सिरसोली येथिल जिल्हा परिषद उर्दू शाळेत पंचायत समिती तेल्हारा चे गटनेता तथा सदस्य प्रा संजय हिवराळे यांच्या हस्ते सामाजिक अंतर ठेवुन शाळेतील मुलाना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले यावेळी तेल्हारा तालुक्यातील सर्व शाळेमध्ये शिकवनी वर्ग बंद असल्यामुळें शाळेच्या शिक्षकांनी मुलाच्या घरी जाऊन शिकवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे यावेळी सिरसोली येथिल वंचित बहुजन आघाडी चे जेष्ठ नेता इरफान अली मिरसाहेब , पंचायत समिती तेल्हारा गटनेता प्रा संजय हिवराळे. जि प उर्दू शाळेचे मुख्याध्यापक वजाहद अलीम सर, सादीक पटेल धम्मपाल दारोकार रमण वानखडे रंजित भारसाकडे विवेक इगळे रेहान अली शफीक अली विजय भारसाकडे, कैलाश भारसाकडे, चेतन गुहे, संजय आमबुसकार, विशाल भारसाकडे, विकी मोकळकार ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शकावत अली ,राजपाल भारसाकडे , उमेश हिवराळे राजेश भारसाकडे प्रज्वल तायडे आदी सह शिक्षक वृध व कर्मचारी उपस्थित होते
अडगाव बु ३३ के.व्ही . उपकेंद्र अडगाव बु . ला गेल्या ६ वर्षापासून कनिष्ठ अभियंता नाही . मध्यंतरी फक्त तीन म हिन्याकरीता कनिष्ठ अभियंता आला होता . त्यांनी पण तीन महिन्यात आपला गाशा गुंडाळला . या उपकेंद्राचा कारभार कधी तेल्हारा तर कधी हिवरखेड येथून प्रभारी म्हणून सुरू आहे . पावसाळ्याचे दिवस असताना सुद्धा कधी रात्रभर तर कधी दिवसाला ११ तास विद्युत पुरवठा खंडीत असतो . दिवसाला कित्येक वेळा विद्युत ये – जा करीत असते . विद्युत ब्रेक डाऊन तर कधी दुरुस्तीच्या नावावर बंद असतो . सकाळी १० वाजता गेलेली लाईन रात्री ९ वाजता येते . असा प्रत्येक आठवड्याचा नित्याचाच दिवस ठरला आहे . यामुळे विद्युत ग्राहकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे . हाच प्रकार नेहमीच सुरू राहिल्यास विद्युत ग्राहक उपकेंद्रा समोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत . ज्यांच्याकडे उपकेंद्राचा प्रभार आहे तेही पाहिजे तेवढे लक्ष द्यायला तयार नाहीत . उपकेंद्राचा कारभार पर्वत रांगेपर्यंत चालत आहे . वरिष्ठ अधिकाऱ्यांना गेल्या सहा वर्षापासून निवेदने दिली . आ.भारसाकळे यांनाही , कनिष्ठ अभियंता देण्यात यावा ह्याबाबत निवेदन दिले पण काहीही फरक पडला नाही . उलट ग्राहकांना आता मोठ्या प्रमाणात त्रास होण्यास सुरूवात झाली आहे . पावसाळ्याचे दिवस असताना सर्व कृषीपंप बंद आहेत . तरीही विद्युत पुरवठा सुरळीत मिळत नाही . गेल्या सहा वर्षात जेवढे सिंगलफेज जळले तेवढ्या पैशात येथे कनिष्ठ अभियंत्याचा पगार निघून वेळोवेळी ग्राहकांना नियमित विद्युत मिळाली असती व लाईनवर आकोडे टाकून घरात लाईन घेण्याचा प्रकार झाला नसता . आताही बऱ्याच मोहल्ल्यात विज चोरीचे प्रमाण वाढले आहे . यावर अजून तरी कोणी नियंत्रण मिळवले नाही . करीता आ.प्रकाश भारसाकडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करून येथे क.अभियंता व कर्मचारी देण्याची मागणी विद्युत ग्राहक करीत आहेत .
यवतमाळ: अती धाडस एका तरुणाच्या अंगावर आले आहे . ,पुलावरून पाणी वाहत असताना मोटारसायकलने पूल पार करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे , अर्ध्या रस्त्यात गेल्यावर पुराचा लोंढा आल्याने तो नदी पात्रात वाहून गेला आहे , नकुल जाधव असं या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे .
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील निंबर्डा येथे या भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी दुथडी भरून वाहत होती . अशातच या नदीचे पाणी पुलावरून मोठ्याप्रमाणावर वाहत होते .जीवाची पर्वा न करता नकुल याने जाते धाडस करीत नदीवरील पूल मोटारसायकलने ओलांडण्याचा प्रयत्न केला .पण पाण्याच्या एका मोठ्या लोंढ्याने त्याचे मोटारसायकलवरचे संतुलन बिघडले आणि तो नदी पात्रात वाहून गेला . त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो अद्याप सापडला नाही ,
जळगाव जामोद पंचायत समितीच्या 5% शेष फंडातून फंडातून 48 दिव्यांगांना प्रत्येकी एक हजार रुपयाचा भारतीय स्टेट बँकेचा चेक दिनांक 23 सप्टेंबरला जळगाव जामोद येथील पंचायत समिती कार्यालया मधून देण्यात आला. दिव्यांग बांधवांना या कोरोना महामारी मध्ये आर्थिक पाठबळ म्हणून प्रत्येकाला एक हजार रुपयाच चेक पंचायत समिती प्रशासनाकडून मदत स्वरूप दिव्यांग बांधवांना देण्यात आला यावेळी चेक स्वरूपात मदत देताना यावेळी पंचायत समिती सभापती रंजनाताई ठाकरे पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, सदस्य रामेश्वर राऊत,नंदा धंदर,सिमाताई कापसे,एकनाथ वनारे,गिताताई बंडल,विमल कळसकर,तसेच जिल्हा परिषद सदस्य श्रीराम अवचार, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे तसेच पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी प्रकल्पाच्या २२वर्षाच्या इतिहासात प्रकल्पात तिसऱ्यांदा १००टक्के जलसंचय होण्याकडे वाटचाल सुरू आहे.दि.२२रोजी दुपारपर्यंत प्रकल्पात ९०.०७%इतका पाणीसाठा झाला होता.सतत पाणीटंचाईचे झळा सोसणाऱ्या वैजापूर तालुक्यात यावर्षी दमदार पाऊस झाल्याने तालुक्यातील छोट्या-मोठ्या सर्वच प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.
१९९८ मध्ये पूर्ण झालेल्या नारंगी मध्यम प्रकल्पाची ऊंची ५४फूट असून प्रकल्प पूर्णत्व झाल्यानंतर वर्ष २००६मध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला होता.त्यावेळी धरणाचे पाचही दरवाजे उघडून प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग हा नारंगी नदीत करण्यात आला होता.यानंतर २००९ मधेही धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला होता या नंतर ह्या वर्षी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून प्रकल्प १००टक्के होणार आहे.येणाऱ्या एक-दोन दिवसात प्रकल्पातील पाणीसाठा ९५% पेक्षा अधिक झाल्यानंतर कोणत्याही क्षणी प्रकल्पाचे दरवाजे उघडुन नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
नदीकाठच्या गावांना यापूर्वीच प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
पॉझिटीव्ह रिपोर्ट’च्या ग्वाहीनंतर आंदोलन मागे; आंदोलनकर्त्यांची बिघडली तब्येत !
अन् राणा चंदन यांनी घेतले अंगावर पेट्रोल
मोताळा : गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन हेक्टरी २५ हजारांची मदत देण्याच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह 3 कार्यकर्त्यांनी एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतात स्वतःला गाडून घेण्याचे अनोखे आंदोलन परडा ता.मोताळा शिवारात केल्यांनतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. साडेतीन तास आंदोलनकर्ते जमिनीत राहल्याने त्यांची तब्येत खालावली असून तिघांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर तुपकर यांचीही ‘ऑक्सिजन लेवल’ कमी झाली होती. दरम्यान येत्या तीन दिवसांत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण करुन मदतीसाठी ‘पॉझिटीव्ह रिपोर्ट’ पाठविण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यानंतर हे आत्मक्लेश आंदोलन मागे घेण्यात आले.
आज बुधवार २३ सप्टेंबर रोजी रविकांत तुपकर हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह नुकसानीची पाहणी करत करत परडा येथील मक्याचे नुकसान झालेल्या नारायण भिवटे यांच्या शेतात पोहोचले. तेथे शेतकऱ्यांचे अनावर झालेले अश्रू पाहून त्यांना या परिस्थीतीत आता टोकाचा निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही, या विचाराने तेथेच त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतात गाडून घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्यासह शे.रफीक शे.करीम, सैय्यद वसीम व दत्ता पाटील यांनीही खड्डे करून गाढून घेतले.या आंदोलनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी व परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळी तिकडे धाव घेतली. आर.सी.पी. सह पोलिसांची मोठी कुमक आंदोलनस्थळी पोहोचली. चक्र फिरायला लागली. तहसीलदार ठाणेदार प्रशासनासह तिथे पोहोचले. तहसीलदार कुमरे व ठाणेदार गरुडे यांनी तुपकरांना बाहेर काढण्यासाठी खूप विनावण्या केल्या पंरतु तुपकर भूमिकेवर अडून राहिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. शेवटी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी तूपकरांशी सविस्तर चर्चा केली. परंतू आजच्या आज मदतीचे आश्वासन मिळाल्याशिवाय माघार न घेण्याची भूमिका तुपकरांनी घेतल्यामूळे आंदोलनस्थळी चांगलाच तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हे आंदोलन तुपकरांनी जबरदस्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली याचवेळी चिडलेले स्वाभिमानी युवा आघाडीचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंद्रशेखर चंदन यांनी अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एकच धावपळ उडाली. आता हे आंदोलन हाताबाहेर जाऊ नये म्हणून, भूषण अहिरे यांनी दिलेल्या प्रस्तावांना मान्यता दिली व 3 दिवसांत जिल्ह्यातील संपूर्ण नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संपवतो व नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाने कडे तातडीने प्रस्ताव पाठवतो असे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन तूर्त स्थगित करण्याची भूमिका तूपकर यांनी घेतली. जर यानंतरही गांभीर्याने मागण्यांवर विचार झाला नाही तर हे आंदोलन राज्यभर अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सततच्या अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी २१ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
त्यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात नमुद होते की, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस सुरु आहे. सध्या काही ठिकाणी पिक काढणी सुरु आहे तर काही ठिकाणी पिके उभी आहे. अशावेळी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. याआधी ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान होते त्यानंतर आता ऐन पिकांच्या काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिके उध्वस्त झाली आहेत. मागील वर्षी रब्बी व खरीप हंगामातही अतिवृष्टी व गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर कोरोना लॉकडाऊनमुळे तसेच बोगस बियाणे व खतांच्या तुटवड्यामूळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सोसावा लागला. आधीच चहुबाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे आता अवकाळी पावसाने कंबरडेच मोडले आहे. सोयाबीन, कपाशी, मका, ज्वारी यासह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्याची गरज आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढतील. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावा, अशी माणगी रविकांत तुपकर यांनी केलेली आहे. आंदोलना दरम्यान पवन देशमुख, महेंद्र जाधव, आकाश माळोदे, प्रदीप शेळके, चंदू गवई, गजानन गवळी, दत्ता शिंबरे, निलेश पुरभे, हिम्मत जाधव, जाबीर खान, सय्यद इमरान, नितीन पुरभे, भागवत धोरण, संतोष गवळी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
अन् राणा चंदन यांनी घेतले अंगावर पेट्रोल..
जमिनीत गाडून घेणाऱ्या या आत्मक्लेश आंदोलनाने वातावरण चांगलेच गरम केले होते. हे आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाने केला असता, त्याच ठिकाणी अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न स्वाभिमानी युवा विदर्भ कार्याध्यक्ष चंद्रशेखर चंदन यांनी करताच एकच धावपळ उडाली. या आंदोलना दरम्यान तब्बल साडेतीन तास जमिनीत गाडून घेतल्याने, आंदोलनस्थळी पोहोचलेल्या वैद्यकीय चमूने तपासणी केली असता रविकांत तूपकर यांची ‘ऑक्सिजन लेव्हल’ कमी होऊन त्यांचा रक्तदाबही वाढलेला होता. तर अन्य तीन कार्यकर्त्यांना प्रकृतीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मोताळा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केला संग्रामपूर मित्र परिवाराने नवीन उपक्रम
आज दि.23 सप्टेंबर 2020 रोजी संग्रामपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरात खेकळा मशिनद्वारे प्रमुख रस्ते सार्वजनिक ठिकाणे,धार्मिक स्थळे, बस स्टँड,गर्दीच्या ठिकाणावर प्रत्येक वार्डात मेन गल्लीत सॅनिटायजर फवारणी करण्यात आली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असे अनेक प्रकारचे उपक्रम संग्रामपूर मित्र परिवाराने घेतलेले आहेत.सामाजिक उपक्रमांत संग्रामपूर मित्र परिवार नेहमी अग्रेसर असतो.आजच्या उपक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि बोलताना या उपक्रमाची वाह वाह देखील केली.असेच समाजोपयोगी उपक्रम संग्रामपूर मित्र परिवार नेहमी घेत राहणार अशी ग्वाही संग्रामपूर मित्र परिवाराच्या सदस्यांनी दिली.
ना तोटा ना नफा
नागरिकांच्या मनाची समाधानी हाच आमचा नफा
गोंदिया जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक, विश्व पानसरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी गस्त वाढविण्याचे आदेश दिले. यामुळे 22 सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षक विश्वस्त पानसरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, चिचगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस अधिकारी इंस्पेक्टर अतुल तावडे यांच्या नेतृत्वात सी -60 पाठक देवरी कॅम्पने नक्षलविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून कोस्बी वन संकुलात सखोल शोध मोहीम सुरू केली, या कारवाईत नक्षलवाद्यांनी दैनंदिन वापरलेली सामग्री टाकून ती जप्त केली. ज्यामध्ये 5 ब्लॅक ट्रिपल तंबू इ.
Integer quis nisl at orci feugiat lobortis quis a odio. Etiam efficitur metus ultricies nisl lacinia malesuada. Mauris ante eros, convallis vitae eros ut, congue placerat ante. Etiam metus massa, volutpat sit amet sapien ut, condimentum ultricies dui. In mauris metus, semper eu consequat eget, porttitor sed dui. Nam eu hendrerit nibh. Mauris vulputate lectus at nisi elementum, sed fermentum erat malesuada. Integer a lectus vel felis semper sollicitudin eu in leo. Phasellus eget nisi nec tortor placerat ornare vitae in odio. Maecenas ultrices efficitur sagittis.
Maecenas elit nisi, placerat a leo nec, ultricies tincidunt ante. Nullam et ante elit. Aenean ullamcorper egestas consectetur. Donec euismod quam quis sollicitudin accumsan. Curabitur feugiat orci enim, sagittis mattis nisi malesuada sed. Nullam ac lorem porta, semper urna vel, tempus sapien. Vestibulum iaculis id eros id interdum. Pellentesque laoreet varius lectus sit amet tempor. Curabitur suscipit massa eu nibh tincidunt, et vehicula magna mollis. Integer in augue euismod, feugiat libero at, fermentum leo. Donec pulvinar arcu placerat pretium condimentum.
Vivamus nisl odio, semper at erat non, aliquet sollicitudin nisi. Curabitur nunc ligula, semper vel erat nec, ultrices ultricies dolor. Aliquam eleifend arcu in dui tincidunt pharetra. Sed nec mattis urna. Vestibulum sed leo tellus. Quisque finibus feugiat leo, eu lobortis arcu sodales aliquam. Suspendisse viverra accumsan lectus ut sodales. Nulla ac sodales nisl. Nunc malesuada quis nunc nec pretium. Mauris euismod tristique lorem vel rutrum. Sed vitae tortor et dolor tincidunt egestas.
A heading
Vestibulum luctus, dolor vel facilisis egestas, augue enim commodo lorem, vitae auctor nulla nulla ut tortor. Sed sapien massa, efficitur vel arcu at, convallis euismod sapien. Ut at augue vel nisi consequat porttitor. Aliquam vel vestibulum diam. Vestibulum ligula elit, volutpat in eleifend nec, viverra at nisi. Quisque auctor euismod tincidunt. Integer ornare rutrum sodales. Praesent accumsan lobortis enim, ut facilisis risus pulvinar sit amet. Suspendisse eget gravida nisl. Nullam ut risus ultrices, sodales metus sit amet, vestibulum metus. Aenean porta dolor ut ante hendrerit, eget commodo lectus lobortis. Suspendisse est dui, consectetur in laoreet ut, rutrum sit amet odio.
Sed malesuada sodales dui. Nullam ultricies ac nibh sit amet aliquam. Nulla efficitur arcu felis, vitae ullamcorper sem lobortis in. Sed consequat orci in eros varius imperdiet. Vestibulum ante ipsum primis in faucibus orci luctus et ultrices posuere cubilia curae; Nam dictum feugiat rutrum. Mauris eu tempor felis. Praesent quis lectus a urna scelerisque pellentesque. Ut pellentesque ligula a lorem posuere volutpat. Praesent vitae enim elementum, malesuada metus in, pharetra turpis. Pellentesque ut mauris ut purus congue malesuada vitae ut quam. In pretium, ipsum non interdum sollicitudin, elit nunc porta massa, vitae venenatis metus nisl ut ligula. Sed aliquet nibh arcu, at convallis nisl fermentum id.
Another heading
Fusce tempor mattis rutrum. Suspendisse dignissim libero ex, vitae rhoncus enim bibendum at. Sed pulvinar, neque eget tincidunt scelerisque, libero nulla cursus est, sed dictum est magna sit amet urna. Sed blandit urna velit, non vestibulum lectus luctus id. Sed ut porta sapien, eu tincidunt massa. In semper, sem ac vehicula laoreet, ipsum tellus tincidunt arcu, nec mollis enim turpis nec sapien. Class aptent taciti sociosqu ad litora torquent per conubia nostra, per inceptos himenaeos. Phasellus vitae faucibus nibh, vitae aliquam risus. Praesent suscipit tincidunt dui eu rutrum. Curabitur dolor ligula, commodo vitae rutrum a, pharetra ac diam. Aenean orci massa, consequat sollicitudin accumsan eu, maximus dignissim massa. Pellentesque semper vulputate risus non maximus. Nullam eget velit in leo rutrum vehicula. Pellentesque sit amet pharetra urna, vel consectetur elit. Curabitur lorem magna, scelerisque a purus nec, elementum scelerisque velit.
गोंदिया. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अर्जुनी मोरगाव उपविभागातील नवेगाव धरणातील तंत्रज्ञ सुनील गोमण रहांगडाले 35 यांना 22 सप्टेंबर रोजी गोंदिया अँटी करप्शन ब्युरोने 6 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, नवेगाव धरणातील रहिवासी असलेल्या आरओ प्लांटच्या मीटरच्या तपासणी दरम्यान कंप्रेसरचे कनेक्शन थेट असल्यास 1 लाखांचा दंड होऊ शकतो, आरोपीने फिर्यादींकडे 7 हजारांची लाच मागितली, परंतु फिर्यादीने गोंदिया एसीबीकडे तक्रार केली त्यानंतर एसीबीने सापळा रचला आणि आरोपीला रंगेहाथ पकडले. राजेंद्र बिसेन, आणि एसीबीच्या टीमने केले.