Home Blog Page 596

गुरुद्वारा साहब के जगह के लिए सौंपा निवेदन

0

 

वर्धा. कारंजा के सिख सिकलीगर संगत ने 2010 से गुरुद्वारा साहब के लिए 100×100 सर्वे नंबर 250 जगा रोकी हुई है इस जगह के लिए कारंजा निवासी संगत एक निवेदन लेकर के तहसीलदार को सौंपा है। सेवादार हरदीप सिंह अंन्ध्रेले ने बताया कि 2010 से इस जगह पर गुरुद्वारा साहब स्थापित करने की योजना बनाई है पर अभी तक कोई अनुमति मिलने के कारण काम रुका हुआ है इसी के चलते एक निवेदन वर्धा कलेक्टर को और जिला परिषद अध्यक्ष को भी सौंपा है कारंजा सादसंगत की मांग है कि सरकार प्रशासन इस पर जल्द से जल्द ध्यान देकर इस निवेदन को गंभीरता से लेकर गुरुद्वारा साहब के निर्माण की अनुमति दें अजाब सिंह बावरी, राना सिंह बावरी, नानक सिंह भौडं, कालू सिंह टांक, संजू सिंह बावरी, रंजीत सिंह भौंड व इलाके की संगत ने प्रशासन से मांग की है

रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली बुलडाण्यात ‘स्वाभिमानी’ने ठोकले महावितरण मुख्यालयाला कुलूप..

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

लॉकडाऊन काळातील संपूर्ण विज बिल माफ करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते मा.रविकांतजी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा महावितरण मुख्यालयाला ‘स्वाभिमानी’च्या वतीने कुलूप ठोकण्यात आले. ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विजबिल देणाऱ्या महावितरणचा यावेळी निषेध करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजू शेट्टी साहेब व चळवळीतील जेष्ठ नेते एन.डी. पाटील सर यांच्या नेतृत्वात आज (दि.27 ऑक्टोबर 2020) राज्यभर वीजबिल माफीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे..जर सरकारने वीजबिल माफ केले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला..या आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता..
आंदोलनात ‘स्वाभिमानी’चे विदर्भ युवा कार्याध्यक्ष राणा चंदन, शे.रफिक शे.करीम, ज्ञानेश्वर कल्याणकर, महेंद्र जाधव, कडूबा मोरे, रशिद पटेल, दत्ता पाटील, गजानन गवळी, संतोष गवळी, मनोज जैस्वाल, रमेश जोशी, संकेत मेढे, शे.हारूण, रामदास खसावत, रघु खसावत, सैय्यद जहरोद्दीन, निखिल पाटील, सागर मेढे, संदीप पवार, अजाबराव तायडे, शुभम महाले, विठ्ठल चौथे, सुभाष जगताप, हरिदास पाटील, जयंत गवई यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..

सेलू तालुक्यातील राजवाडी गावाचा अतिवृष्टी ग्रस्त मंडळात समावेश करावा अशी मागणी राजवाडी येथिल सरपंचासह ग्रामस्थांनी केली आहे

0

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

अतिवृषटीमुळे नुकसान झालेल्या बाधीत गावांचा समावेश सेलू मंडळात करण्यात आला.परंतु सेलू लगत असलेल्या राजवाडी या गावाचा समावेश करण्यात आला नाही शासनाने राज्वाडी गावातील शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहणार असून याबाबत निवेदन उपिल्हाधिकारी सेलू यांना देण्यात आले आहे. सरपंच शिवहरी शेवाळे, रामेश्वर शिंपले, उध्दव काष्टे आदी शेतकरी ग्रामस्थांनी मागणी केली आहे

जामोद ग्रामपंचायत सरपंचावर दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव नामंजूर…

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

जळगांव जामोद प्रतिनिधी:-

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी जामोद ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त सरपंच सौ गंगुबाई पुंडलिक दामदर यांच्यावर 22 तारखेला तालुका निवडणूक अधिकारी यांच्याकडे 13 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता त्यानुसार आज दिनांक 27 ऑक्टोबर ला प्रस्तावावर सभा बोलविण्यात आली होती ,तालुका निवडणूक निर्णय अधिकारी सह त्यांचे सहकारी जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुनील जाधव साहेब व त्यांचे सहकारी जातीने हजर होते यावेळेस सभागृहांमध्ये प्रस्ताव दाखल करणारे 13 सदस्य सभागृहात हजर होते सरपंचाच्या बाजूचे चार सदस्य गैरहजर होते तेरापैकी एक सदस्य फुटल्याने अविश्वास प्रस्ताव बारगळला आज योगायोगाने जामोद नगरीमध्ये दुर्गा विसर्जन होते आणि त्यातच सरपंच विसर्जन होता होता थोडक्यात वाचले.

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अवंती सिंगनजुडेचे सुयश

0

 

गोंदीया-शैलेश राजनकर

लाखनी,दि.27ःनुकतीच राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा यवतमाळ येथे संपन्न झाली.या स्पर्धेत कु.अवंती उमेश सिंगनजुडे हिने तृतीय क्रमांक पटकविल्याने तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रम अंतर्गत यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा 2020चे आयोजन केले होते.ही स्पर्धा अ गट इयत्ता 1 ते 4 व ब गट 5 ते 8 अशा दोन गटात घेण्यात आली.या स्पर्धेत महाराष्ट्रातील 550 विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला .
या स्पर्धेच्या निकाल सहकार भवन जिल्हा यवतमाळ येथे महाराष्ट्राचे वनमंत्री आदरणीय संजय राठोड यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.या राज्यस्तरीय स्पर्धेत कु.अवंती उमेश सिंगनजुडे ही तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली.मंत्रीमोहदयाच्या हस्ते तिचा व तिच्या पालकांचा रोख रक्कम,सन्मान चिन्ह,ग्रामगीता,पदक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.ती इयत्ता 8 वित लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूल लाखनी येथे शिकत आहे.
यापूर्वी तिने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अनेक पारितोषिक पटकविले आहे. त्याचबरोबर ती उत्कृष्ट जलतरणपटू आहे.मागच्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील चिवला बीच येथील अरबी समुद्रात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित केली होती.त्या स्पर्धेत तिने 2 किमी चे अंतर यशस्वीपणे पार केले.
याबद्दल तिचे अभिनंदन लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूल चे संचालक संजयराव वनवे ,शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे नागपूर विभागाचे अध्यक्ष भाऊराव पत्रे ,राज्य संघटक संजय खेडीकर दिनेश पिकलमुंडे ,विनोद किंदरले,सुभाष चवडे यांनी तिचे अभिनंदन केले आहे

लाखनी येथे फटाक्याच्या दुकानाला आग,11 लाखाचे नुकसान

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

लाखनी,दि.27ः येथील एका फटाक्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत फटका दुकानासह लगतचे कापड व फुलाचे दुकानही भस्मसात झाले. यात ११ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.लाखनी येथे सिंधी लाईनमध्ये अंबिका फटका सेंटर आहे. दिवाळी निमित्त या दुकानात फटकाने मोठ्यप्रमाणात ठेवले होते. सोमवारी रात्री दुकान नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अचानक फटक्यांचा आवाज येवू लागला. नागिकांनी धाव घेतली असता फटाक्याच्या दुकानाला आग लागल्याचे दिसून आले. नागरिकांनी तात्काळ एका बांधकाम कंपनीचे पाण्याचे टँकर आणून आग विझविली. मात्र तोपर्यंत दुकान जळून खाक झाले होते. यात २ लाखांचे नुकसान झाले, तर लगतचे नागराज कोठेकर यांचे फुलांचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले, त्यात त्यांचे ७ लाखांचे तर लक्ष्मी कापड दुकानाचे दोन लाखाचे असे एकूण ११ लाखांचे नुकसान झाले.

पगडीच्या साहाय्याने वृद्धाने घेतली फाशी; जळगाव जामोद शहरातील संध्याकाळची घटना

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद शहरातील भाजी मार्केटमध्ये 62 वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली.
टेलसिंग तारासिंग चव्हाण (रा. फुकटपुरा, जळगाव जामोद) असे फाशी घेणार्‍याचे नाव आहे. पगडीच्या साहाय्याने फाशी घेऊन त्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवला. आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. अधिक तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भारत बर्डे, हेड कॉन्स्टेबल कुसुंबे, पो. काँ. पवार, पो. काँ. निंबाळकर करत आहेत.

बुलडाणा येथे डॉ.सुनील राजपूत यांच्या श्री सिद्धिविनायक कोविड हेल्थ केअर सेंटर चे उद्घाटन

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ‘स्वाभिमानी’चे नेते मा.रविकांतभाऊ तुपकर यांनी उपस्थित राहून डॉ.सुनील राजपूत यांना शुभेच्छा दिल्या..

:- श्री सिद्धिविनायक कोविड केअर सेंटर हे शहरातील पहिलेच खाजगी कोव्हीड सेंटर आहे. या 200 बेड च्या सुसज्ज हॉस्पिटलचा कोरोनाच्या कठीण काळात जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे..या आधी ज्या कोरोना रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचे असत त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे जावे लागत होते. पंरतु सिद्धीविनायक हॉस्पिटल मुळे बुलडाण्यातच रूग्णांना चांगले उपचार मिळणार आहेत.
यावेळी भाजपा चे नेते मा.आ.विजयराज शिंदे,रा.कॉ.चे नेते मा.नरेश शेळके शंतनू बोंद्रे,पत्रकार रणजित राजपूत, ‘स्वाभिमानी’चे राणा चंदन, नगरसेवक मंदार बाहेकर, डॉ.अनिल साळोख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते..

पळशी वैद्य येथिल बलात्कार आरोपीस कठोर शिक्षेची मागणी संदर्भात मुख्यमंत्री यांना काँग्रेसचे निवेदन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

बुलढाणा जिल्ह्य़ातील जळगाव जामोद तालुक्यातील पळशी घाट (वैद्य) येथे एका सहावर्षिय आदिवासी मुलीवर एका नराधमाने पाशवी बलात्कार केला. आज बुलढाणा जिल्हाव महिला कॉंग्रेस च्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नावे निवेदन दिले आणि या निवेदनात या गुन्हेगारास ताबडतोब कठोर शिक्षा होण्यासाठी ही केस जलद गती न्यायालयात प्रविष्ट करण्यात यावी व ताबडतोब पिडीतेला व तिच्या कुटुंबातील लोकांना लवकर न्याय मिळावा यासाठी निवेदनात मागणी केली आहे. यावेळी उपस्थितीत बुलढाणा जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सौ ज्योती ताई ढोकणे, जळगाव जामोद शहर अध्यक्षा सौ मिनाताई सातव,, विधानसभा पक्ष नेत्या सौ स्वाती ताई वाकेकर, बुलढाणा जिल्हा महिला कॉंग्रेस उपाध्यक्षा सौ परविनताई देशमुख, सौ सुषमाताई भिमराव पाटील, सौ केदार ताई सौ संगीता बारेला, सौ निता पवार, बुलढाणा जिल्हा महिला कॉंग्रेस च्या सरचिटणीस सौ ज्योती वानेरे, युवा कॉंग्रेस कार्यकर्ते अ.राजिक,शेख मंजूर, शे जुनेद शेख,मतिन पटेल , शेख शफिक, अनिल भाऊ शंकर ईंगळे, श्री श्रीकृष्ण केदार सेवादल सरचिटणीस विधानसभा जळगाव जामोद श्रेत्र साक्षी गायकी, मंजूराताई इंगळे सदस्या तालुका कॉग्रेस कमिटी, दिव्या झांबरे, निकिता ईंगळे, शुभांगी वानखडे, गोकरणा झांबरे गोपाल करांगळे, नितीन भाऊ जाधव, ज्ञानेश्वर वानखडे, सुनील भाऊ येनकर, ज्ञानदेव गायकी श्रीयुत लहासे सर यांची उपस्थिती होती

जिंतूर सेलू तालुक्यातील अतिवृष्टीतुन वगळलेली महसूल मंडळे अतिवृष्टी मध्ये समाविष्ट करा -मा गाजी आ.विजय भांबळे

0

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

– मागील महिन्यामध्ये जिंतूर व सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झाला आहे.त्यात प्रत्येक महसूल मंडळामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे सरसकट नुकसान झालेले आहे त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, विहिरी पडल्या आहेत, अनेक जनावरे दगावले आहेत अशा प्रकारचे आसमानी संकट कोसळले आहे. तर खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, हळद, ऊस व फळबागांचे अतोनात नुकसान झालेले आहे. व हे नुकसान सरसकट सर्व परिसरात व सर्व महसूल मंडळात झालेले आहे.
परंतु, महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी अहवालानुसार जिंतूर तालुक्यात फक्त तीन व सेलू तालुक्यात फक्त दोन महसूल मंडळे अतिवृष्टी बाधित घोषित केली आहेत. तर उर्वरित जिंतूर तालुक्यातील पाच मंडळे बामणी, आडगाव, संवगी म्हा, दुधगाव व जिंतूर आणि सेलू तालुक्यातील तीन कूपटा, चिकलठाणा व वालुर, असे एकूण आठ मंडळे वगळण्यात आले आहेत. तरी या आठही मंडळामध्ये सरसकट अतिवृष्टी घोषित करावी आणि मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी घोषित केलेली नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी परभणी श्री मुगळीकर यांना देण्यात आले.
यावेळी आ.बाबाजानी दूररानी माजी आ. विजय भांबळे, यांच्यासह जि.प.सदस्य प्रसादराव बुधवन्त, बाळासाहेब घुगे, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे, अभिनय राऊत, बाळासाहेब रोडगे, अशोक काकडे, रामराव उबाळे, राजेंद्र लहाने, मनोज थिटे, गणेशराव इलग, चंद्रकांत गाडेकर,पुरुषोत्तम पावडे, रामेश्वर गाडेकर, आनंद डोईफोडे प्रभाकर गिराम इ उपस्थित होते.