Home Blog Page 589

आ.रवी राणांचे जेलमध्ये अन्नत्याग तर खा.नवनीत राणांचे जेलबाहेर धरणे आंदोलन 

0

 

अमरावती :-  सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष नेते सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाही. अशातच आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी रास्तारोको आंदोलन केले होते.
रास्तारोको आंदोलन करणाऱ्या रवी राणा यांना अमरावती पोलिसांनी अ.टक केलं आहे. ऐन दिवाळीतील आजचा महत्वाचा दिवस देखील रवी राणा यांना कारागृहातंच काढावा लागणार आहे. अमरावती पोलिसांनी रवी राणा यांच्यावर केलेल्या कारवाई विरोधात रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेरच धरणे आंदोलन केलं आहे
खा. नवनीत राणा आज सकाळी रवी राणा यांना भेटण्यासाठी कारागृहात गेल्या होत्या. मात्र, अमरावती पोलिसांनी त्यांना भेटू दिलं नाही. यावेळी नवनीत राणा फार संतप्त झाल्या होत्या. त्यांची यावेळी अमरावती पोलिसांबर चांगलीच बाचाबाची देखील झाली.
संतप्त झालेल्या नवनीत राणा यांनी यावेळी कारागृहाबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले. जोपर्यंत रवी राणा यांची भेट होणार नाही तोपर्यंत मी कारागृहाबाहेरच धरणे आंदोलन करणार आहे, असा इशारा नवनीत राणा यांनी पोलिसांना दिला आहे.
एकीकडे नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी अट.क करताच रवी राणा यांनी कारागृहात अन्नत्याग केला आहे. आता याप्रकरणी पुढे काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, अमरावती पोलिसांनी भाजपच्या एका आमदारावर ऐन दिवाळीत कारवाई केल्यानं अनेक भाजप नेते याचा निषेध व्यक्त करत आहेत. भाजप नेते सोशल मीडियावरून महाविकास आघाडी सरकारवर देखील यावरून निशाणा साधत आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे. यासंबंधीत देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.

दिवाळीच्या दिवशी तीन सख्ख्या भावाचा तलावात बुडून मृत्यू

0

 

 

गोंदिया-शैलेश राजनकर

 

भंडारा,दि.14ः-ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर परंपरेनुसार शेळ्यामेंढ्या च्या आंघोळ करण्याकरिता गावानजीक तलावातील पाण्यात उतरले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सख्या तीन भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील पुयार येथे घडली .
पुयार तलावातील लक्ष्मीपूजन च्या दिवशी 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास घडली .
मृतक मधुकर नीलकंठ मेश्राम 42 . सुधाकर नीलकंठ मेश्राम 39 . व प्रदीप नीलकंठ मेश्राम राहणार . ह्या सख्ख्या भावाचे नाव होते .
घटनेच्या दिवशी 13 वर्षीय बालकाला घेऊन मालकीच्या अंदाजे शंभर शेळ्या मेंढ्या घेऊन आंघोळीसाठी गावाजवळील तलावात नेले होते . यावेळी प्रारंभी मृतक मधुकर हा शेळ्या-मेंढ्यांना आंघोळीसाठी खोल पाण्यात उतरला मात्र शेळ्या-मेंढ्या पाण्याबाहेर पडताना . मृतक मधुकर बुडत असल्याचे पाहून मृतक सुधाकर दुसऱ्या भावाने पाण्यात उडी घेतली . तोदेखील बुडताना दिसले यांचे तिसऱ्या प्रदीपने उडी घेतली . मात्र खोल पाण्याचा अंदाज न लागल्याने एकमेकाचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला .
यावेळी तुषार ने सदर माहिती दूरध्वनी वरून कुटुंबीयांना माहिती दिली . यावेळी गावकऱ्यांना माहिती होताच गावकरी घटनास्थळी धाव घेतली. गावातीलच काही दिवस बांधवां च्या मदतीने मृत्यू देह तलावातून बाहेर काढण्यात आले .
सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलीस स्टेशन ला होताच येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक चहांदे . यांच्या सह नाईक पोलीस दुर्योधन वके कार . संदीप रोकडे . बावणे . नखाते . घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले .
दिवाळीच्या शुभ प पर्वावर एक्या गरीब कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्यने संपूर्ण पुयार गावात शोककळा पसरलेली आहे .

गाव तेथे शाखा अभियान ची सुरवात पलसोडा येथून करताना मनस्वी आनंद, काँग्रेस चा विचार घरो-घरी पोहचविणार. आमदार राजेश एकडे

0

 

सुनील पवार नांदुरा

गाव तिथे शाखा या अभियानांचा शुभारंभ
गुरुवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजी दीपावलीच्या पूर्वसंध्येला पलसोडा येथे मलकापूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार .राजुभाऊ एकडे यांच्या शुभ हस्ते काँग्रेस पक्षाच्या विविध शाखाचे उदघाटन व शाखा फलकाचे अनावर तसेच काँग्रेस पक्ष प्रवेश समारंभ ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या वेळी गाव तेथे शाखा अभियान ची सुरवात पलसोडा येथून करताना मनस्वी आनंद, काँग्रेस चा विचार घरो-घरी पोहचविणार असे मनोगत आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केले या भव्य दिव्य कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री.पदमभाऊ पाटील,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे,जिल्हा काँग्रेस किसान सभेचे अध्यक्ष श्री राजूभाऊ पाटील,जिल्हा परिषद सदस्य श्री.संतोषभाऊ पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती श्री.केदारभाऊ ढोरे,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तमभाऊ झाल्टे, किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री.सचिन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य श्री प्रसादभाऊ पाटील,तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री.आकाश वतपाळ श्री. अतुल पाटील,युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वरभाऊ डांबरे,युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष श्री.राजू हाडे पाटील, श्री. शंकर बोबडे,युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष श्री.शुभम लांडे ,श्री.नारायण झालटे, श्री.रमेश कांडेलकर, श्री.गुरुदास पाटील,श्री.दीपक चांभारे, श्री.शिवाभाऊ चाभारे, श्री.नारायण कांडेलकर श्री. रामकृष्ण ठोंबरे,श्री. बाळकृष्ण चाभारे, श्री.बाळूभाऊ आढाव,श्री. राजेंद्र चाभारे,श्री.गजानन चाभारे, श्री शिवा पाटील,श्री.संतोष ठोंबरे, श्री.सदाशिव पाटील,श्री.विजय पाटील श्री.प्रकाश ठोंबरे,श्री. भिकाजी सुरळकर,श्री.जनाभाऊ पाटील,श्री.सोपान इंगळे,श्री.वाल्मिक मुकुंद पलसोडा येथील ग्राम काँग्रेस शाखा, किसान काँग्रेस शाखा व युवक काँग्रेसच्या शाखेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळी च्या दिवशी चिमुकलीचा पाण्यात बुडून अंत , देवरी तालुक्यातील ओवारा येथील डिड वर्षाच्या विधी लाडे हिचा बादली मध्ये बुडून मृत्यु

0

 

 

 

दिवाळी च्या दिवशी विधी लाडे
कुटुंबावर दु:खाचे डोंगर

भागवत चकोले
देवरी तालुका प्राधिनिधी :

देवरी/ओवारा 14/11/2020 आज दिवाळी चा सण संपूर्ण देश साजरा करत असतांना लाडे कुटूंबीया समोर दु:खाचे डोंगर उभे राहिले आहे. घरची सर्व लोक दिवाळी ची तयारी करत असतांना सकडी विधी महेंद्र लाडे ओवारा वय दीड वर्ष हि घरी खेतड होती परंतु खेडता खेडता शेजारी असलेल्या पाण्याच्या बादली मध्ये पडली आणि तिचा त्यातच दु:खद मृत्यु झालाची घटना घडली असून ऐन दिवाळीच्या दिवशी लाडे परिवारावर दु:खाचा आभाळ कोसळलेला असून सर्वी कडे चिमुकली साठी हळहळ व्यक्त केला जात आहे घटनास्थळी गावात सरपंच, पोलीसपाटील आणि गावकरी उपस्थित होते आणि कुटुंबाला सांतवना दिला.

जळगाव जामोद तहसील कार्यालया समोर बेसन भाकर खात केले भाजपाने आंदोलन… व काळी दिवाळी साजरी

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा. तालुका प्रतिनिधी:-

आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद तालुका भाजपाच्या वतीने शेतकऱ्यांना शासकीय मदत ताबडतोब देण्यात यावी यासाठी तहसील कार्यालयासमोर बेसन भाकर आंदोलन करण्यात आले, संपूर्ण जिल्ह्यात ओल्या दुष्काळाने थैमान घातले आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातील पीक नुकसान झाले आहे, जळगाव जामोद तालुक्यात ही सर्वात जास्त पिकाचे नुकसान झाले आहे , सोयाबीन पिकाचे तर सांगायलाच नको सोंगणी ही महागात पडत आहे. कपाशी वर ही बोंड अळी येऊन मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशातच शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.
पण राजकीय दाबावा खाली येऊन पिकाची अनेवारी ही ५० टक्या पेक्षा जास्त दाखवण्यात आली आहे, पालकमंत्र्यांच्या मतदार संघात सर्वाधिक नुकसान दाखवण्यात आले आणि तेच जळगाव जामोद मतदार संघात सर्वात कमी नुकसान झाले असा अहवाल पाठवण्यात आला..
जिल्ह्यात ६५ हजार शेतकरी नुकसान भरपाई साठी पात्र आहेत त्यात एकट्या सिंदखेड राजा मध्ये ५९ हजार शेतकरी नुकसान ग्रस्त दाखवले म्हणजे हा सरसर अन्याय भेदभाव आहे शेतकऱ्या सोबत त्याच करिता पिकाची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी भाजपा जळगाव जामोद येथे बेसनभाकर खात आंदोलन करण्यात आले , दिवाळी सारखा मोठा सण उद्या आहे पण शेतकऱ्यांचा पिकाच नुकसान झालं त्यात त्यांना भेदभाव करून मदत नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यानी कशी दिवाळी साजरी करायची , कपडे लात्ते तर दूर त्यांना खायची वांदे झाले हे पालकमंत्र्यांना दिसत नाही काय ?
असा प्रश्न या वेळी विचारण्यात आला … शेतकऱ्यांचा सर्व मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आज बेसन भाकर आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला… शेतकऱ्या सोबत बेसन भाकर खाऊन आंदोलन केले , व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व बेसन भाकर दिली , सोबत च मागण्या पूर्ण न झाल्यास या पेक्षा ही उग्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ,, शहर अध्यक्ष अभिमन्यू भगत माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र गांधी , भाजपा ओबीसी अध्यक्ष रवींद्र ढोकणे, भाजयूमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, नगराध्यक्ष सौ. सीमाताई डोबे , सौ. अपर्णाताई संजय कुटे , चंदाताई पुंडे , लताताई तायडे , जिल्हा महा मंत्री नंदू अग्रवाल नगरसेवक निलेश शर्मा , रवी पाचपोर , चंद्रकांत वाघ , जी प सदस्य रुपालीताई अशोक काळपांडे , राजेंद्र उमाळे, बंडू भाऊ पाटील ,पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, मोहनसिंह राजपुत,रमेश वंडाळे, अमोल घाटे , राम इंगळे , ज्ञानेश्वर तिकर , गणेश वाघ , परम राजपूत यांच्यासह शेकडो भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ड्रॉ अमोल पवार यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत पार्टी तर्फे अर्जं दाखल केला!

0

 

 

येणाऱ्या 1 डिषसेंबर 2020 रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे पडघम महाराष्ट्रात जोराने वाजवायला सुरुवात झाली आहे. समाजसेवा ‘नसानसात’ भिनलेले व कोरोनाच्या जागतिक महामारीत तन-मन-धनाने गोरगरीब लोकांना मदत करणारे, करोना आजारावर अभ्यासपूर्वक जनजागरण करणारे सर्व डॉक्टरांच्या मदतीने घेऊन पलूस तालुक्यात पहिले खाजगी ‘कोविड हॉस्पिटल’ उभारणारे उच्चशिक्षित -अभ्यासू- पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, संविधान समर्थक डॉक्टर अमोल पवार यांना आम आदमी पार्टीची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.

अत्यंत कमी कालावधीत भारतीय राजकारणात आपल्या कार्यशैलीने एक वेगळा ठसा उमटवणारी पार्टी म्हणजेच आम आदमी पार्टी. अश्या आप पार्टीची अधिकृत उमेदवारी डॉ.अमोल पवार यांचे समाजोपयोगी कार्य व जनसामान्यात असलेली सकारात्मक प्रतिमा आणि निवडणूक निवडून येण्याची दाट शक्यता या गुणवत्तेवर अधिकृत उमेदवारी 7 नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आली.

आज पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आज पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात डॉ अमोल पवार यांनी आम आदमी पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत आज दाखल केली. आप पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, संघटन मंत्री डॉ अभिजित मोरे, सह संयोजक संदीप सोनवणे, इम्तियाज खान, सतीश यादव,असगर बेग, चेतन बेंद्रे ,स्मिता पवार, केदार ढमाले, आनंद अंकुश, सुभाष करांडे, अभिजित परदेशी, विक्रम गायकवाड, विकास लोंढे, निखिल देवकर, मनोज थोरात, ज्ञानेश्वर गायकवाड, सुजित आगरवाल, बाबासाहेब जाधव,मारुती गायकवाड, रोहन रोकडे,आप्पासाहेब ननावरे, मोहनसिंग रजपूत, शीतल अदमाने, प्रा एस आर पाटील,प्रशांत सावंत ,विकास कांबळे,श्रीकांत शिंदे,वेदांत पाटील,रंगराव पाटील,ओंकार पाटील,अनिकेत पाटील,अमोल मडामे, सुशांत कोलप इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

पुणे पदवीधर मतदार संघातील विविध सामाजिक संघटना संस्था, जसे महामार्ग संघर्ष समिती, लोकशाही वाचवा कृतिशील विचारमंच, बऱ्याच डॉक्टर संघटना, सांगली जिल्ह्यातील इतर पुरोगामी परिवर्तनवादी जनसंघटनानि डॉक्टर अमोल पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे आणि दिवसेंदिवस इतर जनसंघटनांचा पाठिंबा वाढतच आहे

त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. आजच्या पत्रकार भवन पुणे येथील पत्रकार परिषदेत  आपचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ अमोल पवार यांच्यासह आप पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, संघटन मंत्री डॉ अभिजीत मोरे , इम्तियाज खान , सतीश यादव उपस्थित होते.
—- डाॅ. नितीन पवार

झुणका भाकर खाऊन आघाडी सरकारचा निषेध

0

 

अजहर पठाण
परभणी

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दिवाळी तोंडावर आलेली असतांना देखील शासनाने शेतकऱ्यांना अजूनही मदत दिलेली नाही. जी अल्प मदत जाहीर झाली त्यात सुद्धा भेदभाव केल्या गेला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या कमी दाखवून बहुसंख्य शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. महाराष्ट्रातील तिघाडी सरकारने शेतकरी बांधवांप्रति दाखवलेल्या उदासिन धोरणाचा निषेध करण्यासाठी आज रोजी..

जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे जिल्ह्याच्या नेत्या कार्यक्षम आमदार सौ.मेघनादिदि साकोरे-बोर्ङीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा-किसान मोर्चा परभणी च्या वतीने ‘चुन भाकर आंदोलन’ करून शेतकऱ्यांप्रति उदासीन असलेल्या महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला व मा.जिल्हाधिकारी साहेब यांना झुनका-भाकर देऊन निवेदण देण्यात आले..

यावेळी आमदार सौ.मेघनादिदि साकोरे-बोर्ङीकर जिल्हा अध्यक्ष ङाॅ सुभाष कदम.किशान मोर्चाचे उध्दवराव नाईक.भाजपा जनसेवक मा.बाळासाहेब जाधव साहेब.माजी आमदार मोहनराव फङ.विठ्ठलराव रबदङे.प्रमोद वाकोङकर.ॲङ तांळदे साहेब.रंगनाथ सोळंके.सुरेश भुमरे.सुभाष अंबट.मधुकरराव चव्हाण.विलास कच्छवे.आकाश लोहट व जिल्हातील सर्व भाजपा वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होतो…!!

चुन भाकर आंदोलनाने तहसिल कार्यालय दणाणले

0

 

संग्रामपुर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात सरसकट शासनाने अनुदान द्यावे या मांगणी करीता शेतकर्यांना सोबत घेवुन भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शासन विरोधी घोषणा देत महाआघाडीच्या शासनाचे निषेध व्यक्त केला. तालुक्यात शेतकर्‍यांची परिस्थिती भयानक असतांना सुध्दा हे सरकार शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहत नाही. मुंग, उडीद, सोयाबीन, कापूस ही सर्व पिके बाद झाली आहे. अस असताना शेतकरी मोठय़ा आशेने शासनाकडे पाहत होते पंरतु निराशाच हाती आली. या सर्व बाबींचा विचार करत भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी शेतकऱ्यांच्या सेमवेत भाकर चटणी खात या शासनाचे विरोध केले.
यावेळी श्री लोकेश राठी, तालुका अध्यक्ष भाजपा, पं स सभापती सौ नंदाताई पांडुरंगजी हागे,गजाननभाऊ दाणे, सभापती कृ उ बा समिती, जानरावजी देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, राजुभाऊ ठाकरे, सहकार जिल्हा संयोजक, पांडुरंगजी हागे, डॉ. गणेशभाऊ दातिर, जिल्हा सदस्य भाजपा, ज्ञानदेवराव भारसाकळे, जि प सदस्य, प्रमोदभाऊ खोद्रे, जि प सदस्य, श्री अंबादासजी चव्हाण, उपसभापती, पं स संग्रामपुर, विलासभाऊ इंगळे, शहराध्यक्ष संग्रामपुर, सुभाषभाऊ हागे, प्रमोदभाऊ गोसावी, रामदास म्हसाळ, अविनाश धर्माळ, राजुभाऊ मुयांडे, श्रीकृष्ण भालतिडक, संजुभाऊ ठाकरे, गुणवंता खोडके, नारायण अवचार, संजुभाऊ उमाळे, शामभाऊ आकोटकार, यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ता उपस्थित होते

महावितरणा च्या भोंगळ कारभारामुळे आदिवासींची दिवाळी प्रकाशित होणार की नाही….?

0

 

 

सोनाळा (सूर्या मराठी न्युज) संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पुनर्वसित आदिवासीबहुल भागांमधील गावांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून अंधारमय असलेले लोक वस्ती प्रकाशित करण्याकरता महावितरणने मोठा गाजा वाजा करत रोहन खिडकी, नविन चुनखडी, शेंबा इत्यादी गावांमध्ये लाखो रुपये खर्चून विद्युत महावितरणने मोठ्या थाटात कामाला सुरुवात केली. पंधरा दिवसात काम पूर्ण करून गेल्या एक ते दीड महिन्यापासून महावितरणचे अधिकारी लाईट चालू करण्याकरता कशाची वाट बघत आहेत. महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कुंभकरण झोपेतून उठून आदिवासीबहुल भागातील लाईन चालू करावी अशी मागणी आदिवासी भागातील नागरिक करत आहे.
आदिवासीबहुल भागातील पुनर्वसित आदिवासी नागरिकांनी विद्युत महावितरणला आपण लाईन चालू करत नसाल तर आदिवासी बांधव विद्युत महावितरण कार्यालय सोनाळा या ठिकाणी तीव्र आंदोलन करतील हे त्यांनी आपल्या सूर्या मराठी न्यूज चॅनल च्या माध्यमातून शासनापुढे मांडले.

वान चे पाणी आमच्या हक्काचे घोषणा देत तेल्हारा आडसुळ येथे भाजपाचे रास्तारोको

0

 

तेल्हारा —- तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड गावा जवळ सातपुडा च्या पायथ्याशी वान नदी प्रकल्पांतर्गत वान धर्मातील जलसाठ्यांची उचल बाळापूर मतदार संघातल्या 69 खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनासाठी वापरण्याचा घाट घातला जात असून सदर्हू पाण्याचा वापर व अकोट तालुक्यात साठीच व्हावा या मागणीसाठी तेल्हारा तालुका व शहर भाजपाच्यावतीने अडसूळ तेल्हारा शहर येथे 12 नोव्हेंबर रोजी वान चे पाणी आमच्या हक्काचे नाही अशा घोषणा देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
तेल्हारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ आडसुळ फाट्या वरील टी पाँइंटवर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून दि 12 नोव्हेंबर रोजी दोन तास वाहतूक रोखून धरली तालुका भाजपाध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या मार्गदर्शनात भाजपा शहराध्यक्ष महेंद्र गोयनका आडसुळ येथे भाजयुमो जिल्हा सरचिटणीस किरण अवताडे हिवरखेड येथे प्रवीण येऊन यांच्या नेतृत्वात पार्क पडलेल्या रास्ता रोको आंदोलनात भाजपा जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे शेतकरी आघाडी शहर अध्यक्ष संजय देशमुख सहकार आघाडी शहर अध्यक्ष अतूल विखे तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर सरफ प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षा नयनाताई मनतकार महिला आघाडी तालुका अध्यक्षा मोनिकाताई वाघ भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष लखन राजनकर शहर अध्यक्ष गणेश इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनात सरचिटणीस रवि गाडोदिया गजानन गायकवाड उपाध्यक्ष विजय देशमुख तालुका प्रसिद्धी प्रमुख रवि शर्मा न प गट नेते नरेश आप्पा गंभिरे गजानन नळकाडे नागोराव वानखडे गोपाल पाडिया राजेश बुरघाटे प्रविण बुरघाटे न्यानेश्वर वारूळकार अक्षय पदवाड मनोज पालिवाल श्याम वानखडे सुमित गंभिरे सदानंद नवलकार विशाल कोकाटे मोहिब ठेकेदार अर्जुन वाघ रोशन खोटरे राहुल मार्के धिरज नेमाडे शिवा खाडे राहुल भोम श्रीधर महाल्ले दिनेश काळपांडे शुभम चिंचोळकार अंकुश वाघ विठ्ठव खराडे गोपाल भाकरे सागर धोपाले सोमेश नेमाडे आशिष शेळके सुधिर दाते विठ्ठलराव भाकरे अनिल खारोडे सुधिर दाते विठ्ठल भाकरे अनिल खारोडे अतुल ताथोड दिगंबर पांडे धम्मपाल भटकर बाळासाहेब पाचपोर विजय माने शुभम ईसापुरे स्वप्निल भारसाकडे अनिल धरमकर गोपाल मोहोड यांच्यासह भाजपा शहर व तालुका चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

 

 

*तालुका प्रसिद्धीप्रमुख रवि शर्मा*