Home Blog Page 597

संतापजनक….. सहा महिन्यांच्या पोटच्या तान्ह्या मुलीला रस्त्यावर फेकले

0

 

चिखली : दि २५ ऑक्टोबर रोजी चिखली शहरातील बस स्टँड समोरील आशीर्वाद मेडिकल समोर एका पतीपत्नीचे भांडण सुरू झाले असता त्यांनी रागाच्या भरात पोटच्या सहा महिन्याच्या मुलीला त्याच ठिकाणी रस्त्यावर फेकून दिले, त्या ठिकाणी असलेल्या फुल विक्रेत्यांनी सदर रेतीवर बाळ रडत असल्याचे पत्रकार भरत जोगदंडे यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी तात्काळ रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील व सामाजिक कार्यकर्ते भारतीय मानवाधिकार चे जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे यांना फोन करून त्या ठिकाणी बोलावले असता त्यांनी तास भरापासून रडत असलेल्या बाळाला उचलून दूध,पाणी पाजून शांत केले व सदर मुलीला सांभाळण्याची तयारी प्रशांत डोंगरदिवे यांनी दाखवली घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल होऊन आजू बाजूला बाळाच्या पालकांची विचारपूस केली असता तब्बल दोन तासाने सदर मुलीचे आई वडील त्या ठिकाणी आले असता त्यांना बाळाला या ठिकाणी का फेकले असे विचारले असता त्यांनी बेजबाबदार उत्तर देताच प्रशांत ढोरे पाटील यांनी त्या बेजबाबदार पालकाच्या श्रीमुखात वाजवली व येथेच्छ लाथा बुक्क्यांनी बदाडून नंतर समज देऊन सदर बाळाला तिच्या आईच्या स्वाधीन करून दिले, प्रशांत डोंगरदिवे यांच्या अंगावर सदर बाळाने शी, सु केली असता पोटच्या गोळ्या प्रमाणे त्यांनी तिला डायपर्स घालत असतांना बघून उपस्थितांना ही भरून आलं ,जिथे रक्ताच्या नात्यांना पोटच्या गोळ्याची काळजी नाही तिथे हे सामाजिक कार्यकर्ते धाऊन आले.

परखेड महसुल मंडळ दुष्काळग्रस्त घोषित करणेबाबत सत्याग्रह शेतकरी संघटना व समस्त शेतकरी

0

 

 

,वरील विषयास अनुसरून मागच्यावर्षी ओला दुष्काळ ने शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले होतेआणि त्यात यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनची तीन वेळा पेरणी करावी लागली.असे वाटले उडीद,मुगाचे,पीक आम्हाला साद देईल पण तेही निसर्गाने आमच्यापासून हिवरून घेतले.तिळाचे पीक सुद्धा आले नाही. आणि कपाशी पीक सुद्धा मोठया प्रमाणात जास्त पाण्याने बोड्या सोडल्यामुळे हातातून गेले.
शेतात एवढी कसरत करून सुद्धा रोगराई अतिदुष्टी सोयाबिनला हिरवा गच्च पाला दिसला पण उत्पन्न मात्र आले नाही . एकरी एक ते दीड किटल पेक्षा कमी उत्पन्न आले असून यात यात सोयाबिन काढणीचा सुद्धा खर्च निघाला नाही . त्या मुळे आत्ता वर्षभराचा घर खर्च ,शेतीचा आजाराचा खर्च , कसा भागावायचा व उदरनिर्वाह तरी कसा करायचा हाच प्रश्न पडला आहे . पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाल्या मुले सगळ्या पिकांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची येणारी दिवाळी अंधारात जाणार आहे आमच्या मंडळाचे नजर अंदाज आनवरी 66 पैसे इतकी दाखवली आहे परंतु उत्पन्न झाले नसतानाही नजर अंदाज आणेवारी 30 पैसे च्या आत यायला पाहिजे होती पण ती खरी आणेवारी दाखवली नाही. तरी आम्हला यात शंका वाटत आहे म्हणुन हा प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकऱ्यानं पुढे खूप मोठे आर्थिक संकट आहे . म्हणून हे परखेड महसूल मंडळ दुष्काळ ग्रॅस्थ घोषित करऊन दुष्काळाच्या सर्व सवलती पीक विमा तात्काळ लागू करण्यात यावा अन्यथा या सवलती लागी न झाल्यास 15 दिवसा नंतर आम्ही सर्व शेतकरी आमच्या कुटुंबासह आपल्या कार्यालयावर लोकशाही मार्गाने आंदोलन करू . याची दक्षता घ्यावी.

पळशी येथील बलात्कार प्रकरणातील आरोपींना भर चौकात गोळ्या घाला – रविकांत तुपकर

0

तुपकरांनी घेतली पीडितेची व तिच्या कुटूंबियांची भेट..

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामधील पळशी येथे एका 6 वर्षीय मुलीचे एका 46 वर्षीय नराधमाने अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आज (ता.25 ऑक्टो. 2020) त्या पीडितेची व कुटूंबाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांनी भेट घेतली..ही घटना अतिशय संतापजनक आहे. “तळपायातील आग मस्तकात घालणारी” ही घटना आहे. या घटनेने मन अतिशय व्यथित झाले. महाराष्ट्र हा शिव छत्रपतींचा,शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. बुलडाणा जिल्हा माँसाहेब जिजाऊंचा जिल्हा आहे. जिल्ह्यात अशी घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. या कठीण प्रसंगात त्या कुटुंबाच्या सोबत आम्ही ताकदीनिशी उभे आहोत..सदर घटनेतील आरोपीला जळगाव जामोद पोलिसांनी 3 तासाच्या आत अटक करून तत्परता दाखविली परंतु अशा नराधमांना भर चौकात गोळ्या घाला..! जेणेकरून कुणाची पुन्हा असे कृत्य करण्याची हिंमत होणार नाही..अशी मागणी यावेळी रविकांत तुपकरांनी सरकारकडे केली आहे..

नियमांचे पालन करत देवीचे विसर्जन

0

 

सिल्लोड प्रतिनिधी
सागर जैवाळ

मालखेडा येथील श्री दुर्गा माता मित्र मंडळ हे दरवर्षी नवरात्रात आगळे वेगळे उपक्रम राबवत असतात पण या वर्षीही कोरणाचा वाढता संसर्ग लक्षात घेता श्री दुर्गा माता नवरात्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व नियमांचे पालन करत नऊ दिवस ही शांततेत देवीची पूजा पाठ आरती केली व देवीची मिरवणूक न काढता शांततेत सर्व नियमांचे पालन करून देवीचे विसर्जन केले

केऱ्हाळा ते पळशी मार्गावरील खड्डे बुजवत केला वाढदिवस साजरा

0

 

भाजपा तालुका चिटणीस भाऊसाहेब बडक यांचा स्तुत्य उपक्रम

सिल्लोड प्रतिनिधी:सागर जैवाळ

सिल्लोड:सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा तालुका चिटणीस भाऊसाहेब बडक यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने केऱ्हाळा ते पळशी रस्त्यावरचे खड्डे बुजवत सामाजिक कार्य करत आपला वाढदिवस साजरा केला आहे. भाऊसाहेब बडक व कार्यकर्त्यांनी एकत्र येत केऱ्हाळा ते पळशी गावापर्यत खराब झालेल्या रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी करण्यात केली. केऱ्हाळा ते पळशी रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. हा रस्ता पुढे जळगाव महामार्गाला मिळत असल्यामुळे,व सिल्लोड येथे व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे हा रस्ता रहदारीचा म्हणून ओळखला जातो. सदरच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे नेहमी लहान मोठे अपघात होत असतात.कोरोना च्या अनलॉक नंतर पळशी सिल्लोड येथे दर तासाला धावणाऱ्या महामंडळाच्या परिवहन महामंडळाच्या एस.टी ने देखील रस्त्यातील पडलेल्या खड्ड्यामुळे धावण्यास नकार दिला होता. याची दखल घेत भाऊसाहेब बडक यांनी अवांतर खर्चाला फाटा देत या रस्त्यावरची सर्व खड्डे बुजवत समाजाप्रती असणारी संवेदनशीलपणा सामाजिक कार्य करत पूर्ण केला आहे.आता तरी प्रशासनाने यात लक्ष घालून मजबूत रस्ता बनवावा. व भाऊसाहेब बडक यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे पळशी ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया 01


भारतीय जनता पार्टीचे तालुका चिटणीस भाऊसाहेब बडक हे नेहमी सामाजिक कार्यात सदैव पुढे राहिलेले आहे. सदरचा रस्ता नेहमी वर्दळीचा असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. आपला वाढदिवस खड्डे बुजवून भाऊसाहेब बडक यांनी अगोदर खड्डे बुजवले.आज त्यांचा वाढदिवस आहे. हे कौतुकास्पद आहे. आता तरी दुर्लक्ष असणाऱ्या प्रशासनानाने याची दखल घेऊन सदरचे काम मार्गी लावावे अशी अपेक्षा आहे.

दत्ता माधवराव बडक
सरपंच पळशी ता. सिल्लोड

प्रतिक्रिया 02

आमचे नेते तालुका चिटणीस यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिलेले आहे. समाजसेवेचे व्रत जपत सदैव सर्व सामान्यांच्या सुख दुःखात ते म्हणाले सहभागी होत असतात. आपला वाढदिवस खड्डे बुजवले. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. प्रशासनाने यातून काहीतरी बोध घ्यावा असे मला वाटते.

*-गजानन बडक*
तंटामुक्ती अध्यक्ष, पळशी ता.सिल्लोड

सावता परिषदेचे बदनापूर तालुकाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या आईचे निधन झाल्यामुळे सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांची सांत्वनपर भेट.

0

 

सागर जैवाळ सिल्लोड
तालुका प्रतिनिधी

बदनापूर जि. जालना येथे जाऊन व सावता परिषद माजी जिल्हाध्यक्ष रमेश आढाव यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे मौजे हातडी. ता. परतूर जि. जालना येथे जाऊन सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी सांत्वनपर भेट घेतली.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी अंबड येथील शासकिय विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यासोबत चर्चा केली. बदनापूर येथे संतशिरोमणी सावता महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेऊन रघुनाथराव खैरे यांच्या निवासस्थानी समाज बांधवाच्या सोबत सवांद साधला तसेच सेलगाव येथेही सावता महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतले व योगेश जाधव यांच्या निवासस्थानी समाज बांधवांसमवेत सवांद केला. जालना शहरातील नव युवकांची धावती भेट घेतली. वाटूर फाटा येथील समाज बांधवांची भेट घेतली. मधुकर झरेकर यांच्या निवासस्थानी समाज बांधवांशी चर्चा केली.
यावेळी सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू उबाळे मामा, प्रदेश संघटक तथा पं. स. सदस्य भास्कर बापू गाढवे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष इंजि. शिवानंद झोरे, विभागीय उपाध्यक्ष तथा नगरसेवक विष्णुभाऊ पुंड, जालना जिल्हाध्यक्ष अजित बुलबुले, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता गाजरे, पं. स. सदस्य लक्ष्मणराव गाडेकर, नगरसेवक गोरख तात्या खैरे, औरंगाबाद मार्केट कमिटीचे संचालक अशोक तारो, राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. शहराध्यक्ष रघुनाथ खैरे, माळी समाज जेष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब खैरे, सावता अर्बनचे चेअरमन दिगांबर टेकाळे, सावता परिषद युवा आघाडीचे योगेश जाधव, नंदू पुंड, सावता परिषदेचे घनसावंगी तालुकाध्यक्ष जनार्धन बारवकर, अंबड तालुकाध्यक्ष महादेव गाडेकर, परतूर तालुकाध्यक्ष परमेश्वर ढवळे, गेवराई तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा संघटक राधाकिसन माने, परतूर तालुकाध्यक्ष मधुकर झरेकर, बदनापूर तालुकाध्यक्ष सुनिल बनकर, सरपंच ओम बोरकर, सरपंच भरत शिंदे, सोशल मिडियाचे भगवान टिळेकर, राम वाघमारे, राहुल घायाळ, कु. सपना गाढवे, सौ. वंदना पाऊलबुद्धे, शिवाजी देवकर, दत्ता टिळेकर, पुंजाराम सोनवणे, लक्ष्मणराव शिंदे, भारत किटाळे, राम माने, सुनिल जाधव, श्रीहरी झरेकर, सुधाकर झरेकर, रामेश्वर गाढवे, राज देवकर, सावता कटारे, कैलास खांडेभराड, राजू कडुकर, विशाल शिंदे, अमर शिंदे, विनायक तिरगुळे, प्रथमेश वाघमारे, अभिषेक आढाव, जय झोरे, ज्ञानेश्वर फुलसुंदर, सोमीनाथ कदम, शंकर दळवी, भगवान जाधव, शुभम वाघमारे, सुदर्शन वाळके, सुनिल जैवाळ, शाम वाघमारे, सुरेश घायाळ, योगेश जैवळ , बबन वाघमारे आदींची विविध ठिकाणी उपस्थिती होती.

सेलू येथे बोर्डीकर पोद्दार इंग्लिश स्कूल चे शुभारंभ अजहर पठाण वालुरकर

0

 

सेलू/परभणी

सेलू येथे पोद्दार इंग्लिश स्कूल शाखेची स्थापना करण्यात आली. यामुळे परिसरातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेऊ शकतील भावणाताई बोर्डीकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. ह. भ. प. दत्तराव महाराज मगर सोंन्नेकर , दगडोबा जोगदंड पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू माजी सभपती श्री. रवींद्र डासालकर, सरपंच गोविंद काळे, रमेश तार्डे, माणिक जोगदंड, रजेभाऊ निर्वल आदी मान्यवर उपस्थित होते.

सोयाबीन-कापसाच्या नुकसान भरपाईसाठी ‘आर पार’ च्या लढाईसाठी सज्ज रहा – रविकांत तुपकर..

0

 

 

स्वाभिमानी’ची खामगाव-शेगाव तालुक्याची नवीन कार्याकरिणी गठीत..

खामगाव – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खामगाव व शेगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज ( ता.24 ऑक्टो. 2020) खामगाव येथे पार पडली. या बैठकीत बोलतांना रविकांत तुपकर म्हणाले की, राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई ही तोकडी आहे. ही नुकसान भरपाई म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारातून बाहेर काढायचे असेल तर सरकारने उदार अंतकरणाने हेक्टर ची अट न घालता सरसकट भरीव मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिरायती क्षेत्रासाठी हे.25 हजार बागायतीसाठी हे.50 हजार व फळबागांसाठी हे. 1.00 लाख रु नुकसान भरपाई मिळावी, पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी सरकारने भाग पाडावे, कापसाचे केंद्राच्या हमीभावा प्रमाणे खरेदी केंद्र चालू करावे तसेच सोयाबीनचा भाव 6000 रु प्रति क्विं. स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे व कर्ज माफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करण्यात यावा. या मागण्यांसाठी येणाऱ्या आठ दिवसांत विदर्भ-मराठवाड्यात ‘स्वाभिमानी’चे वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे. या आंदोलनात ताकदीने रस्त्यावर उतरून “आर या पार” च्या लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांना केले.
या बैठकीत घाटाखालील नव्याने संघटना बांधनी बाबत चर्चा करण्यात आली व संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामभाऊ अवथळे यांच्या नेतृत्वाखाली खामगाव व शेगाव तालुक्यात नव्याने गाव तिथे शाखा निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला..तसेच यावेळी खामगाव व शेगाव तालुक्यातील कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये घाटाखालील स्वाभिमानी अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी मासूम शहा,जिल्हा प्रसिध्द प्रमुख पदी सोपान खंडारे, खामगाव तालुका संपर्क प्रमुख पदी आतिष पळसकर,पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी गोपाल ताठे, स्वाभिमानी युवाआघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी संदीप चव्हाण, स्वाभिमानी अल्पसंख्याक आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी शेख युनिस शेख युसुफ, स्वाभिमानी विद्यार्थी आघाडी च्या तालुकाध्यक्ष पदी निलेश देशमुख, तालुका प्रसिद्ध प्रमुख पदी निलेश गवळी व पि.राजा जि.प.सर्कल प्रमुख पदी विठ्ठल महाले तसेच शेगाव स्वाभिमानी पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी अनिल पा.मिरगे, संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी गजानन राऊत, युवा आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी शिवा म्हसणे यांच्या पुढील सहा महिन्यासाठी निवडी करण्यात आल्या या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे रविकांत तुपकरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या..
या बैठकीला युवा विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन, संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे,जालना जिल्ह्याचे नेते मयुर बोर्डे, राज्य कार्यकारिणी सदस्य गिरीधर देशमुख, समाधान भातुरकर,गजानन पटोकार, श्रीकृष्ण काकडे,आनंदा आटोळे,भैय्या वाघ, रमेश कलाम, सोनू इंगळे,यांच्यासह खामगाव व शेगाव तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते..

ग्राम मालठाणा येथील विवाहिता बेपत्ता

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

मुलीचे पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेलेली विवाहिता मुलीसह गायब झाल्याची घटना जामोद (ता. जळगाव जामोद) येथे समोर आली आहे. मालठाणा (ता. जळगाव जामोद) येथील सौ. राधा अंजूर पवार (22) ही महिला 22 ऑक्टोबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास तिच्या पतीसह जामोदला पासपोर्ट फोटो काढण्यासाठी व दळणाकरिता आले होते. तिचा पती दळण दळण्यासाठी गेला व राधा मुलीसह फोटो काढण्यासाठी गेली. त्यानंतर ती गायब झाल्याचे तिच्या पतीचे म्हणणे आहे. पूर्ण गावात तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. मुलीसह ती हरविल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

ओला दुष्काळ’ जाहीर करुन,शेतकऱ्यांना आर्थीक मदत करा ; वसंतराव वानखेडे वंचित बहुजन आघाडी

0

 

मेहकर.आॅगस्टपासुन सुरु असलेल्या पावसामुळे होत्याचे नव्हते केले आहे.पोटच्या पोराप्रमाणे शेतकऱ्यांनी पिकांची जोपसना केली; परंतु अवकाळी पावसाने पिकासह साऱ्या स्वप्नांवर पाणी फिरविले आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी राजाला आर्थीक नुकसान भरपाई द्यावी,व विजबिल माफ करावे या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी मेहकर यांना वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंतराव वानखेडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या कडे केली आहे.
ऐन दिवाळीत बरसलेल्या अवकाळी शेतातील कापूस, सोयाबीन, धान, ज्वारीसारखे पीक हातातून गेले.जिल्हातील शेतकरी परत संकटात आला. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांना कोंबदेखील फुटले आहेत. अतिवृष्टीमुळे कापसाच्या झाडाचे खराटे झाले. शेतीसाठी लागलेला खर्चही शेतक-याला निघाला नाही़ त्यामुळे शेतकरी राजा हा मोठ्या संकटात सापडला असून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा,व विजबिल माफ करावे यासाठी
वंचित बहुजन आघाडीचे
उपविभागीय अधिकारी यांना निवेदनात नमुद केले की
गेल्या अनेक वर्षांपासून सतत नापिकी यावर्षी करोनामारीच्या पार्श्वभूमीवर मुळे शेतकरी हात लागून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे आणि त्यातच निसर्गाच्या अवकृपेने नुकताच हातातोंडाशी असलेला घास हिरव्या गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे त्यामुळे शेतकऱ्याचा जीवन-मरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने त्याच्यापुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नाही
या संपूर्ण परिस्थितीचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देत सरसगट हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी व तसेच विज बिल माफ करीत धीर देण्याचे काम करावे अन्यथा देशाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचा न्याय हक्काच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी मेहकर लोणार च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आक्रोश आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडी च्या मार्फत देण्यात आले आहे
त्यावेळेस संघपाल पनाड, वसंतराव वानखेडे, डॉ राहुल दाभाडे, सिद्धार्थ अमोल, बाळासाहेब चव्हाण,संदीप थोरात, दत्ता राठोड,राहुल अवसरमोल,शालिक्रम मोरे, संदीप मोरे,गणेश नागरिक,विजय माने, गौतम सरकटे,अमित काकडे, सुनील मोरे,जिवन जाधव प्रभाकर इंगळे, समाधान मोरे, संतोष साळवे,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत