Home Blog Page 618

शिवसेनाची आता झाली सोनिया सेना- कंगना

0

 

मुंबई शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. तसंच आताही दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. दरम्यान, कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल करत शिवसेनेची आता सोनिया सेना झाल्याचं म्हटलं आहे. बुधवारी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही कंगनानं पालिकेवर आणि सरकारवर निशाणा साधला होता.

“ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा पाया रचला, तिच विचारधारा विकून शिवसेना सत्तेसाठी सोनिया सेना बनली आहे.
ज्या गुंडांनी माझ्या नकळत माझं घर तोडलं, त्यांना स्थानिक प्रशासकीय संस्था म्हणू नका. संविधानाचा इतका अपमान करू नका,” असं कंगना म्हणाली. तिनं ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख

“उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं.फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडून तुम्ही बदला घेतला आहे. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. हे वेळेचं चक्र आहे, नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं हे मला आज कळालं. आज मी या देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्या नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार. आपल्या देशवासियांना जागरुक करणार. ही क्रूरता आणि दहशतवाद माझ्यासोबत झाला हे चांगलं आहे, कारण याचा काही अर्थ आहे. जय हिंद.जय महाराष्ट्र,” असं कंगना बुधवारी मुंबई आल्यानंतर म्हणाली होती.

पालिकेकडून कारवाई

कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. दरम्यान पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली होती. न्यायालयाने पालिकेकडे उत्तरही मागितलं होतं.

0

गोंदिया. विद्यमान जिल्हा दंडाधिकारी डॉ. कदंबरी बलकवडे यांनी दोन वर्षे पूर्ण मुदत संपल्यानंतर प्रशासकीय प्रक्रियेअंतर्गत, September सप्टेंबर २० रोजी, त्यांची जागा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी म्हणून घेण्यात आले. वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना नियुक्त करण्यात आले आहे. हे लक्षात घ्यावे की जिल्हा दंडाधिकारी श्रीमती बालकवडे सध्या कोरोनाद्वारे अडथळा आणत आहेत. कोरोनामधून बरे झाल्यानंतरच त्यांची बदली प्रक्रिया इतरत्र शक्य आहे.
गोंदियाचे नवीन जिल्हा दंडाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणारा आयएएस दीपक कुमार मीणा मूळचा राजस्थानच्या जयपूरचा रहिवासी आहे. श्री मीणा हे २०१ B बीचचे आयएएस अधिकारी आहेत. २०१ Maharashtra मध्ये ते महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे (महानंदा) प्रशासकीय संचालक आणि माजी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत आहेत, अनेक महत्त्वाच्या पदांव्यतिरिक्त ते २०१ since पासून वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
श्री मीणा लवकरच गोंदिया जिल्हा दंडाधिकारी म्हणून वाशिम जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद दुसर्‍या अधिकाऱ्याकडे  सोपवल्या

धानोरा येथे आढळला अनोळखी मृतदेह

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा शिवारात आढळला अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी धानोरा येथील रहिवासी रघुनाथ सुरपातणे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिली की की माझ्या शेतात मका पिकात कुजलेला मृतदेह आढळला आहे सदर व्यक्ती हा माझा परिचयाचा नाही त्यावरून पोलीस स्टेशन नी चौकशी केली असता सदर व्यक्तीच्या शेतात मका पिकात कुजलेला मृतदेह आढळला मृत व्यक्ती अनेक दिवसापासून मृत झालेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पुढील तपास पोलीस पीएसआय सागर भारस्कार व पोलिस हेडकॉन्स्टेबल गव्हाळे करीत आहेत

शैक्षणिक कामाकारीता आवश्यक असलेल्या शालेय कागदपत्रे देण्यास पैशाची मागणी करीत कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

0

 

करणाऱ्या इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था बुलडाणा द्वारा संचालित कृषी तंत्र निकेतन विद्यालय मलकापूर या संस्थेविरूध्द कारवाई करून त्या विद्यार्थीनीस पुढील शिक्षणाकरीता आवश्यक असलेली कागदपत्रे तात्काळ देण्यास विद्यालयास निर्देश देण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी आज ९ सप्टेंबर रोजी शिक्षणाधिकारी बुलडाणा यांच्याकडे तहसीलदार मलकापूर यांचे मार्पâत एका निवेदनाद्वारे केली आहे. शालेय कामाकरीता शालेय
निवेदनात नमूद आहे की, इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था बुलडाणा द्वारा संचालित कृषी तंत्र निकेतन विद्यालय मलकापूर या संस्थेमध्ये कु.पल्लवी शिवसिंग हळदे रा.भालेगाव ही विद्यार्थीनी शिक्षण घेत होती. तिचा ३ वर्षाचा असलेला कोर्स पुर्ण झाला असून ती पास झाली आहे. त्यामुळे तिला पुढील शैक्षणिक कामाकारीता व पुढील शिक्षणाकरीता तिला शालेय कागदपत्रांची आवश्यकता आहे. मात्र विद्यालयातून तिला शालेय कागदपत्रे देण्यास शालेय फी ६५ हजार रूपयांची मागणी करण्यात येत असून जोपर्यंत पैसे भरत नाही, तोपर्यंत कागदपत्रे देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. सदर विद्यार्थीनीने शैक्षणिक स्क्वॉलरशिप करीता अर्ज केला होता, मात्र तिला स्क्वॉलरशिप एकाही वर्षाची मिळाली नाही. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत हलाकीची असून कुटुंबाचा उदरनिर्वाह हा मोलमजुरीवर चालतो. शिवूâन कुटुंबासाठी काहीतरी करण्याची इच्छा तिची असलीतरी विद्यालयाच्या अशा प्रकारे अडवणुकीमुळे तिच्यावर पुढील शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
तेव्हा तिच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा याकरीता तिला शालेय कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करणाNया शैक्षणिक संस्थे विरूध्द कडक कारवाई करण्यात येवून तिला तात्काळ कागदपत्रे देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी केली आहे.
निवेदनावर अजय टप यांच्या सह संतोष जाधव, निलेश चोपडे, अमोल बावस्कार, अजित पुंâदे, शुभम घुले, महेश हळदे, शिवसिंग हळदे, शितल जांगडे, संजय इंगळे, बलराम बावस्कर, उमेश जाधव, शालीकराम पाटील आदींच्या स्वाक्षरीया आहेत.

आशिया खंडातील मुलींच्या पहिल्या शाळेला “राष्ट्रीय स्मारक” घोषित करा…

0

 

 

अन्यथा आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती , महात्मा फुले ब्रिगेड, फुलेंप्रेमी व विविध संघटना कडून आंदोलनाचा इशारा….

अडगांव बु प्रतिनिधी :दिपक रेळे

 

तेल्हारा दि. 8 सप्टेंबर , २०२० गुरुवार रोजी अशिया खंडातील मुलींची पहीली शाळा वाचविण्यासाठी व राष्ट्रीय स्मारक घोषीत करावे यासाठी “आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती, महात्मा फुले ब्रिगेड ,समस्त फुले प्रेमी वतीने मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व माई सावित्रीआई फुले यांनी सुरू केलेल्या देशातील पहीली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे हे ठिकाण शासनाने तात्काळ भूसंपादीत करून “राष्ट्रीय स्मारक ” म्हणुन घोषीत करून विकसीत करावे देशातीलच नव्हे तर संपुर्ण आशिया खंडातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा प्रसिद्ध आहे. राष्ट्रपिता – सत्यशोधक – तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी १ जानेवारी , १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू केली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहचविली. ज्या फुले दाम्पत्यांनी अनेक अडी- अडचणींचा सामना करून , शेण – माती – चिखल विरोध पत्करून बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी केली.आज त्या भिडेवाड्यातील शाळेची अवस्था खुपच दयनीय झालेली आहे. हे तमाम फुले प्रेमींसाठी वेदनादायक आहे
सदरील जागा शासनाने लवकरात लवकर भूसंपादीत करून त्या वास्तुला राष्ट्रीय स्मारक म्हणुन घोषीत करून विकसीत करावे अन्यथा शासनाच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्रात ” आईसावित्री माई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती व समस्त फुले प्रेमीं “च्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल यांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी……

मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देतांना महात्मा फुले ब्रिगेड व आईसवित्री माई फुले स्मारक संघर्ष समिती द्वारे अजय दादा बंड यांचा नेतुरत्वात निवेदन देण्यात आले त्या वेळी मार्गदर्शक म्हणून लखनदादा राजनकार, गजाननभाऊ उंबरकार, महेंद्र भोपळे यांचा मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले.
महात्मा फुले ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय बंड़, ऋषिकेश निमकर्डे(तालुका अध्यक्ष) रोशनभाऊ बोंबटकार( ता.उपाअध्यक्ष)
अनंता निमकर्डे, सोनुभाऊ भड, वैभवभाऊ राऊत, गोपालभाऊ बंड, स्वप्नील झगडे,प्रशांत रत्नपारखी,विनोद अढाउ, गणेश लाघे, विद्याधर भारसाकले, उमेश राखोंडे, प्रफुल आमले,सचिन तायडे,प्रशांत उमाळे,अनिल इंगळे,धीरज लोणकर गणेश भाऊ इंगोले,श्रीकृष्ण कवर सह
समस्त फुलेप्रेमी उपस्थित होते. सदर निवेदन शासनाच्या नियमात राहुन , मास्क लावुन देण्यात आले.

आदिवासी आश्रम शाळा अडगांव बु तर्फे शाळा आपल्या दारी

0

 

अडगांव बु प्रतिनिधी: दिपक रेळे

तेल्हारा तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळा अडगांव बु येथे डॉ.जगन्नाथजी ढोणे माजी आमदार यांनी आदिवासी विद्यार्थ्याकरिता इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षकाची सोय उपलब्ध करून दिली आहे . परंतु कोरोना काळात शिक्षण संस्था बंद असल्याने खाजगी शाळांनी शिक्षण सुरू केले आहे . परंतु आदिवासी पालकांकडे स्मार्ट फोन नसल्याने त्यांच्या पाल्यांना अडचणी निर्माण होत आहेत . ही बाब लक्षात घेउन संस्था अध्यक्ष डॉ.जगन्नाथजी ढोणे प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे तसेच प्राचार्य संजय निमकर्डे . प्राथ . मुख्याध्यापक श्री.जी.डब्ल्यु.अपाले हयांच्या प्रेरणेतुन ” शाळा आपल्या दारी ” हा उपक्रम सुरू केला आहे.हया शाळेत शिक्षण घेत असलेल्या विविध गावातील विद्यार्थ्याच्या दारी जाउन शिक्षक या उपक्रमाअतर्गत शिक्षणाचे धडे घेत आहेत . दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क सुविधा नसणा – या गावामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने पालकामध्ये विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे . अनु.आदिवासी आश्रम शाळा अडगांव बु . येथील विद्यार्थ्याकडे स्मार्ट फोन घेण्याची सोय नाही . त्यामुळे ते ऑनलाईन शिक्षण घेउ शकत नाही . त्यावर पर्याय म्हणुन शाळा प्रशासणाने शाळा आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला.शाळा बंद कालावधीत आदिवासी विद्यार्थ्याच्या घरापर्यंत शिक्षण या माध्यमातुन अनु . आदिवासी आश्रम शाळा अडगांव बु . ता . तेल्हारा जि.अकोला येथील शाळेतील शिक्षकांनी मुलांचे गावे दत्तक घेउन त्या गावात जाउन ऑफलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे . या उपक्रमामध्ये कार्य करित असतांना शिक्षक विद्यार्थी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करित आहेत . शिक्षणासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षक आरोग्य शिक्षणाचे धडे सुदधा देत आहेत . सोशल डिस्टंसिंग ठेवणे मास्क चा वापर करणे , हॅडवॉश तसेच साबनाचा वापर करणे इ.गोष्टी समजावून सांगीतल्या जात आहेत . अशा प्रकारे आश्रम शाळा अडगांव बु . च्या वतील प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे साहेब एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांच्या मार्गदर्शना नुसार शैक्षणिक कामकाज सुरू आहे .

सुनगाव येथे ग्रामीण कुटा अंतर्गत कोरोना जनजागृती

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी नव्या दिशा संस्थे अंतर्गत क्रेडिट एक्सेस लिमिटेड ग्रामीण कुटा मार्फत सूनगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर जनजागृती करण्यात आली यावेळी कंपनीचे विकास अधिकारी सुपडा बोचरे व त्यांचे सहकारी गणेश बोंबटकार विकास अधिकारी यांनी कोरोना जनजागृती बद्दल माहिती सांगितली त्यामध्ये त्यांनी स्वच्छते बद्दल माहिती दिली व रोजच्या आहारात जीवनसत्त्वे असणारा सकस आहार घ्यावा व घरातील लहान व बुद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी व covid-19 कोरोना बद्दल माहिती दिली यावेळी माजी सरपंच पुंडलिक भाऊ पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण धर्मे ग्राम विकास अधिकारी चौधरीसाहेब व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी हजर होते

जळगाव जामोद तालुक्यातील अवैध धंदे बंद करा नगरसेवकाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0

 

जळगाव जामोद तालुक्यातील जनतेच्या सामाजिक संसारिक शांतता सुव्यवस्थेच्या दृष्टीने जळगाव जामोद तालुक्यात काय व धंद्यांना जोर चढला आहे अवैध धंद्यांचा बाजार भरवला जात आहे अवैद्य गुटका , कच्ची पक्की दारू, वरली मटका ,जुगार यांसारख्या धंद्यांना तालुका व स्थानिक पोलिस प्रशासनाच्या व्यक्तिगत आर्थिक हित संबंधाने भ्रष्ट वृत्तीने कोरणा आजार यापेक्षाही अवैद्य भ्रष्ट धंद्यांचा आजार आपल्या जळगाव जामोद तालुक्यात वाढत चाललेला आहे
सध्या संपूर्ण देशात करुणा सारख्या महामारी नेते मन घातले असताना सरकार या मारीला थांबविण्यात व्यस्त असताना या संधीचा फायदा घेत संधीसाधू व भ्रष्ट अधिकारी अवैध धंद्यांचे हप्ते वाढून सर्रास विक्रीची मुभा देतात
आमच्या भागामध्ये शेतीशिवाय अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही त्यामुळे व्यसनाच्या लालसेपोटी लोकांची ऐवजी धंद्याच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात दूध होत असून यामध्ये गरीब व श्रीमंत यांची दरी निर्माण होत आहे शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे लोकांचे जीवन धोक्यात आलेले आहे कौटुंबिक वादाचे वाढते प्रमाण असून घटस्फोटाचे प्रमाण सुद्धा वाढत आहे त्याचप्रमाणे मुलांच्या शैक्षणिक उज्ज्वल भविष्यावर याचा मोठा परिणाम होत चाललेला आहे
भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांमुळे धंद्यांना ऊत आलेला असून गरीब लोकांच्या कुटुंबावर दैवत धंद्यामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे या आर्थिक लालची धोरणामुळे छोटे-मोठे अपघात, भांडणे ,पत्रकारांवरील वाढते हल्ले, यामुळे शांतता व सुव्यवस्था धोक्यात येत असून
अवैध धंदे धारक व पोलीस अधिकारी यांच्या संपत्तीत वाढ होत असून नैवद्य माफियांना अभय मिळत आहे कर्तव्य होणाऱ्या कचऱ्यामुळे अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे असे निवेदनात नमूद आहे
जनतेच्या हिताच्या दृष्टीने व शांतता सोयीच्या दृष्टीने अवैध धंदे बंद करा असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे

चान्नी-पिपंळखुटा महामार्गावर जीव गेल्या वर सुद्धा होतचं आहे वाळूची तस्करी :महसूल विभागाचे दुर्लक्ष

0

 

नासिर शहा
पातूर प्रतिनिधी

पातुर तालुक्यात लाँकडाऊनच्या काळात सर्वत्र शांतता असताना बहुतांशी व्यवसाय धंद्यामध्ये शुकशुकाट असताना अवैध व्यवसाय मात्र तेजीत असलेल्याचे दिसत आहे.पिपंळखुटा महामार्गावर एक वाहनाने दोन महिलांना उडवले एक जागीच ठार झाली व एक गंभीर जखमी तरी पण वाळू माफिया चे वाहने जोरात चालूच आहेत एका रॉयल्टी वर चार ते पाच ट्रिपा मारत वाहने खूप वेगाने जात आहेत.
एक जीव गेल्या वर सुद्धा काहीच कारवाही झालेली नाही पोलीस प्रशासन या वाळू माफियांना साथ देत आहेत असेही सांगण्यात येत आहेत ही वाळू खूप मोठ्या प्रमाणात उत्खन्न होत आहेत. अवैध व्यवसायात सर्वात जोर धरलेली वाळूची तस्करी रोखण्यात प्रशासन प्रयत्न करत असले तरी वाळूचे अवैध धंदे करणारे शिरजोर झाले असून पिपंळखुटा-चांगेफळ, नदीच्या पात्रात आता रात्रीच्या राजरोसपणे वाळूचा उपसा केला जात आहे.रात्रीच्या अंधारात काढलेली वाळू दिवसाच्या उजेडात लाखो रुपयांना विकली जात आहे.महसूल विभागाने संयुक्त कारवाई करावी हा गोरखधंदा तेजीत वाळत आहे.वाहन चालक मद्यपान करून वाहन चालत आहेत ज्या ठिकाण हुन वाळू उचलली जात आहे तो रस्ता खूप चिखलमय झाले दोन ते तीन घटना त्या ठिकाणी पण झाल्या आहेत किंचित जखमा झाल्या पण पुढे कोणाचे जीव पण जाऊ शकते या साठी जनतेने आवाज उठवायला पाहिजे विशेष कार्यकर्ते पुढारी यांनी पण दखल घेतली पाहिजे काही सांगितलं तर रॉयल्टी आहे असे सांगितले जाते तुमच्या जवळ रॉयल्टी आहे मान्य आहे पण तुम्ही जीवाशी खेळू नका असे
वाळू माफियायांच्या मनात कोणाचाही धाक राहिलेला नाही.
सस्ती,चान्नी-चतारी,पिपंळखुटा, वाहळा,बु, चांगेफळ, खेट्री-शिरपुर उमरा-पांग्ररा,राहेर-अडगांव, व पातुर तालुक्यातील अनेक गावाच्या हदीतून वाळूतस्कर भरदिवसा वाळू तस्करी करीत आहेत,काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे वाळू उपसा करण्याच्या तक्रारी ऊतावळी नदी काठचे गावकरी करीत असतात.परंतु पातुर महसूल पथक,पोलीस पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तस्करी रोखण्यासाठी जातात मात्र ठोस कारवाई होत नसल्याने हे व्यवसाय बंद करण्यात यावे असे पिपंळखुटा-चान्नी ग्रामस्थाचे आवाहान आहे.महसूल विभागाने यांच्याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.

मलकापूर शहरातील सिंधी काॅलनीत सुरू असलेले चांडकाई यांचे अवैध बांधकाम न.प.प्रशासन पाडणार का.

0

 

बांधकाम मालक आणि न.प अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याच्या चर्चेला उधान..

प्रशासनाच्या तिजोरीस चुना लावणारे अवैध बांधकाम करणारे महाशयाची वाढली मजल..

मलकापूर:- बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये अवैध बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.तर धक्कादायक म्हणजे या ठिकाणी नगरपालिकेची कुठलीच परवानगी न घेता तब्बल ५ महिन्यांपासुन हे बांधकाम सर्रास पणे सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव्य समोर आल्यावर ही बांधकाम मालक हा नगर पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना न जुमानता आपले बांधकाम न थांबवता अतिशय जलद गतीने उरकवत आहे.एवढेच नव्हे तर या महाशायाने आपल्या जागेसमोर असलेला नवीन सिमेंटचा सरकारी रस्ता खोदुन त्यावर बांधकामासाठी लागणारी लिफ्ट उभी केली आहे,
नगर पालिका प्रशासनाकडे यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होऊन सुद्धा कारवाई होत नसल्यानं या प्रकरणी अधिकारी व बांधकाम मालकांमध्ये साटलोट असल्याची चर्चा आता शहरात जोरात रंगू लागली आहे.तर नगरपालिका या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन कारवाई करून आपला हटोडा चालवणार का…किंवा साटेलोटे असल्याने दुर्लक्ष करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे…
तर शहरातील सिंधी कॉलनी येथील चांडकाई यांचे गेल्या 5 महिन्यांपासून घरांचे बांधकाम सुरू आहे.याप्रकरणी नगरपालिकेमध्ये दोन तक्रारी देखील दाखल झाल्या आहे.मात्र या प्रकरणी अद्यापही या अवैध बांधकाम मालकावर कारवाई होत नसुन नगर पालीका या कारवाई कडे डोळेझाक का करित आहे.असा प्रश्न आता सर्वसामान्यातुन ऐकायला मिळत आहे.तर याप्रकरणी न.प.अधिकारी यांना विचारणा केलि असता आम्हाला ईतरही कामे असतात. वेळ मिळाला तर नक्कीच कारवाई केली जाईल होईल.आपणही मला काम करू द्यावे.अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देत वरीष्टांचे आदेश नसल्याचे सांगत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय…तर न.प या बांधकाम मालकावर कारवाई का करीत नाहीये याचे कारण मात्र उद्यापही गुलदस्त्यात आडकुन असलं तरी मलकापूर नगर पालिका ही चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्यासाठीच आहे का असा सवाल उपस्तीत होत आहे,