Home Blog Page 557

सिंदखेड राजा कलम 144 लागू !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

11 ते 12 जानेवारी दरम्यान मातृतीर्थ सिंदखेडराजा शहरामध्ये देश-विदेशातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने दरवर्षी लोक येत असतात !व राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांना अभिवादन करत असतात ‘मात्र यावर्षी करोनाची परिस्थिती लक्षात घेता ‘महसूल प्रशासकीय यंत्रणेने उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा यांना एक आदेश पारित करून 11 ते 12 जानेवारी दरम्यान संपूर्ण सिंदखेड राजा परिसर व शहरात दोन दिवसा करता कलम 144 लागू करण्यात आले आहे ‘या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० व कलम १८८नुसार कारवाई करण्यात येईल असा दिनांक ५ / १ / 202 १ उपविभागीय अधिकारी श्री सुभाष दळवी यांनी आदेश पारित केला आहे !

मलकापूर पांग्रा येथील ख्यातनाम गायिका आशाताई चरवे यांनी स्वीकारला बौद्ध धम्म !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील ख्यातनाम गायिका आशाताई चरवे यांनी ७ जानेवारीला नागपूर येथे बौद्ध धम्माचा स्वीकार केला !मुळची मलकापूर पांग्रा येथील रहिवासी आशा चरवे शाहू-फुले-आंबेडकर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित गीत गाऊन त्यांनी विचार गावोगावी पोहोचली आहे ‘त्यानंतर आशाताई चरवे यांचा विवाह गोदरी येथील हिरालाल जगन खरे यांच्याशी हिंदू पद्धतीने झाला होता .दोघेही चर्मकार समाजाचे असल्यामुळे तरीही त्यांच्यावर शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता .डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे गीत समाज प्रबोधनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर गाण्याच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवले ‘आपल्या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा सांगितली होती की एक दिवस मी जरूर बुद्धधर्माचा स्वीकार करेल .अशातच त्यांनी ७ जानेवारीला दिक्षाभूमी नागपूर येथे भदंतआर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विधिवत पूजा करून धम्मदीक्षा दिली आशाताई म्हटल्या की मला सुरुवातीपासून बौद्ध धर्माची आवड होती अगोदरच बुद्ध धम्माची दीक्षा घेण्याचे ठरवले होते परंतु ते शक्य झाले नाही .माझ्या घरच्यांना मी बुद्ध धम्म समजावून सांगितला ।आज माझा पती माझ्या सोबत आहे ! व धम्म स्विकारला आहे ।

महाराष्ट्राच्या भंडारा येथे मनाला चटका लावणारी घटना, आगीत जिल्हा रुग्णालयातील 10 बालकांचा होरपळून मृत्यू

0

 

महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शिशु केअर च्या युनिटला आग लागल्याने दहा नवजात बालकांच्या होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनांनी पूर्ण भंडारा जिल्हा हादरला असून सर्वसामान्यांच्या मनाला चटका लावणारी घटना शुक्रवारच्या मध्यरात्री दोन वाजे घडली. शिशु केअर युनिट मधून धूर निघत असल्याचे. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना दिसला त्यांनी दार उघडून बघितल्यावर आग लागल्याचे समजले असता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या शिशु केअर युनिटमध्ये एकूण 17 बालके होती त्यामधून 7 नवजात बालकांना वाचवण्यात यश आले असून दहा बालकांच्या धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सर्व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी येथील जनतेने केली

पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थित पत्रकार भवन येथे रक्तदान शिबिर

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा,दि. 8: समाजाचे वेगवेगळे ऋण प्रत्येकावर असतात. कोविडच्या काळात या ऋणांचे महत्व अधिकतेने पुढे आले. आपण समाजाला काही देणे लागतो. या भावनेतून हे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच भावनेतून पत्रकारांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून या माध्यमातून समाज ऋण फेडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, असे प्रतीपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. बुलडाणा टिव्ही जिल्हा टिव्ही जर्नालीस्ट असोसिएशनच्यावतीने जिल्हा पत्रकार भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
सदर शिबिर उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपसिथत होते. कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, बुलडाणा अर्बन सोसायटीचे राधेश्याम चांडक, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरूण जैन, टिव्ही जर्नालीस्ट असोसिए शनचे अध्यक्ष वसीम शेख, सचिव युवराज वाघ, संदीप शेळके आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, कोविड काळात पत्रकारांनी उत्कृष्ट काम करीत समाजाला जागृत करण्याचे काम केले. त्यामुळे कोरोना विषाणू विरोधात जनजागृती होण्याचे मोलाची मदत झाली. पत्रकारांकडून रक्तदान शिबिरासारखा स्तुत्य उपक्रम आयोजित केलेला आहे. मागील काळात रक्ताचा तुटवडा राज्यात होता . त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत चांगल्या प्रकारे रक्त संकलन राज्यात होत आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने प्रयत्न केले. त्यामध्ये यशही मिळत आहे.
आमदार संजय गायकवाड यावेळी म्हणाले, कोविड काळात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या व माणुसकी जिवंत असणाऱ्या घटना सातत्याने अनुभवास आल्या. कोविडने मृत्यू झालेला असल्यास त्याचे प्रेतही नातेवाईक घेत नव्हते. आपलेस आपल्या दूर सारत असल्याचा हृदयद्रावक अनुभव आला. मात्र काहींनी या कठीण काळात माणुसकी जागविणारे काम केले. रक्तदान करून कोविड रूग्णांना आवश्यकतेनुसार रक्तही त्याकाळात पुरविल्या गेले.
रविकांत तुपकर यावेळी म्हणाले, अगदी तुटपुंज्या पगारावर किंवा मानधनावर पत्रकार काम करीत असतात. कोविडच्या परिस्थितीत केवळ पगारासाठी काम न करता व आपले आरोग्य धोक्यात घालून पत्रकारांनी वार्तांकन केले. हे खरेच कौतुकास्पद आहे. केवळ चरितार्थासाठी काम न करणारे पत्रकार हे खरोखरच समाजसेवकच आहेत. राधेश्याम चांडक यावेळी म्हणाले, बुलडाणा अर्बन भविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार आहे. या माध्यमातून गरीब रूग्णांची सेवा करण्याची संधी संसथेला मिळेल. रक्तदान हे महत्वाचे दान आहे. या दानामुहे लोकांचे जीव वाचतात. असे पवित्र कार्य पत्रकारांनी हाती घेतले ही स्तुत्य बाब आहे.
यावेळी असोसिएशनच्यावतीने नगर परिषद आदर्श उर्दू शाळेचे मुख्याध्यापक रयसोद्दीन काजी, संचेती हृदयालयाचे डॉ. संचेती, पत्रकार गजानन धांडे यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सचिव युवराज वाघ यांनी केले. प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष वसीम शेख यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन संदीप वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी, टि व्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
**********

महसूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे संग्रामपुर तालुक्यात अवैध रेतीची तस्करी जोमात सुरू..मात्र कारवाई शून्य असून लाखो रूपयाचा महसूल बुडत आहे

0

 

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात असून याकडे महसूल विभाग, पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या  बघायला मिळत आहे .जवळपासच्या नद्यांच्या पात्रातून उघडपणे रेतीची तस्करी होत आहे. शेकडो लहानमोठ्या वाहनांमधून ही चांगल्या दर्जाची रेती नेण्यात येतानाचे चित्र सर्रास दिसून येत आहे. महसूल विभागाच्या सहकार्याने हा अवैध कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे नदीच्या पात्रावर मात्र 15 ते 20 फूट चे मोठ-मोठे खड्डे पडलेले दिसत आहेत.
महसुल विभागाकडुन कोणत्याच प्रकारची कारवाई दिसून येत नाही.

संग्रामपुर तालुक्यात बुलढाणा जिल्हा व अकोला जिल्ह्याच्या सिमेवर वाननदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रेती वाहतूक होत असुन अकोला जिल्ह्यातील , तेल्हारा , माळेगाव , हिवरखेड , आकोट संग्रामपुर तालुक्यातील गावात मोठ्या प्रमाणात नेण्यात येत आहे.
येथील नागरिकांनी कारवाईची मागणी केली वाण नदी पात्रातून दररोज हजारो ब्रास रेती ची अवैधरीत्या वाहतुक करण्यात येत आहे ही होणारी वाहतुक थांबविण्यात यावी व रेती वाहतूक करणाऱ्या विरुध्द तत्काळ गुन्हे दाखल करावे.
वान नदी पात्रातून जे सी बी द्वारे मोठ मोठी खड्डे करुन अवैधरीत्या रेती उत्खनन केल्या जात असुन नदी पात्राचे मोठे नुकसान होत आहे तसेच शासनाचा महसूल पण बुडत आहे सदर रेती माफियांना संग्रामपुर महसूल विभागाचे अभय असुन महसूल शासनाच्या तिजोरीत जमा न होता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे , अधिकार्‍यांच्या संगनमताने अवैध रेती वाहतूक जोमात सुरू आहे.अशी चर्चा जनतेतून केली आहे.

कटंगीची आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल;सरपंचसह गावकऱ्यांनी घेतला पुढाकार

0

 

गोंदिया शैलेश राजनकर

गोरेगाव : तालुक्यातील कटंगी बुजरूकचे सरपंच तेजेंद्र हरिणखेडे हे उच्च शिक्षित असल्याने गावकऱ्यांनी गावाचा विकास करण्यासाठी निवडून दिले. त्यांनी आदर्श ग्राम गावांची पदाधिकाऱ्यांसह पाहणी करून सर्वप्रथम गावाला हागणदारीमुक्त गाव केले. विविध विकास योजनेंतर्गत विकास कामे केल्याने तालुका स्मार्ट गाव पुरस्कार, जिल्हा स्मार्ट गाव पुरस्कार मिळविले. गावकऱ्यांच्या सहकार्याने आदर्श ग्राम पुरस्काराकडे हे गाव वाटचाल करीत आहे.
कटंगी बुजरूक येथे 597 कुटुंब संख्या असून 2 हजार 643 लोकसंख्या आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 232 व अनुसूचित जमातीची लोकसंख्या 295, इतर जातीची लोकसंख्या 2 हजार 116 आहे. गावातील लोकसंख्या शिक्षित असल्याने ग्रामसभेमार्फत हागणदारीमुक्त गाव, स्वच्छता अभियान, विविध योजनांची माहिती दिली व सर्वप्रथम पुरस्कार प्राप्त गावांना भेटी देऊन तेथील विकास कामांची माहिती घेतली. गावाला विकास मार्गावर आणण्यासाठी सर्व कुटुंबांना शौचालय इमारत बांधकामाचा लाभ मिळवून घेतल्याने उघड्यावर शौचास जाणे बंद झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले शेणखताचे खड्डे माटी भरून सपाटीकरण केले व गावात स्वच्छता अभियान राबविण्यात यश आले. त्यामुळे या गावाला शासनाच्या योजनेतून पुरस्कार मिळाले. या पुरस्कार रक्कमेतून बंदीस्त नाली बांधकाम, प्रवासी निवारा दुरुस्ती, सभामंडप दुरुस्ती, अंगणवाडी शौचालय बांधकाम, डिजीटल शाळा, विद्यार्थ्यांना गणवेश, शुद्ध पिण्याचे पाणी, पथदिवे या सारखे काम केल्याने तालुका स्मार्ट गाव पुरस्कार प्राप्त केले. गावाच्या विकास कामांची पाहणी जिल्हा स्मार्ट गाव समितीने केली असता जिल्हा स्मार्ट गाव म्हणून 40 लाख रुपयांचे पुरस्कार मिळाले. कटंगी बुजरूकला स्मार्ट गाव पुरस्कार मिळाले असले तरी हे गाव आदर्श गाव करण्याचे स्वप्न सरपंच तेजेंद्र हरिणखेडे यांनी पाहुन 40 लाख रुपये पुरस्कार रक्कमेतून विकास कामांना गती दिली आहे. आदर्श गाव करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेसमोर फलोत्पादन प्रकल्प, व्यायाम करता यावे यासाठी खुले जीम साहित्य बसविले. ग्रामपंचायत कार्यालय सुशोभित केले. आंगणवाडी केंद्राजवळ ऑक्सीजन पार्क, दोन सार्वजनिक शौचालय बांधकाम, 4 सौर ऊर्जेवर चालणारे दुहेरी हातपंप, शाळेत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आरओ बसविले. वृद्धांना बसण्यासाठी खुर्च्या सर्व वार्डात लावले. झाडांना पाणी देण्यासाठी ट्रिप सिंचन योजना सुरू केली. घनकचरा व्यवस्थापन केंद्र तयार करून महिला बचत गटांना जबाबदारी दिली आहे. दहन भूमीचे सपाटीकरण, धार्मिक स्थळ परिसराचे सपाटीकरण करून गावकऱ्यांना आदर्श कल्पना देण्याचे काम सरपंच तेजेंद्र हरिणखेडे करत आहेत. गावाला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी सरपंच यांनी 3 वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणून गावकरी जोमाने कामाला लागले. उमेद अंतर्गत असलेले सर्व महिला बजतगट, माहीम महिला बचत गटाच्या महिलांना गाव विकास कामांसाठी सिहांचा वाटा असून आदर्श गाव करण्याचे संकल्प महीला बचतगट, जेष्ठ नागरिक, युवा मंडळी, सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी घेतला आहे.

मनरेगाचा भ्रष्टाचार १२ कोटीच्या घरात

0

 

गोंदिया: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विकास कामे करता-करता लोकांच्या हाताला रोजगारही दिला जातो. परंतु मनरेगाच्या कामातून मोठी मिळकत मिळविण्यासाठी अधिकारीही मागे राहत नाही. कोट्यावधीचा गंडा घलणाèया अधिकाèयांना लगाम लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला.गोंदिया जिल्ह्यात सन २०१७-१८ या वर्षातील २१२ कामांत अनागोंदी कारभार असून त्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाèयांनी दिले आहेत. यापैकी २०३ कामांची चौकशी पूर्ण झाली असून त्यात १२ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे चौकशीत दिसून आल्याचे समजते.
मनरेगांतर्गत वनविभागात वनतलाव, वनतळी व वनबंधाèयाचे बांधकाम केले जाते. गोंदिया जिल्ह्यात सन २०१७-१८ या वर्षात देवरी, अर्जुनी-मोरगाव, सालेकसा, आमगाव व गोरेगाव या ५ तालुक्यात मनरेगांतर्गत करण्यात आलेल्या २१२ कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याने याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाèयांनी दिले आहेत. या तालुक्यातील मनरेगाच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाèयांनी त्रिस्तरीय समिती गठित केली आहे.त्यात एक उपविभागीय अभियंता, एक सहाय्यक लेखाधिकारी व एक विस्तार अधिकारी यांनी चौकशी केली.
यात १३३ कामात १० कोटी तीन लाख ७७ हजार ५६९ रुपये तर उपवनसंरक्षकांनी ८ कामांची चौकशी केली असता एक कोटी ८८ लाख ८१ हजार ५६९ रुपयांची तफावत झाल्याचे पुढे आले. एकुण २०३ कामांची चौकशी पूर्ण झाली असून चौकशी अहवालानुसार ११ कोटी ९२ लाख ५९ हजार १३८ रुपयांचा अपहार झाल्याचे पुढे आले आहे.
तहसीलदारांवर गुन्हे दाखल होणर का?
गोंदिया-शैलेश राजनकर
गोंदिया जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील मनरेगाची बोगस कामे झाली. त्यात देवरी तालुका अघाडीवर आहे. देवरी तालुक्यातील ११२ कामे, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६१ कामे, सालेकसा तालुक्यातील ३६ कामे आमगाव तालुक्यातील २ कामे तर गोरेगाव तालुक्यातील १ कामावर चौकशी समिती बसविण्यात आली आहेत. वनविभागात जरी काम झाले असले तरी या कामाचे पैसे तहसीलदार देतात. वनक्षेत्राधिकारी यांच्याबरोबर तहसीलदारही या कामात अग्रेसर आहेत. त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

शिंदी – ते साखरखेर्डा रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बाभळीच्या तुटलेल्या फांद्या ठरताय ! अपघातास निमंत्रण ‘ ‘ ‘ ‘ ‘बांधकाम विभागाने वाकलेली दुतर्फा झाडे तोडावी – – – वाहन धारकांची मागणी –

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

साखरखेर्डा ते शिंदी रोड च्या दुतर्फा असलेली बाभळीची झाडे हे अपघातास निमंत्रण ठरू शकतात ‘
शिंदी ते साखरखेर्डा रस्त्यावरती रताळी फाट्यानजीक भलेमोठे बाबळीचे झाड हे वाकलेल्या स्थितीत असून त्याच्या फांद्या तुटलेल्या खाली लोंबकळत आहेत ‘अनेक चार चाकी तसेच दुचाकीस्वारांचा डोक्याला ह्या तुटलेल्या झाडांच्या फांद्या लागल्या असून आहे वाकलेले बाबळीचे झाड लवकरात लवकर तोडण्याची मागणी वाहन धारक करत आहे ।
अगोदरच सिंदी ते साखरखेर्डा हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत तर काही ठिकाणी पूर्ण डांबर निघालेले आहे ‘
ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे त्या ठिकाणी हे बाभळी चे झाड वाकलेले असून झाडाच्या फांद्या तुटून लोंबकळत आहेत .जर लवकरात लवकर तुटलेल्या फांद्या बाबळीचे झाड तोडले नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही !

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी हॉटेल व धाबा ‘ वाईनबार ‘हाऊसफुल -अनेकांनी आयोजित केली बोकड्यांचे मटन पार्टी – – -बोकडांना चांगला भाव !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे । )

सिंदखेडराजा तालुक्यातील43 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा बिगुल वाजला तसेच उमेदवार सुद्धा घरोघरी प्रचाराचा धडाका करत आहेत ‘
काही ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य हे बिनविरोध निवडून आले तर जे सदस्य निवडून आलेले नाहीत ते अजूनही प्रचाराच्या निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत ‘सध्या साखरखेर्डा व परिसरातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तारीख जसजशा जवळ येत आहे तसे उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना राबवताना दिसत आहेत ।अनेक उमेदवार हॉटेल ।वाईन बार व धाबा याठिकाणी मतदारांना जेवण देत आहेत तर अनेक ठिकाणी उमेदवार आपल्या शेतामध्ये बोकडाच्या मटणाची पार्टी देताना दिसत आहे ‘त्यामुळे सध्या बोकडाची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे !
अनेक उमेदवारांनी सोशल मीडियाद्वारे आपला प्रचार सुरू केला असून प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाची खात्री बाळगून आहे ‘अनेक ठिकाणी आपले पॅनल हे विजयाची दावे-प्रतिदावे करत असून निवडणुकीच्या निकालानंतर चित्र पष्ट होईल ।

तेलवर्गीय करडी व सुर्यफुल पिक होत आहेत नामषेश.पारंपरिक पिके घेतली पाहिजे कृषी सहाय्यक – पवार

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

जुन्या काळी महत्त्वाचे कडधान्य असणारे व आहारामध्ये प्रमुख्याने समावेश असणारी करडी पिक व सुर्यफुल नामशेष होत असून ज्वारीमध्ये दिसणारी करडीचे पिक सिंदखेड राजा तालुक्यामधून नामशेष होण्याच्या मार्गावर असून या करडी व सूर्यफूल पिकाचे संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कडधान्य मध्ये महत्त्वाची कडधान्य असलेल्या करडी व सूर्यफुलाच्या उत्पादनावर मोठा फटका बसला असून हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एरवी सिनखेडराजा तालुक्यातील बहुतांश साखरखेर्डा शिंदी रताळी गोरेगाव भागात दिसणारे करडी व सूर्यफूल पीक पीक घेणे कष्टकरी शेतकऱ्यांनी बंद केलेआहे त्याचे कारणही लवकरात लवकर उत्पन्न घेऊन पैसे मिळवता आले पाहिजे हेच आहे त्यामुळे करडी व सुर्यफुल पिकांवर नामशेष होण्याची वेळ आली आहे.
जुन्या काळी प्रत्येक शेतकरी व प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये खाण्याचे पिकांचे उत्पादन घेतले जात असे तसेच हे पीक झालेले उत्पान्न गावातच व गावातीलच तेल्या कडे देण्यात येईल व तोच घरच्या घाण्यामध्ये तेल व जनावरांसाठी करडीची ढेप निर्माण करीत परंतु आधुनिकीकरणाच्या
नादामध्ये सोयाबीन व कपाशीचे
तेल वापरण्याचे प्रमाण वाढली असल्याचे तसेच करडीचे तेल महागात पडत असल्याने लोकांनी करडीचे घेण्याकडे पाठ फिरवली त्यामुळे या पिकाचा पेरा कमी झाला याचा परिणाम हे पीक घेणे शेतकऱ्यांनी कमी केले तसेच हे पीक घेतल्यावर शेतात काटे असल्याने पिकाचे निंदणी करणे मोठी अवघड होत असल्याने शेतकरी हे पीक घेण्याचे टाळत आहे.याबाबत कृषी सहाय्यक शरद पवार यांच्याशी चर्चा केली असताना त्यांनी करडी व सूर्यफूल हे पीके पारंपरिक पिके घेणे गरजेचे आहे ।नगदी पिके घेण्याच्या नांदत शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली असल्याचे त्यांनी सांगितले आहे !
पूर्वी शेतामध्ये सूर्यफूल दिसायचे तर ते तोडून खाण्याची मजा बच्चे कंपनीमध्ये औरत होती करून ती आता दिसत नाही