Home Blog Page 619

खडकत व गाडीबोरी येथील अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवाच्या शेताची आ. संतोषराव बांगर यांच्याकडून पाहणी.

0

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील खडकत व गाडीबोरी येथे काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस या पिकांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संतोषराव बांगर यांनी स्वतः शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली व पंचनामे करण्याचे तहसीलदार मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना आदेश देण्यात आले. या वेळी सोबत जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती फकीरा मुंडे, शिवसेना नगरसेवक रामभाऊ कदम, दिनकरराव गंगावणे, नानाराव वडकुते, शंकर लोथे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी बांधव उपस्थित होते.

अनाथ आश्रम मध्ये साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा

0

 

अनिष्ट प्रथा व अनाठायी खर्च न करता स्तुप्त उपक्रम

अंबड प्रतिनिधी : भागवत गावंडे वाढदिवस म्हटला कि घर सजावट,भेटवस्तु,केक व बरेच काही प्रत्येक जण करत असतात.परंतु या अनिष्ट चालिला फाटा देत सामाजिक जाणीवेचे भान ठेवून वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम मध्ये फळे,बिस्केट,रजिस्टर,पेन,पेन्सिल व इतर साहित्य वाटप करून समाजासमोर आदर्श ठेवण्याचे कार्य दुधना काळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ हिवाळे यांनी ठेवले आहे.विश्वंभर भांदरगे,अनिल मस्के,निखिल चौधरी यांच्या संकल्पनेतुन हा आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे.सामाजिक दायीत्व म्हणून आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पर्यावरण पुरक वातावरणकरता हातभार लावण्याचा हेतुने वाढदिवसानिमित्त अनाठाई खर्च न करता गावामध्ये वृक्षरोपण व दुधना काळेगावातील स्वच्छता मोहीम हाती घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ केले व अनाथ आश्रम या ठिकाणी मुलांना वह्या,पेन इत्यादी साहित्य वाटप करत दुधना काळेगावातील प्रत्येक मुलांने बॉडी बिल्डर बनावे या करता व्यायाम शाळा चालु करून एक आदर्श पायडा समाजासमोर ठेवला आहे.या समाजापयोगी उपक्रमासाठी गणेश भाऊ हिवाळे यांच्या सोबत देवा ग्रूप चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्य जालना जिल्हाध्यक्ष विश्वंभर भांदरगे,अनिल मस्के,निखील चौधरी,शाम संकुडे,राजेश मस्के,करण मिसाळ तसेच आश्रमातील शिक्षक वर्ग व गणेश भाऊ हिवाळे मिञमंडळ या सर्वांची उपस्थिती व्होती.

वैजापुर नारंगी सारंगी मध्यम प्रकल्पात अनेक वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात जलसाठा (पाणीसाठा) झाल्याने आमदार रमेश बोरनारे यांच्या शुभहस्ते जलपुजन करण्यात आले

0

 

वैजापूर तालुका प्रतिनिधी ऋषी जुंधारे

या जलपूजना प्रसंगी नगराध्यक्ष शिल्पाताई दिनेशभाऊ परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरभाई, मा.नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, अड. प्रतापराव निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी तहसीलदार निखील धुळंदर साहेब, सहाय्यक अभियंता वनगुजरे साहेब खुशालसिंग अंकल, तालुका प्रमुख सचिन वाणी, मा सभापती रामहरी बापू जाधव, शहर प्रमुख राजेंद्र पा साळुंके, प्रशांत सदाफळ, उपतालुका प्रमुख महेश पा बुनगे, मोहन पा साळुंके, सलीम वैजापूरी, गटनेते प्रकाश चव्हाण,जि.प.सदस्य दिपक राजपूत,विष्णू भाऊ जेजुरकर, साहेबराव औताडे, नगरसेवक पारस घाटे, स्वप्निल जेजुरकर, डॉ निलेश भाटीया, इम्रान कुरैशी,सकहरी बर्डे, वसंत ञिभुवन, उल्हास ठोंबरे, बबन ञिभुवन, बिलालभाई सौदागर, गणेश खैरे, प.स.सदस्य रविंद्र कसबे, शांतीलाल पहाडे, दिगंबर खंडांगळे,सुरेश अल्हाट, सुनिल गायकवाड, प्रमोद कुलकर्णी, अमीर अली, सामीर लोंढे, कमलेश आंबेकर, कपिल खैरे, अमोल बोरनारे, सिताराम पा वैद्य, दौलतभाऊ गायकवाड, प्रकाश शेठ बोथरा, नंदूशेठ मूगदिया, संभाजी पा शिंदे, भाऊलाल सोमासे काका, भिकन लहामगे, सावळीराम गाढे, भोसले काका, शंकर कदम, प्रमोद गायकवाड, प्रेम राजपूत, पप्पु लांडे, निखील वाणी, अनिल न्हावले,शरद कोल्हे, प्रदिप गायकवाड, शंकर मुळे, उत्तम साळुंके,कचरू भोसले, राजू बवचे, मंजाहरी शिंदे, व सर्व पंचक्रोशीतील शेतकरी व वैजापुर शहरातील नागरिक उपस्थीत होते.

रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन शाळेतील खाद्यपदार्थ लंपास करण्याचा प्रयत्न

0

 

नासिर शहा
पातुर तालुका प्रतिनिधी

दि पी ई एस विद्यालय पिंपळखुटा शाळेतील खाद्यपदार्थ दि.18 सप्टेंबर रोजी रात्री 8 ते 10 यादरम्यान खाद्यपदार्थ लंपास करण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक संदीप उत्तम चव्हाण . खाद्यपदार्थ सहाय्यक सुरेश किसन खोडके. यांच्या सहायाने बोलेरो पिकप MH 30 AB 3601 या वाहनांमध्ये डायवर व त्याच्यासोबत एक व्यक्ती यांच्या सहाय्याने तांदुळाचे कट्टे हरभरा डाळीचे कट्टे व तुरदाळ कट्टे वाहनात भरणे चालू असताना रंगेहात पकडन्यात आले
वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला त्याचा सोबती व मुख्याध्यापक संदीप चव्हाण व खोडके यांना बीड जमदार किरण गवळी यांच्या ताब्यात देण्यात आले कच्चा पंचनामा करून पुढील तपास पूर्णपणे करू असे सांगितले

महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरेंगाव येथील महाराष्ट्रसैनिक याचे तहसीलदार यांना निवेदन.

0

 

या मध्ये संघटक/शाखाअध्यक्ष राधेश्याम बंगाळे पाटील, उपाध्यक्ष बालाजी चाटे, महाराष्ट्रसैनिक गणेश गोरे, विद्यार्थीसेना जिल्हाअध्यक्ष शिवा दादा पुरंदरे,अतिष राजे जाधव,
अंकुश चव्हाण, भागवत राजे जाधव, इत्यादी उपस्थित होते…
_________________________
दरेंगाव ता सि×राजा,जि बुलढाणा
येथील खूप वर्षापूर्वीचे जुने आणि भले मोठे भलेमोठे ४,५ झाडे (वड,पिपळ) जीर्ण झालेले आहेत, झाडाच्या फांद्या जि.प.शाळेच्या गच्चीवर व काही घरावर गेलेल्या आहेत तसेच काही गावातील फांद्या विजेच्या तारात घुसल्या असून फॉल्ट होण्याची शक्यता आहे गावामध्ये माकड येत असल्यामुळे ते झाडावरून घरावर उड्या मारतात ,त्यामुळे घरामध्ये असलेल्या लहानलेकराणा,मोट्या माणसांना काही जीवीत हानी होऊ शकते, ग्रामपंचायत सरपंच/सचिव याना वारंवार सांगून लक्ष घालत नाही ,या साठी तहसीलदार साहेब तुह्मी ग्रामपंचायतला परवानगी द्यावी ही आपणास विनंती,काही जीवित हानी झाल्यास ग्रामपंचायत व प्रशासन जबाबदार राहील….

महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारला कांदा पाठवून आंदोलनातून निषेध

0

http://https://youtu.be/tyvW4Igfjms

फुलंब्री तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ

आज राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या वतीने केंद्र सरकारला कांदा पाठवून आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त
जगभरात लाॅकडाऊन असताना, गारपीट, पाणी टंचाई, दुष्काळ, रोगराई या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत, अनेक आव्हानांचा सामना करीत शेतकरी वर्गाने कांदा उत्पादन घेतले, चार पैसे हातात मिळतील असं वाटत असतानाच लहरी केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी बाबत निर्णय घेतला.
या निर्णयामुळे शेतकरी उध्वस्त होत आहे. मुंबई जवळील उरण बंदरावर 5 लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे, जवळपास साडेबाराशे कोटींची उलाढाल थांबली आहे, हा कांदा खराब झाला तर याला जबाबदार कोण??
सन्माननीय पंतप्रधानजी, देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी वल्गना करतात, त्याचवेळी शेतकरी विरोधात निर्णय घेतात…..मग शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार???
सन्माननीय राज्यपालांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलिस व महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना चर्चेसाठी वेळ दिली तशीच वेळ माझ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना द्यावी व त्यांच्या अडचणी केंद्रापर्यंत पोहचवाव्यात.
सन्माननीय मोदी साहेबांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील बळीराजाने पिकविलेला कांदा भेट पाठवित आहोत. शेतकऱ्यांच्या लेकी म्हणून निवेदनाच्या माध्यमातून विनंती करतो की आपण कांदा निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी.
आज पुणे सिटी पोस्ट ऑफिस येथून सन्माननीय पंतप्रधान व सन्माननीय राज्यपाल यांना कांदा व निवेदन दिले आहोत.
Nationalist Congress Party – NCP
Supriya Sule

कोरोनाच्या संकटकाळी इंग्रजी शाळांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मागणी निवेदन

0

 

फुलंब्री तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ

कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद असल्यामुळे आज खाजगी शाळा मुख्यतः इंग्रजी शाळांवर खूप मोठे आर्थिक संकट आले आहे खाजगी शाळेची संस्थाचालक यांनी अगोदरच विद्यार्थ्यांच्या हितासाठी बँकेकडून कर्ज घेऊन मुलांना शिक्षण देण्याचे काम खाजगी शाळा करत होत्या परंतु कोरोना संकट आल्यामुळे इंग्रजी शाळांचे संस्थाचालक आर्थिक अडचणीत आले असून त्यांना शासनाने अनुदान जाहीर करावे असे निवेदन जालना जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय नामदार राजेश भैय्या टोपे साहेब यांच्याकडे श्री भरत भांदरगे सर राजेंद्र दायमा सर अनिल गव्हाणे सर व शिवाजी ( बापू )गाडेकर .यांनी दिले

लोकजागर मंचचा ‌एक हात मदतीचा

0

हिंगणी बु. येथे सिलेंडर गॅस मुळे झालेल्या विस्फोट‌‌ मुळे नुसकान पाहणी केली असता त्या सर्व घरे ‌हे‌आगीत राख झाले अश्यावेेळी नेहमी मदतीसाठी‌‌‌ नागरिकांसाठी धावुन येणारे लोकजागर मंच संस्थापक अनिलदादा गावंडे यांच्या विनंती वरुन लोकजागर मंच च्या वतीने सढळ हाताने आर्थिक मदत करण्यात आली तसेच त्या नागरिकांना शासकीय अधिकारी तहसीलदार साहेब यांच्या बद्दल विचारले असता स्वतः यांनी भेट न दिल्याचे ‌सागिंतले‌ तेव्हा ‌शासकीय अधिकारी तहसीलदार साहेब यांच्याशी फोनवर गोपाल जळमकार यांनी चर्चा करून त्यांना तात्काळ मदत करणे तसेच संबंधित नागरिकांसोबत या बाबतीत चर्चा केली त्याची दखल घेत मा. तहसीलदार साहेब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व भेट दिली यावेळी ‌लोकजागर मंच होईल ती मदत करण्यास तत्पर राहतील लोकजागर मंचचे गोपाल जळमकार जि.कार्याध्यक्ष अमोल जवंजाळ तेल्हारा तालुकाध्यक्ष राजेश काटे शहराध्यक्ष, दीपक अहेरकर, चंद्रकांत ‌मोरे, विक्की खुमकर‌, मयुर जवंजाळ तसेच इतर पदाधिकांरीनी‌ त्यांना भेट‌‌ देऊन ‌सांत्वन ‌केले.

युवा सेना जळगाव जामोद यांनी दिले नगरपरिषद मुख्याधिकार्‍यांना निवेदन…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

मागील ६ ते ७ महीण्यापासुन पुर्ण जगात कोरोना सारख्या महामारी ने ग्रासलेले असतांना सुद्धा प्रभाग ९ मधे गेले १५ ते २० दिवस झाले कोणतीही घनकचरा गाडी व नाल्यांची साफसफाई साठी आलेले नाही या बाबत वारंवार संपर्क करुनही मुख्याधिकारी तसेच न. प प्रशासकीय अधिकारी हेतुपुरस्परपने डोळे झाक करत आहे, सदर घनकचरा उचलण्याकरीता न.प प्रशासनाने ११ महिन्याकरिता सदर कंत्राट अंदाजे एक कोटी रुपयांचा दिला असुन यामधे जनतेचा पैसा वापरला जात आहे. सदर घनकचरा उचलण्याकडे कंत्राटदाराने पुर्णपणे दुर्लक्ष असुन या बाबींवर प्रशासकीय अधिकारी हे देखील दुर्लक्ष करीत आहेत. वास्तविक पाहता ईतका मोठा कंत्राट दिल्यानंतर सदर कंत्राटदाराने व न.प प्रशासनाने नियमितपणे संपूर्ण शहरातील कचरा व नाली साफ ठरलेल्या नियमानुसार करायला पाहीजे त्यानुसार होतांना दिसत नाही व त्यामुळे सदर परिसरातच नव्हे तर पुर्ण शहरात विवीध रोगांचा प्रादुर्भाव होत असुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे , त्यामुळे सदर हुन कचरा येत्या २४ तासात उचलल्या गेला नाही तर शिवसेनेच्या व युवा सेनेच्या वतीने सदर कचरा न.प च्या प्रशासकीय ईमारती मधे टाकण्यात येईल व त्यापासून होणार्या परीणामास व नुकसानी आपन स्वतः प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी.
असा ईशारा युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल पाटील व पदाधिकारी यांच्या वतीने न.प प्रशासनाला देण्यात आला.
निवेदनावरती सदर प्रभागातील नागरीकांच्या व शिवसेना पदाधीकार्यांच्या सह्या आहेत.युवा सेनेचे शुभम पाटील, अक्षय भालतडक,चांद कुरेशी,दिपक बावसकार, मंगेश कतोरे, युवराज देशमुख, मयुर बोदडे, वैभव जाणे यावेळी उपस्थित होते.

‌पळशी गावामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन आयोजित करून रक्तदान शिबिर घेण्यात आले

0

 

सिल्लोड तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पळशी गावांमध्ये सेवा दिन आयोजित करून रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यामध्ये गावातील पदाधिकाऱ्यांनी व व युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदान केले यावेळी सरपंच पळशी तथा भवन सर्कल प्रमुख दत्ता पा. बडक पंचायत समिती सदस्य नारायण पा. बडक,माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा भाजपा तालुका चिटणीस भाऊसाहेब पा. बडक,काकासाहेब नारायण पा. बडक भाजपा शाखाध्यक्ष पळशी,अंकुश बाजीराव बडक.श्रावण बडक उपसरपंच पळशी, गजानन बडक तंटामुक्ती अध्यक्ष पळशी,योगेश साहेबराव बडक, संजय पा. बडक भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस. सुदाम राऊत, राजू वैष्णव, संदीप बिडवे, अंकुश राऊत,ज्ञानेश्वर सुलताने.यांनी विशेष सहकार्य केले. आयोजित केलेल्या रक्तदान भरघोस प्रतिसाद मिळाला त्यामध्ये रक्तदाते नारायण शेषराव बडक , दत्ता माधवराव पा. बडक, भाऊसाहेब विश्‍वनाथ बडक, काकासाहेब नारायण बडक. भगवान पुंडलीक बडक, संतोष पांडुरंग बडक, कृष्णा रामकिसन राऊत, सुनील कचरू बडक, आकाश रामराव बडक, गणेश हरिभाऊ बडक,योगेश साहेबराव बडक, सागर कैलास जाधव, अंकुश बाजीराव बडक,गणेश सोमीनाथ धांडे,राजू दलसिंग राजपूत, संतोष रामू कुदळे, रामेश्वर शेषराव बडक, भास्कर एकनाथ बडक, प्रवीण उत्तमराव वैष्णव, समाधान गजानन मंडोरे, आकाश राजपूत.आदींनी रक्तदान केले.यावेळी गावातील दत्तू पा. बडक, परमपूजनीय जगन्नाथ महाराज कानिफनाथ संस्थान पळशी,सुदाम जैवाळ पोलीस पाटील पळशी, हिरामन धांडे,जगन्नाथ बडक,अंबादास पुंगळे, उत्तम निकम.आदींची उपस्थिती होती