Home Blog Page 620

ग्राम उसरा येथे कोरोणाचा शिरकाव

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यात कोरोणा चा संसर्ग वाढत असताना ग्रामीण भागात कोरोणाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे असेच ग्रामपंचायत सूनगाव अंतर्गत येत असलेल्या ग्राम उसरा बु येथे कोरोनाचा शिरकाव झालेला आहे 7ऑगस्ट रोजी आलेल्या एका 40 वर्षीय पुरुष रिपोर्ट कोरोना बाधित आल्याने उसरा येथील जनतेत भीतीचे वातावरण आहे ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या वतीने रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे व उसरा येथील जनतेने विनाकारण बाहेर फिरू नये व फिरताना तोंडाला मास्क बांधावे असे सुनगाव ग्रामपंचायतीच्या वतीने उसरा येथील नागरिकांना संदेश दिला आहे

70/30 चा फार्मूला रद्द करा: आमदार.संतोषराव बांगर

0

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय प्रवेश 70/30 टक्क्याचे विभागवार धोरण शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून साध्य करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मराठवाड्यात वैद्यकीय प्रवेशाच्या जागा कमी असल्याने अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहत आहेत. देशपातळीवर एकच परीक्षा घेतली जाते व देशातील इतर कुठल्याही राज्यात 70/30 हे धोरण राबविले जात नाही. तरी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करण्याकरिता आज शिवसेनेचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तसेच युवा सेना प्रमुख श्री. आदित्यजी ठाकरे यांच्याकडे 70/30 चे विभागवार धोरण शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून रद्द करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख हिंगोली श्री.संतोषराव बांगर यांच्यासोबत परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर हे उपस्थित होते. यावेळी युवा सेना प्रमुख श्री.आदित्यजी ठाकरे यांनी आपला प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे आश्वासन दिले.

जनविकास संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष साईनाथ गिरी यांच्याकडून हिंगोली जिल्ह्यामधे पार्थ पवार फाऊडेशन ची सुरुवात गरजू लोकांपर्यंत मदतीचा हात मिळावा म्हणून पार्थ फाउडेशन ची हिंगोली जिल्ह्यात सुरुवात

0

जनविकास संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष साईनाथ गिरी यांच्याकडून हिंगोली जिल्ह्यामधे पार्थ पवार फाऊडेशन ची सुरुवात गरजू लोकांपर्यंत मदतीचा हात मिळावा म्हणून पार्थ फाउडेशन ची हिंगोली जिल्ह्यात सुरुवात

 

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

पार्थ फाऊंडेशन चा माध्यमातून महाराष्ट्र भरामध्ये विकासाची कामे अतिशय चांगल्या पद्धतीने केली जात आहे त्याचेच एक प्रयत्न म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये मी साईनाथ गिरी जनविकास संघटना महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हाध्यक्ष
हिंगोली जिल्ह्यामध्ये गरजू व्यक्ती पर्यंत मदतीला हात मिळावा यासाठी पार्थ फाऊंडेशन चा माध्यमातून विकासाचा वसा पुढे नेत आहे

अधिकारी हजर नसल्याने खुर्ची ला दिले निवेदन..

0

 

मलकापूर- देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा परिसराची साफसफाई करण्यात येवून पुतळा परिसरात सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीेने आज ७ सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी न.प. मलकापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान यावेळी एकही अधिकारी हजर नसल्याने सदरचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खाली खुर्चीला देण्यात आले.
मलकापूर शहराच्या तहसील चौकामध्ये देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. काही महिन्यांपासून या पुतळा परिसरामध्ये न.प.च्या वतीने कुलूप लावण्यात आलेले असून या परिसरात आजरोजी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तेव्हा या परिसराची तात्काळ साफसफाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आज रोजी पुतळा परिसरात झालेली घाण पाहता ही एक प्रकारे विटंबनाच होत असल्याचा प्रकार आहे. तेव्हा होत असलेली विटंबना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सहन करण्यात येणार नाही. तात्काळ याबाबत कार्यवाही न केल्यास प्रहारच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल, याची सर्वस्व जबाबदारी न.प. प्रशासनाची राहील, असेही निवेदनाच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी उपजिल्हा प्रमुख अजय टप, तालुका प्रमुख अजित फुंदे, युवा तालुका प्रमुख अमोल बावस्कार, युवा शहर प्रमुख संतोष जाधव, बळीराम बावस्कर, अपंग क्रांती आंदोलन संघटना तालुका प्रमुख दत्ता पाटील, सुर्यकांत महाजन आदी उपस्थित होते.

चांन्नी पिंपळखुटा मार्गावर झालेल्या अपघातात एक ठार तर एक जखमी

0

 

नासिर शहा
पातूर प्रतिनिधी

पातुर : तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चांन्नी ते पिंपळखुटा या मार्गावर वाळू वाहणाऱ्या MH 14 AZ /7245 या क्रमांकाच्या मिनी टाटा वहानाने दोन मजुर महीलाना धडक दिल्याने एक महीलां जागेवर ठार तर एक गंभीर जखमी झाले आहे सविस्तर वृत्त असे आहे की वाळूची वाहतूक करीत असलेले वाहन वेगाने जात असताना दोन मजूर महिला शेतात जात होत्या त्यांना आज सकाळी सात ते आठच्या दरम्यान या वाहनाने जबर धडक दिल्याची घटना घडली आहे यामध्ये शिलाबाई सरदार ही महिला जागेवर ठार झाली आहे.तर दुसऱ्या मुलीचे नाव बेबाबाई सोनोने या गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली या वाहनाच्या चालकावर व वाहनांवर 279 / 338/304 अ भादवी. सह कलम 134 मोटार वाहन कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे , व वान हे घटनास्थळी जागर उभे करून वाहन चालक फरार असल्याची माहिती मिळाली आहे पुढील तपास चांन्नी पोलिस स्टेशन करत आहे

जळगाव जा. विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने उप विभागीय अधिकारी यांना निवेदन सादर

0

 

गजानन सोनटक्के

जळगाव जा.

:नाफेड अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मका या पिकाची नोंदणी केले ली होती अश्या1927 शेतकर्या पैकी फ़क्त153शेतकऱ्यांचा माल शासनाने खरेदी केला, उर्वरित 1774 शेतकऱ्यांना आपला माल कवडी मोल भावाने बाहेर बाजारात विकावा लागला.तरी 1774 शेतकऱ्यांना शासनाने 700ते 800 रुपये प्रति की.अनुदान देण्यात यावे, करिता निवेदन देण्यात आले आहे…
निवेदन देते वेळी काँग्रेस पक्षनेत्या सौ स्वातीताई वाकेकर, विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद सपकाळ, तालुका अध्यक्ष अविनाशभाऊ उमरकर, शहर अध्यक्ष अर्जुनभाऊ घोलप,कृउबास संचालक विश्वासभाऊ पाटिल, जिल्हा सरचिटणीस राजुभाऊ पाटील, जिल्हा चिटणीस युनुस भाई, जिल्हा चिटणीस अमरभाऊ पाचपोर, dr प्रशांतभाऊ राजपुत, पराग अवचार, माणिक खोद्रे, हुसेन राही, महादेव उमाळे, अखिल शाह,गोपाल कोथळकर मिलिंद वानखडे,राजीकभाई,सुनील ताडे,अमान खान व adv रविंद्रभाऊ काकडे यांच्या सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दि.मतदार टाईम्स चे तालुका प्रतिनिधी राहुल निर्मळ यांना अवैध गुटखा माफिया कडून आसलगांव येथे मारहाण…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यामध्ये अलीकडील काळात अवैध धंद्यांना उत आल्याचे दिसत आहे
त्यामध्ये अवैध गुटखा, वरली,मटका, सट्टेबाजी अवैध दारू धंदे जोमात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे तसेच या सर्व प्रकारांमुळे पोलीस प्रशासनाविषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.परिणामी रेती माफियाकडुन अधिकाऱ्यानवर हल्ला, तर अवैध धंदेवाल्यांकडुन पत्रकारांनवर हल्ला होत असल्याचे प्रमाण जळगांव जामोद येथे दिसुन येत आहे. असेच भ्रष्ट पोलिस यांच्या आश्रीत असलेले गुटखा माफियाकडुन पत्रकाराला मारहाणीचे प्रकरण समोर आले आहे.
जळगाव जामोद तालुका पत्रकार बांधवांच्या वतीने दिनांक 7 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की दिनांक 6 सप्टेंबर रात्री नऊच्या सुमारास मतदार टाईम्सचे तालुका प्रतिनिधी राहुल निर्मळ यांना मिळालेल्या माहिती वरून श्रीकांत श्रीकृष्ण भेलके यांच्या अवैध गुटखा विक्रीची टाटा कंपनीची इंडिका गाडीने गजानन दहीकर टुनकी गाडी क्रमांक एम एच 28 6188 या गाडीने गुटका आसलगाव येथे भेलके यांच्या घरी आला असता त्यांचे स्टिंग आँपरेशन करीत फोटो काढीत असताना श्रीकांत श्रीकृष्ण भेलके यांनी अंगावर धावत येत राहुल निर्मळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामुळे राहुल निर्मळ यांचा भ्रमणध्वनी फुटला तसेच त्यांच्या दुचाकी वाहनांचे नुकसान होऊन शरीराला मुका मार लागला सदर घटनाक्रम चालू असताना गावकरी धावून आले नाही तर श्रीकांत भेलके यांनी राहुल निर्मळ यांचा खून करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता सदर घटनेची तक्रार पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे करण्यास राहून निर्मळ गेले असता,ASI रमेश धामोडे यांनी एवढ्या मोठ्या गुन्ह्याची नोंद फक्त NC करून घेतली.तसेच ASI रमेश धामोडे यांनी राहुल निर्मळ यांना धमकी देत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत अर्वाच्य भाषेत राहुल निर्मळ यांना म्हणाले की रिकामे कामे कशाला करतोस तुला कोणी सांगितले गुटख्याच्या गाडीचे फोटो काढायला.तसेच ASI रमेश धामोडे हे दारू पिल्याचे जाणवत होते ही बाब निवेदनात नमुद केली आहे.सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपी व पोलिस अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी जळगांव जामोद यांनी द्यावे तसेच पुढील आठ दिवसात सदर प्रकरणात आरोपी व पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे. सदर प्रकरणात आरोपीला अटक व ASI रमेश धामोडे याची बदली न झाल्यास पत्रकार उग्र आंदोलन करतील तसेच होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. सदर निवेदनावर राजेश गजानन बाठे, राजू वाडे, विजय पोहनकर , दत्तू दांडगे,अनिल भगत, अशोक टाकळकर, गणेश भड, गणेश गिर्हे, गजानन सोनटक्के विनोद वानखडे, सागर झनके, राहुल निर्मळ, मनीष ताडे, गुलाबराव इंगळे,विलास बोडखे,अमोल भगत,विनोद चिपडे, आदींच्या सह्या आहेत

आज राजे प्रतिष्ठान हिंगोली जिल्हा संघटक पदी नियुक्त्या करण्यात आल्या

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

आज राजे प्रतिष्ठान हिंगोली जिल्हा संघटकपदी श्री.नागनाथ नारायण पुरी यांची नियुक्ति करण्यात आली.यावेळी* श्री.प्रल्हादराव जाधव ( मराठवाडा विभागीय अध्यक्ष राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) व अंकुश गिरी सोशल मीडिया अध्यक्ष हिंगोली जिल्हा व बालाजी दळवी आदी याच्या अध्यक्ष ते खाली श्री,नागनाथ पुरी याची हिंगोली जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली

0

 

 

अकोट कोविड ‌सेंटर‌ समस्याचा विळाख्यात
एकीकडे ‌महाराष्ट्र सरकार ‌कोरोना ‌रुग्ण साठी हव्या त्या ‌सुविधा ऊपलब्ध ‌करत असताना रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी सरकार ‌भर देत ‌असताना मात्र अकोट कोवीड‌ सेंटर रुगणाचे जेवनाचे , नाश्तायाचे हाल करत आहे मेस वाला तळलेलेया ‌तेलाचा ‌नाश्ता ‌, सकाळच्या पोळ्या ‌संध्याकाळी जेवनात देत आहेत तसेच संडास,‌बाथरुम,पाण्याची व्यवस्था नाही वापरण्याचे पाणी ‌हे‌‌ रुग्णाना बाहेरुन टंकरने आणावे लागत आहे‌‌ तहसिलदार साहेब यानी जातीने लक्ष देण्याचे लोकजागरचे ‌मंच‌‌चे‌‌ तेल्हारा तालुका‌अध्यक्ष यांनी मागनी‌ केली‌

वरिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची अनुदानाची मागणी

0

 

 

महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक कर्मचारी संघटनेच्या वतीने वरीष्ठ महाविद्यालयाना अनुदान मिळावे या मागणीसाठी अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेंश नेवाल याना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
कायम विनाअनुदानित वरीष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी असे आंदोलन व निदर्शने करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर अमरावती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्रचे राज्यपाल,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री संबंधिताना निवेदन अमरावती चे जिल्हाधिकारी यांचे मार्फत मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे. २००१ नंतर च्या कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाचा “कायम” शब्द वगळून प्रचलित नियमानुसार टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात यावे व आमचा २० वर्षांपासूनचा विनावेतनाचा प्रवास थांबवावा अशी या आंदोलन कर्त्याची प्रमुख मागणी आहे
१९ जुन पासून अर्थात ८० दिवसापासून संघटनेच्या वतीने घरबैठे आंदोलन सुरू आहे मात्र ८० दिवसानंतरही शासनाने अद्यापही या मागणीकडे लक्ष केंद्रित केले नाही .निवेदन देतेवेळी संघणेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. राहुल तट्टे डॉ पांडुरंग टिपरे, डॉ. नरेश इंगळे, पद्माकर नागपुरे, संतोष नागपुरे डॉ मेघा सावरकर, प्रा सुषमा थोटे, रामकृष्ण नागपुरे सह विविध महाविद्यालयाचे निवडक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते.
शिक्षक दिनी शासनाच्या धोरणाचा निषेध
निषेध !
पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन हा शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी हे गत दोन दशकापासून विनावेतन/नाममात्र मानधनावर विद्यादानाचे कार्य करीत आहे. मात्र या कर्मचाऱ्यांनी अनुदान प्राप्तीसाठी वारंवार निदर्शने, आंदोलने तसेच शासन व संबंधितांना निवेदने सादर केली असतानासुद्धा शासनाने दोन दशकापासून कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही.म्हणून शिक्षक दिनाच्या पर्वावर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या तकलादू आणि कायम विनाअनुदानित धोरणाचा निषेध नोंदविला आहे.
आगामी अधिवेशनात कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा तसेच राज्यातील शिक्षक आमदार यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती आंदोलन कर्त्यानी केली आहे.

मत व्यक्त करताना
*प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे*