Home Blog Page 660

सुनगाव येथे ग्रामीण कुटा अंतर्गत कोरोना जनजागृती

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी नव्या दिशा संस्थे अंतर्गत क्रेडिट एक्सेस लिमिटेड ग्रामीण कुटा मार्फत सूनगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर जनजागृती करण्यात आली यावेळी कंपनीचे विकास अधिकारी सुपडा बोचरे व त्यांचे सहकारी गणेश बोंबटकार विकास अधिकारी यांनी कोरोना जनजागृती बद्दल माहिती सांगितली त्यामध्ये त्यांनी स्वच्छते बद्दल माहिती दिली व रोजच्या आहारात जीवनसत्त्वे असणारा सकस आहार घ्यावा व घरातील लहान व बुद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी व covid-19 कोरोना बद्दल माहिती दिली यावेळी माजी सरपंच पुंडलिक भाऊ पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण धर्मे ग्राम विकास अधिकारी चौधरीसाहेब व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी हजर होते

जळगाव जामोद तालुक्यातील अवैध धंदे बंद करा नगरसेवकाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

 

जळगाव जामोद तालुक्यातील जनतेच्या सामाजिक संसारिक शांतता सुव्यवस्थेच्या दृष्टीने जळगाव जामोद तालुक्यात काय व धंद्यांना जोर चढला आहे अवैध धंद्यांचा बाजार भरवला जात आहे अवैद्य गुटका , कच्ची पक्की दारू, वरली मटका ,जुगार यांसारख्या धंद्यांना तालुका व स्थानिक पोलिस प्रशासनाच्या व्यक्तिगत आर्थिक हित संबंधाने भ्रष्ट वृत्तीने कोरणा आजार यापेक्षाही अवैद्य भ्रष्ट धंद्यांचा आजार आपल्या जळगाव जामोद तालुक्यात वाढत चाललेला आहे
सध्या संपूर्ण देशात करुणा सारख्या महामारी नेते मन घातले असताना सरकार या मारीला थांबविण्यात व्यस्त असताना या संधीचा फायदा घेत संधीसाधू व भ्रष्ट अधिकारी अवैध धंद्यांचे हप्ते वाढून सर्रास विक्रीची मुभा देतात
आमच्या भागामध्ये शेतीशिवाय अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही त्यामुळे व्यसनाच्या लालसेपोटी लोकांची ऐवजी धंद्याच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात दूध होत असून यामध्ये गरीब व श्रीमंत यांची दरी निर्माण होत आहे शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे लोकांचे जीवन धोक्यात आलेले आहे कौटुंबिक वादाचे वाढते प्रमाण असून घटस्फोटाचे प्रमाण सुद्धा वाढत आहे त्याचप्रमाणे मुलांच्या शैक्षणिक उज्ज्वल भविष्यावर याचा मोठा परिणाम होत चाललेला आहे
भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांमुळे धंद्यांना ऊत आलेला असून गरीब लोकांच्या कुटुंबावर दैवत धंद्यामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे या आर्थिक लालची धोरणामुळे छोटे-मोठे अपघात, भांडणे ,पत्रकारांवरील वाढते हल्ले, यामुळे शांतता व सुव्यवस्था धोक्यात येत असून
अवैध धंदे धारक व पोलीस अधिकारी यांच्या संपत्तीत वाढ होत असून नैवद्य माफियांना अभय मिळत आहे कर्तव्य होणाऱ्या कचऱ्यामुळे अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे असे निवेदनात नमूद आहे
जनतेच्या हिताच्या दृष्टीने व शांतता सोयीच्या दृष्टीने अवैध धंदे बंद करा असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे

चान्नी-पिपंळखुटा महामार्गावर जीव गेल्या वर सुद्धा होतचं आहे वाळूची तस्करी :महसूल विभागाचे दुर्लक्ष

 

नासिर शहा
पातूर प्रतिनिधी

पातुर तालुक्यात लाँकडाऊनच्या काळात सर्वत्र शांतता असताना बहुतांशी व्यवसाय धंद्यामध्ये शुकशुकाट असताना अवैध व्यवसाय मात्र तेजीत असलेल्याचे दिसत आहे.पिपंळखुटा महामार्गावर एक वाहनाने दोन महिलांना उडवले एक जागीच ठार झाली व एक गंभीर जखमी तरी पण वाळू माफिया चे वाहने जोरात चालूच आहेत एका रॉयल्टी वर चार ते पाच ट्रिपा मारत वाहने खूप वेगाने जात आहेत.
एक जीव गेल्या वर सुद्धा काहीच कारवाही झालेली नाही पोलीस प्रशासन या वाळू माफियांना साथ देत आहेत असेही सांगण्यात येत आहेत ही वाळू खूप मोठ्या प्रमाणात उत्खन्न होत आहेत. अवैध व्यवसायात सर्वात जोर धरलेली वाळूची तस्करी रोखण्यात प्रशासन प्रयत्न करत असले तरी वाळूचे अवैध धंदे करणारे शिरजोर झाले असून पिपंळखुटा-चांगेफळ, नदीच्या पात्रात आता रात्रीच्या राजरोसपणे वाळूचा उपसा केला जात आहे.रात्रीच्या अंधारात काढलेली वाळू दिवसाच्या उजेडात लाखो रुपयांना विकली जात आहे.महसूल विभागाने संयुक्त कारवाई करावी हा गोरखधंदा तेजीत वाळत आहे.वाहन चालक मद्यपान करून वाहन चालत आहेत ज्या ठिकाण हुन वाळू उचलली जात आहे तो रस्ता खूप चिखलमय झाले दोन ते तीन घटना त्या ठिकाणी पण झाल्या आहेत किंचित जखमा झाल्या पण पुढे कोणाचे जीव पण जाऊ शकते या साठी जनतेने आवाज उठवायला पाहिजे विशेष कार्यकर्ते पुढारी यांनी पण दखल घेतली पाहिजे काही सांगितलं तर रॉयल्टी आहे असे सांगितले जाते तुमच्या जवळ रॉयल्टी आहे मान्य आहे पण तुम्ही जीवाशी खेळू नका असे
वाळू माफियायांच्या मनात कोणाचाही धाक राहिलेला नाही.
सस्ती,चान्नी-चतारी,पिपंळखुटा, वाहळा,बु, चांगेफळ, खेट्री-शिरपुर उमरा-पांग्ररा,राहेर-अडगांव, व पातुर तालुक्यातील अनेक गावाच्या हदीतून वाळूतस्कर भरदिवसा वाळू तस्करी करीत आहेत,काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे वाळू उपसा करण्याच्या तक्रारी ऊतावळी नदी काठचे गावकरी करीत असतात.परंतु पातुर महसूल पथक,पोलीस पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तस्करी रोखण्यासाठी जातात मात्र ठोस कारवाई होत नसल्याने हे व्यवसाय बंद करण्यात यावे असे पिपंळखुटा-चान्नी ग्रामस्थाचे आवाहान आहे.महसूल विभागाने यांच्याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.

मलकापूर शहरातील सिंधी काॅलनीत सुरू असलेले चांडकाई यांचे अवैध बांधकाम न.प.प्रशासन पाडणार का.

 

बांधकाम मालक आणि न.प अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याच्या चर्चेला उधान..

प्रशासनाच्या तिजोरीस चुना लावणारे अवैध बांधकाम करणारे महाशयाची वाढली मजल..

मलकापूर:- बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये अवैध बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.तर धक्कादायक म्हणजे या ठिकाणी नगरपालिकेची कुठलीच परवानगी न घेता तब्बल ५ महिन्यांपासुन हे बांधकाम सर्रास पणे सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव्य समोर आल्यावर ही बांधकाम मालक हा नगर पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना न जुमानता आपले बांधकाम न थांबवता अतिशय जलद गतीने उरकवत आहे.एवढेच नव्हे तर या महाशायाने आपल्या जागेसमोर असलेला नवीन सिमेंटचा सरकारी रस्ता खोदुन त्यावर बांधकामासाठी लागणारी लिफ्ट उभी केली आहे,
नगर पालिका प्रशासनाकडे यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होऊन सुद्धा कारवाई होत नसल्यानं या प्रकरणी अधिकारी व बांधकाम मालकांमध्ये साटलोट असल्याची चर्चा आता शहरात जोरात रंगू लागली आहे.तर नगरपालिका या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन कारवाई करून आपला हटोडा चालवणार का…किंवा साटेलोटे असल्याने दुर्लक्ष करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे…
तर शहरातील सिंधी कॉलनी येथील चांडकाई यांचे गेल्या 5 महिन्यांपासून घरांचे बांधकाम सुरू आहे.याप्रकरणी नगरपालिकेमध्ये दोन तक्रारी देखील दाखल झाल्या आहे.मात्र या प्रकरणी अद्यापही या अवैध बांधकाम मालकावर कारवाई होत नसुन नगर पालीका या कारवाई कडे डोळेझाक का करित आहे.असा प्रश्न आता सर्वसामान्यातुन ऐकायला मिळत आहे.तर याप्रकरणी न.प.अधिकारी यांना विचारणा केलि असता आम्हाला ईतरही कामे असतात. वेळ मिळाला तर नक्कीच कारवाई केली जाईल होईल.आपणही मला काम करू द्यावे.अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देत वरीष्टांचे आदेश नसल्याचे सांगत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय…तर न.प या बांधकाम मालकावर कारवाई का करीत नाहीये याचे कारण मात्र उद्यापही गुलदस्त्यात आडकुन असलं तरी मलकापूर नगर पालिका ही चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्यासाठीच आहे का असा सवाल उपस्तीत होत आहे,

सूनगाव ग्रामपंचायत प्रशासकपदी श्री पी एच राजपूत रुजू

गजानन सोनटक्के
तालुका प्रतिनिधी
जळगाव जा

सुनगाव ग्रामपंचायत प्रशासक पदी श्री पी एच राजपूत रुजू जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत सर्वात मोठी असून सदस्यसंख्या 17 आहे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा कार्यकाल आज दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी संपुष्टात येऊन पंचायत समिती जळगाव जामोद चे विस्तार अधिकारी श्री पी एच राजपूत हे आज रुजू झाले त्यांचा सत्कार सरपंच विजयाताई पाटील यांनी शाल व श्रीफळ देऊन केला तसेच सरपंच विजयाताई पाटील यांचा निरोप समारंभ प्रशासक यांनी शाल श्रीफळ देऊन केला यावेळेस पुंडलिक पाटील गजानन धुळे ग्राम विकास अधिकारी टी जी चौधरी व ग्रामपंचायत कर्मचारी हजर होते पहिल्या दिवशी बोलताना प्रशासक म्हणाले की कामाबद्दल कोणत्याही कर्मचाऱ्यांनी कामाबद्दल दिरंगाई दाखवू नये व कायद्याचे पालन करावे

लम्पी आजाराच्या निर्मूलना साठी उपाय योजना करा – राम पाटील

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

संपूर्ण राज्यात थैमान घातलेल्या ‘लम्पि’ या आजाराने वाशिम जिल्ह्यातील अनेक जनावरे बाधित झाली असून या आजाराला आळा घालण्यासाठी तालुका स्तरावर उपाय योजना करण्यात याव्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने पशुसंवर्धन तालुका अधिकारी याना निवेदन देण्यात आले.
जनावरांच्या शरीरावर गाठी येऊन ताप येणे, चारा न खाणे , नाक व डोळ्यातुन पाणी येणे , यासारखी लक्षणे दिसून लम्पि या विषाणू जन्य आजाराच्या मोठ्या प्रमाणात जनावरांना लागण होत आहे . त्यामुळे पशुपालक शेतकरी मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत . तालुक्यातील प्रत्येक उपकेंद्रा वर शिबिर घेऊन शेतकऱ्यांना माहिती व उपाय काय आहेत याची जाणीव करून देण्यात यावी या आजारावर प्रतिबंधक असलेली ‘गोट फॉक्स’ ही लस मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी . तालुका स्तरावर तसेच उपकेंद्रावर नियुक्तीस असलेल्या पशुधन विकास अधिकारी , कर्मचारी यांना ग्रामस्तरावर सर्वे करून उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात याव्या यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष युवक राम पाटील बोरकर , शहर संघटक राहुल डांगे , शो. मी. ता. अध्यक्ष मयूर हिवाळे , तालुका उपाअध्यक्ष अजय बोडखे , अभिषेक देशमुख,राहुल डांगे ,ऋषिकेश देशमुख ,उमेश राईटकर , रवी गाडे , समाधान गाडे , सचिन गाडे , गणेश माने , ज्ञानेश्वर कांबळे ,अमोल डांगे ,संतोष पाटील ,शुभम कदम , समाधान खळबर ,अभिषेक कोरडे , पवन खोडके , वैभव कांबळे , विश्वास चव्हाण ,भगवान राऊत, अविनाश पाटील , महादेव पाटील , विष्णू मुंडे ,आशिष चोपडे , भगवान पाटील , गोरख डांगे , शिवराज , खिराडे , राजेश पडगान , बाळासाहेब बोडखे , सतीश पाटील , यांची उपस्थिती होती .
यावेळी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी केंद्रे मॅडम यांनी लम्पि या आजारा संदर्भात शेतकऱ्यांनी घाबरून न जाता लक्षणे दिसताच प्राथमिक उपचार करावेत व तीव्र लक्षणें असल्यास जवळच्या आरोग्य केंद्रातुन उपचार करून घ्यावेत आजारी असलेल्या जनावरांना इतर जनावरणापासून वेगळे ठेवण्यात यावे अशी माहिती दिली.

अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत कोंटी येथे शेतकऱ्यांचे ऊस पिकांचे नुकसान

 

नांदुरा तालुक्यात गेल्या काही दिवसापासून परिसरात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने तालुक्यातील कोंटी. येथील कामिनी बाई प्रल्हाद ठोंबरे या शेतकऱ्यांचे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्याची पाहणी करून कृषी विभागाने पंचनामा करून शेतकऱ्यांला मदत करण्याची वेळ निर्माण झाली आहे या नुकसानीमुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे . काही दिवसा आधी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी सोयाबीन मका ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे कपाशी पिकावर मावा तुला बोंड अळीचे चित्र दिसून येत आहे . अचानक जोरदार पावसामुळे पावसाने उडीद सोयाबीन मूग या पीकांची शेतकऱ्याची आधीच नासाडी झाली आहे कपाशी पिकांचे पात्या फुलं गळून पडत असून त्यामध्ये अळीने थैमान घातले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे चे चित्र दिसून येत आहे शेतकरी हा आधीच कोरोनामुळे त्रस्त झालेला आहे अशातच लागून बसलेली पावसाची झडी या झडीमुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादनासाठी मोठा झटका बसणार आहे या सर्व प्रकारामुळे या शेतकऱ्याला तात्काळ शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे व कृषी विभागाने कृषी सहाय्यक यांनी झालेल्या नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी . जिल्हा परिषद सदस्य डॉ गोपाळ गव्हाळे . भाजप नेते श्री शांताराम बोधे .श्री संजय ठोंबरे . यांच्यावतीने होत आहे . .

जळगाव ते जामोद रोडचे काम निकृष्ठ दर्जाचे

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव ते जामोद या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून चालू होते या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता तसेच भ्रष्टाचार बोळकावल्याने या रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे तसेच हे काम करताना ठेकेदाराने व बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालू होते यामध्ये जळगाव ते सुनगाव या सहा किमी रोडचे काम हे आता तीन महिने अगोदर झालेले आहे हे जळगाव ते सुनगाव रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या रस्त्यावरील अंथरलेले डांबर चे कोटिंग पूर्णता उखडून गेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे ज्यावेळेस ह्या रोड चे काम चालू होते त्यावेळी गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी या निकृष्ट दर्जाच्या रोजच्या कामाला विरोध केला होता परंतु ठेकेदार व अधिकारी यांनी त्यांचा विरोध झुगारून रोडचे काम सुरू ठेवले होते याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी या रोडच्या कामातील काही मोठी रक्कम कमिशन स्वरूपात घेतल्याचे बोलले जात आहे त्यामुळेच या रोडवर कोणत्याच अधिकाऱ्यांचे नियंत्रण नव्हते त्यामुळे हा रोड अवघ्या तीनच महिन्यात पडलेला आपणास दिसत आहे गावातील काही सुज्ञ नागरिकांनी याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिनांक आठ सप्टेंबरला रोडचे काम करणारे अधिकारी व ठेकेदार यांच्या तक्रारीचे सुद्धा निवेदन दिले आहे निवेदनामध्ये सुनगाव ते जळगाव या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम गेल्या तीन महिने अगोदरच झाले आहे व पहिल्या पावसामध्ये या रोडवरील पुर्ण उघडुन रोडच्या साईडला पडलेली आहे व जागोजागी या रोडच्या खड्डे सुद्धा पडले आहेत सदर रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाच्या बनविल्याने रोडची दयनीय अवस्था बघायला मिळत आहे तसेच रोडवरील निघालेल्या गिट्टिमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे तरी निवेदनाद्वारे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची आमच्या समक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई व पुन्हा या रोडची दुरुस्ती करण्यात यावी व संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद यांना देण्यात आले आहे सदर निवेदनावर पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण धर्मे, कृषी मित्र मोहन सिंह राजपूत, पत्रकार गजानन सोनटक्के, गजानन देशमुख, गजानन कोथळकर संदीप धर्मे,महेश बोरले,रामेश्वर ठोसर,विष्णु येउल,प्रविण कपले, राजु खोंड, शालीग्राम भगत,महेश घोलप,योगेश घोलप,राजाराम धुळे यांच्यासह बहुसंख्य नागरिकांच्या सह्या आहेत.

चान्नी येथील दिव्याग लाभार्थ्यांना पाच टक्के निधी देण्यात टाळा टाळ !

 

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाची पायमल्ली संबधीताचे दुर्लक्ष

नासिर शहा
पातू प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील चान्नी येथे दिव्यागाणा पाच टक्के निधी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप दिव्याग लाभार्थ्यांना कडून होत आहे.
पाच टक्के निधी मिळवण्यासाठी दिव्याग्या लाभार्थ्यांनी संबंधित वरिष्ठ ग्रामपंचायत कडे निवेदन दिले परंतू संबधीताकडून तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे दिव्याग्य लाभार्थ्यांना उपास मारीची वेळ आली आहे.
ग्रामपंचायत मध्ये अनेक वेळा निधी जमा झाला परंतु लाभार्थ्यांना त्यांच्या दरकाचे पाच टक्के निधी देण्याची तरतूद देखील ग्रामपंचायत कडून करण्यात आली नाही.जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नगर पालीका स्तरावर दिव्यागाचा पाच टक्के राखीव निधी खर्च करण्यात अलटिमेट पालकमंत्री बच्चु कडू भाऊ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्ह्यातील गट विकास अधिकारी यांना दिले होते. गेल्या जुलै महीन्या मध्ये जिल्हा अधिकारी कार्यालया सभागृहात एका बैठकीत दिव्याग लाभार्थ्यांयांच्या पाच टक्के निधी पंधरा दिवसात देण्यात यावा अश्या संबंधीतावर निलबताची कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देखील पालकमंत्री यांनी दिला.
परंतु चान्नी येथील दिव्याग लाभार्थ्यांना पाच टक्के पालकमंत्री बच्चु भाऊ कडू यांच्या आदेशाची पायमल्ली होत आहे.पालकमंत्री बच्चु भाऊ कडू जिल्ह्यातील गोर गरीबाची आक्रमण मुमीका घेऊन संबंधित अधीकाऱ्यांना निदेश देतात परंतु त्यांच्या आदेशाची पायमल्ली करून येत आहे.त्यामुळे चान्नी येथील दिव्यागाचे नाराजीचे सुर उमटत आहे.तसेच पालकमंत्री बच्चु भाऊन कडून दिव्यांग जनतेला खुप अपेक्षा आहे.त्यांनी या गंभीर बाबी कडे तज्ञ देऊन दिव्यागाणा त्यांच्या हक्काचा निधी मिळऊन देण्यासाठी संबंधीताना आदेश दयावे

पोलिस अधीक्षकांच्या पथकाची जूगार अड्यावर धाड

 

तामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एस पी च्या पथकाने तिसर्यांदा केली कारवाई.

अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ भूजबळ पाटील यांच्या आदेशान्वये संग्रामपूर तालुक्यात तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संग्रामपूर तालुक्यात एकलारा ( बानोदा ) शिवारातील एका शेतात दि. ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ए. पी. आय गजानन वाघ यांच्या नेतृत्वातील पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकली आहे. या धाडीत २५ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २५ हजार २० रूपये रोख रक्कम तर ८७० रूपांचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार एकलारा (बानोदा) शिवारातील एका शेतात मोठ्या प्रमाणात जुगार सुरू होते. यासंदर्भात गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली. त्यांनी पथकाला संग्रामपूर तालुक्यात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर धाड टाकण्याचे आदेश दिले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने एकलारा शिवारात धाड टाकली असता शेतामध्ये जुगार खेळत असतांना संतोष गिरी, सचिन राऊत, शेख सादिक, साहेबराव कोकाटे, अशोक बावस्कार, राजेश चोपडे, भागवत अस्वार, संजय बोदडे या ८ आरोपींना अटक केली आहे. यापूर्वीही दोन वेळा तामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने कारवाई करून स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. रविवारी रोजी तिसऱ्यांदा तामगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करण्याची आली आहे.

 

एस पी साहेब जरा सोनाळा पोलीस स्टेशनकडेही लक्ष द्या.

नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात बहुचर्चेत असलेल्या सोनाळा पोलिस स्टेशनचाच कारभार सद्यस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाहेर गेला आहे. पोलिस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचाय्रांमध्ये  कोणताही समन्वय नाही. त्यामुळे ज्यांनी वाद सोडवायचे, लोकांना न्याय द्यायचा, त्यांचीच अंतर्गत कुरबुर आणि वाद पोलिस स्टेशनच नव्हे जिल्हाभर चव्हाट्यावर येत आहेत.  कर्मचाय्रांवर ठाणेदारांचा कोणताही एक अंकुश नसल्याचे निदर्शनास येताच, परिसरातील अवैध धंद्यांनी तसेच गौण खनिज माफीयांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तामगाव पोलीस स्टेशन प्रमाणेच सोनाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पथकाकडून कारवाई होणे गरजेचे झाले आहे.