Home Blog Page 620

मुलाने केली आई बेपत्ता असल्याची तक्रार

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जामोद

सुनगाव येथील 42 वर्षीय विवाहिता बेपत्ता दिनांक 17- 9- 2020 रोजी सागर अनंता धर्मे वय वर्ष 20 व्यवसाय शेती राहणार सूनगाव ,तालुका जळगाव जामोद यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन ला रिपोर्ट दिला की त्यांची आई नाव ज्योती अनंता धर्मे 42 वर्ष असून तालुका जळगाव जामोद ही 17- 9- 2020 रोजी सकाळी साडेदहा वाजता घरून कोणालाही काही न सांगता निघून गेली आतापर्यंत तिचा शोध घेतला असता ती मिळाली नाही वरून पोलीस स्टेशन नी मिसिंग रिपोर्ट घेऊन शोध चालू केला आहे सदर महिला कोणालाही आढळून आल्यास पोलीस स्टेशन जळगांव जामोद ला कळवावे पुढील तपास ठाणेदार श्री सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आई श्री महल्ले व पो काँ इंगळे करीत आहे

नव्या दिशा संस्थेअंतर्गत कोरोना जनजागृती

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील अकोला खुर्द या गाव या गावात जनजागृती करण्यात आली नव्या दिशा संस्था बेंगलोर ग्रामीण कुटा क्रेडिट एक्सेस लिमिटेडच्या वतीने सुपडा बोचरे विकास अधिकारी यांनी कोविड 19 विषयी महिती दिली त्यामध्ये त्यांनी स्वच्छता विषयी व दररोजच्या जीवनात सकस आहार घ्यावा व हात वेळोवेळी धुवावे अशी माहिती दिली यावेळी अकोला खुर्द चे सरपंच पुष्पा सोळंके अंगणवाडी सेविका शीतल इंगळे ग्रामपंचायत सदस्य व बचत गट महिला व गावकरी उपस्थित होते

मेहकर तालुका महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

0

 

मेहकर तालुका महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा नवजीवन विद्यालय अंजनी बुद्रुक या ठिकाणी पार पडला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले ब्रिगेडचे जिल्हा संघटक ज्ञानदेव बळी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मेहकर तालुका अध्यक्ष राजेश मगर अमरावती विभाग संपर्कप्रमुख शिवशंकर मगर त्याचप्रमाणे माझी पंचायत समिती सदस्य डॉक्टर आल्हाट साहेब सरपंच गजानन टोणपे वसंतराव नाईक विद्यालयाचे माननीय आखरे सर नवजीवन विद्यालयाचे ठाकरे सर पाटील सर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष लाड सतीश खडसे डॉक्टर अशोक नागोलकर प्रदीप सरोदे किरण परिसकरहे हजर होते मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा फोटो व आकर्षक प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला संपूर्ण भारतभर महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने गुणवंताचा सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री ज्ञानदेव बळी यांनी विद्याधन हे सर्वात मोठे धन आहे या धरणाची शिदोरी घेऊन आपण फार मोठे व्हा व भारत मातेची सेवा करा असे सांगितले महात्मा फुले ब्रिगेडचे मेहकर तालुका अध्यक्ष राजेश मगर यांनी गरीब होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना महात्मा फुले ब्रिगेड सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक महात्मा फुले ब्रिगेडचे कार्यकर्ते गणेश अल्हाट विशाल लाड हनुमान पायघन गोपाल अल्हाट शिवम ढोले नागेश भोने व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे संचलन शिवम ढोले यांनी केले तर आभार प्रदर्शन आकाश लाड यांनी केले

अनाथ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना अन्नदान करत केले पितृपूजन

0

 

झंवर परिवाराचा माऊली वारकरी संस्थेत अनोखा पितृपूजन सोहळा संपन्न

प्रतिनिधी:सागर जैवाळ

 

सिल्लोड-सिल्लोड येथील प्रसिद्ध व्यापारी पूजा मेडिकल व पूजा फार्माचे सर्वेसर्वा जगन्नाथ गणपत झंवर यांनी अनाथ,आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना तसेच वारकरी मुलांना माऊली वारकरी शिक्षण संस्था निल्लोड फाटा येथे महापंगत देत अनोखे पितृपूजन साजरे केले.प्रारंभी जगन्नाथ झंवर यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुख्मिनी मातेस दुग्धभिषेक संपन्न झाला.तसेच गोमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी सिल्लोड नगरपालिकेचे नगरसेवक तथा जगन्नाथ झंवर यांचे पुत्र मनोज झंवर, योगेश झंवर, शैलेश झंवर व सर्व झंवर कुटुंबीय उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी नगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत क्षीरसागर,सिल्लोड तालुका व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष दुर्गेश जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रशांत क्षीरसागर बोलतांना म्हणाले की ह.भ.प रामेश्वर महाराज यांचे कार्य उल्लेखनीय आहे, अनाथ आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या,व इतर मुलांना वारकरी संस्थेच्या माध्यमातून शिक्षण देणे हे गौरवास्पद आहे. आज झंवर कुटुंबाने अनाथ मुलांसोबत साजरे केलेले पितृपूजन इतरांना आदर्शवत ठरणारे आहे.यावेळी संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज पवार झंवर परीवाराचे आभार मानताना म्हणाले की माऊली वारकरी संस्था उभी करतांना कथा, कीर्तन,प्रवचनाच्या माध्यमातून मिळणारे मानधन संसारासाठी न लावता संस्थेसाठी,संस्थेच्या मुलांसाठी खर्च करायचे असे ठरवले होते. आज बारा वर्षापासून यात खंड पडला नाही. कोरोना संकटामुळे लेकरांचा सांभाळ करतांना अडचणींना सामोरे जाव लागत आहेे.मात्र झंवर परिवाराने दिलेली साथ सदैव समरणात राहील.
यावेळी नगरपालिका सिल्लोड चे नगरसेवक सुधाकर पाटील, राजू गौर,संजय झंवर, डॉ. नितीन झंवर, हर्षराज लॅबचे साळवे व व्यापारी व मित्रपरिवार,शिक्षक किशोर बडक, मुख्याध्यापक के. बी.जैवाळ,व्यवस्थापक गजानन डिगावकर यांची उपस्थित होती.

चौकट

पितृपूजन कार्यकामासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व व्यापारी व मित्रपरिवार यांनी ऐनवेळी पुढाकार घेत अनाथ,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना, व वारकरी मुलांना वह्या, पेन, पेन्सिल, तेल पाऊच,टूथ पेस्ट आदी साहित्य भेट देत सेवेचे अनोखे दर्शन घडविले

ज्ञानविकास विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन संपन्न

0

 

प्रतिनिधी सागर जैवाळ
सिल्लोड-

येथील ज्ञानविकास विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपस्थित ज्येष्ठ पालक श्री.किसन काशीनाथ साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयातील सहशिक्षक श्री.ए.डी. सोनवणे यांनी या दिनाविषयाचे महत्व पटवून देताना 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानात विस्तारलेला होता. त्यामध्ये 565 संस्थांनापैकी 562 संस्थांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु हैद्राबाद, जुनागड आणि काश्मीर या संस्थांनानी स्वतः ला स्वतंत्र घोषित केल्यावर साहजिकच भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळाच देश निर्माण होण्याची चिन्हे होती. म्हणजेच आपला भारत देश स्वतंत्र होऊनही काही भाग हा वेगळा होता. तो संस्थानाच्या अधिपत्याखाली येत होता.त्यातच हैद्राबाद संस्थान हे एक होते. भारताच्या पोलिसी कारवाई नंतर 17 सप्टेंबर रोजी हैद्राबाद संस्थांनचे विलीनीकरण भारतात करण्यात आले.यामध्ये महाराष्ट्रात मराठवाडा हा विभाग येतो.आणि याच मराठवाड्याला 15 ऑगस्ट ऐवजी 17 सप्टेंबर रोजी स्वतंत्र मिळाले.या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला आज 72 वर्ष पूर्ण झाली त्याचा आज 73 व वर्धापन दिन साजरा करण्यात आला.असे यावेळी श्री.सोनवणे यांच्याकडून सांगण्यात आले.
यावेळी सद्य परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षित अंतराचे पालन करून ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ पालक किसन काशीनाथ साळवे,बालाजी सखाराम साळवे, मुख्याध्यापक यांच्यासह सर्व शिक्षकवृंद,कर्मचारी यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री यांचे आदेश जनता कर्फ्यू

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

बुलढाणा – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत कडकडीत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांनी केले आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला आज जिल्हा नियोजन भवनामधील पालकमंत्री यांच्या दालनात आयोजित बैठकीदरम्यान पालकमंत्री महोदयांनी दिल्या आहेत. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी षन्मुखराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ, अति जिल्हाधिकारी दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रामेश्वर पुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडित, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या5 हजाराच्यावर गेली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात जनता कर्फ्यु घोषित करण्यात यावा अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, संघटना यांनी केली होती. त्यानुसार जनता कर्फ्युची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दूध डेअरी, मेडिकल, हॉस्पिटल, पेट्रोल पंप, बँक व शासकीय कार्यालय वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल्स, आस्थापना बंद ठेवण्यात याव्या असे आवाहन करण्यात आले आहे.
जे लोक नियमांचे उल्लंघन करतील त्यांवर पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी व जनतेने जनता कर्फ्यु कडकडीत पाळणे गरजेचे आहे.
शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेले आपले कुटुंब आपली जबाबदारी या मोहिमे अंतर्गत शासनाच्या वतीने आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने सर्वेक्षणाच्या वेळी घरी हजर राहणे आवश्यक आहे. त्यावेळी देखील हा जनता कर्फ्यु महत्वाचा ठरणार आहे.

अंखड हिंदुस्थान चे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष पंतप्रधान, आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून

0

 

 

आज पातुडाॅ बु जि प सर्कलच्या वतीने गरिब गरजुंना माननीय आमदार श्री संजुभाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य वाटप करण्यात आले. यावेळी श्री ज्ञानदेवभाऊ भारसाकळे जि प सदस्य, श्री. गजाननभाऊ दाणे, सभापती कृ उ बा समिती, सौ रत्नप्रभाताई नि धर्माळ पं स सदस्या, श्री. भारतभाऊ वाघ, श्री. लोकेश राठी,श्री. प्रकाशभाऊ अरबट, श्री. अविनाशभाऊ धर्माळ, दिपकभाऊ गोमासे, रामदासभाऊ म्हसाळ , कैलासभाऊ गवई,श्री कृष्ण मोहनकार, भाष्करभाऊ अढाव, विनायक चोपडे, शंकरराव बोपले, राजुभाऊ मांडवगडे, अरविंदभाऊ झाडोकार, दिपकभाऊ फाळके, गोपालभाऊ माहोकार, राजुभाऊ बावस्कार, वैभव रहाटे, शामभाऊ वानखडे, ज्ञानेश्वरभाऊ धर्माळ, बाळुभाऊ वानखडे, गोपालभाऊ वाकडे, कपिल गवई, आत्मारामभाऊ वरटकार, विठ्ठल पुंडे, आकाश पालीवाल, गजाननभाऊ इंगळे, प्रमोदभाऊ देऊकार, गजानन घटाळे, मोहन बगाडे, यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

अकोला जिल्ह्यात आज पत्रकारांचे एसएमएस पाठवा आंदोलन

0

 

अकोला – कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटूंबियांना शासनाने 50 लाख रुपयांची मदत करावी, कोरोना काळात विमा संरक्षण द्यावे, दिवंगत पत्रकार संतोष पवार व पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूची चोकशी करावी,कोविड हॉस्पिटलमध्ये पत्रकारांसाठी बेड राखीव ठेवण्यात यावेया प्रमुख चार मागण्यासाठी आज अकोला जिल्हा व सर्व तालुका संघातर्फे आरोग्य मंत्र्यांना एसएमएस पाठवा आंदोलन करण्यात येत आहे.मराठी पत्रकार परिषदेचे नेते श्री एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी संपूर्ण राज्यभर दिनांक 18 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी एसएमएस पाठवा या आंदोलनाची हाक दिली आहे.अकोला जिल्हा पत्रकार संघातर्फे हे आंदोलन अकोला, पातूर, बाळापूर, तेल्हारा, अकोट, मुर्तिजापूर , बार्शीटाकळी अशा सात तालुक्यातून राबविण्यात येणार आहे, उपरोक्त मागणीचे एसएमएस आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे याना त्यांच्या 9619111777 या भ्रमणध्वनीवर पाठवावेत असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शोकतली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर, उपाध्यक्ष रामदास वानखेडे, गजानन सोमाणी,चिटणीस संजय खांडेकर,विजय शिंदे , सत्यशील सावरकर,प्रदीप काळपांडे , उमेश देशमुख,तालुका अध्यक्ष सर्वश्री मोहन जोशी,दिलीप देशमुख,अनिल गीऱ्हे,अरिओम व्यास, प्रल्हादराव ठोकणे, केशव लुले, दीपक देशपांडे यांनी केले आहे.एसएमएस पाठवा आंदोलना नंतर जिल्हा व तालुका पत्रकार संघाचे वतीने जिल्हाधिकारी व सर्व तालुका तहसीलदार यांना ई मेल द्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येणार आहे.

रात्री पायी फिरत असतांना समोरून आलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी

0

 

मुख्य संपादक

अनिलसिंग चव्हाण

चिखली : रात्री पायी फिरत असतांना समोरून आलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी
झाल्याची घटना चिखली ते बुलडाणा रोडवरील जैन शोरूम समोर घडली.
याबात पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून काल रात्री १० च्या सुमारास विद्या लक्ष्मण वायाळ (वय ४५ ) व मंगला जाधव ( वय ५० ) दोघीही रा. राऊतवाडी चिखली ह्या रात्री रस्त्याने पायी फिरायला गेल्या असता मेहकर कडून बुलडाण्याकडे पुठ्याचा माल घेऊन निष्काळजीपणे व भरधाव वेगाने जाणा-या आयशर ट्रक क्र. ( एम एच १५ ईजी ६८५२ ) ने जोरदार धडक दिल्याने मंगला जाधव ह्या जागीच ठार झाल्या तर विद्या वायाळ ह्या जखमी झाल्या. स्थानीक नागरीकांनी याबाबत पोलीसांना माहिती दिली असता चिखली पो. स्टेशनचे पिएस आय चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन सदर आयशर चालक रमेश केशव गोपाळ ( रा. सिरसमणी ता. पारोळा जि. जळगाव वय ३६ ) यास ट्रकसह ताब्यात घेतले.
या घटनेचा प्राथमीक तपास पोलीस ऊप निरीक्षक चव्हाण साहेब यांनी करून पुढील तपास पोलीस ऊपनिरीक्षक किरण खाडे हे करीत आहेत.

कोरोना काळातही स्वच्छतेचा अभाव नालीचे दुषित पाणी घुसतय घरात

0

 

अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे

 

तेल्हारा तालुक्यातील अडगांव बु शिवाजी नगर येथील नागरिकांनी अनेक वेळा ग्राम पंचायत कार्यालयात स्वच्छते बाबत तक्रारी केल्या मात्र निगरगट्ट प्रशासनाने त्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गावातीलच रहिवासी अपंग महिला कल्पना सुरेश सित्रे ह्यांच्या घरासमोर बांधकाम केलेली नाली ही चुकीच्या पद्धतीने बांधल्याने सदर नालीतील पाणी हे सित्रे ह्यांच्या घरात शिरत आहे व त्या पाण्यामध्ये नालीतील किडे त्यांच्या घरात येतात त्यामुळे त्याच्या घरातील व्यक्तीची प्रकृती वारंवार बिघडत असून कोरोना काळात त्यांच्या परिवारावर प्रशासनाच्या चुकीमुळे कृत्रिम संकट निर्माण झाले आहे.
ह्या बाबत त्यांनी ग्राम पंचायत सचिव ,सरपंच, आरोग्य विभाग, पंचायत समिती सदस्य, गट विकास अधिकारी यांना निवेदने दिली परंतु कोणत्याच प्रकारची दखल यांनी घेतली नाही पर्यायी पंचायत समिती तेल्हारा येथे उपोषणाला बसण्याची वेळ आली परंतु पंचायत समिती सदस्य व गट विकास अधिकारी यांनी त्यांची समजूत काढून उपोषणाला स्थगिती दिली व तुमचे काम उद्याच करतो अश्या प्रकारचे आस्वासन दिले मात्र आज 4 महिन्यापासून ही अपंग महिला न्यायासाठी प्रशासनाचे दार ठोकत आहे परंतु ह्यांची हाक झोपी गेलेल्या म्हणावे की झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला कधी ऐकू येईल. स्वच्छतेचे धडे देणारे शासन प्रशासन काही पाऊल उचलेल की त्यांना डबक्यातच राहावे लागेल. व चुकीच्या पद्धतीने बांधकाम केलेल्या नालीचे बिल कसे काढण्यात आले याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे.तसेच दोषींवर कारवाई ची मागणी नागरिक करत आहेत.