Home Blog Page 6

मेजर ध्यानचंद को देश ने किया याद

आज यानी 29 अगस्त 2026 को पूरे देश में राष्ट्रीय खेल दिवस मनाया जा रहा है। यह दिन महान हॉकी खिलाड़ी मेजर ध्यानचंद की जयंती के सम्मान में हर साल मनाया जाता है। इस अवसर पर देशभर के स्कूलों, कॉलेजों, खेल संस्थानों और विभिन्न सरकारी संगठनों में खेल गतिविधियों का आयोजन किया जा रहा है। युवाओं को खेलों से जोड़ने और नियमित शारीरिक गतिविधियों के प्रति जागरूक करने पर विशेष जोर दिया जा रहा है। राष्ट्रीय खेल दिवस के माध्यम से देश में खेल संस्कृति को मजबूत करने और नई प्रतिभाओं को आगे बढ़ाने का संदेश दिया जाता है। इस दिन मेजर ध्यानचंद के योगदान को याद करते हुए उन्हें श्रद्धांजलि भी अर्पित की जा रही है।

'खेलेगा भारत, जीतेगा भारत' बनी 2026 की थीम
राष्ट्रीय खेल दिवस 2026 के लिए "खेलेगा भारत, जीतेगा भारत" थीम रखी गई है। इस थीम के जरिए देश के नागरिकों, खासकर युवाओं को खेलों में सक्रिय भागीदारी के लिए प्रेरित करने का संदेश दिया जा रहा है। सरकार की ओर से खेलों को केवल प्रतियोगिता तक सीमित न रखते हुए इसे स्वस्थ और सक्रिय जीवनशैली का हिस्सा बनाने पर जोर दिया जा रहा है। विभिन्न स्थानों पर दौड़, योग, फिटनेस गतिविधियां और पारंपरिक खेलों से जुड़े कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं। स्कूल और कॉलेज स्तर पर विद्यार्थियों को खेलों में हिस्सा लेने के लिए प्रोत्साहित किया जा रहा है। इस अभियान का उद्देश्य देश में फिटनेस और खेल के प्रति सकारात्मक माहौल तैयार करना है।

मेजर ध्यानचंद का खेल जगत में ऐतिहासिक योगदान
मेजर ध्यानचंद का जन्म 29 अगस्त 1905 को हुआ था और उनकी जयंती को राष्ट्रीय खेल दिवस के रूप में मनाया जाता है। उन्हें भारतीय हॉकी के सबसे महान खिलाड़ियों में शामिल किया जाता है और उनकी शानदार खेल प्रतिभा के कारण उन्हें हॉकी का जादूगर कहा जाता था। उन्होंने भारतीय हॉकी टीम के साथ 1928, 1932 और 1936 के ओलंपिक खेलों में स्वर्ण पदक जीतने में महत्वपूर्ण भूमिका निभाई थी। उनके खेल कौशल और गोल करने की क्षमता ने दुनियाभर में भारतीय हॉकी की पहचान मजबूत की। देश के लिए उनके योगदान को देखते हुए उनकी जयंती को खेलों के प्रति सम्मान और प्रेरणा के दिन के रूप में मनाया जाता है। आज भी मेजर ध्यानचंद की उपलब्धियां युवा खिलाड़ियों के लिए प्रेरणा का स्रोत बनी हुई हैं।
 

SnakeRescue/संग्रामपूरच्या लखन पंचर दुकानात धामण साप आढळला; सर्पमित्रांनी केले रेस्क्यू

 

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरात लखन पंचर दुकानात अचानक धामण जातीचा साप आढळून आल्याने काही काळ खळबळ उडाली. दुकानात साप दिसताच उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मात्र, सर्पमित्रांना पाचारण करण्यात आल्यानंतर सापाला सुखरूप रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.

संग्रामपूर येथील लखन पंचर दुकानात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना दुकानाच्या परिसरात एक साप आढळून आला. साप दिसताच दुकानातील कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी सतर्कता बाळगत सुरक्षित अंतर ठेवले.

दरम्यान, साप धामण जातीचा असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्पमित्रांना याबाबत माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले आणि मोठ्या कौशल्याने या सापाला रेस्क्यू केले.

रेस्क्यू करण्यात आलेला धामण साप सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर त्याला योग्य नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यामुळे संभाव्य धोका टळला असून दुकानातील उपस्थितांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

धामण हा विषारी साप नसला तरी साप कोणत्याही प्रकारचा असो, त्याला स्वतःहून पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते.

त्यामुळे घर, दुकान किंवा शेत परिसरात साप आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित अंतर ठेवावे आणि सर्पमित्रांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

SnakeRescue/संग्रामपूरमध्ये लखन पंचर दुकानात आढळलेल्या धामण सापाचे सर्पमित्रांनी सुरक्षित रेस्क्यू करत त्याला पुन्हा निसर्गाच्या अधिवासात सोडले.

RoadWork/टुणकी–लाडनापूर रोडवर एसटी बस रस्त्याच्या कडेला घसरली; वाहनधारकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

 

संग्रामपूर तालुक्यातील टुणकी–लाडनापूर मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्याच्या कडेला माती व खडीचा भाग निर्माण झाला असून, याच ठिकाणी प्रवास करणाऱ्या एसटी बसचा रस्त्याच्या कडेला घसरण्याचा प्रकार समोर आला आहे.

सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना टळली. मात्र, रस्त्याचे काम सुरू असताना योग्य खबरदारी न घेतल्यास अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते, त्यामुळे वाहनधारकांनी या मार्गावरून प्रवास करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

विशेषतः एसटी बस, ट्रक, चारचाकी तसेच दुचाकी वाहनचालकांनी वेग कमी ठेवावा, रस्त्याच्या कडेला जाणे टाळावे आणि समोरून येणाऱ्या वाहनांना सुरक्षित अंतर देऊन मार्गक्रमण करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित विभागाने वाहनचालकांना योग्य सूचना देणारे फलक, बॅरिकेडिंग आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

RoadWork/त्यामुळे टुणकी–लाडनापूर रोडने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सावकाश आणि काळजीपूर्वक वाहने चालवावीत, जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील.

WardhaNews/चाणकीतील मुरूम परवानगीवर प्रश्नचिन्ह

 

आदेशावर प्रत दिल्याची नोंद; मंडळ अधिकाऱ्यांकडून पत्र मिळाले नसल्याचा दावा

विदर्भ प्रतिनिधी : सचिन वाघे

सेलू : तालुक्यातील मौजा चाणकी येथील गट क्रमांक ७७/१ मधील ५०० ब्रास मुरूम उत्खनन व वाहतुकीच्या परवानगीप्रकरणी महसूल विभागातील कागदोपत्री कार्यवाहीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

तहसीलदार शकुंतला पराजे यांनी ७ ऑगस्ट २०२६ रोजी परवानगी दिल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. मात्र, या आदेशाची प्रत संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष मिळाली होती का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

तहसीलदार कार्यालयाच्या आदेशात मंडळ अधिकारी सचिन पिसूड्डे तसेच चाणकीचे पटवारी चौधरी यांना प्रत देण्यात आल्याची नोंद आहे. तसेच बारकोडयुक्त पावती पुस्तकाची तपासणी, महाखनिज ॲपवरील वाहतूक परवान्यांची पडताळणी आणि अवैध उत्खनन रोखण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्याचे नमूद आहे.

मात्र मंडळ अधिकारी पिसूड्डे यांनी संबंधित पत्र मिळाले नसल्याचे सांगितल्याने आदेशावरील प्रत नोंद आणि प्रत्यक्ष पत्रप्राप्ती याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. पटवारी चौधरी यांनीही सुरुवातीला प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित आदेशाची आवक-जावक नोंद, पत्राची पोहोच आणि वितरणाची नोंद तपासणे आवश्यक ठरणार आहे.

1)रॉयल्टी पावतीची पडताळणी गरजेची

या प्रकरणातील रॉयल्टी पावतीच्या उपलब्ध प्रतीबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. पावतीवर रॉयल्टीची संपूर्ण माहिती स्पष्ट नसून चालान क्रमांक दिसत असल्याचा दावा आहे.

त्यामुळे मूळ रॉयल्टी पावती, चलन, शासनाच्या खात्यात जमा झालेली रक्कम आणि महाखनिजवरील व्यवहार यांची पडताळणी करण्याची गरज आहे.

2)परवानगी आणि वाहतुकीत तफावत?

परवानगी एका व्यक्तीच्या नावावर असताना प्रत्यक्ष वाहतुकीसाठी तिचा वापर दुसऱ्या व्यक्तीकडून केला जात असल्याची माहिती समोर आल्याचा दावा आहे. ही बाब तपासणीअंती स्पष्ट होणे आवश्यक आहे. संबंधित वाहतूक पास, वाहन क्रमांक, वाहनमालक, चालक आणि महाखनिजवरील नोंदी तपासल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.

3)प्रत्यक्ष मोजमापाची आवश्यकता

मंजूर ५०० ब्रासपेक्षा अधिक मुरूम उत्खनन झाले का, परवानगीच्या क्षेत्राबाहेर उत्खनन झाले का किंवा परवानगीची मुदत संपल्यानंतर वाहतूक झाली का, याबाबतही प्रश्न उपस्थित आहेत. यासाठी महसूल विभागाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून उत्खननाचे मोजमाप करणे तसेच वाहतूक पास व महाखनिजवरील नोंदींची पडताळणी करणे आवश्यक आहे.

4)वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी

WardhaNews/आदेशावरील प्रत नोंद, संबंधित अधिकाऱ्यांना पत्र मिळाल्याबाबतचा दावा, रॉयल्टी पावती, महाखनिज व्यवहार, वाहतूक परवाने आणि प्रत्यक्ष उत्खनन यांची एकत्रित पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. मूळ कागदपत्रे आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणीच्या आधारे चौकशी झाल्यास या प्रकरणातील तफावत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Jatashankarnews/जटाशंकर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी

 

संपादक:- अनिल सिंग चव्हाण

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध जटाशंकर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे.

पावसाळ्यात जटाशंकर धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलून येत असल्याने जिल्ह्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे पर्यटनासाठी दाखल होत आहेत.

ShegaonNews/शेगाव बसस्थानकात मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून तीन महिला, चिमुकला जखमी

पावसामुळे परिसरातील डोंगर-दऱ्या हिरव्यागार झाल्या असून, जटाशंकर धबधबा देखील पाण्याने ओसंडून वाहत आहे. उंच कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहे.

धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत.

कुटुंबीय, मित्रमंडळी आणि तरुणाई मोठ्या संख्येने जटाशंकरला पोहोचली आहे.
या गर्दीमुळे जटाशंकर परिसरात पर्यटनाला चांगलीच चालना मिळाली आहे.

मात्र, धबधब्याच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढल्यास दगड निसरडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांनी सेल्फी किंवा फोटो काढताना अतिउत्साह न करता सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे.

स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनीही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MarathiNews / रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठीवरून महायुतीत खळबळ; मंत्री नाराज?

 

Jatashankarnews/पावसाळ्यात निसर्गाचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची पावले जटाशंकरकडे वळली असून, धबधब्याचा खळाळता प्रवाह आणि हिरवाईने नटलेला परिसर सध्या पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे.

ShegaonNews/शेगाव बसस्थानकात मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून तीन महिला, चिमुकला जखमी

शेगाव बसस्थानकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; स्लॅब कोसळून चौघे जखमी

शेगाव बस स्थानकात बसची प्रतीक्षा करणाऱ्या तीन महिला आणि तीन वर्षीय चिमुकल्याचा अंगावर अचानक छताचे प्लास्टर कोसळण्याची घटना शेगाव बस स्थानकावर घडल्याने एकच धांदल उडाली.

या घटनेत चौघेही जखमी झाले असून त्यांना सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णाल उपचार हे दाखल करण्यात आले आहे.

कोमल गणेश बावस्कर रेखा रामदास बावस्कर तीन वर्षे रुद्र गणेश बावस्कर व विमलाबाई भिकाजी पवार हे शेगाव बस स्थानकावरून प्रवासाकरता आले होते.

बसची प्रतीक्षा करीत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि छताचे प्लास्टर त्यांच्या अंगावर कोसळले त्यामुळे बस स्थानकात एकच खळबळ उडाली.

एकंदरीत शेगाव बस स्थानकाच्या इमारतीची अवस्था चिरणे झाली असून यापूर्वी तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला होता छताचे प्लास्टर थेट प्रवासाचे अंगावर कोसळल्याने बस स्थानकातील प्रवासांच्या सुरक्षितता प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे .

ShegaonNews/बस स्थानकाच्या इमारतीची तातडीने पाहणी करून धोकादायक भागाची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासांकडून होत आहे.

मराठीच्या मुद्द्यावरून महायुतीत मतभेद? शिंदेसेनेचे मंत्री नाराज

मराठीच्या मुद्द्यावरून महायुतीत मतभेद? शिंदेसेनेचे मंत्री नाराज

संपादक : अनिलसिंग चव्हाण

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने शिंदेसेनेचे मंत्री नाराज असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, २७ ऑगस्ट रोजी रिक्षा-टॅक्सीचालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर केली.
या निर्णयापूर्वी परिवहन मंत्रालयाला विश्वासात घेतले नसल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दोन दिवस आधी परिवहन मंत्र्यांची वेगळी भूमिका आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय यामुळे भाजप-शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
आता या मुद्द्यावर महायुतीतील नेत्यांची भूमिका काय राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

MarathiNews / रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठीवरून महायुतीत खळबळ; मंत्री नाराज?

 

संपादक : अनिलसिंग चव्हाण

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने शिंदेसेनेचे मंत्री नाराज असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.eknathshinde

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याची भूमिका घेतली होती.

मात्र, २७ ऑगस्ट रोजी रिक्षा-टॅक्सीचालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर केली.

या निर्णयापूर्वी परिवहन मंत्रालयाला विश्वासात घेतले नसल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. Devendrafadnvis

दोन दिवस आधी परिवहन मंत्र्यांची वेगळी भूमिका आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय यामुळे भाजप-शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.

MaharashtraPolitics/आता या मुद्द्यावर महायुतीतील नेत्यांची भूमिका काय राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.political

AccidentNews/रक्षाबंधनासाठी आले अन् काळाने हिरावले! संग्रामपूर तालुक्यात भीषण अपघात

 

रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीला आणि तिच्या तीन मुलांना घेऊन आपल्या गावी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. संग्रामपूर तालुक्यातील टुणकी–लाडनापूर मार्गावर दूध डेअरीजवळ भीषण अपघात झाला.

या अपघातात एका चिमुकल्याचा आणि त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यातील बुरवा येथील दुचाकीस्वार रक्षाबंधनानिमित्त मध्य प्रदेशातील जसौंदी येथे आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. Brekingnews

बहिणीला आणि तिच्या तीन मुलांना सोबत घेऊन तो बुरवा गावाकडे परतत असताना संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर दूध डेअरीजवळ हा भीषण अपघात घडला. accidentnews

याचवेळी रेल्वे विभागाची महिंद्रा बोलेरो टुणकीकडून जळगावच्या दिशेने भरधाव वेगाने जात असल्याचे सांगण्यात येत आहे. बोलेरो आणि दुचाकीची जोरदार धडक झाली.

धडक एवढी भीषण होती की दुचाकी तब्बल २५ फूट अंतरावर फेकली गेल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की एका बालकाचे शरीर आणि शीर रस्त्यापासून अनुक्रमे सुमारे ३०० आणि ४०० फूट अंतरावर फेकले गेल्याची माहिती समोर आली आहे.

या भीषण अपघातात एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या आईचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कुटुंबातील इतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.boloroapghat

रक्षाबंधनाच्या आनंदाच्या दिवशी बहिणीला घेऊन घरी परतणाऱ्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.baikaccdent

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, बोलेरोचा वेग किती होता आणि या घटनेला कोण जबाबदार आहे, याचा तपास संबंधित पोलीस करत आहेत.

AccidentNews/संग्रामपूर तालुक्यातील टुणकी–लाडनापूर मार्गावरील या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा भरधाव वाहनांच्या वेगाचा आणि रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

RoadAccident/टुणकी–लाडनापूर रोडवर भीषण अपघात; चिमुकल्याचा जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी

 

संग्रामपूर तालुक्यातील टुणकी–लाडनापूर रोडवर बोलेरो आणि मोटरसायकलची भीषण धडक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या अपघातात मोटरसायकलवरील एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून, त्याची आई गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.BreakingNews

मिळालेल्या माहितीनुसार, टुणकी–लाडनापूर मार्गावर बोलेरो वाहन आणि मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलवरील चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातात चिमुकल्याची आई देखील गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.#LatestNews

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला?

बोलेरो चालकाचा वेग किती होता? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. संबंधित पोलीस प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू असून, अपघाताची संपूर्ण परिस्थिती तपासल्यानंतरच कारण स्पष्ट होणार आहे.

टुणकी–लाडनापूर रोडवरील या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

RoadAccident/या अपघातातील मृत चिमुकल्याला भावपूर्ण श्रद्धांजली, तर गंभीर जखमी आईच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.