Home Blog Page 587

सांडपाण्याचे व्यवस्थापन करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा. स्वाभिमानी चा आंदोलनाचा इशारा

0

 

शेगाव काँग्रेस नगर वार्ड 5 येथील सांडपाण्या ची व्यवस्थापना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सांडपाणी जाण्याकरिता भुयारी गटारीचे व्यवस्था सांडपाणी जाण्याकरिता करावा लागेल
सांड पाण्याला जाण्याकरिता मार्ग नसल्याने घरगुती सांडपाणी तिथेच साचून राहते या मुळे साथीच्या रोग, डेंगू, मलेरिया चा मोठया प्रमाणात फेलाव होऊ शकतो सध्या उद्भवलेल्या वैशेषिक माहाणारी असेलेल्या कोविड 19 ( कोरोना ) च्या प्रादुर्भाग मुळे परिस्तिथी अत्यंत गंभीर होत चालली आहे. दिवसा गणित नवीन रुग्णाची संख्या वाढतच आहे. काँग्रेस नगर परिसरात नेहमी स्वरूपात जंतू नाशक फवारणी. सफाई कामगार द्वारे साफ सफाई होणे गरजेचे आहे.परंतु तसे न होता सांडपाणी वेवस्थापनेत होत असलेला निष्काळजीपणा तिथ राहत असलेल्या नागरिकांच्या जीवावर उठलेला आरोग्यास धोका उदभवलेला आहे. शेगाव नगर परिषद ही स्वछता पारितोषिक सन्मानित आहे.
त्या मुळे अश्या समस्या कळे गांभीर्याने लक्ष दयावे.
समस्या चे समाधान न होत नसल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना वतीने देण्यात आला असून या वेळेस *स्वाभिमानी शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे.* आकाश भालेराव.,रामा दुतोंडे, गजानन तायडे, आकाश शेगोकार, अयुब शेख. हे कार्यकर्ते उपस्तित होते.

डॉक्टर तो भगवान का रूप होता है??? अकोल्यातील डॉक्टरने विकलांग युवती सोबत केले गैरवर्तन,डॉक्टर वर विनयभंगाचा गुन्हा दाखल

0

 

अकोला – कोरोनाच्या महामारीत जगभर डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. मात्र, वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अकोला शहरात घडली आहे. डॉक्टररांनपासून कोणतीही गोष्ट लपविली तर आपणच गोत्यात येतो असे बोलले जाते मात्र याच गोष्टींचा फायदा अनेक जण उचलत असतात त्यातुन विनयभंग सारखे गुन्हे घडत असतात असाच प्रत्यय आज अकोल्यात आला आहे. खामगाव जिल्ह्यातील एक छोट्याशा गावात राहणाऱ्या परिवरराती एक पीडिता आपल्या आई आणि भावा सोबत अकोल्यात आली दोन वर्षांपासून पोटात दुखत असल्याने दुर्गा चौक स्थित पुरुषोत्तम तायडे यांच्या अमृत हॉस्पिटलमध्ये तपासणी साठी आली असता सदर डॉक्टर ने तिची सोनोग्राफी करण्यासाठी तिला आपल्या कॅबिन मध्ये झोपवले पीडितेचा आईला व भावाला शंका आल्याने त्यांनी या नराधम डॉक्टर आत के करतो आहे पाहण्याच्या प्रयत्न केला असता या डॉक्टर ने पीडितेच्या आई व भावाला कॅबिन बाहेर काढले व व पीडिते सोबत गैरवर्तन केले असता पीडितेने या नराधम डॉक्टर च्या कानशिलेत पेटवली थोड्या वेळाने तपासणी होताच सदर पीडितेने कॅबिन मध्ये घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगताच पीडितेच्या भावाने रामदास पेठ पोलीस स्टेशन गाठून गुन्ह्या नोंदविला डॉक्टरने विनयभंग केल्याचा आरोप करीत पोलीस स्टेशन गाठल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे सदर प्रकरणात डॉक्टर पुरुषोत्तम तायडे याला रामदास पेठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात रामदास पेठ पोलीस स्टेशन मध्ये 354, 376,C (D) L, 377 कलम खाली गुन्ह्या नोंदविला. विशेष बाब म्हणजे पीडिता ही विकलांग असल्याने या नराधम डॉक्टरावर रोष व्यक्त होत आहे सदर ची कारवाई रामदास पेठ पोलीस स्टेशन चे ठाणेदार आव्हाळे, PSI नरेंद्र नरेंद्र पद्मने, प्रशांत इंगळे, श्रीकांत पतोंड, विशाल चव्हाण यांनी केली

मोताळा तालुक्यातील वनहक्क दावेदारांवर वन व महसूल प्रशासनाकडून अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी- के जी शाह

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

मोताळा :- तालुक्यातील उबाळखेड , माळेगाव , मोहेगाव , रोहिनखेड , राहेरा , लोणघाट , दाभा , कोऱ्हाळा , खडकी , गुलभेली , खैरखेड , कोथळी , तरोडा , वारुळी इत्यादी गावातील वनजमिनिवर अतिक्रमण केलेल्या वनहक्क कायद्यानुसार दावे दाखल झालेल्या वनहक्क दावेदारांचे एकूण 262 वनहक्क दावे मा. उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष उपविभागीय स्तरीय समिती यांनी दि. 29/10/2020 रोजी मोताळा तहसील कार्यालयात ग्रामस्तरीय वनहक्क समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सदर दाव्यातील त्रुटी पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत सदरचे 262 वनहक्क दावे मोताळा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार महसूल यांच्याकडे प्राप्त झालेले आहेत
सदर दावे महाराष्ट्र शासनाच्या दि 18/05/2018 रोजीच्या परिपत्रकानुसार तसेच अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006 , नियम 2008 , सुधारित नियम 2012 अंमलबजावनीचे प्राधिकार व कार्यपद्धती नुसार संबंधित दाव्याची पडताळणी करण्याबाबत व वनहक्क कायद्यातील कलम 12 क (1) प्रमाणे वनहक्क समितीच्या व दावेदऱ्यांच्या उपस्थितीत वन व महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ताब्यात असलेल्या अतिक्रमण शेतजमिनीच्या स्थळ निरीक्षण व ताब्यात असलेल्या जमिनीचे पंचनामे तसेच मागणीचे क्षेत्र निश्चित करणारा नकाशा , वनविभागाचा नमुना-अ इत्यादी वनहक्क दाव्याच्या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा यांनी माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालय मलकापूर यांना याआधीच पत्र क्र . 1822/2020 दि. 22/05/2020 नुसार दिले आहे .
असे असतांना , मोताळा तालुक्यातील वनहक्क दावेदाऱ्यांच्या संदर्भात पंचनामे व स्थळ निरीक्षण अहवाल तयार करतांना तसेच दि 11 मे 2018 च्या शासन परिपत्रकाप्रमाणे वनमित्र मोहीम राबविताना वनहक्क दावेदारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी याबाबत आज दि 3/11/2020 रोजी मा तहसीलदार मोताळा यांना भूमिहक्क परिषदेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. जी. शाह यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले आहे सदर निवेदनाच्या प्रती मा. आयुक्त अमरावती , मा. जिल्हाधिकारी बुलडाणा , मा. उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना सादर करण्यात आले आहे .
निवेदन सादर करतांना शिष्ट मंडळामध्ये संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक गायकवाड , मोताळा तालुकाध्यक्ष भास्कर धुरंधर , संघटनेचे महासचिव रामकृष्ण मोरे यांच्यासह शिवदास घोती , उत्तम मोरे , तेजराव चव्हाण , आत्माराम फुलमाळी , पुनमचंद डांगे , संतोष चव्हाण , अनुसया वाकोडे उपस्थित होते.

सूनगाव येथील शेतकऱ्यांनी दिले राशी सिड्स 659 कंपनीच्या विरोधात तालुका कृषी अधिकाऱ्यांना तक्रार

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील शेतकरी यांनी तक्रारीत म्हटले की त्यांनी उसरा बु शिवारात गट नं 75 13 14 व सूनगाव भाग 2 मधील 791 शेतात राशी कंपनीचे 659 हे कपाशीचे वाण पेरणी केली परंतु बियाणे पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे आज रोजी कपाशीच्या झाडांना कमी प्रमाणात बोंडे लागली व काही झाडांना तर बोंडे लागलीच नाही व लागलेल्या बोडांना सुरवातीपासूनच कीड लागलेली आहे व मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे या वर्षी आधीच संकटात सापडलेल्या अवस्थेत शेतकरी असताना अशा परिस्थितीत राशी कंपनीचे 659 वान पेरून उत्पन्न न झाल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे व कंपनीने बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केली आहे तरी आपण सदर शेताची पाहणी करून पंचनामा करून कंपनीवर कायदेशीर कारवाई ची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांचा झालेला खर्च व उत्पादन खर्च त्याचा मोबदला शेतकर्‍यांना देण्यात यावा अशा आशयाची तक्रार दिली आहे व तक्रारीची प्रतिलिपी तहसीलदार जळगाव जामोद यांना दिली आहे तक्रारीवर गजानन सोनटक्के सुरेश ढगे प्रमोद राऊत सुमित्राबाई राजपूत आदिच्या सह्या आहेत

सत्याग्रह शेतकरी संघटनेचा अयाज भाऊ शेख यांच्या नेतृत्वाखाली सर्व नियमांचे पालन करून शेगांव तहसील येथे आकाल मोर्चा काढण्यात आला

0

 

मागच्यावर्षी ओला दुष्काळ ने शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले होते. ते संकट झाले न झाले यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनची दोन ते तीन वेळा पेरणी करावी लागली. असे वाटले उडीद, मुगाचे पीक आम्हाला साथ देईल पण तेही निसर्गाने आमच्यापासून हिवरून घेतले. तिळाचे पीक सुद्धा आले नाही. आणि कपाशी पीक सुद्धा मोठया प्रमाणात जास्त पाण्याने बोड्या सोडल्यामुळे हातातून गेले.
शेतात एवढी कसरत करून सुद्धा रोगराई अतिवृष्टीमुळे सोयाबिनला हिरवा गच्च पाला दिसला पण उत्पन्न मात्र आले नाही. एकरी एक ते दीड क्विंटल पेक्षा कमी उत्पन्न आले असून यात सोयाबिन काढणीचा सुद्धा खर्च निघाला नाही. त्या मुळे आत्ता वर्षभराचा घर खर्च, शिक्षण, आजाराचा खर्च , कसा भागावायचा व उदरनिर्वाह तरी कसा करायचा हाच प्रश्न पडला आहे . पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाल्या मुळे सगळ्या पिकांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची येणारी दिवाळी अंधारात जाणार आहे. आमच्या मंडळाची नजर अंदाज आनवरी 65 पैसे इतकी दाखवली आहे परंतु उत्पन्ना सारखे दिसत नसतांना नजर अंदाज आणेवारी 65 पैसे आली तरी कशी ? खरं तर ही आणेवारी 30 पैसे च्या आत यायला पाहिजे होती ही वस्तुस्थिती आहे, पण ती खरी आणेवारी दाखवली नाही. तरी आम्हला यात शंका वाटत आहे म्हणुन हा प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकऱ्यानं पुढे खूप मोठे आर्थिक संकट आहे . म्हणून शेगांव तालुका दुष्काळ ग्रस्थ घोषित करून दुष्काळाच्या सर्व सवलती पीक विमा तात्काळ लागू करण्यात यावा अन्यथा या सवलती लागू न झाल्यास 15 दिवसा नंतर आम्ही सर्व शेतकरी आमच्या कुटुंबासह आपल्या कार्यालयावर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू. याची दक्षता घ्यावी ही विनंती

राजू नाकाडे(जिल्हा संयोजक)
अयाज शेख(युवा आघाडी अध्यक्ष)
आकाश देशमुख(युवा आघाडी)
गणेश सडतकार(युवा आघाडी)
अमीर शहा(अल्प.युवा आघाडी)
शब्बीर शेख(अल्प.ता.अध्यक्ष)
मोहन कवरे(युवा ता.अध्यक्ष)
मनीष खवले(ता.संपर्क प्रमुख)
गणेश भंबेरे(ता.अध्यक्ष)
गोपाल बाठे संजय फाटे अनिल कवडे अनिल गव्हादे
भागवत मिरगे
नथुराम बेळूरकर
विष्णू फायके
शिवा भाऊ पाटील
आत्माराम पाटील
सागर जवंजाळ
गोपाल गावंदे.पवन चव्हाण वसंतराव पहुरकर
शुभम पहुरकर शब्बीर खान मनोज बेलोकार प्रथमेश साळुंके
शेख सत्तार शेख इस्माईल शेख लतीप शेख आजाम व सत्याग्रह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व असंख्य शेतकरी उपस्थित होते

वरवट बकाल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने संग्रामपूर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गोरगरीबांना अहोरात्र आरोग्य सेवा देणारे दानशूर व्यक्तीमत्व मा. शंकरभाऊ पुरोहित यांना महाराष्ट्र बहुजन ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य मित्र पुरस्कार

0

 

संग्रामपूर – आज वरवट बकाल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने संग्रामपूर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गोरगरीबांना अहोरात्र आरोग्य सेवा देणारे दानशूर व्यक्तीमत्व मा. शंकरभाऊ पुरोहित यांना महाराष्ट्र बहुजन ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल संग्रामपुर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला…
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वरवट बकाल चे ग्राम पंचायत सदस्य चक्रधर इंगळे होते तसेच प्रमुख उपस्थितीत जेष्ट नेते देविदास दामोदर , माजी पंचायत समिती सदस्य दशरथ भाऊ सुरडकर , आबाराव इंगळे , पंचायत समिती सदस्य शेषराव खंडेराव , संजु भाऊ इंगळे असंख्य समाज बांधव उपस्थित होते… बोलतांना देविदास दामोदर यांनी सांगितले की सत्कार त्यांचाच होतो ज्यांचे सत्कार्य असते…. प्रास्ताविक राहुल इंगळे सर यांनी केले तसेच सूत्रसंचालन विजयभाऊ पहुरकर यांनी केले .. आभार संजु भाऊ इंगळे यांनी मानले.तालुक्यातील मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते…

दखल सूर्या मराठी न्युज ची सुनगाव येथील वार्ड नंबर 6 मध्ये सफसफाईचे काम सुरू

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत येथे वार्ड6 नंबर सहा मध्ये नाल्या गेल्या कित्येक दिवसांपासून साफ केलेल्या नाहीत व ग्रामपंचायत सफाई कामगार सुद्धा वार्ड नंबर 6 मधील सुनील खवले यांच्या घरासमोरील नाल्या साफ करीत नाही त्या नाल्या ब्लॉक होऊन त्यामधील केरकचरा घाण रोडवर येत आहे व त्या घाणीमुळे नागरिकांना रस्त्यावर चालतासुद्धा येत नाही व त्या घाणीचा दुर्गंध परिसरात पसरून परिणामी सदर गल्लीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी या संबंधित बाबीचा ग्रामपंचायत प्रशासनाकडून दखल घेण्यात यावी अशी मागणी वार्ड नंबर सहा मधील नागरिकांनी केली आहे ही बातमी प्रसारित होताच ग्रामपंचायत प्रशासन जागे होऊन वॉर्ड न 6 मध्ये सफाई कामगारांकडून साफ सफाईचे काम सुरू केले

जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीचे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन…

0

 

 

 

गजानन सोनटक्के
जळगांव जामोद प्रतिनिधी:-

आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटी जळगाव जामोद च्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर जळगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाची पिके अत्यल्प स्वरूपात शेतकऱ्यांच्या हातामध्ये येत आहेत या पिकांमधून शेतकऱ्यांचा शेतीमाल तयार करण्यासाठी खर्च निघणे कठीण झाले आहे त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्याचे आनेवारी 54 टक्के जाहीर करून प्रशासनामार्फत शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आलेले आहे यामुळे पीक विमा ही शेवटची आशा आहे दुसर होताना दिसत आहे करिता जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने 24 तास राबणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनामार्फत पिकाची योग्य ती आणेवारी जाहीर करून त्यांना या संकटातून शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर करावा यासाठी निवेदन देण्यात आले सदर निवेदनावर अविनाश उमरकर, डॉक्टर स्वातीताई वाकेकर, प्रकाश पाटील,ज्योतीताई ढोकणे, बाल गजानन पाटील, युनूस खान, अमर पाचपोर, राजू भाऊ घुटे, अर्जुन घोलप, आदींच्या सह्या आहेत.

जामोद महावितरण केंद्राचा भोंगळ कारभार वरिष्ठ अधिकारी यांचा आशीर्वादाना सर्रास चालू आहे अवैधरित्या कनेक्शन स्थानिक कर्मचाऱ्यांचा काही साटंलोटं तर नाही ना असा सवाल

0

 

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद उपविभागातील जामोद वितरण केंद्र अंतर्गत येणाऱ्या करमोळा गावांमध्ये सर्रासपणे वीजचोरी चालू आहे जामोद ते टुनकी रोड वरती तीन ढाब्यावरती वरिष्ठ अधिकारी यांचा आशीर्वादाने सर्रासपणे अवैधरित्या विजेची चोरी होत आहे तरीपण महावितरणचे अधिकारी व कर्मचारी कुंभकरण झोपीतच नाटक करताना दिसत आहे तसेच आजूबाजूच्या खेळामध्ये सुद्धा अवैधरित्या चोरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे या अवैध कनेक्शन मुळे बऱ्याच वेळा महावितरण चे तार तुटण्याच्या पण प्रकार वाढत आहे तसेच या गावांमधील ट्रांसफार्मर वरील फ्युज जाण्याचे प्रकार होत आहे तसेच करमोळा भागांमध्ये लाईट जाण्याचे प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे तरी महावितरण वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का अशी मागणी येथील नागरिक करीत आहे

सुनगाव येथील वार्ड नंबर 6 मध्ये घाणीचे साम्राज्य

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत येथे वार्ड6 नंबर सहा मध्ये नाल्या गेल्या कित्येक दिवसांपासून साफ केलेल्या नाहीत व ग्रामपंचायत सफाई कामगार सुद्धा वार्ड नंबर 6 मधील सुनील खवले यांच्या घरासमोरील नाल्या साफ करीत नाही त्या नाल्या ब्लॉक होऊन त्यामधील केरकचरा घाण रोडवर येत आहे परिणामी सदर गल्लीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी या संबंधित बाबीचा ग्रामपंचायत प्रशासनाकडून दखल घेण्यात यावी अशी मागणी वार्ड नंबर सहा मधील नागरिकांनी केली आहे