प्रसेनजीत पाटिल यांचा एल्गार गुंजनार. जळगाव जामोद येथे एल्गार संघटनेची स्थापना

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

१५ ऑगस्ट २०२० रोजी अजहर देशमुख यांच्या नेतृत्वात प्रसेनजीतदादा विचारमंच ची स्थापना करण्यात आली होती. तब्बल १०० दिवसाच्या कालावधीत संघटनेने अनेक आंदोलन करीत शेतकरी,शेतमजूर,आदिवासी,अल्पसंख्यांक यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने संघटनेने केली.. प्रसेनजीत पाटिल यांना अभिप्रेत शाहू, फुले, आंबेडकर,भगतसिंग, गाडगेबाबा, ए.पी.जे अब्दुल कलाम यांची विचारधारा अधिक प्रभावीप्रणे जनतेपर्यंत पोहचवन्यासाठी दिनांक २९ नोव्हेबर २०२० रोजी गिता भवन जळगाव जामोद येथे जळगाव जामोद तालुक्यातील महत्वपूर्ण कार्यकर्त्यांची बैठक झाली..बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रमेशभाऊ घुले हे होते. या बैठकीत शोषित,पीड़ित,वंचित यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढन्यासाठी एल्गार संघटनेची स्थापना करण्यात आली व प्रसेनजीतदादा विचारमंच या संघटनेत विलीन करण्याची घोषणा यावेळी विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष अजहर देशमुख यांनी केली.. एल्गार ही संघटना अराजकीय असेल तसेच संघटनेच्या माध्यमातून सुशिक्षीत युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करने,त्यासाठी प्रशिक्षण वर्ग ठेवणे,महिलांना रोजगारासोबतच सक्षम करने, महिलांना सुरक्षा प्रदान करने, विद्यार्थ्यांच्या शालेय तसेच महाविद्यालयीन समस्या सोड़वने,जातिपातीवीरहीत संघटन व जातिविरहित काम या विषयावर काम करणारी ही संघटना असेल असे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटिल यांनी भाषनात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड.करिम खान यांनी केले तसेच विजय पोहनकार यांनी प्रास्ताविकामध्ये संघटनेची नियमावली,पुढील दिशा,उद्देश व संघटनेचा त्रिसूत्री कार्यक्रम याविषयी विस्तृत माहिती दिली. एल्गार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षासाठी चर्चा सत्रामध्ये प्रसेनजीत पाटिल यांची निवड करावी अशी आग्रही मागणी यावेळी उपस्थितांनी केल्यामुळे मा. प्रसेनजीत पाटिल यांची एल्गार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी संतोष गवई सर, आसिफ इकबाल, अजहर देशमुख,भिमराव पाटिल,रवि धुळे,गौरव अवचार यांनी चर्चासत्रात सहभागी होऊन आपली मते मांडली. आभार प्रदर्शन अँड.मोहसीन खान यांनी केले.

Leave a Comment