Home Blog Page 553

संग्रामपूर तालुक्यात अवैध्य. रेती तस्करी जोमात , तर महसुल प्रशासन कोमात,,

0

 

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा,,परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात खुले आम अवैद्य रेती वाहतूक सुरू असून महसूल.विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष्य असल्याचे चित्र दिसुन येत आहे. त्यामुळे रेती तस्करी जोमात तर महसुल विभाग कोमात असे म्हणावयास काही हरकत नाही .
काकनवाडा परिसरातील नदीपात्रात दररोज तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील किमान पंधरा ते वीस वाहने
बिनधास्त दिवसा ढवळ्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक सुरू असून महसूल विभागाचा लाखोंचा महसूल बुडत असून महसुलचे काही संबंधित अधिकारी ,कर्मचारी मुद्दाम डोळेझाक करीत असुन स्वतःचे भलं तर करुन घेत नाही ना?. रेती तस्करांची ही एवढी फिल्डींग लागलेली असते की,एखादे वेळी अधिकारीला कोठून जर निरोप आला की,रेती वाहने नदीपात्रात वाहने आली .तर लगेच धाड टाकनाऱ्याचे अगोदरच सर्व वाहने पसार होतात.त्यामुळे पथक नियुक्त करुनही कुचकामी ठरले आहेत. बरेच वेळा तहसील कार्यालयात वाहन जमा करण्यासाठी आणतांना तेही पसार होते. तरी याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे,. सूर्या मराठी न्युज साठी अनिलसिंग चव्हाण सह निलेश चिपडे संग्रामपूर, बुलढाणा

ठाकरे सरकार शेतकऱ्यां कडे लक्ष द्या.- बाळराजे जाधव.

0

 

गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे

गेवराई तालुक्यात या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे कापसाचे चांगले उत्पादक आले आहे. परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकूळामुळे शेतातला कापूस घरात आणला. दमदार पावसामुळे कापूस ही जोमात आला होता. यामुळे शेतकरी राजाने वेळोवेळी औषध फवारणी करत मशागत केली होती. परतीच्या झालेल्या पावसामुळे आलेले कापसाचे बोंड शेतातच सडत होते. तर फुटलेल्या कापसाच्या जागेवरच वाती होत होत्या . अशा परिस्थितीतही शेतकर्यांनी कसे बसे कापूस वेचून घरात आणला आहे. बहुतांश लोकांच्या घरात कापूस आहे. त्यांनी आता जिनिगंला कापूस नेत आहेत. परंतु तिथे चार ते पाच दिवस काडकडीच्या थंडीत मुक्काम करावा लागत आहे. शेतकर्यांचे अजून असे किती दिवस चालणार या वर ठाकरे सरकार कधी लक्ष केंद्रित करणार असा प्रश्न शेतकरी राजा ला निर्माण होत आहे.
मुख्यमंत्री साहेब आपल्या सि.सि.आय वर आमचे शेतकरी राजा कापुस आणतात तर शेतकऱ्यांना सि.सि.आय वर चार.पाच दिवस मुंकामाला थंडीत थांबावे लागतात त्यांना जेवन वेळेवर भेटत नाही . एक तर दोन ते तीन जिनिंगाना सि.सि.आय ची परवांगी द्या नसता त्याना दोन टाईमाचा जेवण द्या.आसा ईशारा गेवराईचे तालुका प्रमुख रयत शेतकरी संघटना बाळराजे जाधव यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सागितले

ग्रामपंचायत निवडणूकीचे चित्र स्पष्ट; 9664 उमेदवार रिंगणात

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

27 ग्रामपंचायतीमध्ये 95 सदस्यांची अविरोध निवड

बुलडाणा दि. 5 जानेवारी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी काल 4 जानेवारी रोजी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख होती. त्यानुसार जिल्ह्यामध्ये काल 4 जानेवारी रोजी 3007 उमेदवारांकडून 3104 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. या माघारीनंतर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले असून ग्राममपंचायतीसाठी 9664 उमेदवार निवडणूकींच्या रिंगणात आहेत. मात्र जिल्ह्यात निवडणूकीला फाटा देत 27 ग्रामपंचायतींमध्ये अविरोध सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या 27 ग्रामपंचायतींमध्ये 95 सदस्य अविरोध निवडून आले आहेत.
जिल्ह्यात अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 527 ग्रामपंचायतींसाठी 13 हजार 320 उमेदवारांकडून 13 हजार 609 अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी झालेल्या छाननीमध्ये 179 उमेदवारांचे 210 अर्ज नांमजूर करण्यात आले. छाननीअंती बाद झालेल्या अर्जानंतर 13 हजार 141 उमेदवारांचे 13 हजार 399 अर्ज शिल्लक आहेत. सध्या माघारीनंतर 9 हजार 664 उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. सर्वात जास्त 1387 उमेदवार खामगांव तालुक्यात असून अर्ज 1405 आहेत. बुलडाणा तालुक्यात 1171 उमेदवार, चिखलीमध्ये 1110, दे. राजा तालुक्यात 262, सिं. राजामध्ये 610, मेहकरमध्ये 795, लोणार तालुक्यात 301, शेगांव तालुक्यात 635, जळगांव जामोदमध्ये 456, संग्रामपूर तालुक्यात 574, मलकापूरमध्ये 581, नांदुरा तालुक्यात 776 व मोताळा तालुक्यात 1006 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे प्राचार्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

0

 

 

आयुषी दुबे शेगाव

शेगांव : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या अम्रपाल भिलंगे नामक विद्यार्थ्याला त्याची संस्थेत असलेली मुळ कागड़पत्र हवी होती. तो ती मागण्यांसाठी प्राचर्याकडे गेला असता तेथील महिला प्राचार्या राजश्री पाटिल यांनी त्याला , ” आताच माझ्यासमोर जीव दे , पुन्हा तोंड दाखवू नको व जाउन मुख्यमंत्र्याना सांग ही बाई मला शिव्या देते…! ” अस म्हणून अपमानित केल होत . परवा या घटनेचा व्हिडिओ समाज मध्यमात व्हायरल झाला होता. आज प्रहार संघटनेने शेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेश द्वारासमोर प्राचार्या च्या प्रतीकात्मक पुतल्याची तिरडी बनवून प्रवेशद्वारा समोरा प्राचार्याच्या प्रतिमेच दहन करण्यात आल. यावेळी प्राचार्य राजश्री पाटिल यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली.

महिला शिक्षण दिन “साविञी जयंती ऊत्सव ” पांगरी येथे मोठ्या ऊत्साहात साजरा.

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

3 डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच महिला शिक्षक दिन हा बुलढाणा जिल्ह्यातील पांगरी येथे साजरा करण्यात आला
*कोरोना काळात ज्या अंगणवाडी महीला सेविका, तसेच आशा वर्कर महिलांनी, आपल्या जिवाची पर्वा न करता,*
*घरोघरी जावुन लोकांच्या आरोग्याची माहिती जमा केली.*
*अश्या महिलांचा,* *आणि* *डॉ.राजेश्वर उबरहंडे सर,*
*यांनी मेडीकल कॉलेज कोरोना रुग्नांसाठी दिले.*
*त्याबद्दल त्यांचा सुद्धा “कोविड योद्धा” म्हणुन,*
*महात्मा फुले जंयति ऊत्सव समिति पांगरीच्या वतिने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.*

*तसेच शैक्षणिक क्षेत्रात विषेश गुण मिळवलेल्या विद्यार्थाचा ,शाल,पुष्प व आर्थिक मदत देऊन सत्कार करण्यात आला.*

*नवजात मुलिच्या जन्माचे स्वागत करण्यात आले.*

*संगित खुर्चीमध्ये विजेत्या* *महिलांना महिला आर्थिक* *विकास महामंडळ बुलढाणा* *अंतर्गत लोक संचालीत केंद्र* *धाडच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.*

*कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान*
*अनिताबाई प्रताप पवार (कोविड योद्धा)*
*यांनी स्विकारले.*

*सर्वप्रथम डॉ.राजेश्वर उबरहंडे* *सर व प्रमुख वक्ते* *प्रा.सचिन खरे सर यांनी माता* *सावित्रींच्या प्रतिमेसमोर* *दिपप्रज्वलन करुन अभिवादन केले.*

*कु.शिवानी विष्णु पवार व कु.कोमल विष्णु पवार यांनी सुंदर आवाजात स्वागतगीत म्हटले तर ताराबाई विष्णु पवार यांच्या सावित्री वंदन गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.*

*सावित्रीच्या वेशामध्ये आलेल्या लहान मुली व महिलांचा सत्कार करण्यात आला.*

*प्रा.सचिन खरे सरांनी*
*माता सावित्रींचा संपुर्ण इतिहास* *आपल्या प्रबोधनातुन सांगितला.*
*तसेच,*

*डॉ.राजेश्वर उबरहंडे सर,*
*छायाताई जाधव,*
*डॉ.अशोक* *पवार,*
*शाहीर रुस्तुम गवई,*
*यांनी* *सुद्धा आपले विचार व्यक्त केले.*

*उपस्थित महिलांनी व लहान मुलींनी सुद्धा माता सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल* *विचार व्यक्त केले.*

*कार्यक्रमाचे प्रास्ताविक,*
*विष्णु पवार यांनी केले.*

*कार्यक्रमाचे सुञसंचालन* *रत्नदिप हिवाळे* *यांनी केले.*
*तर*
*आभार प्रदर्शन सचिन सरकटे यांनि केले.*

*सदर कार्यक्रमासाठी डॉ.राजेश्वर उबरहंडे यांनी २५००रु.,तर बबन सावंत यांनी ११०० शे रु.देणगी दिली.*

*सदर कार्यक्रम संपुर्ण दिवसभर*
*भरपुर महिलांच्या तसेच* *गावातील,*
*सिद्धार्थ* *हिवाळे,*
*विनोद* *गवई,*
*शेषराव गवई,*
*कैलास* *पवार,*
*परमानंद गवई,*
*बुद्धेश्वर* *गवई,*
*नारायण पवार,*
*रविकांत* *पवार,*
*शरदचंद्र पवार,*
गणेश पवार,
उद्धव पवार,इत्यादिंच्या उपस्थितीत अत्यंत**हर्षोउल्हासात अगदि आनंदात ,”महिला शिक्षण* *दिन”,”महीला मुक्ती दिन”* *सावित्रीजयंती**उत्सव दिवस म्हणुन साजरा झाला.

सुनगाव ग्रामपंचायत साठी आलेल्या 50 अर्जापैकी 7 अर्ज माघार

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत17 सदस्य असणारी ग्रामपंचायत आहे 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये सुनगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण सहा वॉर्डसाठी येथील पन्नास उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते व त्यांची छाननी करून 50 चे 50 हीअर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी पात्र केलेले आहेत व येत्या चार तारखेला या उमेदवारांमधून किती उमेदवार अर्ज मागे घेतात व किती उमेदवार 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी रिंगणात 43 उमेदवार राहणार आहेत व 7 उमेदवारांनी माघार घेतली आहे

सैनिकाचा सेवानिवृत्ती समारोह जातेगांव येथे उत्साहात साजरी .

0

सचिन पगारे
मो.९९२२७८३४२१
नांदगांव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील जवान हवालदार दादा तुकाराम पेहरकर यांचा सेवानिवृत्ती समारोह उत्साहात संपन्न झाला .
भारतीय सैन्यदलात सेवेत राहून विविध आव्हानांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे शूरवीर,देशप्रेमी आपले जवान भारतमातेचे भूषण आहेत,असे हे जवान त्या-त्या गावचा अभिमानच असतात.
नांदगाव तालुक्यातील ‘फौजींचे गांव’ म्हणून ओळख असलेल्या घाटमाथ्यावरील जातेगांव येथील भुमीपुत्र जवान
हवालदार दादा तुकाराम पेहरकर हे आपल्या २६ वर्षांच्या लष्करीसेवेनंतर निवृत्त झाले. जवान दादा पेहरकर हे सन २४ डिसेंबर १९९४ मध्ये भारतीय सैन्यदलातील आॅर्डिनन्स फॅक्टरी मध्ये दाखल झाले होते. आपल्या २६ वर्षांच्या यशस्वी सेवेनंतर ते आपल्या जातेगांवी परतले.
गावातील आजी -माजी सैनिकांच्या मार्गदर्शनातून देशभक्तीमय गीतांत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील तमाम नागरिकांनी त्यांचे औक्षण व सत्कार करून भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सेवापूर्ती समारोहाचे आयोजन गावातील श्रीविठ्ठल- रुक्मिणी मंदिरात करण्यात आले. गावातील ग्रामपालिका कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार केला . तसेच उपस्थित आजी – माजी सैनिकांचा देखील सत्कार ग्रामस्थांकडुन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पवार यांनी केले. आहेर सर, संदीप पवार, विजय पाटील , गुलाब चव्हाण, सोपान खिरडकर यांनी आपले मत व्यक्त करत जवान दादा पेहरकर यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या .आजी-माजी सैनिकांनीही त्यांना सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या. या सेवापूर्ती समारोहात गावातील लष्करी व पोलिस दलातील कार्यरत जवान, शिक्षकवर्ग, व्यापारी, तरुणवर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून शिंदी येथे महिलांसाठी उद्योग कार्यशाळा संपन्न 

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि याच जयंती निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विविध कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करत असतात ‘असेच सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदे या गावी सावित्रीबाई फुले व महिला शिक्षक दिन याचे औचित्य साधून शिंदी येथील पत्रकार सचिन खंडारे व अजय खंडागळे यांनी महिलासाठी मोफत उद्योग कार्यशाळा आयोजित केली होती ‘या कार्यशाळेमध्ये बचत गटाच्या महिला तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण उपस्थित होते ‘यावेळी सर्वप्रथम शिंदी गावचे ग्रामसेवक अर्जुन गवई तसेच सरपंच विनोद खरात मुंगसाजी अर्बन शाखा अधिकारी नितीन डाखोरे महिला बचत गटाच्या अध्यक्षा स्वाती विनोद मार्के यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन केले .यानंतर उपस्थित असलेले ग्रामसेवक अर्जुन गवई यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व महिलांच्या बचत गटाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहील अशी ग्वाही दिली !यानंतर सरपंच विनोद खरात तसेच मुंगसाजी अर्बन शाखा अधिकारी नितीन डाखोरे यांचे सुद्धा थोडक्यात भाषणे झाली .त्यानंतर उद्योग कार्यशाळेचे मार्गदर्शक अविनाश खिल्लारे व तसेच उमेश खारडे यांनी उद्योगा बाबत मार्गदर्शन केले तसेच कोणते उद्योग महिलांच्या फायद्यासाठी आहेत कोणते उद्योग महिलांच्या तोट्या साठी आहेत याचे सविस्तर मांडणी त्यांनी या वेळी केली ‘त्यानंतर कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर प्रमुख पाहुणे असलेले मुंगसाची सरपंच शाखाधिकारी नितीन डाखोरे सरपंच विनोद खरात तसेच अकोला येथील तरुण उद्योजक मयूर घुसरकर ।मेहकर चे सचिन जोशी ‘यांच्या हस्ते उपस्थित कार्यशाळेतील महिलांना व तरुणांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले ‘यावेळी महिलांसाठी चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती ‘कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन खंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन पवन गवई यांनी केले ‘कार्यक्रम यशस्वीतेसाठी ‘महिला बचत गटाच्या स्वाती विनोद मारके ‘शुभम खंडारे रतन खंडारे अजय खंडागळे ‘गजानन गवई ‘संतोष बंगाळे ‘सुनील वायाळ ‘विजय भालेकर ‘प्रवीण मोरे ‘सुरेश यरमुले ‘आदींनी परिश्रम घेतले ‘

हिवरा आश्रम येथील अंगणवाडी मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला यांनी 3जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती हा महिला शिक्षक दिन म्हणून साजरा केला गेला ‘मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील अंगणवाडी क्रमांक एक मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली ‘सर्वप्रथम हिवरा आश्रम येथील प्रवेशिका सौ लोंढे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे रीतसर पूजन केले .यानंतर त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात मध्ये महिलांनी आपले कर्तव्य पार पाडावे व तत्परतेने कामे करावी असे मार्गदर्शन केले ‘यावेळी अंगणवाडी सेविका संगीता मोरे केंद्र क्रमांक तीन नीता जागृत ‘ मीरा ठाकरे व इतर महिला उपस्थित होत्या ।

ग्रामपंचायत कार्यालय पातुर्डा बु.येथे स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या

0

 

 

ग्रामपंचायत कार्यालय पातुर्डा बु.येथे स्त्री शिक्षणाचा पाया

रचणाऱ्या
भारतातील पाहिल्या शिक्षिका,समाज सुधारिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्‍या
“क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले” यांची जयंती “महिला शिक्षक दिन” निमित्त गावाच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई प्रकाशराव भोंगळ यांच्या हस्ते क्रांतिज्योति यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून यांच्या विचार,कार्य-कृतीला विनम्र अभिवादन करण्यात आले.उपस्थित सौ.संगीताताई गाडे,सौ.निर्मलाताई पुंडे,श्रीमति.भीमाबाई वानखडे,अन्सार पठाण,दिनकर इंगळे,विनायक चोपड़े, नीलेश चांडक, बबनराव डीखोलकर,सुनील इंगळे, राजू मांडवगडे हे ग्रा प सदस्य.ग्रामविकास अधिकारी मेहेंगे साहेब.संजय सातव,विलास इंगळे,लियाकत,विठ्ठल इंगळे,सुधाकर इंगळे,श्रीकृष्ण आमझरे, ज्ञानेश्वर पवार सर्व ग्रा प कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.*
*महाराष्ट्र शासनाने क्रांतीज्योती यांचा जन्मदिवस हा “महिला शिक्षण दिवस” म्हणून साजरा करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतल्यामुळे ग्रामपंचायत पातुर्डा यांनी ठराव घेऊन महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले.भविष्यात अशाच पद्धतीने क्रांतिज्योती व क्रांतीसुर्य या दाम्पत्यांना भारतरत्न देण्याची मागणी ग्रा प ठरावातून करण्यात आली.*