Home Blog Page 7

Marathakunbi/जरांगेंची भीती खरी ठरली? कुणबी वैधता नाकारल्याने विद्यार्थिनी अडचणीत!

 

मराठा-कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा पुन्हा चर्चेत!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाधणी येथील सोनवणे कुटुंबाने जात वैधता प्रमाणपत्राबाबत गंभीर दावा केला आहे.manojjarange

कुटुंबातील आजोबांच्या नोंदीमध्ये कुणबी उल्लेख असल्याचे सांगितले जात असतानाही, त्यापूर्वीच्या पिढीतील मराठा नोंदीचा आधार घेत जात वैधता प्रमाणपत्र नाकारण्यात आल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.shitalsonvane

शीतल सोनवणे हिचा नाशिकमधील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश झाला आहे. मात्र वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यास शैक्षणिक सवलत आणि शिष्यवृत्तीवर परिणाम होण्याची भीती कुटुंबाने व्यक्त केली आहे.

२६ डिसेंबर २०२५ रोजी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता, अशी माहिती तिचे वडील उदय सोनवणे यांनी दिली.

प्रश्न सुटला नाही तर टोकाचा निर्णय घेण्याचा इशारा कुटुंबाने दिला आहे. दरम्यान, जात प्रमाणपत्राच्या प्रश्नामुळे मुलांचे शिक्षण आणि नोकरी धोक्यात येऊ शकते, अशी भीती मनोज जरांगे यांनी यापूर्वी व्यक्त केली होती.marathaarkshan

Marathakunbi/आता या प्रकरणात शासन आणि जात पडताळणी समिती काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Grampanchayatnews /१५ ऑगस्टची ग्रामसभा रखडली; 8 दिवसात ग्रामसभा न घेतल्यास सोनाळा ग्रामपचायतला ताला ठोक आंदोलन इशारा…

 

सोनाळा ( प्रतिनिधी )ग्रामपंचायत सोनाळा येथे दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणारी ग्रामसभा दिनांक २० ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, निश्चित केलेल्या दिवशीही ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामसभा तातडीने घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सोनाळा येथील सरपंच यांना निवेदन देण्यात आले असून, 8 दिवसात ग्रामसभा घेण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.

ग्रामसभा ही गावातील विकासकामे, विविध समस्या, शासकीय योजना तसेच ग्रामस्थांच्या मागण्यांवर चर्चा करून निर्णय घेण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याने तिचे आयोजन वेळेत होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच ग्रामसभेची अधिकृत नोटीस, अजेंडा आणि आवश्यक पूर्वसूचना ग्रामस्थांना देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ग्रामसभा वारंवार रखडल्याने ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

8 दिवसात ग्रामसभा घेण्यात आली नाही, तर ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात ‘ताल ठोक’ आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आंदोलन शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामसभा न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन तसेच पुढील तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन 8 दिवसात ग्रामसभा आयोजित करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. प्रतिक्रिया :
सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत अद्याप १५ ऑगस्टची ग्रामसभा घेण्यात आलेली नाही.

Ravikanttupakar/मंत्र्यांचे बंगले आणि गाड्या लिलाव आंदोलन; रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांना अटक! नियमित कर्जदारांना २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान आणि वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कक्षेत घेण्याची मागणी

ग्रामसभा ही गावातील विकासकामे व नागरिकांच्या प्रश्नांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक यांनी तत्काळ ग्रामसभा आयोजित करावी.ग्रामस्थांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Grampanchayatnews/ग्रामसभा तातडीने न घेतल्यास ग्रामस्थांच्या वतीने ‘कुलूप ठोको’ आंदोलन करण्यात येईल. सतीश व्ही. वानखडे, सामाजिक कार्यकर्ते, सोनाळा

Ravikanttupakar/मंत्र्यांचे बंगले आणि गाड्या लिलाव आंदोलन; रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांना अटक! नियमित कर्जदारांना २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान आणि वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कक्षेत घेण्याची मागणी

 

बुलढाणा | प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत करण्यात आलेल्या आंदोलनाला आक्रमक स्वरूप आले. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, तसेच यापूर्वीच्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीच्या कक्षेत समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान सरकारचा निषेध करत मंत्र्यांचे बंगले आणि सरकारी गाड्यांचा लिलाव करण्याचा इशारा देण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
आंदोलनासाठी मुंबईत दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. “२०१९ पूर्वीच्या वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या” तसेच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत द्यावी, अशा मागण्या फलकांवर करण्यात आल्या. Farmernews

दरम्यान, आंदोलनाचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई केली. येलो गेट पोलीस ठाणे, मुंबई येथे रविकांत तुपकर यांच्यासह अक्षय पाटील आणि शेकडो शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आंदोलनाच्या ठिकाणाहून समोर आली.

शेतकऱ्यांचा सवाल — नियमित कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहन कधी?

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयांमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा मुद्दा आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. संकटाच्या काळातही कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहनपर २ लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

तसेच काही शेतकरी मागील कर्जमाफीच्या निकषांमुळे लाभापासून वंचित राहिले आहेत. अशा शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश करून त्यांना दिलासा देण्याची मागणीही करण्यात आली.

सरकारने मागण्या गांभीर्याने घ्याव्यात शेतकऱ्यांच्या मागण्या केवळ आश्वासनांपुरत्या मर्यादित न ठेवता त्यावर ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. रविकांत तुपकर, अक्षय पाटील यांच्यासह शेतकऱ्यांना येलो गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याने आंदोलनाच्या पुढील भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.

Farmernews/शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न, नियमित कर्जदारांना २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान आणि वंचित शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश — या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

#RavikantTupkar #AkshayPatil #FarmerProtest #FarmersProtest #ShetkariAndolan #KarjMafi #KisanAndolan #FarmerLoanWaiver #MaharashtraFarmers #MumbaiProtest #YellowGatePoliceStation #Shetkari #Kisan #MaharashtraNews #MumbaiNews #SuryaMarathiNews #शेतकरीआंदोलन #कर्जमाफी #रविकांततुपकर #मुंबईआंदोलन #शेतकरी #सूर्यामराठीन्यूज

Adharlink/आधार सीलिंग अंगणवाडीत विविध उपक्रमांतून कार्यक्रम उत्साहात

 

यावला (प्रतिनिधी : विकी वानखेडे)

– बोराळे येथील आधार सीलिंग अंगणवाडीमध्ये अंगणवाडीतील बालकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बालकांचा सर्वांगीण विकास, आरोग्य, स्वच्छता तसेच शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात आला. Adhar

यावेळी अंगणवाडी सेविका रेणुका वानखेडे तसेच मदर्सनीस सुवर्णा राजपूत यांनी बालकांना विविध शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले. बालकांसोबत खेळ, गाणी, कविता, बडबडगीते तसेच विविध शैक्षणिक कृती घेण्यात आल्या.adharlink

कार्यक्रमादरम्यान बालकांच्या आरोग्य, पोषण व स्वच्छतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना मिळणारे पूर्वप्राथमिक शिक्षण आणि पोषण आहार याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

अंगणवाडी सेविका रेणुका वानखेडे व मदर्सनीस सुवर्णा राजपूत यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला. बालकांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने अंगणवाडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.yavalnews

Morchanews/अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात यावलमध्ये विराट एल्गार मोर्चा; “आरक्षण वाचवा, संविधान वाचवा”चा बुलंद नारा

 

यावल (प्रतिनिधी : विकी वानखडे) –

अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात तसेच आरक्षणाचे संरक्षण आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी यावल शहरात तालुक्यातील समाज बांधवांच्या वतीने विराट एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात यावल तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले. मोर्चामध्ये तब्बल दहा हजारांहून अधिक समाज बांधव सहभागी झाल्याचा आयोजकांचा दावा करण्यात आला.

“आरक्षण वाचवा, संविधान वाचवा”, “अनुसूचित जातींचे आरक्षण अबाधित ठेवा”, “सामाजिक न्यायाचा विजय असो” अशा घोषणांनी यावल शहराचा परिसर दुमदुमून गेला. हातात फलक, बॅनर आणि संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश घेऊन समाज बांधवांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदवला.

या विराट मोर्चाचा मुख्य उद्देश अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये करण्यात येणाऱ्या वर्गीकरणाला विरोध दर्शविणे, आरक्षणाच्या घटनात्मक संरक्षणाची मागणी करणे तसेच सामाजिक न्यायाची भूमिका ठामपणे मांडणे हा होता. मोर्चादरम्यान वक्त्यांनी अनुसूचित जातींच्या हक्कांवर कोणत्याही प्रकारे गदा येऊ नये आणि आरक्षणाच्या मूळ उद्देशाला धक्का पोहोचू नये, अशी भूमिका मांडली.suryamarathinews

मोर्चामध्ये यावल तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोठ्या जनसमुदायामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर गर्दीचे चित्र पाहायला मिळाले.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून शासनापर्यंत आपल्या मागण्या पोहोचविण्याची मागणी केली. अनुसूचित जातींच्या आरक्षणासंदर्भातील कोणताही निर्णय घेताना संबंधित समाजाच्या हिताचा आणि सामाजिक न्यायाचा विचार करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.jalgaonnews

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी आयोजकांनीही समाज बांधवांना सहकार्याचे आवाहन केले.

Yavalnews/यावल तालुक्यातील या विराट एल्गार मोर्चामुळे अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाची एकजूट आणि नाराजी ठळकपणे समोर आली असून, आता शासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Yavalnews /नगराध्यक्षांना सन्मानाचे स्थान न दिल्याचा आरोप; यावल आगारातील कार्यक्रमावर अतुल पाटलांचा बहिष्कार

 

लोकनियुक्त नगराध्यक्षांना अपेक्षित सन्मान न मिळाल्याचा आरोप; शासकीय कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा दावा

यावल (प्रतिनिधी : विकी वानखडे)

यावल आगार येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने पाच नवीन अत्याधुनिक बसेसच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून वादाचे स्वरूप प्राप्त झाले. यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांना कार्यक्रमात अपेक्षित सन्मान व प्रोटोकॉल देण्यात आला नसल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी केला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे सांगण्यात आले.

नगराध्यक्षांना व्यासपीठावर अपेक्षित स्थान न मिळाल्याचा आरोप
लोकार्पण सोहळ्यासाठी नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील उपस्थित असतानाही त्यांना व्यासपीठावर योग्य सन्मानाचे स्थान देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान त्यांना बाजूच्या खुर्चीवर बसावे लागले. तसेच दीपप्रज्वलनाच्या वेळी त्यांचे नाव उशिराने घेण्यात आल्याचेही अतुल पाटील यांनी म्हटले आहे.

सत्काराच्या वेळीही नगराध्यक्ष पदाचा आवश्यक तो प्रोटोकॉल पाळण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष या नात्याने सौ. छायाताई पाटील या कार्यक्रमातील प्रमुख लोकप्रतिनिधींपैकी एक असताना त्यांना अपेक्षित सन्मान न मिळाल्याने उपस्थितांमध्येही नाराजीची चर्चा होती, असा दावा करण्यात आला.

शासकीय कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप
या प्रकाराबरोबरच कार्यक्रमाच्या नियोजन व सूत्रसंचालनावरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी आगार प्रशासनाची असताना काही भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमादरम्यान माईक हातात घेऊन सूत्रसंचालनात हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला.

यामुळे शासकीय स्वरूपाच्या कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप करून कार्यक्रमावर राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप अतुल पाटील यांनी केला. शासकीय कार्यक्रम हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसतो. त्यामुळे अशा कार्यक्रमात प्रशासनाने सर्व लोकप्रतिनिधींना त्यांच्या पदानुसार समान सन्मान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.jalgaonnews

अतुल पाटील यांचा कार्यक्रमावर बहिष्कार
नगराध्यक्षांच्या प्रोटोकॉलचा कथित अवमान झाल्याने संतप्त झालेल्या माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी आगार प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकनियुक्त नगराध्यक्षांचा सन्मान राखला जात नसेल, तर अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका घेत त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
“लोकनियुक्त नगराध्यक्षांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा विषय नसून संपूर्ण यावल शहराच्या जनतेने दिलेल्या लोकशाही अधिकाराचा सन्मान आहे.

शासकीय कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असेल, तर त्याचा निषेध करणे आवश्यक आहे,” अशी भूमिका अतुल पाटील यांनी मांडली.grampanchayat

“लोकप्रतिनिधींचा सन्मान पक्षीय राजकारणापेक्षा मोठा”
यावेळी अतुल पाटील यांनी शासकीय कार्यक्रम आणि पक्षीय कार्यक्रम यामध्ये स्पष्ट फरक असला पाहिजे, असे सांगितले. प्रशासनाच्या कार्यक्रमात राजकीय शक्तिप्रदर्शनाला स्थान नसावे, अशी भूमिका त्यांनी घेतली.

“राजकारण करायचे असेल तर ते निवडणुकीच्या मैदानात करा; मात्र शासकीय कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा प्रोटोकॉल आणि सन्मान पायदळी तुडवून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. लोकनियुक्त नगराध्यक्षांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत मान्य केला जाणार नाही,”

Yavlnewa/अशी संतप्त प्रतिक्रिया अतुल पाटील यांनी व्यक्त केली.दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे यावलच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, शासकीय कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींचा प्रोटोकॉल नेमका कसा पाळला जातो, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या आरोपांवर आगार प्रशासन तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, याकडे आता यावलकरांचे लक्ष लागले आहे

MMRDA JE भरतीच्या निकालावर प्रश्नचिन्ह? एकाच केंद्रातील अनेक टॉपर्सच्या दाव्याने खळबळ अभिजीत दिपके यांची सखोल चौकशीची मागणी; विद्यार्थ्यांच्या मनात उपस्थित झाले गंभीर सवाल

 

मुंबई | प्रतिनिधी

महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDAच्या ज्युनियर इंजिनिअर भरती परीक्षेच्या निकालावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. निकालातील काही बाबींवर उमेदवारांकडून आक्षेप नोंदवले जात असून, परीक्षा प्रक्रियेत काही अनियमितता झाली का, याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.

CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या प्रकरणाकडे लक्ष वेधलं आहे. अनेक परीक्षार्थींनी MMRDA JE भरती परीक्षेतील कथित अनियमिततेबाबत आपल्याशी संपर्क साधल्याचा दावा दिपके यांनी केला आहे.
नेमका आरोप काय?

उमेदवारांकडून करण्यात येत असलेल्या दाव्यानुसार, इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित कामगिरी न करणारे काही उमेदवार MMRDA JE परीक्षेत थेट उच्च गुण मिळवून टॉपर्सच्या यादीत आल्याचे सांगितले जात आहे.
यासोबतच निकालातील अनेक टॉपर्स एकाच परीक्षा केंद्रातील असल्याचा दावाही करण्यात येत आहे.
यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

जर हे दावे चुकीचे असतील तर त्यामागचं सत्य काय? आणि जर निकालामध्ये खरोखरच काही अनियमितता झाली असेल, तर त्याची व्याप्ती किती आहे? या प्रश्नांची उत्तरं आता अधिकृत तपासणीतूनच समोर येऊ शकतात.104 जागांसाठी परीक्षा MMRDA JE भरती 2026 अंतर्गत विविध अभियांत्रिकी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. उपलब्ध माहितीनुसार या भरती प्रक्रियेत 104 पदांचा समावेश होता.

ही परीक्षा 11 आणि 12 मे 2026 रोजी ऑनलाइन CBT पद्धतीने घेण्यात आली. त्यानंतर 15 ऑगस्ट 2026 रोजी निकाल जाहीर झाल्याची माहिती आहे.
निकाल समोर आल्यानंतर काही उमेदवारांनी गुणांबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.

190 पेक्षा जास्त गुणांचा दावा काही उमेदवारांना 190 पेक्षा अधिक गुण मिळाल्याची चर्चा सुरू असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, यापैकी काही उमेदवार पहिल्यांदाच स्पर्धा परीक्षा देत असल्याचेही दावे सोशल मीडियावर आणि उमेदवारांकडून केले जात आहेत.मात्र, या सर्व दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

त्यामुळे या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे — दाव्यांची सत्यता तपासणे.
CBT परीक्षेचा डिजिटल डेटा महत्त्वाचा
MMRDA JE परीक्षा ऑनलाइन CBT पद्धतीने झाल्यामुळे परीक्षा प्रक्रियेशी संबंधित डिजिटल नोंदी उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

यामध्ये उमेदवाराची परीक्षा सुरू झाल्याची वेळ, प्रश्न सोडवण्याची पद्धत, उत्तर नोंदी, लॉगिन आणि परीक्षा केंद्राशी संबंधित डिजिटल माहिती यांसारख्या बाबी तपासल्या जाऊ शकतात.

त्यामुळे जर अधिकृत चौकशी करण्यात आली, तर परीक्षा केंद्रनिहाय निकाल, उमेदवारांची मागील परीक्षांमधील कामगिरी, गुणांमधील असामान्य वाढ आणि उपलब्ध डिजिटल डेटा यांची पडताळणी महत्त्वाची ठरू शकते.

विद्यार्थ्यांचा मोठा सवाल सरकारी नोकरी मिळवण्यासाठी हजारो विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करतात. अनेक विद्यार्थी आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करत स्पर्धा परीक्षांची तयारी करतात.

अशा परिस्थितीत एखाद्या भरती परीक्षेच्या निकालाबाबत शंका निर्माण झाली, तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या विश्वासावर होतो.
त्यामुळे उमेदवारांची मागणी आहे की, आरोप खरे आहेत की चुकीचे, हे स्पष्ट करण्यासाठी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि संपूर्ण परीक्षा प्रक्रियेबाबत पारदर्शकता ठेवण्यात यावी.

आता MMRDA काय भूमिका घेणार?
अभिजीत दिपके यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आता या आरोपांवर MMRDA आणि संबंधित परीक्षा यंत्रणा काय भूमिका घेतात? चौकशी समिती नेमली जाते का? परीक्षा केंद्रनिहाय निकाल आणि डिजिटल डेटाची तपासणी केली जाते का? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

सध्या उपलब्ध माहितीच्या आधारे परीक्षा घोटाळा झाला असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. मात्र, निकालाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असल्याने या दाव्यांची अधिकृत आणि पारदर्शक चौकशी होणे गरजेचे आहे.कारण प्रश्न केवळ काही उमेदवारांच्या निकालाचा नाही…

प्रश्न आहे तो हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या भवितव्याचा आणि सरकारी भरती प्रक्रियेवरील विश्वासाचा.

MMRDA JE भरतीतील या कथित अनियमिततेमागचं सत्य चौकशीतून समोर येणार का?
याकडे आता संपूर्ण स्पर्धा परीक्षा विश्वाचं लक्ष लागलं आहे.

SindkhedRaja/ सिंदखेडराजातील राजमाता जिजाऊ स्मारकासाठी आणखी ५० कोटींचा निधी; कामाला मिळणार गती

 

संपादक : अनिलसिंग चव्हाण

बुलडाणा | सिंदखेडराजा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मारकाच्या विकासाला आता मोठी चालना मिळणार आहे. नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून स्मारकासाठी आणखी ५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. स्मारकाच्या कामाला गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.jijaumata

सिंदखेडराजा ही राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जन्मभूमी असल्याने या स्थळाला ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. येथे उभारण्यात येणारे जिजाऊ स्मारक आणि जिजाऊसृष्टी हे परिसराच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प मानले जात आहेत.

२०२४ मध्ये ५० कोटींची घोषणा

सिंदखेडराजा परिसरातील जिजाऊसृष्टी आणि स्मारकाच्या विकासासाठी यापूर्वी २०२४ मध्ये ५० कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता. या निधीतून सिंदखेडराजा शहरालगत असलेल्या जिजाऊसृष्टीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत या कामासाठी सुमारे २७ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असून, प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.sindkhedraja

मात्र शहरातील लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील प्रत्यक्ष राजमाता जिजाऊ स्मारकाच्या कामाला वेग देण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने आता आणखी ५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्मारकासोबत रस्ते आणि सुविधांचाही विकास
नवीन निधीतून केवळ स्मारकाचे बांधकामच नव्हे, तर स्मारक परिसरातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि आजूबाजूच्या आवश्यक सोयी-सुविधांचा विकास केला जाणार आहे. त्यामुळे सिंदखेडराजाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.

स्थानिक नगरपालिकेकडून या विकासकामांसाठी प्रस्ताव मागविण्यात येणार असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध कामांना गती देण्यात येणार आहे. स्मारकाचे काम वेळेत पूर्ण करून सिंदखेडराजाला महत्त्वाचे ऐतिहासिक व पर्यटनस्थळ म्हणून अधिक विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

ऐतिहासिक वारशाला मिळणार नवी ओळख
राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मभूमीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच या परिसराचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी स्मारक प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. अतिरिक्त ५० कोटींच्या निधीमुळे रखडलेल्या अथवा प्रलंबित कामांना गती मिळण्याची शक्यता असून, स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींमध्येही या निर्णयामुळे समाधान व्यक्त होत आहे.

या बैठकीस मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुनील भुसारा तसेच माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या स्मृती आणि ऐतिहासिक वारशाला साजेसे भव्य स्मारक उभारून सिंदखेडराजाच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याचा शासनाचा प्रयत्न या निर्णयातून स्पष्ट होत आहे.

Grampanchayat/ग्रामसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; ग्रामसभेच्या सचिवपदाच्या कामकाजावर बहिष्काराचा निर्णय

 

गटविकास अधिकारी व तहसीलदारांना निवेदन; यावल तालुक्यात ग्रामसभांसाठी अन्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्याची मागणी

यावल (प्रतिनिधी : विकी वानखडे)

– ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत ग्रामसेवक व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायत अधिकारी ए.एन. पाटील यांच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या यावल तालुका शाखेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत ग्रामसभेच्या सचिवपदाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

यासंदर्भात यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. ग्रामसभांचे कामकाज सुरळीत राहावे, यासाठी ग्रामसेवकांऐवजी अन्य विभागातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची ग्रामसभा सचिव म्हणून नियुक्ती करावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी ए.एन. पाटील यांच्या घरात झालेल्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून, या घटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.yavalnews

ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवक हे गावपातळीवर शासनाच्या विविध योजना, ग्रामसभा, विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी पार पाडत असतात. मात्र, कामकाज करताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

१८ ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी बहिष्कार

निवेदनात नमूद केल्यानुसार, दि. १८ ऑगस्ट २०२६ पासून पुढे अनिश्चित कालावधीकरिता ग्रामसभा घेण्याच्या कामकाजात ग्रामपंचायत सचिव म्हणून ग्रामसेवक उपस्थित राहणार नाहीत. ग्रामसभेच्या सचिवपदाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आयोजित होणाऱ्या आगामी ग्रामसभांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामसभांचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.yavalnews

अन्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी

यावल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या ग्रामसभांसाठी ग्रामपंचायत अधिकारी अथवा ग्रामसेवकांऐवजी अन्य विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत संबंधित विभागांना तातडीने योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवक संघटना प्रशासनास सहकार्य करण्यास सदैव तयार आहे. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

Garampanchayat/ग्रामसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न, ग्रामसभांचे कामकाज आणि पर्यायी सचिवांची नियुक्ती याबाबत आता गटविकास अधिकारी व तहसीलदार प्रशासन कोणती भूमिका घेतात, याकडे यावल तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. संघटनेच्या निर्णयामुळे आगामी ग्रामसभांचे कामकाज कोणत्या पद्धतीने पार पडणार, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

Policenews/अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दहेगाव पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण १८ ऑगस्ट रोजी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी; मोबाईल हिसकावणे व हातापाईचे दृश्य असल्याचा पत्रकार सचिन वाघे यांचा दावा

 

प्रतिनिधी : सचिन वाघे

हिंगणघाट/वर्धा : माहिती अधिकारातील अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दहेगाव गोसावी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचे प्रत्यक्ष निरीक्षण १८ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या निरीक्षणादरम्यान संबंधित सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. या निरीक्षणानंतर पत्रकार सचिन वाघे यांनी यापूर्वीच्या चौकशी अहवालावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.ceimenews

दहेगाव पोलीस ठाण्यात घडलेल्या कथित प्रकारासंदर्भात वाघे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेजची माहिती व प्रत मिळविण्याची मागणी केली होती. माहिती अधिकारातील अपिलीय प्रक्रियेनंतर संबंधित फुटेजचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार १८ ऑगस्ट रोजी दहेगाव पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली.

फुटेजमध्ये मोबाईल हिसकावणे व हातापाईचे दृश्य असल्याचा दावा पत्रकार सचिन वाघे यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष सीसीटीव्ही फुटेज पाहताना पोलिसांकडून मोबाईल हिसकावण्यात येत असल्याचे तसेच हातापाई झाल्याचे दृश्य दिसून आले. या दृश्यांमुळे यापूर्वी करण्यात आलेल्या चौकशीतील निष्कर्ष आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा घटनाक्रम यामध्ये तफावत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

वाघे यांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही फुटेज हा या प्रकरणातील महत्त्वाचा इलेक्ट्रॉनिक पुरावा असून त्याचा संपूर्ण घटनाक्रमाच्या संदर्भात विचार होणे आवश्यक आहे.wardhanews

सीसीटीव्ही फुटेज न पाहता चौकशी अहवाल?
या प्रकरणात पोलीस उपविभागीय अधिकारी, वर्धा यांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेजची प्रत्यक्ष पाहणी न करताच पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केल्याचा आरोप पत्रकार वाघे यांनी केला आहे.
जर चौकशी अधिकाऱ्यांनी संबंधित इलेक्ट्रॉनिक फुटेजची प्रत्यक्ष पाहणी केली नसेल, तर चौकशी अहवाल कोणत्या आधारावर तयार करण्यात आला, असा सवाल वाघे यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे या प्रकरणाची फेरतपासणी करून नव्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
३१ जुलैच्या फेरतपासणी अर्जावर निर्णयाची प्रतीक्षा
पत्रकार सचिन वाघे यांनी ३१ जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्याकडे फेरतपासणी व नव्याने चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, या अर्जावर अद्याप अंतिम निर्णय अथवा अधिकृत लेखी उत्तर मिळाले नसल्याचे वाघे यांनी सांगितले.hingnghatnews

सीसीटीव्ही फुटेजची प्रत्यक्ष पाहणी न करता चौकशी अहवाल सादर करण्यात आला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दहेगाव पोलीस ठाण्यात १० सीसीटीव्ही कॅमेरे
दहेगाव गोसावी पोलीस ठाण्यात एकूण १० सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये पोलीस ठाण्याच्या आतील भागासह प्रवेशद्वारांच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.policenews

दरम्यान, पोलीस ठाण्याच्या मुख्य बाहेरील प्रवेशद्वारावर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे निरीक्षणादरम्यान सांगण्यात आले. या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा फोटो काढण्याची विनंती पत्रकार सचिन वाघे यांनी केली असता आनंद भस्मे यांनी फोटो काढू दिला नाही, असे वाघे यांनी सांगितले.

कॅमेरा बंद असल्याची माहिती निरीक्षणादरम्यान सांगण्यात आली असून, त्याबाबत स्वतंत्रपणे कोणतीही मागणी करण्यात आलेली नसल्याचे वाघे यांनी स्पष्ट केले आहे.

इलेक्ट्रॉनिक प्रमाणित प्रत देण्याची मागणी
अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सीसीटीव्ही फुटेजचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले असले तरी संबंधित फुटेजची इलेक्ट्रॉनिक प्रमाणित प्रत मिळावी, अशी मागणी पत्रकार वाघे यांनी केली आहे.
केवळ फुटेजचे निरीक्षण करण्याऐवजी त्याची अधिकृत प्रमाणित इलेक्ट्रॉनिक प्रत उपलब्ध झाल्यास घटनाक्रमाची स्वतंत्रपणे पडताळणी करता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी नागपूर विभागीय माहिती आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांकडून पत्रकाराविरुद्ध कारवाई
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पत्रकार सचिन वाघे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आलेला घटनाक्रम आणि त्यानंतर झालेली पोलीस कारवाई यांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक असल्याचे वाघे यांनी म्हटले आहे.
मोबाईल नेमका कोणत्या परिस्थितीत घेण्यात आला, हातापाई कशामुळे झाली आणि त्या वेळी उपस्थित असलेल्या व्यक्तींची नेमकी भूमिका काय होती, याचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
१८ ऑगस्टच्या निरीक्षणाच्या नोंदीकडे लक्ष
१८ ऑगस्ट रोजी झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या निरीक्षणानंतर आता त्याची अधिकृत नोंद काय केली जाते, निरीक्षणाचा अहवाल कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो आणि ३१ जुलैच्या फेरतपासणी अर्जावर पोलीस अधीक्षक, वर्धा कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

तसेच सीसीटीव्ही फुटेजची इलेक्ट्रॉनिक प्रमाणित प्रत देण्याच्या मागणीवर माहिती आयोग काय निर्णय घेतो, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

निष्पक्ष फेरचौकशीची मागणी सीसीटीव्ही फुटेज, त्यातील घटनाक्रम, यापूर्वीचा चौकशी अहवाल आणि ३१ जुलै रोजी सादर केलेला फेरतपासणी अर्ज या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून निष्पक्षपणे नव्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार सचिन वाघे यांनी केली आहे. breakfast

चौकशीत संबंधित अधिकाऱ्यांकडून नियमबाह्य अथवा चुकीची कार्यवाही झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Policenews/टीप :सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्ये, मोबाईल हिसकावणे व हातापाईबाबतचे दावे तसेच चौकशी अहवालासंदर्भातील आक्षेप हे पत्रकार सचिन वाघे यांनी केले आहेत. मुख्य बाहेरील प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याची माहिती निरीक्षणादरम्यान सांगण्यात आल्याचेही वाघे यांनी नमूद केले आहे. संबंधित पोलीस अधिकारी किंवा पोलीस विभागाची अधिकृत बाजू प्राप्त झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.policenews