Home Blog Page 570

साखरखेर्डा येथे शिक्षक कॉलनीत एकाच रात्री पाच घरे फोडली !लाखोचा ऐवज लंपास – – !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

साखरखेर्डा येथे एकाच रात्री पाच घरे फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना 4 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली यामुळे शिक्षक कॉलनी व परिसरामध्ये खळबळ उडाली आहे !सिनखेडराजा तालुक्यातील शिक्षक कॉलनीत राहणारे संदीप मुंडकुळे दीपक भावसार वैभव खरात विनोद देशमुख व बागुलकर ।हे काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेऊन तीन डिसेंबरच्या रात्री पाच घरे फोडली या मध्ये दीपक भावसार यांच्या घरातील चार लाख रुपयांचे दागिने सव्वा लाख रोख तर ‘ श्री मुंडकूळे श्री खरात यांच्या घरातील किरकोळ दागिने घेऊन पोबारा केला ।ही घटना सकाळी उघडकीस आल्यामुळे दुय्यम ठाणेदार दिपक राणे प्रकाश मुंडे हे घटनास्थळी दाखल झाले दरम्यान बुलढाणा येथून श्नान पथकास पाचारण केल्यानंतर श्वानाने आरोपीचा माग घेतला असता शेंदुर्जन – साखरखेडा रोडपर्यंत चोरटे गेल्याचे दिसून आले ।एकाच रात्री तब्बल पाच घरे फोडल्यामुळे साखरखेर्डा गावासह आसपासच्या खेडेगावांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना जेरबंद करू असे दुय्यम ठाणेदार दीपक राणे यांनी सांगितले आहे यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली ।याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या होत असल्यामुळे चोरट्यांचा शोध घेणे पोलीस पुढे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे !

शेतकरी उत्पादक कंपनी साठी संचालक म्हणून संतोष बाजीराव बंगाळे यांची बिनविरोध निवड !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

जैविक शेती व जैविक मिशन अंतर्गत असलेल्या शेतकरी उत्पादक कंपनी साठी संचालक पदावर शिंदी येथील शेतकरी संतोष बाजीराव बंगाळे यांची सभेमध्ये सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली । .काळुंका माता जैविक शेतकरी गट अंतर्गत शेतकरी गटातील सर्व सदस्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी साठी संचालक म्हणून संतोष बाजीराव बंगाळे यांची निवड केली ।यावेळी जैविक मिशनचे समन्वयक हितेस मिसाळ श्री इंगळे उपस्थित होते यावेळी सूचक म्हणून अशोक आत्माराम खरात अनुमोदक म्हणून मारुती बंगाळे यांनी काम पाहिले !यावेळी काळुंका माता जैविक शेतकरी गटातील सदस्य गणेश मंगळे दिनकर भगवान बंगाळे विनोद खरात सुनील बंगाळे अशोक बंगाळे गजानन खरात संगीता मा बंगाळे अनिल भगवान बंगाळे शिवशंकर विठ्ठल बंगाळे ऋषिकेश संजय हाडे प्रकाश खोसे रोहन मदन हाडे ‘ ज्ञानेश्वर बंगाळे मधुकर बंगाळे अशोक माधवराव खरात परमेश्वर आटोळे आदी उपस्थित होते !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

0

 

नागपूर दि ५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची ते अमरावती जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहेत. यासाठी नागपूर येथून हेलिकॉप्टरने ते लगेच अमरावतीकडे रवाना झाले.
तत्पूर्वी, नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री विशेष विमानाने नागपूर येथे आले होते. या ठिकाणावरून अमरावतीकडे हेलिकॉप्टरने रवाना झालेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील शिवणी रसुलापूर हेलीपॅडवरून ते मौजे देऊळगव्हाण येथे पोहोचणार आहेत. याठिकाणी उतरून ते समृद्धी महामार्गाची पाहणी करतील.
त्यानंतर दुपारी सव्वाबारा वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवाडी कडे प्रयाण करतील. दोन वाजता गोळवाडी हेलिपॅड येथे आगमन व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी ते करणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता औरंगाबाद तेथून ते विमानाने मुंबईला प्रयाण करतील.
आज सकाळी साडेदहा वाजता नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासह अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर व अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी देखील नांदगाव खंडेश्वरकडे प्रयाण केले.
विमानतळावरील त्यांच्या स्वागतासाठी यावेळी खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते.याशिवाय महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार ,अप्पर पोलीस आयुक्त दिलीप झळके, सुनील फुलारी, उपायुक्त नरुल हसन, बसवराज तेली, जिल्हा पोलीस अधीक्षक ( ग्रामीण ) राकेश ओला, वरिष्ठ विमानतळ अधिकारी आबीद रूही, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर उपस्थित होते.

माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणीतल्या शाळेला उजाळा…दहा वर्षांनी पुन्हा भरली शाळा…

0

 

 

मुंबई प्रतिनिधी : महेश कदम

 

आडगांव बु: सर्वांना चे हवी हवीशी वाटणारी शाळा आयुष्याच्या वाटेवर आठवणीत हरवून जाते पण सर्वांच्याच मनात आठवणी कायम असतात. भुतकाळातील शाळेतील जुन्या अनुभवांना उजाळा देणारा उपक्रम स्थानिक जिल्हा परिषद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यी व शिक्षकांनी राबविला…

जिल्हा परिषद विद्यालय आडगांव बु: च्या तब्बल दहा वर्षांनंतर सन २००९-२०१० च्या दहाविचा वर्ग पुन्हा भरला. सन २००९-२०१० चे माजी विद्यार्थ्यी दिपक रेळे, दिपक घाईट व शेख साबिर यांच्या संकल्पनेतून काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शाळेतील आठवणींना उजाळा देण्याकरिता पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला.

यावेळी त्या वर्गातले बहुसंख्य माजी विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती. प्राचार्य आर जी जाधव यांचे प्रमुख उपस्थितीतीत वर्ग शिक्षक इंगळे, पी आर अढाऊ व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास वानखडे यांची उपस्थिती होती.

शिक्षकवृंदानी जुन्या आठवणी व अनुभव कथन करुण विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनी भविष्यात येणाऱ्या अडचणीत एकमेकांना मदत करण्याची शपथ घेतली. दहा वर्षांनी एकत्रित येत असलेल्या बरेच विद्यार्थ्यांनी आप आपल्या आठवणी कथन केल्या त्यावेळी सर्व वातावरण भाऊक झाले होते.

आयोजित कार्यक्रमाचे संचालन रोशनी गाडगे व मनिषा धमके यांनी केले तर आभार प्रदर्शन नागेश तायडे यांनी केले. अशी माहिती दिपक रेळे यांनी दिली.

सराईत गुन्हे असलेला मुख्य आरोपी गजाआड

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

गेल्या वर्षी जळगाव जामोद तालुक्यात घडलेल्या वाटमारीतील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात जळगाव जामोद पोलिसांना यश आले आहे. अजय मन्साराम चव्हाण (26 रा. उमरा, ता. अकोट, जि. अकोला) याला त्याच्या घरातून आज, 4 डिसेंबरला अटक करण्यात आली.
अजय चव्हाणविरुद्ध दर्यापूर, खल्लार, सोयगाव, मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातही जबरी चोरी, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. तो अनेक गुन्ह्यांत पोलिसांना हवा होता. बर्‍याच दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. मात्र तोव। मिळून येत नव्हता. अखेर त्याला पकडण्यात जळगाव जामोद पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुनील जाधव यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने केली. पथकात सहायक पोलीस निरिक्षक सतीश आडे, पोलीस उपनिरिक्षक भारत बर्डे, पो.काँ.गणेश पाटील, विकास गव्हाण, सुनील वावगे यांनी केली.

अशी केली होती वाटमारी…

बोराळा येथील आदिनाथ पुंडलिक वाघ हे रात्री आठच्या सुमारास मोटसायकलने घरी जात असताना मागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवून खिशातील नगदी 20 हजार 370 रुपये, सॅमसंग कंपनीचा मोबाइल 1500 रुपयांचा चोरून नेला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी बरेच प्रयत्न केले. अखेर संयमाने तपास करत लुटारूंनी हिसकावून नेलेल्या मोबाइलच्या साह्याने पोलीस मुख्य आरोपी चव्हाणपर्यंत पोहोचले

श्री संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सव संबंधी प्रशासनाला चुकीची माहिती देऊन गावाची प्रतिमा मलिन करणा-या अधिकार्‍यावर कारवाई म्हणून स्वयंस्फूर्तीने 5 डिसेंबर रोजी गाव बंद

0

 

सोनाळा , संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनाळा येथे कार्तिक पोर्णिमेला श्री संत सोनाजी महाराजांची यात्रा महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो. पण यंदा कोरोणा महामारी च्या प्रभावामुळे यात्रा, रथउत्सव, काला व महाप्रसादाचे कार्यक्रम स्वयंस्फूर्तीने गावकऱ्यांनी व संस्थांनी बंद करण्याचे लेखी पत्र पोलीस स्टेशन यांना दिल्यावर एकदम साध्या पद्धतीने दिनांक एक डिसेंबरच्या रात्री बारा वाजता पोलिसांच्या परवानगी व उपस्थित गावातील मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार रथाची पूजाअर्चा केली तर पोलिसांच्या समोर रथाची प्रतिकृती म्हणजे लहान पितळी रथ डोक्यावर ठेवून गाव प्रदक्षिणेला नेण्यात आले त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तसेच दंगा काबू पथक ५ ते ७ पोलिस उपनिरीक्षक 140 ते पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना मिरवणूक निघाली तर कशी .. पोलिसांच्या कार्यकुशल तेवर समस्त गावकरी व व भक्त प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे….
गावातील मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार रथाची पूजाअर्चा केली तर पोलिसांच्या समोर रथाची प्रतिकृती म्हणजे लहान पितळी डोक्यावर घेऊन गाव परदेशी नेला नेण्यात आले यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही रस व्यवस्थित मंदिर स्थळी पोचवण्यात आला या मिरवणुकीदरम्यान कोणीही पोलीस अधिकारी हजर नव्हते पोलिसांनी नियुक्त केलेले व्हिडिओ शूटिंग चालू होते या प्रकारामुळे कोणतेही कायदा-सुव्यवस्था बिघडला नाही उलट प्रशासनाला सहकार्य केले असल्याचे भाविकांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट स्वरूपात सांगितले .
शासनाने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षापासून जिल्हा प्रशासनाला चुकीचे अहवाल पाठवून यात्रा बंद करण्याचे घाट घातला आहे पोलिसांनी दिलेल्या अहवाल खरा ठरवण्यासाठी गावकऱ्यांवर वचपा काढण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करत असल्याचे व गावामध्ये दरवर्षीच्या यात्रेमध्ये पोलीस प्रशासन विरुद्ध लोकनाट्य मंडळ कधी तर भक्तगण असे असताना पोलिसांनी यात्रे संबंधित चुकीची माहिती वरिष्ठ पातळीवर देण्यात आली या अनुषंगाने याहीवर्षी पोलिसांनी पूर्वीचा डाव मनात घेऊन यात्रेची व गावकर यांची प्रतिमा मलिन करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरता 5 डिसेंबर 2020 शनिवारला गाव स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात येत असल्याचे एका निवेदनात गृहमंत्री पालकमंत्री खासदार आमदार महानिरीक्षक अधीक्षक मुख्यमंत्री यांना अधिकार्‍यावर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.

साखरखेर्डा येथे 25 घाटाचे उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावी याबाबत – – – … : रवींद्र मगर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथे 25 खाटाचे उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करावी अशा मागण्याचे निवेदन साखरखेर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे !त्यांनी पाठवलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की,साखरखेर्डा हे मोठे शहर असून साखरखेर्डा लागत 50 ते 55 खेडे जोडलेली आहे विविध आजाराच्या उपचारासाठी लोक साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल होत असतातपरंतु साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मुबलक जागा आहे !गंभीर आजार झाला की लोकांना शासकीय अथवा खासगी दवाखान्यांमध्ये जावे लागत आहे ।किंबहुना ‘अकोला औरंगाबाद बुलढाणा अशा मोठ्या शहरांमध्ये लोक गंभीर आजाराच्या उपचारासाठी जातात ‘त्यामुळे लोकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे !तरी गंभीर आजाराच्या स्वरूपातील रुग्णावर तात्काळ उपचार मिळावे वनस्पतीच्या खेडेगावातील गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळण्यासाठी 25 घाटाचे उपजिल्हा रुग्णालय त्वरित मंजूर करण्यात यावे अशी मागणीही यावेळी रवींद्र मगर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे !

शिंदी ते मेरा खुर्द रस्त्यावर जीवघेणे खड्डे -पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे – नागरिकांची मागणी

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

अतिशय महत्त्वाच्या अशा महामार्गाला जोडणाऱ्या व दळणवळण क्षेत्रातील महत्त्वाचा समजला जाणारा रस्ता म्हणजेच शिंदी – साखरखेर्डा ते मेरा खुर्द हा रस्ता होय !या रस्त्याची मागणी अनेक वेळा वाहनधारकांनी प्रवाशांनी नागरिकांनी केली आहे !परंतु आज अजूनही या रस्त्याची मागणी पूर्ण झाली नाही ! शिंदी ते मेरा खुर्द साखरखेर्डा या रस्त्यावर तीन तीन ते चार फूट खोल खड्डे पडले असून अनेकदा रात्रीच्या वेळेस वाहनधारकांना हे खड्डे न दिसल्यामुळे अपघात झाले आहे !हा रस्ता चिखली – बुलढाणा – औरंगबाद . जालना – पुणे -या मुख्य शहराकडे जाण्यासाठी उपयुक्त ठरतो !अनेक खेडेगावातील तरुण कामगार कडे जाण्यासाठी साखरखेर्डा येथून मेरा खुर्द फाट्यावर येत असतात .परंतु हा शिंदी – मेरा खुर्द – साखरखेर्डा -ग्रामीण भागातील रस्तापूर्णपणे उखडला असून मोठमोठे खड्डे पडले आहे तरी हा रस्ता त्वरित करण्यात यावा व पालकमंत्र्यांनी लक्ष देऊन या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिक व्यक्त करत आहेत ।

रेतीच्या साठ्यासह टिप्पर व विना क्रमांकाची जेसीबी जप्त ..महसूल विभागाची कारवाई !

0

 

साखरखेर्डा (प्रतिनिधी )

अवैध रेतीचे केंद्र बनलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील एका शेतामध्ये असलेला रेतीचा साठा व तसेच तेथे असलेली टिप्पर व विना क्रमांकाची जेसीबी महसूल विभागाच्या पथकाने 2 डिसेंबर रोजी जप्त केली !तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील एका शेतामध्ये रेतीचा साठाअसल्याची माहिती तहसीलदार सुनील सावंत यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे नायब तहसीलदार प्रवीण लटके तलाठी प्रदीप मोगल तलाठी माघाडे यांच्या पथकाने हिवरखेड पूर्ण गावात भेट दिली असता यावेळी नवीन गावाच्या पूर्वेस गट नंबर 131 मध्ये दहा ते पंधरा ब्रॉस रेतीचा साठा आढळून आला !तसेच विना क्रमांकाच्या जेसीबीने टिप्पर क्रमांक एम एच 28 एबी 72 76 मध्ये रेती साठवत असल्याचे आढळले ‘यावेळी नायब तहसीलदार प्रवीण दटके यांनी परवाना मागितलं असतं त्यांच्या जवळ कुठलाही परवाना आढळून आला नाही ।येळी नायब तहसिलदार लटके यांनी टिप्पर मालक लक्ष्मण माधवराव काटकर यांच्याविरुद्ध किनगावराजा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली .तसेच जेसीबी व टिप्पर पोलीस जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आले । यावेळी जेसीबी चालक घटनास्थळावरून पसार झाला होता ‘यावेळी जीसीपी मालकाचा शोध महसूल कर्मचारी व पोलीस घेत आहे !

भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात श्री वाल्मीक सुरासे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा

0

जिल्हा प्रतिनिधी
ऋषी जुंधारे

विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद संचालित भागीरथी माध्यमिक विद्यालय नालेगाव ता. वैजापूर जि. औरंगाबाद येथे श्री वाल्मीक सुरासे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न झाला. सेवेचे 31 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या गौरव सोहळ्यात श्री वाल्मीक सुरासे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. यापुढेही शिक्षण चळवळीसाठी जास्त वेळ देण्याचे आश्वासन श्री वाल्मीक सुरासे यांनी दिले.
याप्रसंगी प्रशांत अंधारे, भाऊसाहेब तुपे, प्रा चंद्रकांत गायकवाड, बाळासाहेब पाटील, गुरुवर्य श्रीराम उगले, राजाभाऊ देशमुख, आर. आर. पाटील, मनोज पाटील, आसाराम शेळके, युनूस पटेल, पी. एम. पवार, महेश पाटील, आनंद खरात, भारत चाटे, राजेंद्र बाविस्कर, अरुण शिंदे, राजेंद्र ठाकरे, विजय द्वारकुंडे, विशाल सुरासे, दत्तात्रय सुरासे, बी. एल. जाधव, विकास जगताप, सुनील व्यवहारे, विजय जाधव, बी. एम. हजारे उपस्थित होते.
मातोश्री भागीरथी माई यांच्या प्रतिमेचे पूजन करून गौरव सोहळ्याला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एन. पठारे यांनी केले.
या प्रसंगी भरत निंबाळकर,सुनील भवर, राजेश्वर विभुते, प्रमोद चव्हाण, जगताप गणेश, जाधव प्रवीण, प्रमोद रिंढे, त्रिंबक गावडे, श्रीमती मनीषा उभेदळ, सागर राजपूत, जाधव पी. एस., भरत भोपळे, रोहिदास त्रिभुवन, गंगाधर कटारे, गोकुळ पवार, श्रीमती बोर्डे मॅडम, श्रीमती सपकाळ मॅडम यासह शिक्षकेतर कर्मचारी सुनील सपकाळ, समाधान सुरासे, सुनील बोडखे, किशोर साळुंखे, ज्ञानदेव तायडे. अमोल त्रिभुवन उपस्थित होते.