Home Blog Page 578

कारवरील नियंत्रण सुटून कार पलटी एकच मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी !लव्हाळा येथील उडान फुला जवळील घटना !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

केंद्रीय मंत्रालयाने सिमेंट काँग्रेसचे चांगले रस्ते केले की जेणेकरून खड्डे असलेल्या रस्त्यावरून अपघात होणार नाहीत परंतु चांगले रस्ते झाल्यानंतर गाडीचा वेगही वाढला आहे याचा प्रत्यय होणाऱ्या अपघातातून दिसून येत आहे !दिनांक 30 नोव्हेंबर रोजी चिखली ते मेहकर मार्गावरील लव्हाळा येथील उड्डाणपुलाजवळ साखळी खुर्द येथील वाठोरे कुटुंबीय एम एच 24 व्ही 84 22 या क्रमांकाच्या कारणे काही कामानिमित्त पहाटे परभणी कडे जायला निघाले होते !सकाळी सहा वाजता लवळा जवळील उड्डाणपुलाजवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाजवळील रस्त्याच्या बाजूने असलेल्या एका शेतात उलटली ‘ज्या अपघातात सतपाल वाठोरे वय 46 वर्ष हे जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी लताबाई वाठोरे वय 36 वर्ष व त्यांची आई मालताबाई वाठोरे वय 65 वर्ष आणि कार चालक राजू काजणे हे तिघे जण गंभीर जखमी झाले !या या अपघाताची माहिती मिळताच साखरखेर्डा येथील आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी वर प्राथमिक उपचार करून त्यांना बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले !या अपघातामुळे साखळी खुर्द येथील वाठोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे व गावात हळहळ व्यक्त होत आहे !पुढील तपास साखरखेडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश चव्हाण करीत आहेत !तरी लोकांनी रस्ता चांगला आहे म्हणून गाडीचा वेग वाढू नये असे आव्हान जाणकार व्यक्त करत आहेत !

प्रिया चा आदर्श इतर मुलींनी घ्यावा !अपघातात हात गमावलेल्या च तरुणांशी केले प्रियांनी लग्न !एकमेकांचा आधार घेऊन संसार फुलवणार – ….!

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

हिंदी चित्रपट घेऊन गेला होता ” विवाह ” यामध्ये शाहिद कपूर आणि एका मुलीशी लग्न ठरलेले असते आणि तीचे अपघातांमध्ये संपूर्ण शरीरा जळालेली असते !तरीही शाहिद कपूर तिच्याशी च लग्न करतो !अगदी असंच हुबेहूब चित्रण चिखली तालुक्यातील चांधई या गावांमध्ये घडली तर कुतूहल वाटू नये …..सध्या सोशल मीडियावर या वैशिष्ट्यपूर्ण विवाहाची चर्चा सुरू आहे .कारण ही तसेच आहे .चिखली तालुक्यातील चांद ही येथील विशाल दिनकर इंगळे आणि मंगरूळ नवघरे येथील प्रियंका अंकुश घेवंदे यांचे तीन महिन्यापूर्वी लग्न पक्के ठरलेले होते .एक नवीन सुखी संसाराची सुरुवात आपण करणार आहोत असे दोघांचाही मनी रुतले होते ‘विशाल हा प्रवर चालक म्हणून काम करत होता दोघ ही सुखी संसाराची स्वप्न फुलवत होते .दोन्हीकडे मंडळीसुद्धा लग्नाच्या तयारीच्या कामाला लागली होती ‘परंतु लग्नाच्या अगोदरच एका महिन्यात विशाल यांचा देऊळगाव मही जवळ भीषण अपघात झाला ‘व त्यात त्याचा डावा हात ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला त्याच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार करण्यात आली मात्र हात पूर्णता निकामी झाल्याने त्याचा डावा हात कापावा लागला ।विशाल हा वाहनचालक असल्यामुळे दोन्ही हाताने स्टेरिंग पकडावी लागत असते ‘शिवाय हातावर पोट होते तोच हात आता राहिला नसल्याने पुढे करावे तरी काय हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला ‘विशाल आणि प्रिया दोघेही अधून-मधून एकमेकांना सुखी स्वप्न संसाराची कशी रंगणार या वरून फोनवर . दोघे ही चर्चा करायचे ‘तब्येतीची विचारपूस करायचे ‘अशातच प्रीया ला विशालने सर्व खरे सांगून टाकले : !अशातच पर्यायाच्या घरच्या मंडळींनी थोडीफार कुजबूज करण्यास सुरुवात केली !आता विशाल एका हाताने कशी काम करणार ? कसा संसाराचा गाडी पुढे नेणार प्रश्न त्यांच्या मनामध्ये दाटू लागला ! प्रियाने तिच्या मनामध्ये फक्त आणि फक्त विशाललाच शेवटपर्यंत साथ देण्याचा मनामध्ये ठाम निर्णय घेतला ।संसार थाटील तर विशाल संगेच !असा ठाम निश्चय प्रियाने केला होता !लग्न झाल्यानंतर जर विशालचा हात तुटला असता तर तुम्ही तो स्वीकारला असता ना ?तीन हातांनीच संसार आम्ही आयुष्यभर फुलवू !असे प्रियाने घरच्यांना समजावून सांगितले !घरच्यांनाही प्रियाचे म्हणणे पटले व 27 नोव्हेंबरला मोजकेच नातेवाईक यांच्या उपस्थितीत येथे दोघांचाही विवाह पार पडला !समाजामध्ये प्रियाने दिलेली ही चपराक म्हणावी लागेल !कारण अनेक मुली ह्या छोट्या छोट्या कारणावरून मुलांना नाकारत असतात !डोळ्यावरून कानावरून रूपावरून अपंगत्ववरून अनेक संसार हे माना पानावरून सुद्धा मोडले आहे !परंतु !परंतु निश्चितच समाजातील लोकांनी खास करून तरुण तरुणींनी यातून बोध घेणे गरजेचे आहे !विशाल व प्रियांच्या सुखी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा !

जिल्ह्यात घातक शस्त्रे येतात कुठून? मॅक्झिन असलेली पिस्टल, जिवंत काडतूस जप्त… एलसीबीची कारवाई..

0

 

सुनिल पवार नांदुरा

(सूर्या मराठी न्युज)

नांदूरा- खामगाव हायवेवरून जिवंत काडतूस, मॅक्झिन व पिस्टलसह एका आरोपीला एलसीबीने जेरबंद केले आहे.तत्पूर्वीही तलवारी, पिस्टल अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. मात्र ऐवढी घातक शस्त्रे बुलडाणा जिल्ह्यात येतात तरी कुठुन? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जलंब पोलिस स्टेशन हद्दीत नांदुरा- खामगाव हायवेवर आरोपी अब्दुल मोबीन अब्दुल समद रा. नांदूरा जि. बुलडाणा व एक फरार आरोपी याच्याकडून १ मॅक्झिन असलेली पिस्टल, १ जिवंत काडतूस, १ रिकामी काडतूस, ३ मोबाईल, १ झायलो कार असा ५ लाख ६१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध ३ / २५ शस्त्र अधिनियमानुसार गून्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत, अप्पर पोलीस अधीक्षक, बजरंग बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांचे आदेशाने
पोउपनि निलेश शेळके,
श्रीकांत जिंदमवार,गजानन आहेर,युवराज शिंदे,सतीश जाधव,सरिता वाकोडे,सचिन जाधव यांनी केली.गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर लगाम लावण्यात एलसीबीला यश येत असले तरी, घातक शस्त्रे येतात कुठून ? याची पाळेमूळे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.

सोशल मीडियातून जवळीक साधून मुलीवर अत्याचार ,गुन्हा दाखल

0

 

फेसबुक माध्यमातून जवलीकब साधत अकोला येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वानखेड तालुका संग्रामपूर येथील युवका विरुद्ध तामगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला. अकोला येथील अल्पवयीन मुलीशी संग्रामपूर ब तालुक्यातील वानखेड येथील रवी मेहंगे वय 23 वर्ष याने फेसबुक च्या माध्यमातून मैत्री केली प्रेम संबंध निर्माण केले लग्नाचे आमिष देउन घरी बोलावत वेळावेळी अत्याचार केला व वारंवार भेटण्याचा तगादा लावुन बदनामी करण्याची धमकी दिली अशी ब तक्रार अल्पवयीन मुलीने तामगाव पोलीस स्टेशन ला दिली या वरून रवी मेहंगे विरुद्ध भादवीच्या कलम 376(1) 376(2)(ख)376(2)(ठ) तसेच बाल लेंगिक ब अधिनियम 2012 अनयवे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विखे पाटील करीत आहेत

पोलीस उपनिरीक्षकाला 50 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

0

 

 

(सूर्या मराठी न्युज)

महाराष्ट्र ब्युरो चीफ

हिम्मतराव तायडे

पुणे:- पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल चौकशी अर्जातील तक्रारदार यांच्याकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. राहुल शालिग्राम भदाणे, असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली आहे.

म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पैशासंबधित चौकशीमध्ये तक्रारदार यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली. त्यावर तक्रारदार यांनी संबंधित माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाला दिली. त्यानुसार या पथकाने सापळा रचून राहुल भदाणे यांच्यावर कारवाई केली.
दरम्यान, या कारवाईनंतर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

ट्रॉफीक हवालदारावर कार चढवण्याचा प्रयत्न

0

 

सूर्या मराठी न्युज

धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

नागपूर, सक्करदरा चौकवरची
धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे सक्करदरा चौकावर एका ट्रॉफीक हवालदाराने कार ला थांबवण्याचे प्रयत्न केले असता कार चालकाने चक्क कारची गती वाढूवून पळून जाण्याचा प्रयत्न केले त्यात ट्रॉफीक हवालदार कारचे बोनट वर चढला सुमारे अर्धा की मीटर प्रयत्न घेउन गेला, या धावपळीत कार चालकाने रस्त्यावर वरील काही इतर वाहनाना ही धडक दिली पोलिसांनी कार चालक ला अटक केली आहे

प्रसेनजीत पाटिल यांचा एल्गार गुंजनार. जळगाव जामोद येथे एल्गार संघटनेची स्थापना

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

१५ ऑगस्ट २०२० रोजी अजहर देशमुख यांच्या नेतृत्वात प्रसेनजीतदादा विचारमंच ची स्थापना करण्यात आली होती. तब्बल १०० दिवसाच्या कालावधीत संघटनेने अनेक आंदोलन करीत शेतकरी,शेतमजूर,आदिवासी,अल्पसंख्यांक यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने संघटनेने केली.. प्रसेनजीत पाटिल यांना अभिप्रेत शाहू, फुले, आंबेडकर,भगतसिंग, गाडगेबाबा, ए.पी.जे अब्दुल कलाम यांची विचारधारा अधिक प्रभावीप्रणे जनतेपर्यंत पोहचवन्यासाठी दिनांक २९ नोव्हेबर २०२० रोजी गिता भवन जळगाव जामोद येथे जळगाव जामोद तालुक्यातील महत्वपूर्ण कार्यकर्त्यांची बैठक झाली..बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रमेशभाऊ घुले हे होते. या बैठकीत शोषित,पीड़ित,वंचित यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढन्यासाठी एल्गार संघटनेची स्थापना करण्यात आली व प्रसेनजीतदादा विचारमंच या संघटनेत विलीन करण्याची घोषणा यावेळी विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष अजहर देशमुख यांनी केली.. एल्गार ही संघटना अराजकीय असेल तसेच संघटनेच्या माध्यमातून सुशिक्षीत युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करने,त्यासाठी प्रशिक्षण वर्ग ठेवणे,महिलांना रोजगारासोबतच सक्षम करने, महिलांना सुरक्षा प्रदान करने, विद्यार्थ्यांच्या शालेय तसेच महाविद्यालयीन समस्या सोड़वने,जातिपातीवीरहीत संघटन व जातिविरहित काम या विषयावर काम करणारी ही संघटना असेल असे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटिल यांनी भाषनात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड.करिम खान यांनी केले तसेच विजय पोहनकार यांनी प्रास्ताविकामध्ये संघटनेची नियमावली,पुढील दिशा,उद्देश व संघटनेचा त्रिसूत्री कार्यक्रम याविषयी विस्तृत माहिती दिली. एल्गार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षासाठी चर्चा सत्रामध्ये प्रसेनजीत पाटिल यांची निवड करावी अशी आग्रही मागणी यावेळी उपस्थितांनी केल्यामुळे मा. प्रसेनजीत पाटिल यांची एल्गार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी संतोष गवई सर, आसिफ इकबाल, अजहर देशमुख,भिमराव पाटिल,रवि धुळे,गौरव अवचार यांनी चर्चासत्रात सहभागी होऊन आपली मते मांडली. आभार प्रदर्शन अँड.मोहसीन खान यांनी केले.

उद्या पासून रेल्वे धावणार , नवीन वेळेनुसार

0

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

अकोला कोरोना संसर्ग काळात मोठ्या प्रमाणात रेल्वे गाडी बंद झाल्या पासून लोकांचा मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाले होते पण आता उद्या पासून धावणार रेल्वे गाडी या सणासुदीच्या पृष्ठभूमीवर चालविण्यात येत असलेल्या काही विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, १ डिसेंबरपासून हा बदल लागू होणार आहे. यामध्ये अकोला स्थानकावरून जाणा-या महाराष्ट्र एक्स्प्रेस व विदर्भ एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. गोंदिया-कोल्हापूर विशेष गाडी गाडी क्रमांक ०१०४० अप गोंदिया-कोल्हापूर विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून सकाळी ०८.१५ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता कोल्हापूरला पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर दुपारी ०३.१५ वाजता येणार आहे.

गाडी क्रमांक ०१०३९ डाउन कोल्हापूर-गोंदिया विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून दुपारी ०२.४५ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०६.०० वाजता गोंदियाला पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर सकाळी १०.१० वाजता येणार आहे.

 

मुंबई-गोंदिया विशेष गाडी

गाडी क्रमांक ०२१०६ अप गोंदिया-मुंबई विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून दुपारी ०२.४० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.५० वाजता मुंबईला पोहोचेल. गाडी क्रमांक ०२१०५ डाउन मुंबई -गोंदिया विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून सायंकाळी ७.०५ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.१५ वाजता गोंदियाला पोहोचेल नागरिकांना सोयचा होईल

खडसे करणार दोन दिवसात पुरावे सहित मोठी घोषणा , कोण येणार अडचणीत

0

 

 

(सूर्या मराठी न्युज)

राजकीय धमाका कोणाचा चेहरा येणार समोर काय होउ शकते कोणाचा धाब्बे दणाणले आहे काय आहे प्रकरण , भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्था प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असल्याने यादरम्यान बोलणे योग्य ठरणार नाही. आपल्याकडे याविषयीची कागदपत्रे, पत्रव्यवहार असून दोन दिवसात ही सर्व माहिती पत्रकार परिषद घेऊन देतो अशी माहिती माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या प्रकरणात जिल्ह्यातील दिग्गजच अधिक असून संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, माजी मंत्री याची पण माहिती असून ती देणार असल्याचेही खडसे म्हणाले. दरम्यान एकनाथ खडसे यांनी याविषयी तक्रारी करून ते आता कोणावर फास आवळत आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.

बीएचआर संस्थेतील अपहार, गुंतवणूकदारांची देणी न देणे, संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल भावाने विक्री करणे व पुणे येथे दाखल गुन्ह्या संदर्भात जळगावात आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे‌. यासंदर्भात खडसे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, याविषयी आपण राज्य सरकारकडे २०१८पासूनच १५ ते १६ तक्रारी केल्या आहे. सोबतच खासदार रक्षा खडसे यांच्या लेटरहेडवरदेखील दिल्ली येथे व अॅड. कीर्ती पाटील यांनीदेखील तक्रारी केल्याचे खडसे यांनी सांगितले.

या पूर्वीच्या राज्य सरकारने कारवाई थांबवली
दोन वर्षांपूर्वी तक्रारी केल्या तरी या पूर्वीच्या राज्य सरकारने कारवाई थांबवून ठेवण्याचा आरोपदेखील खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केला. या गैरव्यवहार प्रकरणी प्रथम राज्य सरकारकडे आपण तक्रारी केल्या होत्या. मात्र बीएचआर संस्था मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा २००२ प्रमाणे या संस्थेवर कारवाईचे अधिकार केंद्र सरकारला असल्याने राज्याचे सहकार आयुक्त यावर कारवाई करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी हा चौकशी अहवाल सरकारला पाठविला होता. त्यानंतरही राज्य सरकारने चौकशी थांबवून ठेवली होती असे खडसे यांचे म्हणणे आहे.

दोन दिवसात दिग्गजांची नावे समोर
या प्रकरणात जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी मंत्रीदेखील अडकले असून त्यांनी संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात घेतली आहे. या सर्वांचीदेखील चौकशी होणार असून आत्ताच माहिती दिल्यास चौकशीत हस्तक्षेप केल्यासारखे होईल. ते योग्य होणार नाही म्हणून चौकशी संपल्यानंतर दोन दिवसात सर्व माहिती व कागदपत्रेदेखील देतो असे खडसे म्हणाले.

हा घोटाळा हजारो कोटींचा असल्याचे सांगितले जात असून यात जिल्ह्यातील दिग्गज अडकल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सोबतच आता खडसे यांनी दोन दिवसात संपूर्ण कागदपत्रेदेखील देतो असे सांगितल्याने जिल्ह्यातील राजकारण काय वळण घेते व कोणावर कारवाई होते याकडे सर्वांचे राजकीय व लोकांचे लक्ष लागले आहे. तरी या राजकीय स्पॉट मध्ये कोनाचा चेहरा येणार समोर येही पाहणे खूप गरजेचे ठरू शकते

ठेकेदार रमेश काटे यांच्याकडून गावातील 50 कुटुंबीयांना मोफत ब्लँकेटचे वाटप !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

अनेक जण असे असतात की मोठ्या पदावर गेल्यानंतर ते आपल्या गावातील मातीशी असलेली नाळ तोडून टाकतात !परंतु काही बोटावर मोजण्याइतकेच लोक अशी असतात की व्यक्ती कितीही मोठ्या पदावर गेला तरी तो आपल्या गावातील लोकांना व आपल्या गावाला कधीच विसरत नाही गावासाठी काही तरी ते योगदान देत असतात !असाच एक प्रत्यय सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी काटे या गावात आला !पांगरी काटे येथील शासकीय कंत्राटदार म्हणून काम करत असलेले .रमेश भाऊराव काटे .यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी थंडीच्या दिवसांमध्ये ‘गावातील 50 कुटुंबियांना मोफत ब्लँकेटचे वाटप केले . ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये अंगावर रमेश भाऊ यांनी अंगावर घेण्यासाठी म्हणून चादर दिल्यामुळे अनेक कुटुंबियांना आनंद झाला आहे ।त्यांनी दाखवलेल्या दातृत्वाच्या भावनेमुळे परिसरांमध्ये त्यांचे कौतुक होत आहे !