Home Blog Page 573

मोहणसिंग डाबेराव यांच्या हद्दपारीच्या आदेशास स्थगिती

0

 

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

 

वरवट बकाल येथील रहीवासी मोहनसिंग नथू डाबेराव वय.६३ वर्षे यांना उविभागीय अधिकारी देवकर यांनी 6महीण्यासाठि बुलडाणा जिल्ह्यातुन तडिपार केले होते,तो आदेश त्यांनी २७-११-२०२०रोजी पारीत केला,सदर आदेशाविरुध्द मोहणसिंग डाबेराव यांनी अँड.प्रमोद घाटे,अँड.थेरोकार,अँड.मेश्राम यांच्या मार्फत मा.विभागीय आयुक्त अमरावती यांच्या न्यायालयात प्र.हद्दपार/अपिल क्रमांक 94/2020/बुलडाणा,मोहणसिंग, वि.उपविभागीय अधिकारी *१ही अपिल दाखल केली सदर प्रकरणात केलेल्या युक्तिवाद योग्य माणुन मा.आयुक्त हरिष सिंह यांनी गै.अ.यांचे जबाब येईपावोतो ३०/१२/२०२० पर्यत स्थगिती दिली आहे.सदर तडिपारीचा आदेश हा पुर्णता राजकिय व अधिकारी यांच्या दबावामुळे पारीत झाला आहे असा सुरवातीपासुनच मोहणसिंग यांचे वकिल अँड.घाटे यांनी केला होता.सदर आदेश हा केवळ २३दिवसात पारीत झाला असुन बरेचसे तडिपारीचे प्रकरणे प्रलंबीत असताना उपविभागीय अधिकारी जळगाव जा.यांनी हे प्रकरणच का इतक्या लवकर निर्णयी काढले हा मोठा चर्चेचा संग्रामपुर तालुक्यात विषय होता.आता या प्रकरणी इतक्या तात्काळ स्थगिती मिळाल्याने सदर आदेश हा आकासापोटि तर पारीत झाला नाही ना अशि शंका जनतेत उत्पन्न होत आहे.कारण मोहणसिंग यांचेवर केवळ १च गुन्हा प्रलंबित आहे हे विषेश.

भारतबंदला संग्रामपूर तालुक्यात भारत बंद चा उस्फुर्त प्रतिसाद…

0

 

उदैभान दांडगे
विदर्भ प्रतिनिधि

आज सकाळपासून विविध पक्ष संघटनाचा आंदोलनात्मक पवित्रा ..
संग्रामपूर ; केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसेच विविध पक्षातील संघटना एकवटल्या आहेत.* हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. या पृष्ठभूमीवर संग्रामपूर तालुक्यातील विविध पक्ष संघटनाने आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून बंदचा परीणाम जाणवू लागला आहे तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाभाऊ भोंगळ जिल्हा नेते सत्यव्रत कारांगले नारायन ढगे, शिवसेना शांताराम भाऊ दाणे जिल्हाध्यक्ष,रविभाऊ ता अद्यक्ष तर मार्कवादी कॉमोनिस्ट संघटनेचे अनिल गायकवाड जिल्हा सचिव,वंचित आघाडीचे देविदास दामोदर व राष्ट्रीय काँग्रेसचे राजेंद्र वानखडेअध्यक्ष ता.अभयसिंग मारोडे , शामभाऊ डाबरे,मनोहर बोराखडे,तेजराव मारोडे असे विविध पक्ष , संघटना,शेतकरी व व्यापारी वर्ग यांनी आपले दुकाने बंद ठेऊन या बंध मध्ये मोठया संख्येने उपस्तीत राहून आपला पाठींबा नोंदविला पोलिस स्टेशन तामगाव यांनी विविध पक्षातील पाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे

जळगाव जामोद येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्‍यांचे जळगाव नांदुरा रोडवर शांततामय मार्गाने चक्काजाम आंदोलन सुरू

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद मध्ये आज दिनांक 8 डिसेंबर रोजी महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जळगाव ते नांदुरा रोडवर सकाळी साडे पाच वाजेपासून शांततामय मार्गाने चक्काजाम आंदोलन सुरू झालेले आहे केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी विषयक कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सकाळपासूनच महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जळगाव शहरामध्ये जळगाव ते नांदुरा रोड तसेच जळगाव वरवट जळगाव जामोद या रोडवर सकाळपासूनच शांततामय मार्गाने चक्काजाम आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे तसेच जळगांव जामोद शहर संपुर्ण बंद.मोदी सरकारने केलेल्या शेतकरी कृषी कायद्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शहरात संबड वाजवुन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.या आंदोलनात काँग्रेस पक्ष नेत्या स्वातीताई शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, मीनाताई सातव, अर्जुन घोलप, शिवसेना नेते तुकाराम भाऊ काळपांडे,नगरसेवक रमेश ताडे, अविनाश उमरकर शांताराम दाणे, संजय भुजबळ प्रशांत दाभाडे,राजेश पांधी,विशाल पाटील,जुनेद,युवराज देशमुख,अनिकेत पाटील ल,अफ्रोस भाई,साबिर भाई, यांच्यासह बहुसंख्य महा विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे

सुनगाव येथे महा विकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ चक्काजाम आंदोलन

0

 

गजानन सोनटक्के

आज दिनांक 8 डिसेंबर रोजी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतकरी बिल विरोधात आंदोलनास प्रतिसाद देत पाठिंबा देत सूनगाव येथील महाविकास आघाडीच्या वतीने सुनगाव ते जामोद रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले व गावातील सर्व व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत प्रतिसाद या आंदोलनाला दिला आहे यावेळी महा विकास आघाडीचे माजी सरपंच पुंडलिक भाऊ पाटील शिवसेना शाखाप्रमुख सुनील खवले डॉ शालिग्राम आपले डॉ प्रल्हाद कपले रामकृष्ण धुळे शेषराव वंडाळे गजानन धुळे प्रल्हाद येउल मोतीराम धुळे रामदास वसुले आला सिंह राजपूत गणेश मिसाळ वैभव काळपांडे धुळे विनोद अंदूरकार निलेश खवले इतर कार्यकर्ते उपस्थित होते

जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा कंटेनर पोलिसां

0

 

सत्तर गोवंशांना जीवनदान ; सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

अतिशकुमार वानखडे(अकोला)

बाळापूर :- अवैधरित्या विनापरवाना कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून सत्तर गोवंशांसह सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कंटेनरमध्ये चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. कंटेनर चालक पसार होण्यात यशस्वी झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हि कारवाई आज रविवारी बाळापूर जवळ करण्यात आली.
आज रविवारी पहाटेच्या सुमारास एका कंटेनर मधून अकोला ते खामगावकडे गोवंशांना कोंबून कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत असल्याची माहिती बाळापूर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांना खबऱ्या मार्फत मिळाली. ठाणेदार नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्गावरील पारस फाटा गाठत कंटेनरचा शोध घेणे सुरू केले. मात्र कंटेनरचा शोध लागत नव्हता, त्यानंतर महामार्गावरील पेट्रोल पंप, ढाबे, हॉटेल्स याठिकाणी पोलिसांनी शोध मोहीम राबवली. अखेर महामार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालया समोर सदर यु. पी.२१ सी एन ३०४० हा कंटेनर नादुरुस्त अवस्थेत पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली असता सत्तरहून अधिक गोवंश कोंबलेले आढळले. तर यापैकी चार जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या गोवंशाची किंमत सात लाख रुपये एवढी असून कंटेनरसह एकुण सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या गोवंशांना म्हैसपूर येथील गोरक्षण संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत बाळापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, भाष्कर तायडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल अंभोरे, विठ्ठल रायबोले, अमोल ओहेकर यांनी केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, भास्कर तायडे करीत आहेत.

स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यानी रोखली नवजीवन एक्स्प्रेस, मलकापूर रेल्वे स्थानकावर कार्यकर्ते आणी पोलिसांमध्ये बाचाबाची ..

0

 

मुख्य संपादक
अनिलसिंग चव्हाण
887 555 1991

शेतकऱ्यांच्या भारत बंदला जोरदार सुरुवात झाली आहे… ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली आहे… दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आज सकाळ पासून रस्त्यावर उतरली आहे. सकाळी 6.40 वा. चेन्नई – अहमदाबाद एक्सप्रेस रोखून रविकांत तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी रविकांत तुपकर सह कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली त्यामुळे ‘स्वाभिमानी’ आणि पोलिसांमध्ये चांगलाच संघर्ष निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे..तर पोलिसानी 20 ते 30 कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतलं असून येत्या 3 दिवसांत कायदा रद्द न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय ..

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोहाडी येथे अभिवादन

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त 6 डिसेंबर रोजी संदिप इंगळे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली व ग्रामपंचायत सदस्य सौ.जिजाबाई इंगळे कौशल्याबाई इंगळे तसेच माजि मुख्याध्यापक वसंत इंगळे ,प्रकाश इंगळे, विक्रम इंगळे, अनिल इंगळे, समाधान इंगळे, राहुल इंगळे, विलास इंगळे नितिन कंकाळ, प्रभाकर इंगळे, शिक्षक दिपक इंगळे, विजय इंगळे,वाघ्या, सचिन इंगळे, नितिन इंगळे, प्रशांत इंगळे,अमोल इंगळे,शुभम इंगळे, किरण इंगळे, विशाल इंगळे,संजय इंगळे, अविनाश इंगळे व तसेच गावातील सर्व उपासक या यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली व राहुल इंगळे यांनी अभिवादन पर एक गीत सादर केले व वसंत इंगळे सर यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत दोन शब्द बोलून अभिवादन केले व शेवटी बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले व संदिप इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन अभिवादन कार्यक्रम यशस्वी पार पडला

ऊकळी – सुकळी – येथे . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कॅन्डल मार्च काढून अभिवादन !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

ता.मेहकर ऊकळी सुकळी 06/12/20 रोजी तथागत युवा प्रतिष्ठान ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला..!

याप्रसंगी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई व अनिल भाऊ देबाजे ,प्रमोद भाऊ अंभोरे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहिली व भव्य कॕन्डल मार्च रॕली काढण्यात आली..

यावेळी मा.अनिल भाऊ देबाजे यांनी आपल्या मार्गदर्शनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला

या अभिवादन कार्यक्रमास तथागत युवा प्रतिष्ठान ग्रुप महाराष्ट्र सचिव अनिल भाऊ देबाजे, सतीश शेटाने, आकाश तुरुकमाने, करण राऊत, सुरज शेटाने, प्राध्यापक विठ्ठल सावंत सर, विनायक तुरूकमाने, हर्षल राऊत, सतीश तुरुकमाने, राहुल साबळे, अमर अंभोरे, उमेश मोरे, राहुल तुरुकमाने, गुलाब तुरुकमाने, चेतन देबाजे, सचिन तुरूकमाने, भिमराव ठोके, शुभम शेटाने, रोहित झरे, पवन अंभोरे, अविनाश वाघमारे, रोहित तुरुकमाने, स्वप्नील मोरे, वैभव मोरे ,सुजित तुरुकमाने आदी उपस्थित होते

महापरिनिर्वाण दिना निमित्त सम्राट मित्र मंडळाच्या वतिने अंत्री खेडेकर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अंत्री खेडेकर येथील सम्राट मित्र मंडळाच्या वतिने अभिवादन करण्यात आले ! यावर्षी शासनाच्या आव्हानानुसार बौद्ध बांधवांनी चैत्य भूमिवर न जाता बाबासाहेबांना गावातुनच अभिवादन केले ! कोवीड 19 चा प्रादुर्भाव पाहता सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते ! अंत्री खेडेकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतूळ्याजवळील प्रारंगणात त्रिसरण पंचाशिल ग्रहण करून अभिवादन करण्यात आले ! छोटेखानी झालेल्या कार्यक्रमाचे संचालन भास्कर मोरे यांनी केले । यावेळी संजय खेडेकर यानी थोडक्यात आपले विचार व्यक्त केले ‘ या कार्यक्रमाला भिमराव मोरे ‘ अमोल मोरे ‘ महेंद्र मोरे ‘ पवन मोरे ‘राजेश गवई ‘ भगवान मोरे रवि गवई ‘ अमोल पवार समाधान मोरे ‘ प्रकाश मोरे नितीन मोरे ‘ संतोष मोरे इंद्रजित खेडेकर ‘ विनायक खेडेकर गजानन खेडेकर ‘ वसंता मोरे ‘ रवि पवार ‘ विजू अहिले ‘ पवन समशेरे ‘ नंदु मोरे ‘ राजु मोरे ‘ अमोल भालेराव । धिरज मोरे । मनोज मोरे आदी उपस्थित होते !

शिंदी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

0

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथेसहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले !सुरुवातीला माजी सरपंच अशोक खरात यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करण्यात आला !नंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आली !यावेळी ‘पत्रकार सचिन खंडारे सुनील खंडारे अरविंद खंडारे कडूबा खंडारे उकंडा खंडारे रमेश गवई पवन गवई ‘नरेश खंडारे शिक्षक )रमेश गवई शुभम खंडारे संतोष खंडारे गुलजागिर गिरी ‘प्रल्हाद मोरे अजय खंडागळे ‘आधी समाज बांधव उपस्थित होते ।