Home Blog Page 603

“फि” माफ करतो म्हणत वकीलाचा महिलेवर बलात्कार

0

 

आयुषी दुबे शेगाव तालुका प्रतिनिधी

शेगांव : अकोल्यातील वकीलाने जमीनी संदर्भातील केसची फी माफ करतो म्हणत एका महिलेवर बलात्कार केला याप्रकरणी पिडीत महिलेने शेगांव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.

जमीनी संदर्भातील केसचे प्रकरण अकोला पिसे नगर येथील वकील प्रविण महादेव तायडे यांच्याकडे पिडीत महिलेने दिले होते. संबधित जमिनीचे कागदपत्रे गोळा करण्यासाठी वकीलाने पिडीत महिलेसोबत विविध ठिकाणी जात होते त्यामुळे त्यांचा परिचय वाढल्याने वकील हा पिडीत महिलेच्या घरी जात होता. वकील व पिडीत महिला हे २०१६ पासुन एकमेकांच्या संपर्कात होते. २०१६ ते २०२० यादरम्यान वकील प्रविण तायडे याने शेगांव येथील हॉटेल साई गजानन बुक केले व पिडीत महिलेला केस बद्दल चर्चा करू असे म्हणुन लॉजवर नेले व तुम्हाला फि माफ करतो असे म्हणुन जवळ येऊन पिडीत महिलेशी जबरदस्ती करू लागल्याने पिडीत महिला आरडाओरडा करु लागली असता जिवे मारण्याची धमकी दिली व शारीरिक संबंध केले. यावरुन पिडित महिलेने शेगांव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून आरोपीविरुद्ध अ.प.नं ३९६/२० कलम ३७६(२)(N) ५०६ भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश खंडारे हे करीत आहेत.

सलुन अँण्ड पार्लर असो.ची तालुका व शहर कार्यकारिणी घोषित

0

 

संग्रामपुर सकल नाभिक समाज संचालित सलुन अँण्ड पार्लर असोसिएशन ची संग्रामपुर कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.
या छोटेखानी कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष सुनिल अहिरकर,संतोष कळमकर,शरद पिंपळकार,दिपक इंगळे,निलेश अंबुसकर,शिवकुमार भातखडे गोविंद अंबुसकर यांची प्रमुख उपस्थिती होती
सलुन अँण्ड पार्लर असो.ची तालुका व शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली यामध्ये तालुकाध्यक्षपदी श्रीकृष्ण बन्नतकार, उपाध्यक्ष कल्पेश वाघ,सचिव रुपेश वाघ,कोषाध्यक्ष अमोल वाघ, संघटक संतोष वाघ,प्रसिध्दि प्रमुख ज्ञानदेव कोलतकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सर्वश्रि सदस्य म्हणून सारंगधर बन्नतकार,गुरुदास लोळे,गजानन बन्नतकार,विनोद बन्नतकार,गणेश बन्नतकार,आशिष शेळके,गोपाल वाघ,विठ्ठल बन्नतकार व वैभव वाघ आदिंचा समावेश आहे

सोलापूरात कत्तली पासून 9 गोवंशाना जिवदान

0

 

काल मध्यरात्री दि.30/9/2020 रोजी रात्री 1 वाजता गाडी पकडण्यात यश आले आहे गोरक्षकाना एका गुप्त माहिती नुसार एक पिकअप गाडी नंबर MH 13 AN 8378 हे पिकअप मोहोळ वरुन सोलापूरात कत्तली साठी गाई घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यानुसार पोलिसाचा मदतीने मार्केट यार्ड येथे सापळा रचण्यात आला असता मध्यरात्री 1वाजता 9 गोवंशाची गाडी पकडण्यात आली आहे सर्व गोवंश अहिंसा गोशाळा येथे उतरवण्यात आले आहे धर्म कार्य यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे जिल्हाअध्यक्ष सुधीर बहिरवाडे
शहराध्यक्ष विजय यादव
बजरंग दलाचे शहर प्रमुख सिद्राम चरकूपल्ली , प्रसाद झेंडगे, प्रशांत परदेशी, किरण पगुंडवाले,विनायक कोमटी व अखिल भारतीय कृषिगोसेवा संघ शहराध्यक्ष विजय यादव यांनी जोडभावी पोलिस ठाणे येथे फिर्याद नोंदवली असून कारवाई साठी जोडभावी पोलिस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले आणि अहिंसा गोशाळा यांचे मोलाचे सहकार्य लाभले

अत्याचार करणारांनो महिला शक्ती तुम्हाला माफ करणार नाही -ऊर्मिलाताईं ठाकरे

0

 

बांधवांनो बहीण तुमची असो की आमची असो.. अत्याचार करू नका
हम न होते तो तुम न होते,
न होता ये नजारा

दलित महिला मनीषा वाल्मिकी हिच्यावर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई करून त्वरित कठोर शासन करण्यात यावे..फ़ानी देण्यास यावी.
उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील एका खेडेगावात मनीषा वाल्मिकी नावाच्या दलित परिवारातील मुलीवर उच्च जातीतील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार करून.तिची हाडे तोडली, जीभ कापली,व गळा दाबून जीवे मारण्याचे कृत्य केले आहे.. आम्ही या कृत्याचा तीव्र निषेध करीत आहोत. तिने मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या जबानीत सर्व काही कथन केले.त्यानंतर पोलिसांनी त्वरीत आरोपींना अटक केली.दलित परिवारातील कुमारी मनीषा वाल्मिकी फक्त १९ वर्षे वयाची होती.ती आपल्या शेतात गुरांना चारा देण्यासाठी जात असतांना, तिच्या पाळतीवर असलेल्या उच्च जातीतील या गुंडांनी कायद्याची भीती न बाळगता हे दुष्कृत्य केलेले आहे.
सदर गुन्हा योग्य त्या कायद्याच्या कलमाखाली फास्ट ट्रॅक न्यायालयात दाखल करून , आरोपींना त्वरीत कठोर शिक्षा करण्यात यावी..व फाशी देण्यात यावी.

उत्तरप्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात झालेल्या सामुहिक बलात्कार घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे..

ऊर्मिलाताई ठाकरे
राष्ट्रीय सल्लागार,महिला आघाडी
राष्ट्रीय चर्मकार महासंघ

महसूल राज्य मंत्री मा ना अब्दुलजी सत्तार साहेब यांचा वैजापुर परिसरात अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी दौरा व “माझे कुटुंब.. माझी जबाबदारी..” या मोहीम अंतर्गत आढावा बैठक

0

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा ना उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ”माझे कुटुंब.. माझी जबाबदारी..” ही मोहीम संपुर्ण राज्यात कोरोनाची महामारी नियंत्रित करण्यासाठी आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रभावीपणे राबविण्यात येत असुन, महसुल व ग्रामविकास मंत्री मा ना अब्दुलजी सत्तार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यामोहिमे अंतर्गत आजपर्यंत वैजापुर शहरातील 50 टक्के कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले असून जवळपास मृत्यु दर हा राज्यात सर्वात कमी असुन रुग्ण बरे व्हायचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार_प्रा रमेश पा.बोरनारे सर यांनी केले.
.
.
तसेच वैजापुर-गंगापूर विधानसभा मतदार संघात अतिवृष्टी पावसामुळे भगुर, मांजरी या शिवारात थेट शेतकर्यांच्या शेतात जाऊन झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली.
.
तसेच या प्रसंगी खासदार इम्तियाज जलिल साहेब, आमदार उदयभाऊ राजपूत, मा. आ. भाऊसाहेब चिकटगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
.
यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण साहेब, जिल्हा कृषी अधिक्षक मोटे साहेब, उपविभागीय अधिकारी शिंदे साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी देशमुख साहेब, तहसीलदार धुळंदर साहेब, पोलिस निरीक्षक कुलकर्णी साहेब, गटविकास अधिकारी मोकाटे साहेब, उपनगराध्य साबेरभाई, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पा गलांडे, मा नगराध्यक्ष दिनेश भाऊ परदेशी, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, लक्ष्मण सांगळे, सभापती सौ. सिनाताई मनाजी पा मिसाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ तारपे साहेब, डॉ इंदुरकर, सभापती भगीनाथ मगर, तालुका प्रमुख सचिन वाणी, सुभाष कानडे, जि.प.सदस्य रामहरी बापू जाधव, अंकुश पा सुंब, अकिल शेठ, राजेंद्र मगर, प्रकाश शेळके, रविंद्र कसबे, इम्रान कुरैशी, अमीर अली अमोल बुट्टे व सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकारी, नागरीक उपस्थीत होते.

गावातील गाजर गवत निर्मुलनासाठी अमोल ठाकरे यांनी केली तननाशक फवारणी

0

 

संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या गांजर गवतावर पत्रकार अमोल ठाकरे यांनी 30 सप्टेंबर रोजी तननाशक फवारणी केली
गावातील मराठी प्राथमिक शाळेतील परीसरात मोठ्या प्रमाणात गांजर गवत वाढलेले होते तसेच गावातील मुख्य पाण्याच्या टाकीजवळ सुध्दा गांजर गवत वाढलेले होते हि बाब पत्रकार अमोल ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःव गावातील रोजगार सेवक वासुदेव गवई यांना सोबत घेऊन व गावातील सार्वजनिक ठिकाणी गांजर गवतावर तननाशकाची फवारणी केली

पाथर्डी येथील २६ वर्षीय तरुण गणेश काळे घरुन निघुन गेला

0

 

तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील रहिवासी २६ वर्षीय गणेश सुभाष काळे २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घरुन गेला असुन गणेश काळे या युवकाची चौकशी गावात मित्र मंडळी तसेच नातेवाईकडे केली परंतु सदर युवक शोध घेऊनही मिळून आला नाही याबाबत गणेश चा भाऊ शाम सुभाष काळे यांनी २७ सप्टेंबर रोजी तेल्हारा पोलीसांनी दिलेल्या लेखी माहिती वरुन हरविल्याची नोंद केली आहे नातेवाईकांकडे चौकशी केली असता तो आढळुन आला नाही गणेश यांच्या अंगात चौकडी फुलबाह्याचे पिवळे शर्ट काळा पॅन्ट पायात लालसर चप्पल असुन उंची ५ फुट ६ इंच केस काळे रंग गोरा सडपातळ बांधा लाबट चेहरा आहे. उपरोक्त वर्णन असलेला सदर युवक आढळल्यास तेल्हारा पोलीसांशी संपर्क साधावा असे आव्हाण करण्यात आले

पिंपळगाव काळे येथे गावातील रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम… गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात केला विरोध….

0

 

पिंपळगाव काळे ग्रामपंचायतीने मागील काळात जवळपास बारा ते पंधरा लाख रुपयाचा मुरूम कोणत्याही प्रकारची निविदा न काढता गावातील काही ठिकाणी आवश्यकता नसताना सुद्धा मुरूम टाकला ज्या ठिकाणी मुरूम टाकला त्याठिकाणी अगोदरच खडीकरणाचे रस्ते काही ठिकाणी झालेले होते वास्तविक पाहता खडीकरणाचे रस्त्यावर त्याच पैशांमध्ये सिमेंटचे रस्ते झाली असते व पाच ते सहा वर्ष तो रस्ता लोकांसाठी चांगला राहिला असता ज्या ठिकाणी मुरूम टाकला त्याठिकाणी खडीकरणाचे रस्ते का करण्यात आले नाही? असा प्रश्न गावकर्‍यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. गावांमधील सर्व रस्त्यांमध्ये फक्त मुरूम टाकायचा होता तर त्यांची एकत्र निविदा का काढण्यात आली नाही? मागील काळात ग्रामपंचायत ने अनेक कामे रस्ते नाल्या हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अनियमितता यांच्या तक्रारी ग्रामपंचायत मध्ये केल्यानंतर साधी चौकशी सुद्धा केल्या गेली नाही. त्यामुळे मागील पाच वर्षांमधील सर्व कामांची आपल्या स्तरावर चौकशी अधिकारी नेमणूक करून पिंपळगाव काळे गावातील लोकांना न्याय द्यावा अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे. ज्यांनी शासनाच्या नियमांची पायमल्ली करून दिशाभूल केली त्यांच्यावर कडक कारवाई करून शासनाचे पैसे वसूल करण्यात यावे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

संग्रामपूर शहरातील समस्या सोडविण्याबाबत संग्रामपूर मित्र परिवाराने मुंबई येथें मंत्रालयात जाऊन दिले निवेदन

0

 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन केली चर्चा

दि.29 सप्टेंबर 2020 रोजी मुबई येथे मंत्रालय येथे जाऊन संग्रामपूर शहराच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,समाजकल्याण मंत्री धनजयजी मुंडे साहेब तसेच नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना संग्रामपूर मित्र परिवाराच्या वतीने निवेदन देण्यात आले.

संग्रामपूर शहरात भीमनगर येथे स्थित असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक असून त्याचे बांधकाम जीर्ण झाले असल्याने त्याकरिता त्याचे सौंदर्यीकरण होणे गरजेच आहे तसेच डिसेंबर 2019 पासून घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी मिळाली असूनही वेळोवेळी निधी न मिळाल्याने घर बांधकाम अपूर्ण आहेत त्यांना नऊ महिने होऊनही तिसरा चेक न मिळाल्याने त्यांची राहण्याची बिकट परिस्थिती झाली आहे त्याकरिता शासन स्तरावर मागणी करूनही त्यांना लाभ मिळत नाहीये.घरकुल लाभार्थ्यांची अत्यंत दननीय अवस्था झाली असल्याने निधी मिळणे खूप आवश्यक आहे.तसेच संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याची देखील मागणी करण्यात आली.

गेली कित्येकदा निवेदने मोर्चे आणि आमरण उपोषणे करूनही स्थानिक नगरपंचायत कुंभकर्ण झोपेत असल्याने कोणतीही दखल घेत नाहीये त्यांचा त्रास गोरगरीब जनतेला होत आहे त्याकरिता निवेदनात दिलेल्या मागण्यांचा मा.मंत्री महोदयांनी सहानुभूती पूर्वक विचार करून मागण्या पूर्ण कराव्या अशी विनंती संग्रामपूर मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आली

कोविड सेंटर मध्ये सेवा देणारे ईश्वररुपी देवदूतांचे कोरोना ऋणनिर्देश मानपत्र देऊन महिला सरपंचाने केले ऋणव्यक्त

0

 

मेहकर,दि.३० :-

“जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आधाराचा तोच भार साहे’ म्हणतात ते काही खोटे नाही. असेच ईश्वराचे देवदूत म्हणून मेहकर येथील कोविड सेंटर मध्ये कोविड योद्धे काम करीत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
कोविड सेंटर मध्ये सेवा देणारे डॉक्टर, नर्स,सपाई कामगार,या देवदूतांना ‘कोरोना ऋणनिर्देश’ मानपत्र देऊन महिला सरपंचाने ऋणव्यक्त केले आहे.
पत्रकार संतोष अवसरमोल यांच्या संकल्यनेतुन
मेहकर मधील कोविड सेंटर मध्ये अविरत काम करणारे ,डॉक्टर, नर्स,सपाई कामगार, आपला जिव तळहातावर घेऊन,कोविड रुग्णांची सेवा करत आहेत.
स्वत:च्या जिवाची व परिवारांची पर्वा न करता, कोविड रुग्णांची सेवा करत, हे देवदूत कोविड रुग्णांचे प्राण वाचवत आहेत.म्हणुन या कोविड सेंटर मधील देवदूतांचे मनोबल, वाढवण्यासाठी,व ऋणव्यक्त करण्यासाठी, कृर्तत्वान महिला सरपंच सौ ताई गजानन जाधव व पत्रकार संतोष अवसरमोल यांनी कोविड सेंटरला जाऊन डॉक्टर, नर्स ,सपाई कामगार, यांना ‘कोरोना ऋणनिर्देश’ सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले व या देवदूतांचे ऋणव्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी युवानेते विजय जागृत होते तर प्रमुख उपस्थीतीत डि वाय एसपी कार्यालय मधील पि एस आय एम एस भालेराव तर पोलीस सुरेश येरमुळे,यावेळी कोविड सेंटरचे डॉ श्याम ठोंबरे ग्रामीण रुग्णालय अधिक्षक, डॉ कैलास राहटे,
डॉ विशाल सारडा ,डॉ अरविंद सरकटे ,डॉ महेश भागवत आवले ,डॉ कैलास रहाटे,डॉ वर्षा राठोड,डॉ रूपाली वाठोरे ,डॉ वर्षा व्ही जाधव,डॉ विशाल एस खत्री ,डॉ विनय अजगर ,डॉ माधुरी आर चांडक ,डॉ आकाश भिसाडे ,डॉ मनीषा संबपुरे,डॉ नम्रता कळासकर,डॉ नम्रता पाहुलकर, डॉ प्रियंका उगले, नर्स शीतल हिवाळे ,किरण संजय मुटठे, किरण बोरकर, पूजा मुंढे, पूजा रमेश चव्हाण ,चंदा कोल्हे ,अयोध्या गिरी , पदमिनी बी चव्हाण, सत्यनारायन एस खरात,राजेश पी खडसे, साहिल खान इजाज खान, शंकर नखाते,फिरोज नौरंगबादी,व ईतर कोविड सेंटरचे सपाई कामगार ,स्वयपांकी यांना महिला सरपंच सौ ताई गजानन जाधव व पत्रकार संतोष अवसरमोल यांनी कोरोना ऋणनिर्देश मानपत्र व रुमाल टोपी देऊन कुमकुम लावुन ओवाळण्यात आले.तर डॉक्टर मॅडम व नर्स मॅडम यांना ब्राऊज पिस , मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे,या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन जाधव,संदिप जाधव,संजाबराव धोंडगे,पंढरी धोंडगे,सुरज अवसरमोल, मंगेश वानखेडे, योगेश पवार, भारत अवसरमोल,यांनी प्रर्यत्न केले.