Home Blog Page 556

साखरखेर्डा येथील बाजार शुक्रवार ऐवजी गुरुवार लाच ‘शुक्रवारी होणार मतदान!

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे !
विदर्भातील तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि यासाठीच प्रशासनाने त्याच दिवशी असणारा आठवडी बाजार रद्द करून त्याऐवजी गुरुवार लाच आठवडी बाजार भरणार आहे ।शुक्रवार ला असणारा आठवडी बाजार हा रद्द होणारच अशी शंका भाजीपाला विक्रेते यांनी वर्तवली होती ।त्यामुळे भाजीपाला विक्रेते फळविक्रेते यांना गुरुवारी आपले दुकान मांडावी लागणार आहेत ।साखरखेर्डा हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव आहे या ठिकाणी होणारी निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार आहे त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला आहे ।साखरखेर्डा हे गाव सर्वात मोठी असल्यामुळे आसपासची 35 ते 40 खेडे या गावची जोडलेली आहेत त्यामुळे अनेक खेड्यापाड्यातील लोकांचा कामानिमित्त रोज साखरखेर्डा येथे येणे-जाणे असते !

टूनकी येथे खुलेआम रेती तस्करी सुरूच कारवाई मात्र शून्य , महसुल विभागाचा साफ दुर्लक्ष

0

 

(सुर्या मराठी न्युज ब्युरो)

अवैध रेती उत्खनन करण्यास बंदी असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध्य वाळू वाहतूक,सुरू,!!
अवैध रेती उत्खनन करण्यास बंदी असताना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणात अवैध्य वाळू वाहतूक सुरू आहे त्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे ,न्यायालयाने रेती उत्खणावर कठोर निर्बंध लादले आहेत मात्र न्याालयाने दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखविली जाते, संग्रामपूर तालुक्यातील टूनकी सह अनेक ठिकाणी, मनमानी पद्धतीने रेती उपसा केला जात आहे, यावर फार मोठी कारवाई होताना दिसत नाही, दरवर्षी कोटी रुपयांची रेती तस्करी करणाऱ्या वाहनावर तथा रेती साठा यावर कारवाई करण्यात आली होती परंतु आज मात्र तशी कारवाई होताना दिसत नाही, कारवाईचा आकडा सबंधित प्रशासनाकडून दाखवत स्वतःच्या पाठीवर शाबासकी ची थाप मारून घेण्यात प्रशासन मुषागुल असल्याचे बोलले जात आहे,अनेकदा पर्यावरण प्रेमी व समाज सेवकांनी थाठा वृत्तपत्र मीडिया चे बातम्या प्रसारित करूनही प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे, अशी नागरिकात चर्चा होत आहे,

आमदार पुत्र निरज रायमुलकर यांच्या वाहनाचा जालना जवळ टायर फुटून अपघात ! ४ जण किरकोळ जखमी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर मतदार संघाचे शिवसेना आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर यांचा मुलगा निरज रायमुलकर यांच्या इनोव्हा गाडीचा दि . ९जानेवारीच्या रात्री १२ चे दरम्यान जालना येथे अपघात होऊन मुलासह पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत#शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचा मुलगा निरज संजय रायमुलकर व त्याचे मित्र काल दि.९ ला संभाजीनगरला गेले होते. परत येताना जालना शहरातील कन्हेयानगर ते बीड बायपास रस्त्यावर गाडीचे (क्रमांक MH 28 BK 2777) टायर फूटून तीने रस्त्याच्या खाली ३ते ४ पलटी घेत सरळ झाली. या अपघातात निरज संजय रायमुलकर, वरद ठाकूर, ऋषी पागोरे,प्रतिक इंगळे, व सुनील पंडारे किरकोळ जखमी झाले. निरज रायमुलकर हे स्वतः वाहन चालवत होते.सुदैवाने आ.संजय रायमुलकर काल मेहकर येथे होते. तर एक वर्षापूर्वी याच तारखेला मेहकर जानेफळ रस्त्यावर आ.संजय रायमुलकर यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यात आ.संजय रायमुलकर यांना दुखापत झाली होती.

निरोड अतिक्रमण धारकांचा नमुना ८अ चा प्रश्नन मार्गी लावणार. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे आश्र्वासन.

0

 

संग्रामपूर : (ता.प्र.) तालुक्यातील निरोड (बाजार) येथिल बंद पडलेल्या बाजाराची शासकीय जागा अतिक्रमण धारकांच्या नावे करण्यात यावी अशी मागणी अनुप देशमुख यांनी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या कडे निवेदनातून केली आहे. निरोड येथिल ५० ते ५५ कुटुंब गेल्या पन्नास वर्षापासून गावालगत बंद असल्याने बाजाराच्या जागेवर गट नंबर २१७ मधे वास्तव्यास आहेत. ह्या रहीवासी असलेल्या नागरिकांना ग्राम पंचायत मार्फत विजेचा, पाणीपुरवठा, लागणा-या ईतर सुविधा मिळत आहे‌त.परंतु या जागेवर वास्तव्य करून राहणा-या लोकांच्या नावे शासनाने घरकुल मंजूर केले पण यांच्या नावाने गाव नमुना ८अ नसल्यामुळे हे सर्व लाभार्थी घरकुल योजने पासून वंचित राहत आहेत. या संदर्भात पाठपुरावा करुण जिल्हा प्रशासन दिरंगाई करत आहे. त्यामुळे अतिक्रमण धारकांच्या नावे गाव नमुना ८अ ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्यात यावी याकरीता अनुप देशमुख, दिनेश सुरळकार, यांनी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी हा निरोड वासियांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्र्वासन पालकमंत्री डॉ शिंगणे यांच्या कडुन देण्यात आले.

मुख्यमंत्री ठाकरे,खा.प्रफुल पटेल आज भंडारा येथे

0

 

गोंदिया शैलेश राजनकर

भंडारा,दि.10 : भंडारा जिल्हा रुग्णालयात १0 नवजात आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून मरण पावल्याची मनाला पिळवटून टाकणारी घटना घडली. या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, ही समिती शासनाला तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल हे रविवारी दुपारी १२ वाजता दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पाहणी करणार आहेत. तसेच नवजात बालके गमावलेल्या पालकांचीही ते भेट घेणार आहेत. अतिरिक्त सचिव आशिष सिंग, परिवहनमंत्री अनिल परब आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हेदेखील या दौर्‍यात असणार आहेत.

हिवरा आश्रम – चिखली रोडवरील पिंपळगाव उंडा येथे ट्रक व मोटरसायकलचा भीषण अपघातात एक गंभीर जखमी.

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सविस्तर माहिती अशी की चिखली – मेहकर रोड वर हिवरा आश्रम लगतच पिंपळगाव उंडा या फाट्यावर दि . ९ जानेवारी ला रात्री ७ . 30 वाजताच्या दरम्यान ट्रक क्रमांक एम एच 23 7275 व मोटरसायकल क्रमांक एम एच 28 AQ 1053 क्रमांकाच्या मोटर सायकलचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटर सायकल स्वार रवी अंभोरे राहणार पिंपळगाव उंडा गंभीर जखमी झाला असून त्यांना पुढील उपचारासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने मेहकर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचार सुरू आहे. अपघात इतका जबरदस्त होता की या अपघातामध्ये मोटर सायकलची सुराळा झाला आहे तसेच मोटरसायकलस्वार सुद्धा मोटरसायकलवरून उडून रस्त्याच्याकडेला फेकला गेला आहे चिखली कडून मेहकर कडे जाणाऱ्या भरधाव वेगाच्या ट्रक ने मोटरसायकल धडक दिल्याने हा अपघात घडला. परंतु घटनास्थळावरून ट्रक ड्रायव्हर अपघात घडला तेव्हा पसार झाला. बातमीचे वृत्त कळेपर्यंत अजून कुठलाही गुन्हा ट्रक चालकावर दाखल करण्यात आला नव्हता. मोटर सायकलस्वार रवी अंभोरे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने मेहकर येथील रुग्णालयात नेले असून उपचार सुरू आहे.

कोंढाळी भागात शेकडो पक्षांचा मृतु

0

 

सूर्या मराठी न्यूज ब्यूरो

कोंढाळी या भागातील रिगणाबोंडी, मिनीवाडा,मसाळा,चाकगेडोह आदी भागात गेल्या काही दिवसां पासुन पोपट,चिमन्या,कावळे,जंगली कबुतर आदी पक्ष्यांचा मोठया संखेत अज्ञात रोगाने मृत्यु होत आहे.रिगणाबोडी बोडी येथे तर झाडा खाली मृत पोपटांचा सळा पळला आहे.
रिगणाबोडी येथील पोलीस पाटील संजय नागपुरे यांनी रिगणाबोडी भागात मोठ्या संखेत पोपटांचा मृत्यु झाल्याची माहिती कोंढाळी चे ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांना माहिती दिली.या घटनेची माहिती मिळतच ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी काटोलचे तहसीलदार अजय चरडे यांना माहिती दिली.काटोलचे तालुका पशुधन अधिकारी व कोंढाळी चे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ.तुषार पुंड व सुधिर कापशीकर हे वाजता रिगणाबोंडी भागात गेले व झांडा झांडा खाली जावुन निरिक्षण केले असता मृत पक्षांचा खच पडला होता. डॉ.तुषार पुंड यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मजुषा पुंडलिक व प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.युवराज केने यांना माहिती दिली जिल्हास्तरीय प्रयोग शाळेतील चमु नागपुर येथुन रिगणाबोडी कडे रवाना झाली.पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक व प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.युवराज केने नागपूर जिल्हा सर्व पशु चिकित्सालय चे प्रमुख डॉ.उन्मेश हिरूडकर,काटोल येथील तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय डॉ.निरंजन शेटे मृत पक्ष्यांचे नमुने गोळा केले.या पक्ष्यांचा मृत्यु कश्यांने झाला हे स्पष्ट करण्याकरीता हे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय वायरस प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे कारण राज्यात बर्ड फ्लु वायरस शोधनारी प्रयोगशाळा नसल्याने हे सर्व मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथे पाठवावे लागणार आहे अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुढलिक यांनी दिली. पशु संवर्धन अधिकाऱ्यांनी वन विभागाच्या मदतीने सर्व मृत पक्षांची सुरक्षित पध्द

सकाळी ८ वाजता आमचे मलकापूर शिवसेना तालुका प्रमुख विजूभाऊ साठे यांच्या कडे जात असतांना

0

 

सुनील पवार नांदुरा

जवळील धरणगाव व तादुलवाडी चे मध्यभागी एक पांढऱ्या रंगांची गाडी (दिल्ली पथक) नावावर (पोलीस गाडी नव्हती) ऊभी होती व तेथे दोन पोलीस ड्रेसवर ऊभे होते (प्रत्येकी हजार रु रोज) व दोन्ही साईडला ४/५ ट्रक व गाड्या ऊभ्या होत्या. व जँकीट घातलेली ४/५ माणसे गाड्या थांबवून पावत्या फाडत होते. सर्वच ट्रक ना रिफलेकटर ,रेडीयम , टेल लाईट असल्यावर ही.
मी व माझा वडणेर भोलजी येथील मीत्र अनंता सातव दसरखेड कडे जात असतांना हा प्रकार पाहून त्यांच्या जवळ पुढे गेल्यावर वापस आलो व चौकशी केली पोलीस दादा ने मला ओळखले व विषय मोडायच्या निमित्ताने कुठे चालले , कशाला चालले ,आज किशोर भाऊ च्या घरी लग्न आहे वगैरे वगैरे. नंतर या वसुली बाबद विचारले असता त्यांनी बुलढाणा SP यांच्या सहीचे पत्र दाखवून आम्ही अधिक्रुत वसूली करत असल्याचे सांगितले म्हणून मी माझ्या सवयी प्रमाणे माझ्या मित्राला फोटो घेन्यास सांगितले माझा एक्स्पर्ट मित्र अनंता ने फटाफट ४/५ फोटो घेतले पण नंतर पोलीस दादा नावे माहीत आहेत कोनी वरीष्ठ कारवाई* *करत असतील तर सांगू . ग्रुपमध्ये टाकू नका म्हणून सांगत होते मी म्हटले तुम्ही अधिक्रुत वसूली करत आहात तर तुम्हाला भेन्याच काय काम. व पाहिजे तेवढे ते भेलेले पण दिसत नव्हते कारण बाँस ला ३००० तिन हजार रु दररोज व या दोघांना वर लीहलेलेच आहे (चौकशी केली म्हणून लिहले) अस असल्याने बाँस सांभाळून घेनारच*
हे एवढ लिहायचे कारण कारण असे की नुकतेच ५० रूपया साठी ३ बुलढाणा पोलीस घरी गेले. त्यानंतर ही वडणेर भोलजी जवळ गिते साहेबांचा स्टाफ अवैध वसूली करत होता व त्यानंतर ही खामगाव बायपास वर असच दुसर फिरत पथक महीला चा विचार न करता वसूली करत होत त्या दिवशी VDO व्हायरल केल्यानंतर थोडा फरक पडला
शेतकरी अडचणी त आहे आणि हे स्वतः ला शेतकऱ्यांचे पोर म्हणवतात आणि स्वतः च्या हजार रुपयासाठी( पगार असल्यावरही) त्या रस्त्याने येनार्या सर्वांना त्यामधे तिन सिट शेतकरी ,फायनान्स वर घेतलेला सुशिक्षित बेरोजगार अँटोवाला , मरणा वर जात असलेला टेंपो ,यांना पैसे घेतल्या शिवाय सोडत नाही निमित्त असते कागदपत्रे , पण ज्या काळ्या पि हप्ते देतात त्यांची कागदपत्रे कधीच पाहीले जात नाही असो वरीष्ठांनी कारवाई करावी अस काही नाही पण विध्यमान SP साहेबांनी लक्ष द्यावे व यानंतर असे अवैध प्रकार बंद होवून सामान्य नागरीकांना दिलासा मिळावा ही विनंती

केंद्रीय पत्रकार संघाच्या बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी प्रशांतभैया डोंगरदिवे यांची निवड

0

 

 

चिखली येथील एक आंबेडकरी चळवळीचे वैचारीक आंदोलणकर्ते तथा दैनिक जनतेचा महानायक, महाबोधी न्यूज चॅनल व न्यूज लोकनायक, विदर्भ वार्ता न्युज चे प्रतिनिधी प्रशांतभैया डोंगरदिवे यांचा पत्रकारिता क्षेत्राचा व सामाजिक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड, महाराष्ट्र राज्य प्रभारी विनायक कांगणे यांच्या आदेशान्वये व केंद्रीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख सिद्धांत कांबळे, यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य महसूल विभाग प्रमुख सचिन बोंबले यांनी नुकतीच *बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख* पदी निवड करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
प्रशांतभैया डोंगरदिवे हे अभ्यासू पत्रकार असून ते केंद्रीय पत्रकार संघाला बुलडाणा जिल्ह्यात वाढण्याचे काम करतील. वृत्त लेखनाचे, वृतवाहिन्याचे अचूक लेखन/वृत्त संकलन करणा-या पत्रकार बांधवांना न्याय देतील. प्रशांतभैया डोंगरदिवे यांची केंद्रीय पत्रकार संघाच्या बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांनी असे सांगितले की माझ्यावर जी केंद्रीय पत्रकार संघाची बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी केंद्रीय पत्रकार संघाने सोपवली ती पार पाडत असतांना बुलडाणा च नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारीतेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या दुर्लक्षित वंचित सर्व पत्रकार बांधवांना केद्रीय पत्रकार संघामध्ये सहभागी करून मुख्य प्रवाहात ताट माणेने चालण्यासाठी केद्रीय पत्रकार संघाचे सभासद नोंदणी ला प्राधान्य देऊन पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी मी तत्पर राहून दिलेल्या जबाबदारीचे सोने करेन व आमचे केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड,राज्य प्रभारी विनायक कांगणे,महाराष्ट्र राज्य महसूल विभाग प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष सचिन बोंबले,ज्यांच्या शिफारशीनुसार यांच्या पाठपुराव्यामुळे मला केंद्रीय पत्रकार संघाच्या बुलडाणा जिल्ह्यात स्थान मिळाले ते राज्य प्रसिद्धी प्रमुख सिद्धांत कांबळे यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
प्रशांतभैया डोंगरदिवे यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन वर्षाव होत आहे.

निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा असल्याने उमेदवाराने चक्क ऑटोच ठेवला घरावर, प्रचाराचा अनोखा फंडा..

0

 

(सूर्या मराठी न्यूज ब्यूरो)

ग्रामीण भागात सध्या गुलाबी थंडीत ग्राम पंचायत निवडणुकीने वातावरण चांगलच तापलंय… त्यात सरपंच पद हे सदस्यामधून असल्याने सर्व उमेदवार सरपंच पदावर डोळा ठेऊन सर्व शक्तीनिशी प्रचार मोहिमेत लागलेय… यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवं नवीन फंडे अमलात आणीत असतात… असाच एक अनोखा फंडा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सुटाळा बु. येथील वॉर्ड क्र. २ मधील एक उमेदवाराने आजमविला आहे… या उमेदवाराचे मुलाने निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा असल्याने ऑटोच घरावर नेऊन दर्शनी भागात ठेवलाय…
निवडणून आली की उमेदवारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नव-नवीन क्लुत्या लढविल्या जातात… सद्या ग्रामपंचायत निवडणुकिंमुळे वातावरण चांगलेच तापले आहे… राज्यातील प्रमुख पक्षाचे नेते निवडणुकीत लक्ष घालून असल्याने जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे सरपंच व्हावे यासाठी प्रयन्त करीत आहेत… त्यातच उमेदवार सुद्धा आपली ताकदपणाला लावून निवडणूक रिगणात उतरले आहेत… काही उमेदवार नवीन क्लुप्ती लढून मतदारांना एन केन प्रकारे आकर्षित करण्याच्या प्रत्यनात आहेत… बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. येथील वॉर्ड क्र. २ मधील प्रगती प्यांनलच्या उमेदवार . गीताबाई मनोहर रहाटे यांचे निवडणुक चिन्ह ऑटो असून त्यांच्या मुलाने घराच्या छतावर चक्क खराखुरा ऑटोच नेवून ठेवलाय… हा ऑटो छतावर नेण्याकरीता केनची मदत घेण्यात आली… विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी या ऑटोवर आकर्षक लाइटिंग लावल्याने ऑटो नागरीकांचे लक्ष वेधून घेत आहे… निवडणुकीचे चिन्ह ऑटो असल्याने ऑटो छतावर नेवून ठेवल्याने सर्व परिसरात उमेदवाराने ऑटो छतावर ठेवल्याची चर्चा रंगत आहे… आगळ वेगळ काही तरी नाविन्य पूर्ण करुन चर्चेत राहाण्याकरीता अनेक उमेदवार अशा युक्त्या वापरत असतात… खामगाव तालुक्यातील या उमेदवाराने छतावर ठेवलेला ऑटो पाहण्यासाठी गावातील नागरीक गर्दी करीतांना दिसतात. . तर गावाचा विकास करण्यासाठी आपण निवडणुकीला उभे असून मतदारांनी त्याचा विचार करावा असे मत उमेदवार गीताबाई यांनी व्यक्त केलं य.. गीताबाई यपूर्वही निवडून आलेल्या आहेत ..