Home Blog Page 601

वैजापूर न्यायालयासमोर भरदिवसा चाकूने भोसकून खून

0

 

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर

वैजापूर दि०३: वैजापूर शेतजमिनीच्या वादातून पती, मुलगा व नातवाच्या मदतीने पहिल्या पत्नीचा न्यायालयासमोर सकाळी अकरा वाजता चाकूने भोसकून खून केला.या प्रकरणी पतील पोलिसांनी अटक केली असून अन्य तिघे फरार झाले.
या बाबतची माहिती अशी की, केशरबाई कारभारी गवळी (७५) रा.भिंगी बोरसर यांचे पती कारभारी गवळी रा. घायगाव यांच्याशी लग्न झालेले होते. पण त्यानंतर दोघांचे पटत नसल्याने केशरबाई गवळी या भिंगी बोरसर येथे मुलीकडे राहत होत्या.कारभारी किसन गवळी(७०)हे दुसऱ्या पत्नीसह घायगाव येथे राहत होते. केशरबाई आणि कारभारी यांच्यात चाळीस वर्षापासून शेत जमिनीच्या वादावरून न्यायलायात खटला चालू होता. दि ०३ रोजी न्यायलायात तारीख असल्याने केशरबाई सकाळी ११वाजता न्यायालयात तारखेसाठी आल्या होत्या. न्यायालयासमोरून जात असताना कारभारी किसन गवळी(८०),त्यांचा मुलगा भरत कारभारी गवळी (४०), अतुल भरत गवळी(२२) व अन्य एकजण यांनी केशरबाईला गाठले व चाकूने सहा ते सात वेळेस भोसकले.त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना पोलिसांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.या प्रकरणी पोलिसांनी पती कारभारी गवळी याला अटक केली. तर अन्य तिघे फरार झाले .पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सूर्या मराठी न्युज साठी ऋषी जुंधारे वैजापूर

भारतीय जनता पार्टी वैजापूर उपतालुकाअध्यक्ष पदी मंगेश पा. मते यांची निवड..

0

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर

आज दि.०४ रोजी भारतीय जनता पार्टी तालुका कार्यकारणी नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम व कार्यकर्ता मेळावा आयोजित झाला ,या वेळी कार्यक्रमाचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख अतिथी औरंगाबाद जिल्हा भाजपचे जिल्हाअध्यक्ष श्री विजय औताडे,माजी जिल्हा अध्यक्ष श्री एकनाथ जाधव, संभाजीनगर जिल्हा भाजपचे सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी,स
शिरीष जी बोराळकर, अनिल चोरडिया, वैजापूर भाजपचे तालुका अध्यक्ष श्री कल्याण दांगोडे, शहर अध्यक्ष श्री भूषण राजे निंबाळकर यांच्या हस्ते श्री मंगेश पा. मते यांना भारतीय जनता पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली वैजापूर तालुका व शहरातील नवनिर्वाचित पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

बच्चू कडुंच मोठं वक्तव्य नाही तर भाजपा मध्ये करू प्रवेश

0

 

अमरावती | केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाचा देशभरातून विरोध केला जात आहे. अशातच राज्याचे शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कृषी विधेयकात शेतकऱ्यांना 50 टक्के नफा धरून भाव देऊ आणि याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू, असं केल्यास आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात भाजपच्या महिला नेत्या गप्प आहेत. महिला अत्याचार प्रकरणात पक्ष न पाहता महिलांनी पुढे यावं, असं आवाहनही कडू यांनी केलं आहे.

वसुलीसाठी महिलांना धमकावणाऱ्या महिंद्रा फायनान्स च्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा – रासप जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर

0

 

 

वसुलीसाठी महिलांना शिवीगाळ करून धमकावणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या महिंद्रा फायनान्स च्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
खामगाव येथील महिंद्रा फायनान्स कंपनीचे कार्यालय असून ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांना गृह कर्ज वाटप केले आहे. लॉकडाऊन काळामध्ये आर्थिक परिस्थिती बेताची झाल्यामुळे कर्जदार कर्ज भरण्यास असमर्थ आहेत याबाबत रिझर्व्ह बँकेने सहा महिन्याची शिथीलता आधीच दिलेली होती. लॉकडाऊन उलटल्यानंतर आता प्रकरण न्यायप्रविष्ट असून वसुली करण्याचे आदेश अद्याप पावेतो आलेले नाहीत. असे असताना सुद्धा महिंद्रा फायनान्स चे मग्रूर अधिकारी व कर्मचारी व त्यांचे भाडोत्री गुंडे कर्जदारांना महिला – पुरुष असे न जुमानता अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत धमक्या देताना दिसून येतात. वेळोवेळी घरी चकरा मारून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घरी आणून महिलांना दमदाटी शिवीगाळ करण्याचे प्रकार घडत आहेत.
सुनगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी शिवदास सोनवणे यांच्याबाबत असा प्रकार घडला. महिंद्रा फायनान्स चे अधिकारी व कर्मचारी पवन अवचार महिलांना घरात अनधिकृतरित्या प्रवेश करून पैसे देत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेत आजूबाजूच्या लोकांसमोर शिवीगाळ करून त्यांचा चारचौघात पाणउतारा करतात. तसेच घरातील वस्तू उचलून नेण्याचे धमकावत असतात.
शिवदास सोनवणे घरी नसताना महिंद्रा फायनान्स चे कर्मचारी पवन अवचार यांनी शिवदास सोनवणे यांचे घरी येऊन घरातील महिलांचे व घराचे फोटो काढले तेव्हा घरातील महिलांनी महिलांचे व घराचे फोटो पुरुष मंडळी घरी नसताना काढू नका . नियमानुसार कारवाई करायचे नोटीस देण्याचे सांगितले असता . आम्हाला वरून आदेश आहेत तुम्ही घरात राहतात. त्या घराचे मालक आम्ही आहोत. मी तुम्हाला कर्ज दिलेला आहे. आम्हाला शहाणपणा शिकवू नका पैसे भरा अन्यथा मार खायला तयार व्हा अशा धमक्या देत महिलांना शिवीगाळ केली. अशा गुंड प्रवृत्तीच्या अधिकार्यां वर त्वरित कारवाई करून प्रतिबंध करणे गरजेचे आहे. तरी मेहरबान साहेबांनी सदर निवेदनावर लक्ष देऊन महिंद्रा फायनान्स गुंडांना कारवाई करून जेरबंद करावे. फायनान्स कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्ष , अहिल्या सरकार संघटना व भैरव फाउंडेशन महाराष्ट्र यांच्यातर्फे लोकशाही मार्गाने संयुक्त आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला.
सदर निवेदनावर धनश्रीताई काटीकर जिल्हाध्यक्ष रासप, प्रकाश ताटे जिल्हा संघटक, करणसिंग जिल्हा युवा अध्यक्ष , संतोष वानखेडे शहराध्यक्ष, शिवदास सोनोने जील्हा उपाध्यक्ष, सय्यद ताहेर , गीता सोनोने प्रदेशाध्यक्ष शिव अहिल्या शासन व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

देऊळगाव माळी येथे घडले माणूसकीचे दर्शन गरीब कुटुंबाच्या मदतीसाठी धावले गावकरी

0

 

 

देऊळगाव माळी .२ विद्युत शॉक लागून मृत्यू पावलेल्या महिलेच्या अपत्या साठी आर्थिक निधी उभारून माणूसकीचे अदभूत दर्शन मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे घडले. या घटनेमुळे परत समाजाच्या दातृत्व शक्तीचा परिचय समाजाला घडला. दिनांक 27 सप्टेंबरला देऊळगाव माळी गावातील महिला सपना विलास गवई या महिलेचा विद्युत धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलास राऊत यांनी सोशल मिडीयावर सपना विलास गवळी यांची मुलगी स्नेहा विलास गवळी हिच्या शैक्षणीक खर्चासाठी आर्थिक मदतीचे आवाहन असणारी पोस्ट सोशल मिडीयावर टाकली तसेच स्नेहाच्या नावाने सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये खाते सुध्दा काढले. देऊळगावमाळी येथील प्रकाशभाऊ डोंगरे मित्र मंडळ ११००० रुपये,डॉ.विशाल वसंतराव मगर ५००० रुपये, बळी नाथगिरी महाराज ५००० रुपये ,डॉ.अमोल गवई ५००० रुपये ,नारायण बळी २१००रुपये ,सावरकर सर ११००रुपये ,पांडुरंग कृपा भजनी मंडळ अध्यक्ष जगन्नाथ चांगाडे ११०० रुपये ,पांडुरंग संस्थानचे अध्यक्ष टि.एल मगर ११०० रुपये तसेगावकऱ्यांनी तसेच असंख्य गावकऱ्यांनी पाचशे रुपये रक्कम या चिमुकलीच्या खात्यामध्ये जमा केली हि मदत करून चिमुकलीच्या खात्यामध्ये पैसे जमा केले. व अनेकांनी अन्नधान्य सुद्धा या कुटुंबाला दिले विदयुत शॉक लागून मृत्यू पावलेल्या महिलेच्या कुटुंबीयासाठी मदत करण्यासाठी गावकरी पुढे सरसावले. गावकऱ्यांनी मिळून ६७ हजार रूपये एवढा आर्थिक निधी उभा करून समाजापुढे एक आदर्श उभा केला. आर्थिक मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य दानशूर व्यक्तींनी मृतक सपना विलास गवळी यांची मुलगी स्नेहा विलास गवई या चिमुकलीच्या खात्यावर असंख्य लोकांनी आर्थिक रक्कम जमा करून त्या कुटुंबाला आधार दिला. या धकाधकीच्या जीवनात सुद्धा देऊळगाव माळी मध्ये पुन्हा एकदा माणूसकीचा पाझर फुटला याचा प्रत्यय गावकऱ्यांनी दाखवून दिला. देऊळगाव माळी गावातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलास राऊत यांनी यापूर्वीसुद्धा ज्या कुटुंबावर संकट आली त्यामध्ये काही च्या घराला आग लागली असेल त्यांच्या घरामध्ये कुणाचे आजारपण असेल सोलापूर कोल्हापूरचा महाप्रलय असेल त्या प्रत्येक वेळेस वेळोवेळी फुल न फुलाची पाकळी म्हणून त्या संकटात त्या व्यक्तीला धीर देण्याचे काम पत्रकार कैलास राऊत व नारायण बळी यांच्या माध्यमातून या अनेक वेळेस त्या व्यक्तीला धीर देण्याचे काम केलेले करण्यात आलेला आहे. या चिमुकलीला शैक्षणिक खर्चासाठी पूर्ण फुलाची पाकळी आर्थिक मदत करावी जमा झालेल्या रकमेचा धनादेश स्वर्गीय सपना विलास गवळी यांचे पती विलास गवळी यांची मुलगी स्नेहा मुलगा यांच्याकडे ती रक्कम सुपूर्द केली. पत्रकार कैलास राऊत,गजेंद्र गवई यांनी समाजाला केलेल्या आर्थिक आवाहनामुळे एका कुटुंबा मोठा आर्थिक मदत मिळाली. यावेळी पत्रकार कैलास राऊत नारायण बळी वसंतराव मगर पुरुषोत्तम बळी महाराज प्रकाश डोंगरे भिकाजी गवई सुरेश गवई गजेंद्र गवई दत्ता राऊत अनिल गायकवाडयावेळी गावकऱ्यांनी स्नेहाचे वडील विलास गवळी यांच्याकडे आर्थिक मदतीची रक्कम सुपूर्द केली.यावेळी पत्रकार कैलास राऊत,नारायण बळी,वसंतराव मगर,पुरूषोत्तम बळी महाराज,प्रकाश डोंगरे,भिकाजी गवई,सुरेश गवई,दत्ता सुरेश आत्माराम गवई अनिल गायकवाड यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते उपस्थित होते.

नक्षलग्रस्त क्षेत्र के सुशिक्षित युवक रोजगार के अवसर का ले लाभ- पुलिस अधीक्षक

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

16 युवाओ को पुलिस विभाग के सहयोग से मिला रोजगार
गोंदिया। गोंदिया जिले के नक्षलग्रस्त क्षेत्र के सुशिक्षित युवक-युवतिया नक्सली बहकावे में ना आकर रोजगार के अवसर का लाभ लें तथा शासन के मुख्य प्रभाव में शामिल हो ऐसा आव्हान जिला पुलिस अधीक्षक विश्व पानसरे ने किया है। गौरतलब है कि सुशिक्षित युवाओं के रोजगार के लिए पुलिस विभाग द्वारा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना के अंतर्गत रोजगार उपलब्ध करवा रहा है। जिसके अंतर्गत 16 युवक-युवतियों को यशस्वी ग्रुप चाकन पुणे अमेजॉन इंडिया लिमिटेड मुंबई में नियुक्ति हुई जिन्हें अपने कार्य पर मुंबई और पुणे जाने के लिए गोंदिया पुलिस द्वारा निजी बस की व्यवस्था की गई जिन्हें 3 अक्टूबर को देवरी पुलिस स्टेशन में अपर पुलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी ने झंडी दिखाकर रवाना किया इस अवसर पर सालेकसा के पुलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, देवरी के पुलिस निरीक्षक अजीत कदम, सहायक पुलिस निरीक्षक कमलेश बछाओ, विजय धुमाल तथा नक्सल सेल गोंदिया व देवरी के पुलिस कर्मचारी उपस्थित थे।

शहरी भागा प्रमाणे ग्रामीण भागात ही आठवडी बाजार ला परवानगी द्या ,

0

 

जिल्हाधिकारी यांच्या कडे मांगनि ,

बुलडाणा , जिल्ह्यात लोकडाऊन सुरू झाल्या पासून भरणारे सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले होते मात्र आता बुलडाणा , चिखली , मेहकर , देऊलगावराजा , लोणार , या ठिकाणी आठवडी बाजार भरण्यास सुरवात झाली असून शहरी भागा प्रमाणे ग्रामीण भागात ही आठवडी बाजार सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मांगनि जिल्हा आठवडी बाजार संघर्ष समिती चे अध्यक्ष अमीन शाह यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे ,

ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे , पोटाची खळगी भरण्यासाठी काही व्यापारी ग्रामीण भागात जातात मात्र तेथे त्यांना गावात फिरण्यास मनाई करण्यात येते लहान व्यापाऱ्यांना मज्जाव करण्यात येत असून लहान व्यापार करणाऱ्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे , आता परिस्तिथी बदलली असून बस सेवा , व इतर सर्व दुकाने उधडण्यास शासनाने परवानगी दिली आहे , याच प्रमाणे ग्रामीण भागातील लहान बाजारांना परवानगी देण्यात यावी जिल्हाधिकारी यांनी लक्ष केंद्रित करावे व आमचं उपजीविकेचा प्रश्न निकाली काढावा अशी मंगणी निवेदनात करण्यात आली आहे ,

——–//—————//————–//

आठवडी बाजार बंद झाल्या मूळे आम्ही किरकोळ छोट्या व्यापाऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून आमची आर्थिक परिस्तिथी खालावली आहे कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे , शासनाने आमचा विचार करावा व आठवडी बाजाराला परवानगी द्यावी ,

कृष्णा मिसाळ ,

चिवडा विक्रेता आठवडी बाजार ,

आठवडी बाजार बंद असल्या मुळे माझ्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली होती उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता आता शेतात सोयाबीन सोंगणी सुरू झाल्या मूळे मी माझ्या कुटुंबीया सह सोयाबीन सोंगणी करायला जात आहोत शासनाने आमचा विचार करून बाजाराला परवानगी द्यावी ,

शेख नासिर

मसाला विक्रेता ,

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनिषा वाल्मिकी तरुणीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होण्यासंदर्भात शेगाव येथील समस्त नवयुवक वाल्मीकि समाज मित्र परिवार व् समस्त एकता ग्रुप शेगांव यांचे वतीने मेणबत्ती लावून श्रध्दांजली

0

 

आयुषी दुबे शेगाव तालुका प्रतिनिधी

शेगाव येथे समस्त नवयुवक वाल्मीकि समाज मित्र परिवार व् समस्त एकता ग्रुप शेगांव येथे मेणबत्ती लावून वाहली श्रद्धांजली उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनीषा वाल्मीक या तरुणीवर बलात्कार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांविरुद्ध तात्काळ कारवाई करणे व उत्तर प्रदेश मधील सरकार बरखास्त करण्याचा संदर्भात शेगाव येथे हजारो मेणबत्ती लावून श्रद्धांजली उत्तर प्रदेश मध्ये 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिच्या बर्र्बर्र्तापुर्वक तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तसेच केरळच्या धर्तीवर पोलीस एन्काऊंटर करणारा अथवा सदर प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची उत्तर प्रदेश लोकशाही देशात पंतप्रधान व संबंधित राज्याचे मुख्यमंत्री देत नाही म्हणून राष्ट्रपती महोदयांनी यामध्ये लक्ष घालून तात्काळ पीडितांना न्याय मिळवून द्यावा व अत्याचारग्रस्त दलित चळवळीचा जीवनमरणाचा संघर्ष संपल्यानंतर तिच्या निधनाचे वृत्त देखील तिच्या कुटुंबीयांपासून लपवणार्या व तिच्या कुटुंबियांच्या अनुपस्थितीत परस्पर अंत्यसंस्कार करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व कायदा व सुव्यवस्थेची राजरोसपणे होत असलेल्या त्या उत्तर प्रदेशातील सरकार या सर्व गोष्टींमध्ये कमकुवत ठरत असल्यामुळे उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्यात यावे यासंदर्भात उत्तर प्रदेशातील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा समस्त नवयुवक वाल्मीकि समाज मित्र परिवार शेगांव व् समस्त एकता ग्रुप शेगांव वतीने तीव्र शब्दात धिक्कार करत व उत्तरप्रदेशात सरकार राष्ट्रपती महोदयांनी तात्काळ बरखास्त करीत सर्व संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत या तरुणीवर अत्याचार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांना फासावर लटकवण्याची कायदेशीर प्रक्रिया फास्ट ट्रॅक वर चालवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी
समस्त नवयुवक वाल्मीकि समाज मित्र परिवार शेगांव व् समस्त एकता ग्रुप शेगांव
यांचे वतीने करण्यात येत आहे .
सूर्या मराठी न्यूज साठी अनिलसिंग चव्हाण सह आयुषी दुबे शेगाव, बुलढाणा.

भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी .

0

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर

वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद संचालित भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री बी. एम. हजारे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री विशाल सुरासे, संचालक विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद, श्री दत्तात्रय सुरासे, कैलास सोनवणे, दिलीप पगार, हरिभाऊ सुरासे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद रिंढे यांनी तर आभार श्री रोहिदास त्रिभुवन यांनी मानले. या प्रसंगी भरत निंबाळकर , सागर राजपूत , श्रीमती जयश्री बोर्डे आदींसह शिक्षकेत्तर कर्मचारी समाधान सुरासे , ज्ञानदेव तायडे, अमोल त्रिभुवन उपस्थित होते.

सारथी फाॕउंडेशन च्या वतिने रुग्णांना अर्थसाहाय्य

0

 

पिंपळगांव/- दि.२ आॕक्टोंबर

मोतीबिंदु शस्त्रक्रिये साठी आज खामगांव येथे सारथी फाँउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी मोतीबिंन्दु शस्त्रक्रिये करिता दोन रुग्णांना अर्थसाहाय्य केले.
सारथी सामाजिक संस्थेच्या वतिने दर रविवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर नांदुरा व पिंपळगांव काळे येथे आयोजित करण्यात येते असते त्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक उपचार पद्धती करण्यात येते तसेच गरिब व गरजु रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अर्थसाहाय्य देखील करण्यात येत असते आज खामगांव येथील श्री नेत्रालय येथे सलीमा बी शे.अन्सार कुरेशी आणी नारायण राघोजी सातव या दोन रुग्णांना मोतीबिंदु शस्त्रक्रिये साठी प्रत्येकी 2-2 हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले
यावेळी निलेश पाटिल,डॉ.निलेश जवळकर,अभिषेक हिस्सल,सुयोग मनसुटे आदिंची उपस्थिती होती.