 1:00 वाजेपासून तर रात्रीच्या 11:00 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले.

संबंधित कास्तकार यांच्या मागण्या आम्ही विविध कालावधीत पूर्ण करून असे आश्वासन/करावयाची कार्यवाही पत्र मा.अधीक्षक अभियंता यांनी दिले व आंदोलन माघे घेऊन सांगता करण्यात आली.

त्यानंतर 6 महिने होऊन सुद्धा हे काम पूर्ण झाले नाही .
त्या कामाचा पाठपुरावा करण्यास गेल्या नंतर मा.अधीक्षक अभियंता उडवा उडवी चे उत्तर देतात.

हे माझं काम नव्हे ते कार्यकारी अभियंता यांचे कार्य आहे मला काय एवढं काम आहे का आमच्याकडे मनुष्यबळ नाही.

त्यानंतर दि 15 डिसेंम्बर ला दुपारी 3 वाजेपासून तर 7 :33 वाजेपर्यंत सहायक अभियंता खडकपूर्णा प्रकल्प चिखली यांच्या कार्यालयात ठिय्या देऊन होते.

ही बाब मा.पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी लक्ष्यात घेऊन काही मुद्याचा निपटारा करण्यात आला.

झालेल्या बैठकीत ऋषीकेश म्हस्के यांनी शेतकऱ्यांची बाजु मंडळी आणि 15 फेब्रुवारी ला उर्वरित शेतकऱ्यांचे कामे मार्गी लागतील असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

तसेच उर्वरित कामाचे निवेदन यावेळी ऋषीकेश म्हस्के व शेतकऱ्यांनी सादर केले.

15 फेब्रुवारी पर्यंत कामे पूर्ण न झाल्यास त्रिव आंदोलन करण्यात येईल अशा इशारा ऋषिकेश म्हस्के यांनी दिला.

यावेळी मा.अप्पर जिल्हाधिकारी गीते साहेब तसेच मा.सुनील शेळके साहेब उपजिल्हाधिकारी(पुनर्वसन) आणि नितीन सुपेकर साहेब मा.अधीक्षक अभियंता बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलडाणा,मा.संत साहेब व संबधीत सर्व अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थी सेना शेंदुर्जन सर्कल पदी आकाश आव्हाळे यांची नियुक्ती !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

शिवसेना प्रणित विद्यार्थी सेना शेंदुर्जन सर्कल पदी तालुक्यातील सायाळा येथील येथील आकाश आव्हाळे यांची नियुक्ती 19 जानेवारी रोजी विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख सागर समुद्रवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली !शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे .व विद्यार्थी सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना खासदार प्रतापरावजी जाधव ‘व आमदार डॉ . संजयजी रायमुलकर माजी आमदार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर व युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश रामदास आव्हाळे यांची विद्यार्थी सेना विभाग प्रमुख शेंदुर्जन सर्कल पदी नियुक्ती करण्यात आली !नियुक्तीपत्र देताना विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख सागर समुद्रवार ‘आदित्य काटे ‘ विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख कामरान भाई ‘शाळा माझी सरपंच रामदास भाऊ आव्हाळे सोपान आव्हाळे गोपाल आव्हाळे सचिन आवळे स्वप्निल काटे आदी पदाधिकारी उपस्थित होते ।

रोड रोलर नादुरुस्त असल्यामुळे शिंदी – साखरखेर्डा खड्डे बुजवण्याचे काम एका आठवड्यापासून बंद

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

अतिशय महत्त्वाच्या अशा व संपूर्णपणे उखडून गेलेल्या शिंदी ते साखरखेर्डा रस्त्याचे कामगेल्या आठवडा भरापासून रोड रोलर नादुरुस्त असल्यामुळे बंद आहे.

साखरखेर्डा ते रताळी फाटा पर्यंतच खड्डे बुजवण्याचे काम झालेले असून खड्डे बुजवले नंतर त्यावर चूर टाकले.

  बातमी तेच जे सत्य आहे एक क्लिक वर पूर्ण बातमी

https://www.suryamarathinews.com/post/8188

 

 

जातोहा चूर टाकल्यानंतर दुचाकीस्वारांना गाडी स्लिप होण्याचा मोठा धोका असतो.

साखरखेर्डा ते शिंदे भारुड पूर्णपणे झाला असून त्यावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते परंतु आठवडा भरापासून रोडरोलर रस्त्याच्या बाजूला उभे असून ते नादुरुस्त आहे.

असे सांगण्यात येत आहे ‘त्यामुळे शिंदी ते साखरखेर्डा खड्डे बुजवण्याचे काम कासवगतीने सुरु आहे.

काम करणारे मजूर याचे सुद्धा दुसऱ्या कामावर स्थलांतरित करण्यात आले आहे.

आता नेमके काम कधी सुरू होणार हा प्रश्न दुचाकी वाहन धारक विचारत आहेत !

सततच्या नापिकीला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून बाळसमुद्र येथील युवा शेतकरी रामेश्वर मेरत यांनी 20 जानेवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील बाळ समुद्र येथील रामेश्वर मेरत त्यांच्याकडे सहा एकर शेती आहे शेती मशागतीसाठी त्यांनी व इतर लोकांकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतली आहे.

 ही बातमी पण पहा एक क्लिक

https://www.suryamarathinews.com/post/8184

 

परंतु सततच्या अतिवृष्टी तसेच पिकांचे होणारे नुसकान यामुळे पाहिजे तसे उत्पन्न होत नव्हते त्यामुळे कर्ज आणखीनच वाढत गेलं अशातच निराश होऊन त्यांनी 16 जानेवारीला विषारी औषध प्राशन केले होते .

त्यांना तातडीने बुलढाणा येथे दवाखान्या मध्ये दाखल केले होते तेथे उपचार सुरू असताना 20 जानेवारी रोजी दुपारी रामेश्वर मेरत त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यांच्या पश्चात त्यांच्या पाठीमागेआई वडील पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.

अतिशय चांगल्या स्वभावाचा रामेश्वर निघून गेल्यामुळे मित्र परिवारामध्ये हळहळ व्यक्त होत आहे !

रोही समोर आल्यामुळे त्याला वाचवण्याच्या नादामध्ये बस रस्त्याच्या कडेला !सुदैवाने चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

कै .विजय मखमले विद्यालय मलकापूर पांग्रा जवळ दिनांक 21 जानेवारी च्या सकाळी सात वाजेच्या सुमारास लोणार -खामगाव – एम एच – ४० – ८६७८ ही बस खामगाव कडे जात असताना.

अचानक समोर रोही आल्यामुळे रस्त्याच्या उजव्या बाजूला कलंडली ‘रोहिला वाचवण्याच्या प्रयत्नात मध्ये ही बस वाहन चालक यांच्या सतर्कतेमुळे बाजूला कडेला कलंडली.

मोठी बातमी फक्त एक क्लिक वर

https://www.suryamarathinews.com/post/8181

 

 

वाहन आतमोहम्मदयांनी शर्तीचे प्रयत्न करूनही बस कडेला गेली तरीही वाहनचालकाने शर्तीचे प्रयत्न करून बसवर नियंत्रण मिळवल्याने बस आणि बसमधील प्रवाशांना जास्त गंभीर मार लागला नाही.

किरकोळ मार लागला !वाहन चालक मोहम्मद आणि वाहक विशंभर रामकृष्ण निकले हे लोणार -खामगाव बस ने खामगाव कडे निघाले होते.

यामध्ये 14 प्रवासी प्रवास करत होते ।प्रवाशांना किरकोळ मार लागला असून त्यांना तातडीने मलकापूर पांग्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले.

यामध्ये वाहन चालकासह -सुमेध शेजुळे वय १९(‘ बिबी ) -सीमा रवींद्र मूळवकर वय 32 (बिबि )रवींद्र राधाकिसन मुळवकर 3५ बिबि )लता भाऊराव बरबळे वय ४२ बिबी ) एकनाथ मुळे ‘ 62 बिबि )कांताबाई गाईत ६० बिबि )यांच्यासह अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले.

जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मलकापूर पांग्रा येथे नेण्यात आलेव त्यावर उपचार करून त्यांना दुसऱ्या बसची व्यवस्था करून रवाना करण्यात आले.

सुदैवाने मोठी दुर्घटना यावेळी तळणी परंतु या निमित्ताने मलकापूर पांग्रा ते दुसरबीड पर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून ते बुजवण्याचे काम सुद्धा करणे गरजेचे आहे

सरपंच पदासाठी आतापासूनच रस्सीखेच !सरपंच पदाच्या आरक्षण सोडत कडे लक्ष !साखरखेर्डा कडे सर्वांचे नजरा !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

नुकताच 18 जानेवारीला सिदखेडराजा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल लागला अनेक ठिकाणी तरुण उमेदवारांना मतदारांनी संधी दिलीतर काही ठिकाणी अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले.

निकाल लागल्यानंतर अनेक ठिकाणी आपले आणण्यासाठी स्थानिक नेत्याला यश आले आहे ‘ सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या व अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथे परिवर्तन पॅनलचे 17 पैकी 16 सदस्य निवडून आले आहेत .

आता यामध्ये नेमकी सरपंच पदाची माळ साखरखेर्डा गावची कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल !अगोदरच्या सोडत मध्ये साखरखेर्डा सरपंचपद हे सर्वसाधारण .

ही बातमी पहा एक वर सविसर

https://www.suryamarathinews.com/post/8176

आरक्षित होते परंतु त्यानंतर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण ठरवण्यात येईल असा निर्णय ग्रामविकास मंत्री यांनी घेतला होता .

!सध्या साखरखेर्डा येथून सरपंच पदाच्या दावेदार साठी जातीय समीकरण याचा विचार केला तर माळी समाजा साठी अजून पर्यंत सरपंचाची माळ त्यांच्या गळ्यात पडली नाही.

!जर शिंगणे साहेबांनी ठरवलं तर श्रीमती कौशल्याबाई मंडळकर .ह्या पहिल्या टर्ममध्ये सरपंच होऊ शकतात !दुसऱ्या बाजूने अल्पसंख्याक समाजाचा विचार केला.

तर ‘ज्येष्ठ कार्यकर्ते सय्यद ‘दाऊद सेट कुरेशी ‘यांचाही विचार होऊ शकतो ‘तर दुसऱ्या बाजूने आतापर्यंत असे घडले नाही.

असे रावसाहेब देशपांडे हे सुद्धा सरपंच पदाचे दावेदार असू शकतात.

शेवटी आरक्षणाच्या सोडती नंतरच निर्णय होऊ शकेल !मात्र सध्या सरपंचपदासाठी प्रत्येक गावामध्ये बिल्डिंग लावणे सुरू झाले आहे !