Home Blog Page 569

ग्रामपंचायत निवडणूकीत आचार संहीतेचे काटेकोरपणे पालन करावे

0

 

– जिल्हाधिकारी एस रामामूर्ती
ग्रामपंचायत निवडणूक आढावा बैठक

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा,(जिमाका) दि.16 : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. गवागावात निवडणूकीचे वारे वाहत आहेत. प्रभागनिहाय उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर आदर्श आचार संहीतेचे पालन महत्वाचे आहे. तरी या निवडणूकीत आदर्श आचार संहीतेचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हाधिकारी अभिजीत नाईक उपस्थित होते. तर सभागृहात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश लोखंडे, पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आदींसह संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणार असल्याचे सांगत जिल्हाधिकारी एस रामामूर्ती म्हणाले, याबाबत सुचना मिळाल्यानुसार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे. तसेच पोलीस यंत्रणेने संवेदनशील गावांमध्ये सदर निवडणूक शांततापूर्वक मार्गाने पार पाडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. सर्व यंत्रणांनी समन्वय राखून निवडणूका यशस्वीरित्या पार पाडाव्यात. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी काळजी घ्यावी.
बैठकीला संबंधीत यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सिंदखेड राजा तालुक्यात समुदाय आरोग्य अधिकारी पदावर 15 डॉक्टरची नियुक्ती ! अधिकारी कामावर रुजू ।

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या अंतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी पदावर तालुक्यातील 15 आरोग्य अधिकारी रुजू झाले आहेत .यामध्ये आडगाव राजा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या डावरगाव उपकेंद्र मध्ये समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून डॉ . योगेश दिलीपराव आढाव ‘सावखेड तेजन उपकेंद्रांमध्ये डॉ रजनी तात्याराव कांबळे उपकेंद्र चिंचोली येथे डॉक्टर सिद्धेश्वर अशोकराव मोगल ”साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ‘ शिंदी गावांमध्ये डॉ .प्रशांत वायाळ ‘सवडद उपकेंद्रांमध्ये डॉक्टर राखी संदीप कुमार सुरोशे ‘गुंज उपकेंद्र अंतर्गत डॉक्टर जयश्री विजय शेळके ‘राजेगाव उपकेंद्र अंतर्गत डॉ .अर्चना प्रवीण ठोसरे ‘मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत वाघाळा येथे डॉक्टर शिवाजी सिताराम पवार ‘उपकेंद्र देऊळगाव कोळ येथे डॉक्टर सुरेंद्र प्रल्हादराव खोरणे ।उपकेंद्र झोटिंग येथे प्रवीण तेजराव ठोसरे उपकेंद्र खैरव येथे डॉक्टर उमेश सुरेश गुंजकर ‘किनगाव राजा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत चांगेफळ येथे डॉक्टर बळीराम नागनाथ केंद्रे ‘सोनोशी येथे डॉ .मोहन देसाई उपकेंद्र हिवरखेड येथे डॉ . गजानन हरिश्‍चंद्र हुले उपकेंद्र पांगरी उगले येथे डॉ .शिवाजी गजाननराव नायक .या अधिकाऱ्यांच्या नियुक्त झाले असून हे सर्व अधिकारी कामावर हजर झाली आहे यामुळे आरोग्य विभागाला बळकटी मिळणार असून प्राथमिक आरोग्य केंद्राचा ताण हलका होणार आहे ।

पेन टाकळी धरणावरील कॅनॉल फुटला । अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुसकान !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातीलअतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या
पेनटाकळीचा कॅनाॅल फुटला.शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान पाटबंधारे
पेनटाकळी प्रकल्प झाल्यानंतर पेनटाकळी कॅनाॅलचे काम 1996 च्या दशकात पूर्ण झाले. हा कॅनोल झाल्यापासून तो सतत वादग्रस्त ठरत आला आहे.पेनटाकळी धरणाचा हा कॅनाॅल पेनटाकळी, दुधा, रायपूर ,सावञा,जानेफळ, गोमेधर येथील शेतकरी बांधवांच्या शेतातून जातो.सदर कॅनाॅलला 14डिसेंबर रोजी पाणी सोडण्यात आले होते.तो फुटल्यामुळे दुधा येथील गजानन अवचार परसराम अवचार या शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे.तर रायपूर येथील शेतकरी मनोहर काळे यांच्या शेतातील कॅनाॅलच्या भिंतीला तडे गेले असून त्यातून मोठाले नळ लागावेत असे पाणी पाझरताना दिसत आहे.1ते 11किमी चे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झालेले असून या जमीनी सतत पाझरत असल्यामूळे शेतकरी बांधवांचे सतत नुकसान होत असते.कॅनाॅलच्या भिंतीवर मोठ मोठाली झाडे वाढली आहेत.साफसफाई न करताच पाणी सोडल्यामुळे कॅनाॅलच्या भिंतीतून पाणीपाझरत आहे.अनेक वेळा यासाठी आंदोलने ,उपोषण करण्यात आलेली असून 1ते 11 कीमी पर्यंत पाईपलाईन व्दारे पाणी नेवून नुकसान भरपाई ची मागणी परीसरातून जोर धरत आहे.
पावसामुळे व नदीच्या पुरामुळे अतोनात नुकसान झाले. व आता कॅनाॅल तुटल्यामुळे जमीन खरडून गेली याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे :या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा येथून पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री सोळंके यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला व लवकरच कॅनॉल चे काम दुरुस्त करू असे सांगितले !

समुदाय आरोग्य अधिकारी पदावर गुंज येथे डॉक्टर जयश्री शेळके रुजू !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत असलेल्या गुंज या गावी समुदाय आरोग्य अधिकारी पदावर डॉक्टर जयश्री विजय शेळके यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे ।या निमित्त नवनियुक्त समुदाय आरोग्य अधिकारी यांना आरोग्यसेविका डी.एस. पिठलोड यांनी पुष्पगुच्छ व पैठणी देऊन त्यांचा सत्कार केला !
यावेळी आरोग्य सेवक श्री व्ही . एस . सावंत .श्रीमती एस एन इंगळे ‘आशा स्वयंसेविका ‘वृषाली तुपकर संगीता ठाकरे आशामती गवई नीता भगत कांता गवई मदतनीस सुनिता वाकोडे ।साहेबराव तुपकर अनिल तुपकर आदी हजर होते !

धुक्याची चादर ओढून उगवली पहाट !

0

 

▪ दाट धूक्याची सुखद अनुभूती

बुलडाणा : गुलाबी थंडी आणि दाट धुके… असे मनमोहक वातावरण बुलडाणेकरांनी आज गुरुवारी अनुभवले. पहाट उगवली ती धुक्याची दाट चादर पांघरुनच ! सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहररात धुक्यामुळे सूर्यदर्शन झाले नव्हते.

गेल्या काही दिवसांपासून शहरासह परिसरात थंडीची तीव्रता वाढत आहे. १७ डिसेंबरला तर नगरकरांनी गुलाबी थंडीसोबतच दाट धुके व दवबिंदू अशा मनमोहक वातावरणाचा अनुभव घेतला.धुक्यामुळे शहरातील रस्तेसुद्धा दिसत नव्हते. वाहनचालकांना रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने प्रमूख मार्गांवरील वाहतूक संथगतीने सुरू होती. या अल्हाददायी वातावरणामूळे निसर्ग आणखीच फुलला होता.

पेनटाकळी चा कालवा फुटला.. शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान.. हजारो लिटर पाणी वाया….

0

 

 

मनीष जाधव मेहकर बुलढाणा

 

प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे पेन टाकळी प्रकल्पाच्या कालव्याला मोठे भगदाड पडून त्यातुन विसर्ग झालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. तत्काळ कालव्याची दुरुस्ती व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
मदतीची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाची ओळख आहे…

कचरा संकलन कंपन्यांवर आर्थिक दंड करा आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे सक्त निर्देश

0

 

(सूर्य्या् मराठी न्युज ब्युरो)

 

नागपूर, ता. १६ : शहरातील नागरिकांच्या कच-याच्या समस्या सुटावी संपूर्ण शहरातील कच-याबाबतचे कार्य सुरळीत व्हावे यासाठी मनपाद्वारे बीव्हीकजी आणि एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. सुरूवातीच्या काळात दोन्ही कंपन्यांकडून उत्तम कार्य झाले. मात्र सद्या दोन्ही कंपन्यांच्या संदर्भात नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. शिवाय कंपन्यांकडून निविदेमध्ये नमूद बाबींची पूर्तताही केली जात नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील प्रत्येक घरातील, व्यावसायीक प्रतिष्ठानांमधील कचरा योग्यरित्या संकलित न करण्याच्या तक्रारींवर दोन्ही कंपन्यांवर मोठा आर्थिक दंड (हेवी पेनॉल्टी) लावण्याची सक्त ताकीद आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.
विविध विषयांच्या अनुषंगाने बुधवारी (ता.१६) आरोग्य समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, समितीच्या सदस्या आशा उईके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, टाटा ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. टिकेश बिसेन उपस्थित होते. याशिवाय समितीच्या सदस्या लीला हाथीबेड, सरीता कावरे, उज्ज्वला लांजेवार, विशाखा बांते यांनी व्हिडिओ कॉन्फर्निंगच्या माध्यमातून बैठकीत सहभाग नोंदविला.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नागपूर महानगरपालिका सुरूवातीला ५८व्या क्रमांकावर होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वात झालेल्या कार्यामुळे मनपाने १८वे स्थान प्राप्त केले. या यशाबद्दल वीरेंद्र कुकरेजा यांनी आरोग्य विभागाचे अभिनंदन केले व यावेळी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये १०व्या क्रमांकाच्या वरचेच स्थान प्राप्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली. समितीच्या सदस्या आशा उईके यांनी ‘बेटी बचाव’ अभियानाद्वारे कॅन्सरची लस देण्यात येते. मात्र त्या लसीसाठी नागरिकांना सुमारे ३५०० रूपये खर्च करावा लागतो. ही लस मनपाद्वारे मोफत देण्याची मागणी केली. आशा उईके यांच्या प्रस्तावावर आरोग्य विभागाद्वारे चर्चा करून त्याबाबतची माहिती सादर करण्याचे निर्देश वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
बैठकीत प्रारंभी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांनी मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. कोव्हिडचे रुग्ण वाढलेले असताना मनपाद्वारे ६६ खाजगी रुग्णालयांना कोरोनाबाधितांवर उपचारासाठी परवानगी देण्यात आली होती. यापैकी काही रुग्णालय रुग्णांकडून जादा पैसे घेत असल्याची तक्रार प्राप्त होताच मनपा आयुक्तांच्या आदेशाने प्रत्येक रुग्णालयामध्ये ऑडिटर नियुक्ती करण्यात आले. या ऑडिटरकडून रुग्णालयाचे बिल तपासल्यानंतरच रुग्णांना भरावे लागते, अशी माहिती डॉ.प्रवीण गंटावार यांनी यावेळी दिली. मनपाद्वारे नियुक्त सर्व ऑडिटरची माहिती आणि त्यांच्याकडून ऑडिट झालेल्या बिलांचा अहवाल पुढील बैठकीत समितीपुढे सादर करण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
कोव्हिडच्या संकट काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून अनेक डॉक्टर, नर्स तसेच आरोग्य कर्मचा-यांनी अहोरात्र सेवा दिली. प्रामाणिकपणे दिवस-रात्र अनेकांनी नि:स्वार्थ भावनेने काम केले. मात्र याच काळात काहींनी संधी म्हणून फायदा घेत रुग्णांकडून मनमानीपणे बिल वसूल करण्याचे काम केले. संकटाच्या प्रसंगी सेवाकार्य न बजावता पैशाला प्राधान्य देणा-या अशा खाजगी रुग्णालयांवर सक्त कारवाई करा, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
नागपूर शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या कमी आहे. सध्या शहरात २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ही संख्या वाढून ५० होणे गरजेचे आहे. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या रहिवासी परिसरात उपलब्ध व्हावी यासाठी शहरातील प्रत्येक भागात मनपाचे आरोग्य केंद्र व्हावे यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापतींनी दिले.

कोरोना लस संदर्भात दिशानिर्देशानुसार कार्यवाही करा
कोरोनाची लस उपलब्ध झाली असून नागपूर शहरामध्येही लवकरच ती तीन टप्प्यामध्ये देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवेतील कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी शहरातील सर्व खाजगी, शासकीय रुग्णालयांकडून कर्मचा-यांची माहिती मागवून त्याचा डेटाबेस तयार करण्यात येत आहे. नागपूर शहरामध्ये ६४० खाजगी रुग्णालये, ५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मनपाचे ६२ रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सर्वांकडून माहिती मागविण्यात येत असून आतापर्यंत ११ हजार ५६० कर्मचा-यांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्यात आली आहे व उर्वरित माहितीही मागविण्यात येत असल्याची माहिती यावेळी आरोग्य विभागाकडून देण्यात आली. कोरोना लसी संदर्भात केंद्र आणि राज्य शासनाकडून दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. या दिशानिर्देशांचे काटेकोर पालन करून तिन्ही टप्प्यामध्ये नागरिकांना लस योग्यरित्या उपलब्ध व्हावी, याबाबत तातडीने कार्यवाही करा, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

बोरगाव मंजू येथे दुचाकी व ट्रकच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार,

0

 

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

अकोला दि. 16 डिसेंबर :- बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महामार्ग क्रमांक 6 वरील बोरगाव मंजू येथील उज्वल स्कूल व आराम मशीन नजीक आज दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास घडलेल्या एका घटनेमध्ये एक अनोळखी दुचाकीस्वार अकोल्याकडे येत असताना अमरावती कडे खत भरून घेऊन जाणाऱ्या ट्रक समोर आल्याने जागीच ठार झाल्याचे वृत्त असून याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोरगाव मंजू येथे घडलेल्या दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघातामध्ये एक अनोळखी इसम दुचाकी क्रमांक MH 19 DC 6533 ने अकोल्याकडे येत असताना समोरून येणाऱ्या व अमरावतीकडे खताचे पोते भरून घेऊन जात असलेल्या ट्रक क्रमांक MH 40 BL 5263 हा मार्गस्थ असताना दुचाकीस्वार त्या ट्रकसमोर येवून त्याची दुचाकी ट्रक खाली आल्याने या अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके,यांनी पो.कॉ. शरद बुंदे,हे.कॉ.कानडे,हे.कॉ.संजय इंगळे च यांच्यासह घटनास्थळ गाठीत तात्काळ पंचनामा करण्यात येऊन अनोळखी इसमाच्या मृत्यूदेहास अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे शवचिकित्से करिता पाठविण्यात आले असून पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

सरपंच पदाच्या आजच्या सुधारित आदेशाने संभ्रम दूर

0

 

बुलडाणा, १६ डिसेंबर जिल्ह्यामध्ये सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निघाली आहे, त्यांच्या सोडत रद्द करण्यात आल्याचा सुधारीत आदेश आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला आहे. संपूर्ण राज्यात नव्याने सरपंच आणि उपसरपंच यांची निवड निवडणूक मतदानानंतर शक्यतो लवकरात लवकर तथापि ३० दिवसांच्या आत राबविण्यात यावी, असा आदेश आज, १६ डिसेंबर रोजी ग्राम विकास विभागाने जारी केला आहे. या आदेशामुळे मोठा संभ्रम दूर झाला असून आता राज्यभरातील सर्वच ठिकाणी सरपंचपदाची आरक्षण सोडत नव्याने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट आहे. ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी विवेक शिंदे यांच्या स्वाक्षरीनिशी आज हा आदेश संपूर्ण राज्यभर निर्गमीत करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला नागपूर मेट्रोतून प्रवास

0

 

चंद्रपूर, ता. १६ :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊननंतर मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. प्रत्येक फेरीनंतर होणाऱ्या निर्जंतुकीकरणासोबतच सर्व नियमांचे पालन होत असलेल्या नागपूर मेट्रोचा प्रवास अत्यंत सुरक्षित असून विदर्भातून नागपुरात येणाऱ्या नागरिकांनीही मेट्रो प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नागपुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.

नागपूर मेट्रोने अधिकाधिक लोकांनी प्रवास करावा यासाठी महामेट्रोतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नागपुरातील आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांनी नुकतीच मेट्रोची सफर केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., एनएमआरडीएच्या आयुक्त शीतल उगले-तेली, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, वाहतूक पोलिस उपनिरीक्षक सारंग आव्हाड यांनी मेट्रोच्या सुरक्षित प्रवासाचा आनंद लुटला. मेट्रोचा प्रवास अत्यंत सुरक्षित असून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि वाढत्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपुरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मेट्रोने प्रवास करावा, असे आवाहन या अधिकाऱ्यांनी केले.

राजकीय नेत्यांचीही मेट्रो सफर
नागपुरात येणाऱ्या आणि नागपुरातील राजकीय नेत्यांनीही मेट्रोची सफर केली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार मोहन मते, माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी सुरक्षित मेट्रोची सफर करण्याचे आवाहन प्रवाशांना केले.