Home Blog Page 659

रफाल विमानांचा आज भारतीय ताफ्यात समावेश

 

मुख्य संपादक

अनिलसिंग चव्हाण

मुंबई:- भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर आज हवाई दलाच्या अंबाला येथील तळावर पाच रफाल विमाने भारतीय सैन्यदलांत अधिकृतरित्या सामील केली जात आहेत या कार्यक्रमास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, एअर चीफ मार्शल आर.के. भदोरिया यांनीही हजेरी लावली आहे हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “या कार्यक्रमादरम्यान राफेल विमानाचे औपचारिक अनावरण केले जाईल. त्यानंतर ‘सर्व धर्म पूजा’ केल्यावर रफाल आणि तेजस परिक्रमा करतील रफाल हे दोन इंजिन असलेलं अनेक कामं करू शकणारं मध्यम आकाराचं लढाऊ विमान आहे. हवेतून मारा करणं, हवेतल्या हवेत इंधन भरणं, अण्वस्त्राचा हल्ला झाल्यावर संरक्षण, लक्ष्याच्या हालचाली टिपणं त्यांच्यावर अचूक मारा करण्याची क्षमता ही राफेलची वैशिष्ट्यं आहे

 

 

दोन ट्रकच्या अपघातात मानि्ंगवाकला गेलेला एक युवक ठार, एक जखमी
देवरी,दि.10ः-येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील आमगावकडे जाणार्या चौकात आज सकाळी सहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मार्निगवाँकला गेलेल्या युवकाचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली.सविस्तर असे की नागपूरवरून रायपूरकडे (सीजी 04,जेई0359)भाजीपाला घेऊन जाणार्या ट्रकने आमगावकडून नागपूरकडे जनावरे घेऊन जाणार्या ट्रकला आमाेरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडला.हा अपघात एवढा मोठा होता की मार्निगवाँककरीता निघालेला एक युवक भाजीपाला असलेल्या ट्रकच्या चाकात आल्याने त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

जनविकास संघटना महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा पार्थ पवार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हा प्रमुख साईनाथ गिरी आणि राष्ट्रवादी वसमथ विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांचा वतीने हयातनगर चे भावी सरपंच काशिनाथ पाटील सारंग यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

जनविकास संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा पार्थ पवार फाऊंडेशन चे हिंगोली जिल्ह्याचे प्रमुख साईनाथ गिरी तसेच वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू भैया नवघरे यांचा वतीने हयातनगर चे भावी सरपंच तथा वसमत तालुक्याचे पुण्यनगरी चे प्रतिनिधी काशिनाथ पाटील सारंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळेस जिल्हाध्यक्ष साईनाथ गिरी, मन्मथ बावगे, संतोष राऊत,दशरथ सारंग,गोविंद सारंग,गजानन रहतीकर,किशन गिरी,द्यानेश सोळंके,गजानन देशखरे, दत्ता कदम,योगेश सोळंके आदी उपस्थित होते

 

देवरी SBI शाखा प्रबंधकाची ग्राहकाला दिली धमकी, ग्राहकाने केली तक्रार

 

देवरी,दि.10ः-: येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखा प्रबधंकाच्या व्यवहाराने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून शाखा प्रबधकांच्या वाढलेल्या दादागिरीमुळे बँकेची पत घसरू लागली आहे.तालुक्यातील एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा असलेल्या देवरीतील बँकेत जनता बहूउद्देशीय संस्था द्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सुरतोली/ लोहाराचे खाते आहे.खातेदार संस्थेचे संचालक राजकुमार मडामे यांनी नागपूर विद्यापीठाला डीडीच्या माध्यमातून द्यावयाच्या रकमेसाठी महाविद्यालयीन कामकाजाचे डिमांड ड्राफ बनविण्याकरीता २४ ऑगस्ट २०२० रोजी ३१५०रु २८२१ रु व ७५०रुपयाचे चेक दिले.त्याच दिवशी त्या रकमेचे डीडी देणे बंधनकारक असताना बँक प्रबंधकाने मात्र डीडी तयार न करता आधी आणलेली रोख नाकारत चेक मागितले.चेक दिल्यानंतरही २४ ते ३० ऑगस्ट पर्यंत डीडी न देता जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत ३१ ऑगस्टला फोन करून डीडी दिली.शिक्षण संस्थाचालकाला डीडी उशीरा मिळाल्यामुळे रा.तू .म विद्यापीठाने ७०००रु चे अतिरिक्त शुल्क महाविद्यालयाला भरावयास भाग पडले.वेऴेवर डीडी न मिळाल्यामुळे आपणावर भुर्दंड बसल्याचा शाखा प्रबंधकाला विचारले असता सदर बँक प्रबंधकाने दादागिरी करत खातेदार असलेल्या ग्राहकालाच शिविगाळ करीत बँकेतून बाहेर काढण्याची धमकी देत ग्राहकाचा अपमान केला. या सर्व प्रकरणाची तक्रार खातेदार असलेले संचालक राजकुमार मडामे यांनी नागपूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य प्रबधंकाकडे केली असून त्यावर काय कारवाई केली जाते,याकडे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे यापुर्वीही तत्कालीन आमदार संजय पुराम यांनीही एकदा सदर प्रबंधकाची कानउघाडणी केली होती,त्यानंतरही त्यांच्यात काहीही सुधारणा झालेली दिसून येत नाही.

शिवसेनाची आता झाली सोनिया सेना- कंगना

 

मुंबई शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. तसंच आताही दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. दरम्यान, कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल करत शिवसेनेची आता सोनिया सेना झाल्याचं म्हटलं आहे. बुधवारी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही कंगनानं पालिकेवर आणि सरकारवर निशाणा साधला होता.

“ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा पाया रचला, तिच विचारधारा विकून शिवसेना सत्तेसाठी सोनिया सेना बनली आहे.
ज्या गुंडांनी माझ्या नकळत माझं घर तोडलं, त्यांना स्थानिक प्रशासकीय संस्था म्हणू नका. संविधानाचा इतका अपमान करू नका,” असं कंगना म्हणाली. तिनं ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख

“उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं.फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडून तुम्ही बदला घेतला आहे. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. हे वेळेचं चक्र आहे, नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं हे मला आज कळालं. आज मी या देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्या नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार. आपल्या देशवासियांना जागरुक करणार. ही क्रूरता आणि दहशतवाद माझ्यासोबत झाला हे चांगलं आहे, कारण याचा काही अर्थ आहे. जय हिंद.जय महाराष्ट्र,” असं कंगना बुधवारी मुंबई आल्यानंतर म्हणाली होती.

पालिकेकडून कारवाई

कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. दरम्यान पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली होती. न्यायालयाने पालिकेकडे उत्तरही मागितलं होतं.

गोंदिया. विद्यमान जिल्हा दंडाधिकारी डॉ. कदंबरी बलकवडे यांनी दोन वर्षे पूर्ण मुदत संपल्यानंतर प्रशासकीय प्रक्रियेअंतर्गत, September सप्टेंबर २० रोजी, त्यांची जागा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी म्हणून घेण्यात आले. वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना नियुक्त करण्यात आले आहे. हे लक्षात घ्यावे की जिल्हा दंडाधिकारी श्रीमती बालकवडे सध्या कोरोनाद्वारे अडथळा आणत आहेत. कोरोनामधून बरे झाल्यानंतरच त्यांची बदली प्रक्रिया इतरत्र शक्य आहे.
गोंदियाचे नवीन जिल्हा दंडाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणारा आयएएस दीपक कुमार मीणा मूळचा राजस्थानच्या जयपूरचा रहिवासी आहे. श्री मीणा हे २०१ B बीचचे आयएएस अधिकारी आहेत. २०१ Maharashtra मध्ये ते महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे (महानंदा) प्रशासकीय संचालक आणि माजी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत आहेत, अनेक महत्त्वाच्या पदांव्यतिरिक्त ते २०१ since पासून वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
श्री मीणा लवकरच गोंदिया जिल्हा दंडाधिकारी म्हणून वाशिम जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद दुसर्‍या अधिकाऱ्याकडे  सोपवल्या

धानोरा येथे आढळला अनोळखी मृतदेह

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा शिवारात आढळला अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी धानोरा येथील रहिवासी रघुनाथ सुरपातणे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिली की की माझ्या शेतात मका पिकात कुजलेला मृतदेह आढळला आहे सदर व्यक्ती हा माझा परिचयाचा नाही त्यावरून पोलीस स्टेशन नी चौकशी केली असता सदर व्यक्तीच्या शेतात मका पिकात कुजलेला मृतदेह आढळला मृत व्यक्ती अनेक दिवसापासून मृत झालेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पुढील तपास पोलीस पीएसआय सागर भारस्कार व पोलिस हेडकॉन्स्टेबल गव्हाळे करीत आहेत

शैक्षणिक कामाकारीता आवश्यक असलेल्या शालेय कागदपत्रे देण्यास पैशाची मागणी करीत कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

 

करणाऱ्या इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था बुलडाणा द्वारा संचालित कृषी तंत्र निकेतन विद्यालय मलकापूर या संस्थेविरूध्द कारवाई करून त्या विद्यार्थीनीस पुढील शिक्षणाकरीता आवश्यक असलेली कागदपत्रे तात्काळ देण्यास विद्यालयास निर्देश देण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी आज ९ सप्टेंबर रोजी शिक्षणाधिकारी बुलडाणा यांच्याकडे तहसीलदार मलकापूर यांचे मार्पâत एका निवेदनाद्वारे केली आहे. शालेय कामाकरीता शालेय
निवेदनात नमूद आहे की, इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था बुलडाणा द्वारा संचालित कृषी तंत्र निकेतन विद्यालय मलकापूर या संस्थेमध्ये कु.पल्लवी शिवसिंग हळदे रा.भालेगाव ही विद्यार्थीनी शिक्षण घेत होती. तिचा ३ वर्षाचा असलेला कोर्स पुर्ण झाला असून ती पास झाली आहे. त्यामुळे तिला पुढील शैक्षणिक कामाकारीता व पुढील शिक्षणाकरीता तिला शालेय कागदपत्रांची आवश्यकता आहे. मात्र विद्यालयातून तिला शालेय कागदपत्रे देण्यास शालेय फी ६५ हजार रूपयांची मागणी करण्यात येत असून जोपर्यंत पैसे भरत नाही, तोपर्यंत कागदपत्रे देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. सदर विद्यार्थीनीने शैक्षणिक स्क्वॉलरशिप करीता अर्ज केला होता, मात्र तिला स्क्वॉलरशिप एकाही वर्षाची मिळाली नाही. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत हलाकीची असून कुटुंबाचा उदरनिर्वाह हा मोलमजुरीवर चालतो. शिवूâन कुटुंबासाठी काहीतरी करण्याची इच्छा तिची असलीतरी विद्यालयाच्या अशा प्रकारे अडवणुकीमुळे तिच्यावर पुढील शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
तेव्हा तिच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा याकरीता तिला शालेय कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करणाNया शैक्षणिक संस्थे विरूध्द कडक कारवाई करण्यात येवून तिला तात्काळ कागदपत्रे देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी केली आहे.
निवेदनावर अजय टप यांच्या सह संतोष जाधव, निलेश चोपडे, अमोल बावस्कार, अजित पुंâदे, शुभम घुले, महेश हळदे, शिवसिंग हळदे, शितल जांगडे, संजय इंगळे, बलराम बावस्कर, उमेश जाधव, शालीकराम पाटील आदींच्या स्वाक्षरीया आहेत.

आशिया खंडातील मुलींच्या पहिल्या शाळेला “राष्ट्रीय स्मारक” घोषित करा…

 

 

अन्यथा आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती , महात्मा फुले ब्रिगेड, फुलेंप्रेमी व विविध संघटना कडून आंदोलनाचा इशारा….

अडगांव बु प्रतिनिधी :दिपक रेळे

 

तेल्हारा दि. 8 सप्टेंबर , २०२० गुरुवार रोजी अशिया खंडातील मुलींची पहीली शाळा वाचविण्यासाठी व राष्ट्रीय स्मारक घोषीत करावे यासाठी “आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती, महात्मा फुले ब्रिगेड ,समस्त फुले प्रेमी वतीने मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व माई सावित्रीआई फुले यांनी सुरू केलेल्या देशातील पहीली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे हे ठिकाण शासनाने तात्काळ भूसंपादीत करून “राष्ट्रीय स्मारक ” म्हणुन घोषीत करून विकसीत करावे देशातीलच नव्हे तर संपुर्ण आशिया खंडातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा प्रसिद्ध आहे. राष्ट्रपिता – सत्यशोधक – तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी १ जानेवारी , १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू केली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहचविली. ज्या फुले दाम्पत्यांनी अनेक अडी- अडचणींचा सामना करून , शेण – माती – चिखल विरोध पत्करून बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी केली.आज त्या भिडेवाड्यातील शाळेची अवस्था खुपच दयनीय झालेली आहे. हे तमाम फुले प्रेमींसाठी वेदनादायक आहे
सदरील जागा शासनाने लवकरात लवकर भूसंपादीत करून त्या वास्तुला राष्ट्रीय स्मारक म्हणुन घोषीत करून विकसीत करावे अन्यथा शासनाच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्रात ” आईसावित्री माई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती व समस्त फुले प्रेमीं “च्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल यांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी……

मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देतांना महात्मा फुले ब्रिगेड व आईसवित्री माई फुले स्मारक संघर्ष समिती द्वारे अजय दादा बंड यांचा नेतुरत्वात निवेदन देण्यात आले त्या वेळी मार्गदर्शक म्हणून लखनदादा राजनकार, गजाननभाऊ उंबरकार, महेंद्र भोपळे यांचा मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले.
महात्मा फुले ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय बंड़, ऋषिकेश निमकर्डे(तालुका अध्यक्ष) रोशनभाऊ बोंबटकार( ता.उपाअध्यक्ष)
अनंता निमकर्डे, सोनुभाऊ भड, वैभवभाऊ राऊत, गोपालभाऊ बंड, स्वप्नील झगडे,प्रशांत रत्नपारखी,विनोद अढाउ, गणेश लाघे, विद्याधर भारसाकले, उमेश राखोंडे, प्रफुल आमले,सचिन तायडे,प्रशांत उमाळे,अनिल इंगळे,धीरज लोणकर गणेश भाऊ इंगोले,श्रीकृष्ण कवर सह
समस्त फुलेप्रेमी उपस्थित होते. सदर निवेदन शासनाच्या नियमात राहुन , मास्क लावुन देण्यात आले.

आदिवासी आश्रम शाळा अडगांव बु तर्फे शाळा आपल्या दारी

 

अडगांव बु प्रतिनिधी: दिपक रेळे

तेल्हारा तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळा अडगांव बु येथे डॉ.जगन्नाथजी ढोणे माजी आमदार यांनी आदिवासी विद्यार्थ्याकरिता इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षकाची सोय उपलब्ध करून दिली आहे . परंतु कोरोना काळात शिक्षण संस्था बंद असल्याने खाजगी शाळांनी शिक्षण सुरू केले आहे . परंतु आदिवासी पालकांकडे स्मार्ट फोन नसल्याने त्यांच्या पाल्यांना अडचणी निर्माण होत आहेत . ही बाब लक्षात घेउन संस्था अध्यक्ष डॉ.जगन्नाथजी ढोणे प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे तसेच प्राचार्य संजय निमकर्डे . प्राथ . मुख्याध्यापक श्री.जी.डब्ल्यु.अपाले हयांच्या प्रेरणेतुन ” शाळा आपल्या दारी ” हा उपक्रम सुरू केला आहे.हया शाळेत शिक्षण घेत असलेल्या विविध गावातील विद्यार्थ्याच्या दारी जाउन शिक्षक या उपक्रमाअतर्गत शिक्षणाचे धडे घेत आहेत . दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क सुविधा नसणा – या गावामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने पालकामध्ये विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे . अनु.आदिवासी आश्रम शाळा अडगांव बु . येथील विद्यार्थ्याकडे स्मार्ट फोन घेण्याची सोय नाही . त्यामुळे ते ऑनलाईन शिक्षण घेउ शकत नाही . त्यावर पर्याय म्हणुन शाळा प्रशासणाने शाळा आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला.शाळा बंद कालावधीत आदिवासी विद्यार्थ्याच्या घरापर्यंत शिक्षण या माध्यमातुन अनु . आदिवासी आश्रम शाळा अडगांव बु . ता . तेल्हारा जि.अकोला येथील शाळेतील शिक्षकांनी मुलांचे गावे दत्तक घेउन त्या गावात जाउन ऑफलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे . या उपक्रमामध्ये कार्य करित असतांना शिक्षक विद्यार्थी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करित आहेत . शिक्षणासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षक आरोग्य शिक्षणाचे धडे सुदधा देत आहेत . सोशल डिस्टंसिंग ठेवणे मास्क चा वापर करणे , हॅडवॉश तसेच साबनाचा वापर करणे इ.गोष्टी समजावून सांगीतल्या जात आहेत . अशा प्रकारे आश्रम शाळा अडगांव बु . च्या वतील प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे साहेब एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांच्या मार्गदर्शना नुसार शैक्षणिक कामकाज सुरू आहे .