Home Blog Page 610

अतिक्रमण हटविण्यासाठी परस्परविरोधी उपोषण दोन गट एकमेकांसमोर एकाच जागी उपोषणास बसले या प्रकरणी तोडगा काढण्यास प्रशासन अपयशी येथील घटना…

0

 

गजानन सोनटक्के
तालुका प्रतिनिधी
जळगाव जा

दिनांक 22 सप्टेंबर/ जळगाव जामोद

तालुक्यातील जय भवानी चौकातील टपऱ्याचे अतिक्रमण उचलण्यासाठी वार्ड क्रमांक 2 व 3 मधील मोहन सिंह राजपूत श्रीमती गीता बाई बैस किशोर वंडाळे व सविता वंडाळे यांनी त्यांच्या घरासमोरील तीन टपऱ्या उचलण्यासाठी प्रथम तक्रार अर्ज दिनांक 17 ऑगस्ट व 15 सप्टेंबर ला सुनगाव व ग्रामपंचायत प्रशासनास दिला होता या अर्जावर गटविकास अधिकारी यांनी अधिक्रमण उचलण्यात यावे हा शेरा दिलेला आहे तरी आतापर्यंत अतिक्रमणावर कुठलीही कारवाई न केल्यामुळे दिनांक 22 सप्टेंबरला सकाळी अकरा वाजेपासून मोहन सिंह व इतर चार जण ग्रामपंचायत समोर उपोषणास बसले यावेळी अर्जात नमूद अतिक्रमणधारकांना सुद्धा दिनांक 18 विरोधी तक्रार देत स्थानिक लोकांचे अतिक्रमण हटविण्यात यावे ही भूमिका होत उपोषणाची भूमिका घेतली दिनांक 22 ला ग्रामपंचायत समोर एकाच दिवशी एकाच वेळी व एकाच जागेवर दोन परस्परविरोधी मागण्यांचे उपोषण सुरू झाल्याने गावात एक प्रकारे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याप्रकरणी सर्वप्रथम प्रशासक राजपूत यांनी उपोषण मंडपास भेट देत दोन्ही गटांशी चर्चा करून उपोषण सोडण्याचा अपयशी प्रयत्न केला त्यानंतर गटविकास अधिकारी व पोलीस प्रशासन दाखल होऊन त्यांनी ह्या प्रकरणी उपोषण सोडविण्याचे प्रयत्न केले परंतु त्यांनाही अपयश आलेले पाहून पुढील तणावग्रस्त स्थिती रोखण्यासाठी स्वतः जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव आपल्या ताफ्यासह सुनगाव ग्रामपंचायत मध्ये येऊन दोन्ही गटासह बंदद्वार चर्चा करून प्रकरण समंजस पणे मिटवण्याचे प्रयत्न केले ही चर्चाही विफल ठरली, परंतु यावेळी चर्चेनंतर टपरीधारक यांनी उपोषण मागे घेतले रात्री उशिरापर्यंत गावात पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन हे उपोषण मंडपाजवळ कोरोना व जमाबंदी च्या पार्श्‍वभूमीवर गर्दी नियंत्रणाचा प्रयत्नात होते,
दिनांक 22 ला रात्री उशिरापर्यंत श्री मोहन सिंह व इतर चार यांचे उपोषण सुरू होते दिवसभर पावसात हे उपोषण सुरू होते एकंदरीत प्रशासन व पोलिस हे प्रकरणात तोडगा काढण्यात अपयशी ठरले याप्रकरणी काही राजकारणी मंडळी पडद्याआडून सूत्रे हलवत आपली राजकीय पोळी भाजण्याच्या तयारीत असल्याची गावात खमंग चर्चा होती दिवसभर याप्रकरणी उद्या प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्व सुनगाव वासियांची लक्ष लागले आहे.

मातंगपुरी परिसरातील नागरिक चार वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत.

0

 

तहसील कार्यालय शेगाव येथे मातंगपुरी परिसरातील खाजगी मालमत्ता धारक 51 कुटुंबाना नोटीस देऊन हजर राहण्याचे प्रशासनाने कळविले होते. त्या निमित्याने सर्व खाजगी मालमत्ता धारक उपस्तित होते. मातंगपरी पुनर्वसन होऊन चार वर्ष उलटून गेले तरी सुद्धा.अद्याप पर्यंत मातंगपुरी परिसरात राहणाऱ्या खाजगी व प्रशासना च्या नजरेत असलेले अतिक्रमण धारक कुटूंबाना देऊ केलेला जागेचा मोबदला मिळाला नसून.मातंगपुरी रहिवाशांना पुनर्वसन या गोळ नावाखाली अतिक्रमण धारक म्हणून काढून दिले भूसंपादन केले. आता मात्र मातंगपुरी परिसरातील कुटूंबांना खाजगी मालमत्ता धारक म्हणून नोटीस देण्यात आली हा नेमका काय प्रकार आहे. या बद्दल मातंगपुरीतील नागरिकांना च्या वतीने मी प्रश्न उपस्तीत केला असता. ते पुरते निशब्ध झाले. त्यांनी बोलावलेल्या बैठकीत s.d.o साहेब यांची उपस्तिती अनिवार्य होती. s.d.o त्यांचा प्रभारी चार्ज माझ्या केळे आहे. असे त्यांनी सांगितले. तेव्हा जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी बोलणे करून द्यावे.
तेव्हा तुम्ही मला लेखी अर्ज द्या मी जिल्हाअधिकारी यांना तत्काळ कळवितो. व या नंतरच्या बैठकीत s.d.o साहेब राहतील असे संकेत दिल्या मुळे, बरेच काही करण्याचे राहून गेले. मातंगपुरी चे पुनर्वस करून ज्या म्हाडा कॉलनी मध्ये पुनर्वसीत केले त्या म्हाडा कॉलनी मधल्या सदनिकांचे पाळझळ चालू आहे.भविष्यात तिथ मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास शासनाला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही. असा असा इशीरा स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कळून प्रभारी s.d.o.याना देण्यात आला.

प्रहार संघटनेचे रिकाम्या खुर्चीला हार टाकून आंदोलन

0

 

पातूर पंचायत समिती चा कारभार वाऱ्यावर

नासिर शहा
पातुर तालुका प्रतिनिधी

पातूर /: तालुक्यातील पिंपळखुटा येथील डी.पी. ई. एस.विद्यालयाच्या एका खोलीतून मुख्याध्यापक चव्हाण आणि वाहनचालक हे दोघे एका मालवाहू वाहनाचा चालक शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळेला मिळालेल्या तांदळाचे पाच कट्टे वाहनामध्ये भरत असताना ग्रामस्थांनी मुख्याध्यापक चव्हाण, आणि वाहनचालकास दोघांना पकडले परंतु दोघेही शाळेच्या आवारातून पसार झाले या प्रकरणात चान्नी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असता, पोलीस कारवाई करीता पंचायत समिती च्या अधिकारींकडून लेखी तक्रार आवश्यक असल्याचे कळविण्यात आल्याने प्रहार संघटनेचे अरविंद पाटील यांनी पातूर पंचायत समितीचे बीडीओ. समाधान वाघ व गटशिक्षणाधिकारी अनिल अकाळ यांना तक्रार करण्याची मागणी केली.
सदर घटनेला पाच दिवस उलटूनही अजूनपर्यंत अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करण्याची तसदी घेतली नसल्याने आज प्रहार संघटनेचे पदाधिकारी पातूर पंचायत समितीला आले असता अधिकारी हजर नसल्याने पंचायत समितीचे बीडीओ समाधान वाघ व गटशिक्षणाधिकारी अनिल अकाळ आपल्या कार्यालयात हजर नसल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्च्यांना हार टाकून आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रहार संघटनेचे अरविंद पाटील,दत्ता सुडोकार, जिवन उपर्वट,मंगेश इंगळे,नितीन इंगळे,गणेश रणपिसे ,दत्ता वाघ,अंकुश बुंधे,राहुल देशमुख,रविंद्र निंबोकार आदी प्रहरसेवक उपस्थित होते.

वादळी पावसामुळे पीक नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ मदत जाहीर करा- प्रा. मोहन रौंदळे यांची मागणी

0

 

संग्रामपूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस सुरू आहे. आणि या पावसाचे प्रमाण सतत वाढत असल्यामुळे आणि अतिवृष्टी सदृश्य वातावरण असल्यामुळे मका, सोयाबीन,कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच दुबार तिबार पेरणी करून शेतकरी दुष्काळात सापडला आहे त्यात सततच्या पावसामुळे मुंग, उळीद पिकाचे नुकसान झाले असून आता मका, सोयाबीन चे पण पिकाचे नुकसान झाले आहे. वरवट बकाल येथील शेतकरी मोहन काशिराम रौंदळे गट नंबर 137 त्यांच्या शेतात 1 हेक्टर 20 आर मका लागवड केलेली आहे. 10 ते 15 दिवसात पिक तयार होणार अशावेळी वेळोवेळी वादळी पाऊस येत असल्यामुळे मक्का पिक पूर्ण जमीनदोस्त झाले असून पूर्ण पिक मातीत गेलेले आहे.त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळण्याकरिता तहसील कार्यालय संग्रामपूर व कृषी कार्यालय संग्रामपूर येथे दिनांक 16 सप्टेंबरला लेखी स्वरूपात तक्रार अर्ज केलेला आहे. तक्रार अर्ज मध्ये असे नमूद केले आहे. की रौदळे यांच्या शेताचा तात्काळ पंचनामा करून तसा अहवाल शासनास सादर करावा व झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी. तात्काळ परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा.
शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरकारकडून मदत व पीक विमा जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

12 लाख 54 हजार बनावट दारू आणि साहित्य जप्त केले

0

 

पोलिस अधीक्षक विश्वास पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस कारवाई

गोंदिया. जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक विश्वास पानसरे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेणे सुरू केले. त्याअंतर्गत गोंदिया शहरातील पेक्ट्नोली संकुलात अवैध बनावट पातळ पदार्थ तयार केले जात आहेत आणि गोदामात छापा टाकल्यानंतर बनावट दारूसह विविध साहित्य ज्यांची एकूण किंमत 12 लाख 54 हजार रुपये आहे. ज्यात प्रत्येकी १ se8 बंदीयुक्त बॉक्स, १8० एमएल बाटली वजनाची व्हिस्की दारू, आणि दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकलचे can 35 कॅन, एक चारचाकी, एक दुचाकी, रिकाम्या बाटल्या, झाकण आणि बनावट इंग्रजी दारूचे वेगवेगळे ब्रँड याप्रकरणी शहर पोलिसांनी श्याम उर्फ ​​पीटी रमेश आंटी 34, श्रीनगर रहिवासी महेंद्रसिंग उर्फ ​​मोनू उपेंद्रसिंग ठाकूर 29, प्रसन्ना उर्फ ​​तंटू संजय कोथुलकर या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करून दोन आरोपींना ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलिस उपअधीक्षक गोंदिया जगदीश पांडे, शहर पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत, पोलिस उपनिरीक्षक काशिद, पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, पोलिस नायक जागेश्वर उईके, ओमेश्वर मेश्राम, सुबोध यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. बिसेन, महेश मेहेर, तुळशीराम लुटे, योगेश बिसेन, छगन विठ्ठले, विनोद सहारे, रॉबिनसन साठे, नितेश गवई.

बकरीला वाचवताना पाण्यात तिघे जनांनी घेतली उड़ी एकाचा मृत्युदेह सापडला

0

 

मुख्य संपादक
अनिलसिंग चव्हाण

सतत पाऊस सुरु असल्याने नदी नाले ला मोठ्या प्रामानात पुर आलेला आहे नदीकाठाने चरत असलेली बकरी पुराच्या पाण्यात पडल्याने तिला वाचवण्यासाठी प्रवाहात उडी घेतलेले तिघे जण वाहून गेले आहेत. ही घटना खामगाव तालुक्यातील माक्ताकोक्ता गावी सोमवारी (दि. २१) घडली. यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे.

जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. माक्ताकोक्ता येथील गजानन लहानू रणशिंगे (वय ३८), राहूल गजानन रणशिंगे (१६), दिलीप नामदेव कळसकार (४२) हे तिघे बक-या चारण्यासाठी आज बोर्डी नदीपरिसरात गेले होते. दरम्यान त्यांची एक बकरी नदीकाठावरून घसरून प्रवाहात वाहत चालल्याचे पाहून तीला वाचवण्यासाठी राहूल रणशिंगे हा पाण्यात ऊतरला.
परंतु वेगवान प्रवाहात तोही वाहून चालल्याचे पाहून वडील गजानन रणशिंगे व दिलीप कळसकार या दोघांनी नदीत उडी घेतली. परंतु त्यांची धाव अयशस्वी ठरली. तिघेही पुरात वाहून गेल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांना दिलीपचा मृतदेह सापडला असून गजानन व राहूल या पितापुत्रांना शोधण्याचे काम सुरू आहे.

सेनगाव शहरातील पशुवैद्यकीय उपकेंद्रात घाणीचे साम्राज्य.

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

सेनगाव: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरात असलेल्या पशुवैद्यकीय उपकेंद्रात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून पशुपालक त्रास होत आहे. सध्या सुरू असलेला लंपी स्किन हा जनावरांचा रोग खूप कसरत असल्यामुळे या केंद्रात पशुपालक व जनावरे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या केंद्रात पाणी साचल्यामुळे जनावरांना व पशुपालकांना सुरक्षित उभे राहता येत नाही व तसेच त्या पाण्यातून आतमध्ये जावे लागत आहे‌. या केंद्रात बरेचसे गावे येत असल्यामुळे येथे लंपी स्किन या आजाराने गर्दी वाढत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष असून लवकरात लवकर हा प्रश्न दूर करावा अशी मागणी बऱ्याचशा पशुपालकांकडून केली जात आहे.

खामगाव भालेगाव तात्काळ पंचनामे करा निलेश देशमुख थेट शेतकरयाच्या बांधाव र पोहचले व नुकसान ग्रस्त शेतकरयाची पिकांची पाहणी केली …… .पावसाचा तडाखा…पिके उध्वस्त..

0

 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चालू असलेल्या अतिपावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खामगाव तालुक्यातील भालेगाव तेथे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावला आहे. सोयाबीन,कपाशी,मका,ज्वारी व अन्यपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी तहसिलदार साहेबांना विनंती आहे तात्काळ पंचनामे करुन शेतकरी यांना आर्थिक मदत देण्यात यावी आज दोन दिवस उलटुन गेले असुन कुठलाही अधिकारी पंचनामा करण्यासाठी आलेला नसुन लवकरच पंचनामे करुन मदत जाहीर करावे अन्यथा शेतकर्यांना सोबत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना नाईलाजाने आंदोलन करावे लागेल असा ईशारा स्वाभिमानी चे विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष निलेश देशमुख यांनी दिला यासंदर्भात आज भेट घेवून शेतकऱ्यांना हे.25 हजार रुपये नुकसान भरपाई मागणी केली.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित, होते निलेश गवळी,विजय भाऊ चोपडे, गोपाल सावरकर, विजय कोल्हे, संदिप सुरडकर,अजय बुजाडे व समस्त शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

पुरात अडकलेल्या तरूणास वाचवतांना, विजय सुरूशे यांचा दुर्दैवी मृत्यु

0

 

अन तो ठरला देवदूत..

मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील कोराडी धरणावर गावातील काही युवक सकाळी सहा वाजता पोहण्यासाठी गेले असता सांडव्याच्या पाण्यात अडकले. यामध्ये गोपाळ दत्ता जाधव वय 18, विजयानंद किसन कुडके वय 22, शुभम दिनकर गवई वय 22, सलमान जाकिर पठाण वय 22, संतोष सुखदेव माने वय 18, हे तरुण सांडव्यात पोहण्यासाठी गेले,असता अचानक धरणातील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे हे तरुण पाण्यामध्ये वाहून गेले.
यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे अभियंता राजगुरू व कर्मचाऱ्यांनी तात्काळ गावात ही बातमी दिली. गावात माहिती मिळताच गावातील नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, त्यातील सलमान पठान, शुभम गवई ,विजयानंद कुडके यांना सुखरूप बाहेर काढल्या गेले.तर संतोष हा एका झाडाच्या आधराने पाण्यात अडकून होता. मेहकर येथील पोलिस प्रशासनाचे कर्मचारी, व गावातील विजय सुरुशे, आलम पठाण ,अकील पठाण,ऋषिकेश चाळगे,मोहन मगर हे संतोष माने या तरुणाला वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उत्तरले. परंतु त्यामध्ये दुर्दैवाने विजय सुरूशे कुस्ती पैलवान या तरूणाचा पाण्यामध्ये अडकल्यामुळे डोक्याला जबर मार लागून दुर्दैवी मृत्यू झाला. दोन वाजता जिल्हा आपत्ती शोध बचाव पथक, पोलीस प्रशासन, गावातील आलम पठाण ,अखिल पठाण व गावातील तरुणांच्या मदतीने संतोष माने तरूणाला बाहेर काढण्यात यश आले, या मोहिमेमध्ये संभाजी पवार (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ), कृष्णा जाधव ,राजेंद्र झाडगे, प्रवीण साखरे ,वाहनचालक पी.एस खरे (जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा ) पोलीस पथकातील तारासिंग पवार ,हेड -कॉन्स्टेबल दिपक वायाळ ,व त्यांचे सहकारी यांच्यासह मेहकर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आत्माराम प्रधान , उपविभागीय अधिकारी गणेश राठोड ,तहसीलदार संजय गरकळ,पोलीस प्रशासनाचे कर्मचारी, आरोग्य विभाग ,तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मगर,शिवसेनेचे अशोक गाभणे, सचिन मगर, रवींद्र सुरूशे ,कैलास राऊत सह असंख्य तरुण गावकरी हजर होते. प्रशासनाचे कर्मचारी आरोग्य विभाग सह मदत करून चारही मुलांना सुरक्षित बाहेर काढले. परंतु दुर्दैवाने विजय सुरूशे (४०) यांच्या मृत्यूने देऊळगाव माळी गावात सर्वत्र शोककळा पसरली असून त्यांच्या पश्‍चात दोन मुले पत्नी, आई ,भाऊ व वडील असा खूप मोठा आप्तपरिवार आहे. गावकऱ्यांनी “गड आला पण सिंह गेला” अशी भावना व्यक्त करुन जिल्हा आपत्ती उशीरा पोहोचल्यामुळे त्यांच्यावर रोष व्यक्त केला जात आहे. सकाळी सहा वाजता फोन करून सुद्धा आपत्ती व्यवस्थापन विभाग वेळेवर न पोहोचता तब्बल पाच तास उशिरा आले.जर आपत्ती व्यवस्थापन वेळेवर पोहोचले असते तर ही घटना घडली नसती. या दुर्दैवी मृत्यू ला आपत्ती व्यवस्थापन जबाबदार आहे असा रोष गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

 

आज बोरदहेगाव मध्यम प्रकल्पात अनेक वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात जलसाठा (पाणीसाठा) झाल्याने

0

 

 

वैजापूर तालुका प्रतिनिधी-ऋषी जुंधारे

 

आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सरयांनी स्व_रामकृष्ण_बाबा पाटील यांच्या प्रतिमेस श्रद्धांजली वाहून जलपुजन केले.

बोरदहेगाव मध्यम प्रकल्पाला आपण सर्वांनी स्व_रामकृष्ण_बाबा_पाटील_मध्यम_प्रकल्प नाव देऊन या नावाने ओळखले जावे. तसेच रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न चालू असून लवकरच ही योजना सक्रीय होईल असे आमदार साहेबांनी सांगितले

या जलपूजना प्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, मा. जि प सदस्य मनाजी पा मिसाळ,अभिषेक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी तहसीलदार निखील धुळंदर साहेब, उप कार्यकारी अभियंता लाड साहेब, कनिष्ठ अभियंता वनगुजरे साहेब,स्थापत्य अभियंता के.व्हि जुंधारे, प स सदस्य राजेंद्र वाघ, संभाजी डुकरे, प्रकाश शिंदे, प्रविण सोनवणे, सुभाष तांबे, किशोर हुमे, राजुभाऊ राजपूत, दादासाहेब पगार, मनोज लालसरे, ज्ञानेश्वर कवड़े, सुरेश पानसरे, मदन नाना ढंगारे, कैलास आवारे, भरत जगताप सर्व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थीत होते.