Home Blog Page 685

आज राजे प्रतिष्ठान हिंगोली जिल्हा संघटक पदी नियुक्त्या करण्यात आल्या

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

आज राजे प्रतिष्ठान हिंगोली जिल्हा संघटकपदी श्री.नागनाथ नारायण पुरी यांची नियुक्ति करण्यात आली.यावेळी* श्री.प्रल्हादराव जाधव ( मराठवाडा विभागीय अध्यक्ष राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) व अंकुश गिरी सोशल मीडिया अध्यक्ष हिंगोली जिल्हा व बालाजी दळवी आदी याच्या अध्यक्ष ते खाली श्री,नागनाथ पुरी याची हिंगोली जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली

 

 

अकोट कोविड ‌सेंटर‌ समस्याचा विळाख्यात
एकीकडे ‌महाराष्ट्र सरकार ‌कोरोना ‌रुग्ण साठी हव्या त्या ‌सुविधा ऊपलब्ध ‌करत असताना रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी सरकार ‌भर देत ‌असताना मात्र अकोट कोवीड‌ सेंटर रुगणाचे जेवनाचे , नाश्तायाचे हाल करत आहे मेस वाला तळलेलेया ‌तेलाचा ‌नाश्ता ‌, सकाळच्या पोळ्या ‌संध्याकाळी जेवनात देत आहेत तसेच संडास,‌बाथरुम,पाण्याची व्यवस्था नाही वापरण्याचे पाणी ‌हे‌‌ रुग्णाना बाहेरुन टंकरने आणावे लागत आहे‌‌ तहसिलदार साहेब यानी जातीने लक्ष देण्याचे लोकजागरचे ‌मंच‌‌चे‌‌ तेल्हारा तालुका‌अध्यक्ष यांनी मागनी‌ केली‌

वरिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची अनुदानाची मागणी

 

 

महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक कर्मचारी संघटनेच्या वतीने वरीष्ठ महाविद्यालयाना अनुदान मिळावे या मागणीसाठी अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेंश नेवाल याना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
कायम विनाअनुदानित वरीष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी असे आंदोलन व निदर्शने करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर अमरावती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्रचे राज्यपाल,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री संबंधिताना निवेदन अमरावती चे जिल्हाधिकारी यांचे मार्फत मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे. २००१ नंतर च्या कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाचा “कायम” शब्द वगळून प्रचलित नियमानुसार टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात यावे व आमचा २० वर्षांपासूनचा विनावेतनाचा प्रवास थांबवावा अशी या आंदोलन कर्त्याची प्रमुख मागणी आहे
१९ जुन पासून अर्थात ८० दिवसापासून संघटनेच्या वतीने घरबैठे आंदोलन सुरू आहे मात्र ८० दिवसानंतरही शासनाने अद्यापही या मागणीकडे लक्ष केंद्रित केले नाही .निवेदन देतेवेळी संघणेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. राहुल तट्टे डॉ पांडुरंग टिपरे, डॉ. नरेश इंगळे, पद्माकर नागपुरे, संतोष नागपुरे डॉ मेघा सावरकर, प्रा सुषमा थोटे, रामकृष्ण नागपुरे सह विविध महाविद्यालयाचे निवडक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते.
शिक्षक दिनी शासनाच्या धोरणाचा निषेध
निषेध !
पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन हा शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी हे गत दोन दशकापासून विनावेतन/नाममात्र मानधनावर विद्यादानाचे कार्य करीत आहे. मात्र या कर्मचाऱ्यांनी अनुदान प्राप्तीसाठी वारंवार निदर्शने, आंदोलने तसेच शासन व संबंधितांना निवेदने सादर केली असतानासुद्धा शासनाने दोन दशकापासून कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही.म्हणून शिक्षक दिनाच्या पर्वावर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या तकलादू आणि कायम विनाअनुदानित धोरणाचा निषेध नोंदविला आहे.
आगामी अधिवेशनात कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा तसेच राज्यातील शिक्षक आमदार यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती आंदोलन कर्त्यानी केली आहे.

मत व्यक्त करताना
*प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे*

अकोट येथे कोरोना वीर पुरस्कार सोहळा संपन्न .

 

अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे

आकोट : 06/09/2020. स्थानिक राजे संभाजी ऍकेडमी अवधुत कॉलॉनि येथे,तानाजी मालुसरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अकोट द्वारा कोरोना वीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून,ना.त. राजेश गुरव, psi पाटेखेडे मॅडम,शिवसेना जिल्हा समन्वयीका माया ताई म्हैसने,शिवसेनेचे मनीष दादा कराळे, चित्रपट निर्माते दीपक गोरे,adv संतोष खवले हजर होते.तर कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी जनसेवेचे कार्य अखंड पणे चालू ठेवले अशा कोरोना वीरांचा या वेळी सन्मान करण्यात आला, त्यामध्ये पो,हे,कॉ.हिम्मत दंदी, डॉ.कापसे, डॉ.पारसकर, डॉ प्रमोद येउलकर, आ सेवक संतोष बुध, प्रवीण चापके, निचळ , अशोक टेकाडे, बी.ए.वावरे, आ,सेविका ज्योती सोळंके, पत्रकार कुशल भगत,राहुल कुलट,दीपक रेळे, योगेश लबडे, सरपंच संजय ताडे,विराट प्रतिष्ठानचे विशाल भगत,क्रांती ग्रुपचे अचल बेलसरे,सुरज वर्मा,शिव छत्रपती साम्राज्याचे ऍड.संतोष खवले,यांना सन्मानित करण्यात आले, तर प्रमुख मार्गदर्शक श्री गुरव साहेब माया ताई म्हैसने,psi अनुराधा पाटेखडे, ऍड संतोष खवले यांनी कोरोना पार्श्वभूमीवर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.राजीव खारोडे सर,शुभम सोळंके, प्रथमेश बोडखे,हरीश गावंडे, प्रज्वल कोरडे,तुषार नांदूरकर,यांनी मोलाचे योगदान दिले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रवीण बोंद्रे, प्रस्थावीक सुरज बुध तर आभार प्रदर्शन आशिष भटकर यांनी केले,कार्यक्रमाचे शेवटी अजिक्य भारत या वृत्तपत्राचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

देवरी ‘-चिचगड मार्गावर खड्डे च खड्डे

 

 

शैलेश राजनकर. गोंदिया प्रतिनिधि

केंद्र व राज्य शासन रस्ते नवीनीकरणासाठी विविध योजनांतर्गत कोटय़वधीचा निधी देतात. मात्र हा निधी रस्यांवरील खड्ड्यांमध्ये जात असल्याचे निदर्शनास येते. देवरी- चिचगड मार्ग हे त्याचेच उदाहरण असुन रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ता शोधण्याची वेळ आली आहे.
देवरी शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक. ६ वर असुन तालुका, पंचायत समिती, कृषी, शिक्षण , प्रकल्प, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधीक्षक आदी महत्त्वापूर्ण कार्यालयांसह आठवडी बाजार व नगरपंचायततीचे ठिकाण आहे.
त्यामुळे तालुक्यातून दररोज हजारो नागरिकांची वद्ळ असते. चिचगड परीसरातुन येणाऱ्या नागरीकांना रस्त्यावरील खड्ड्यामध्ये लहान-मोठे अपघात नेहमीच झाले आहे स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी जन प्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे,
त्यामुळे नागरिकांना शेष व्यक्त होत असुन रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून लवकरात लवकर नूतनीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे.

वान धरणात आता ७४.२७टक्के जलसाठा

 

अकोला बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष वेधण्याऱ्या तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड येथील वान धरणात आता ७४.२७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती वान धरण अधिकारी यांनी दिली या धरणात दर दिड तासांनी १ सेमी ने वाढ होत असल्याने हे धरण उधा पर्यत ७५ टक्के होणार असल्याची माहीती अधिकाऱ्यानी दिली आहे आहेअमरावती जिल्ह्यात झालेले कमी पजन्यमान पाहता धरणात याधरणात सुरुवातीपासूनच पाण्याचा येवा कमी आहे यावर्षी या धरणाचे गेट उघडे करण्याची वेळ कदाचित येणारही नाही परंतु वान धरण हे धरण १०० टक्के भरणार की नाही याबाबतही प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे या धरणावर अनेक गावांचा पाणी प्रश्र्न अवलंबून आहे शिवाय शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होते की नाही हे येणारा काळच ठरवेल

जळगाव तालुका मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी दिले निवेदन

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

 

Covid-19 या महामारी मुळे जाहीर केलेल्या लोकांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती मुळे सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे जीवन उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही मजुरांच्या हाताला काम नाही यामुळे सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे तसेच या लॉकडाऊन मध्ये रस्त्यावर व्यवसाय करणारे छोटे व्यवसायिक यांचे व्यवसाय ठप्प झाले त्यांच्याकडे इतर कोणतीही उपजीविकेचे साधन नसल्यामुळे त्यांचे वर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे सर्व कष्टकरी समाजघटकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्या म्हणजे स्वामीनाथन कमिशनच्या सर्व शिफारशी ची अंमलबजावणी करण्यात यावी ग्रामीण व शहरी भागात रोजगार हमी कायदा लागू करा अंगणवाडी व आशा वर्कर या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर यांना covid-19 च्या कामात लागणारे सुरक्षा साधने देण्यात यावे अतिवृष्टी मध्ये जळगाव संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसाना ची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या छोटे छोटे व्यवसायिकांना साडेसात हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी आणि ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे समाजातील आदिवासी आर्थिक वंचित भटके या समाजातील छोटी छोटी मुले शिक्षणापासून फेकल्या जाऊनही म्हणून शिक्षण हे शाळेतूनच देण्यात यावे अशा मागण्या निवेदन जळगाव तालुका मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय प्रधानमंत्री यांना देण्यात आले निवेदनावर रामेश्वर काळे ज्ञानेश्वर तायडे विजुभाऊ पोहकर सौ सरला ताई सौ सविता ताई चोपडे नाजमा बी वजीर खा वंदना डोंगरदिवे अनुसया वडाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर होते

अभिनेत्री कंगणा रणावत हिचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला!:शिवसेना महीला आघाडी र्तफे!

 

नासिर शहा
प्रतिनिधी

 

अकोला :- शिवसेना महीला आघाडी अकोला कडुन संपर्कसंघटीका वैशालीताई घोरपडे यांच्या मार्गदर्शनात्त जिल्हा संघटीका देवश्री ठाकरे यांच्या नेतृत्वात अभिनेत्री कंगणा रणावत हिचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्र हा मराठी अभियतेचा गड आहे.मुंबईला पाकव्याप्त करिमर असा उलेख करून महाराष्ट्राचा अपमान केला.झाशीच्या राणी तिची तुलना करणारे राम कदम ह्यांचा ही निषेध व्यक्त करण्यात आंदोलन करण्यात आले व तिच्या विरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देण्यात आले.
ह्यावेळी शिवसेनेच्या जोस्ना चोरे जिल्हा संघटीका देवश्री ठाकरे,उपजिल्हा संघटीका निलिमा तिजारे,शुभांगी किनगे,सुनिता श्रीवास,रेखाताई राऊत, शिवसेना शहरप्रमुख अतुलभाऊ पवनीकर,राजेश मिश्रा मंजुषा शेळके,वर्षा पिसोळे,संगीता मराठे,सिमा मोकळकर,पप्पू चौधरी,विशाल कपले,गजानन बोराडे,युवासेना शहरप्रमुख नितीन मिश्रा,संगिता राठोड ,गोपाल बिल्लेवार,रूख्मिनी जाधव शितल वाघमारे,अर्चना मोकळकर,शिवसेनेचे आजी माझी व युवासेनेचे पदाधीकारी कार्यकर्ते व महीला आघाडी कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
.

संग्रामपुर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील सर्वच अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

 

 

आल्याने चिंता वाढली आहे. सोबतच तीन दिवसांपूर्वी या शाखेतील एक अधिकारी पॉझिटिव्ह आला होता. त्यामूळे तीन दिवसा पासून बँकेचे सर्व व्यवहार बंद करून एकूण दहा लोकांचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीला पाठविले होते.दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने स्वॅब तपासणी करणाऱ्या लॅबमध्ये तान वाढत आहे.परिणामी संग्रामपूर येथील बँकेतील लोकांचे रिपोर्ट येण्यास चार दिवस लागले. चवथ्या दिवशी आलेल्या रिपोर्ट नुसार या बँकेतील शाखा व्यवस्थापकासह इतर तीन अधिकारी व अजून एक जण तसेच याच बँकेशी संबधित एक असे सात जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मयुर वाडे यांनी माहिती दिली आहे.सदर बँक चार दिवसांपासून बंद असून आता अजून किती दिवस बंद राहणार हे सद्या तरी सांगता येणार नाही. या मुळे या बँकेत व्यवहार करणाऱ्याची चांगलीच पंचाईत झाली असून वरिष्ठांकडून यावर काही पर्याय काढला जातो का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

डोणगांव मध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे अभियान रॅली

 

बुलढाणातील मेहकर तालुक्यामधील डोणगांव शहरात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडुन आरोग्य अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,जिल्हासह ग्रामीण भागात गेल्या पाच महिन्यापासुन कोरोना विषाणूच्या लढाईत शासन-प्रशासन सर्वोतपरी प्रर्यत्न करतानी दिसत आहेत.पण काही टंगेखोर आजही रसत्यावर मोकाट फिरतांना दिसत असल्याच्या कारणाने ,कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी घरातच थांबणे गरजेचे आहे.
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरीही मेहकर तालुक्यामधील डोणगांव शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. त्यामुळे दि.४ सप्टेंबर रोजी डोणगांव मध्ये आरोग्य विभागाचे वैधकीय अधिकारी डॉ अमोल गवई यांनी डोणगांव मध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य अभियान राबवण्यात येऊन गावातुन अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, या अभियान रॅली मध्ये जिल्हा परिषदचे कृषि सभापती राजेंद्र पळसकर,तर मेहकर पंचायत समिती सभापती निंबाजी पांडव सहभागी होते,व महिला सरपंच सौ उषा खोडके, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी,अंगणवाडी सेविका, मदतनिस,आशा सेविका,आरोग्य विभागाचे डोणगाव मधील सर्व कर्मचारी,आरोग्य सहायक शिवशंकर बळी सह डोणगांव वैधकीय अधिकारी डॉ अमोल गवई,हे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभाकडुन जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सोशल डिशस्टिंगच्या नियमाचे पालन करण्यात आले असता, रॅलीमध्ये विविध फरक जनजागृतीचे आकर्शक दिसत होते,तर आजाराची लक्षणे सांगताना सर्दी, खोकला, ताप, श्वसन प्रक्रियेत त्रास होत असेल तर त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करणे. तसेच हा आजार होऊ नये, म्हणून घ्यावयाची काळजी, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. गार पाणी, थंडपेय, आईसक्रीम तळलेले पदार्थ याचे सेवन करणे टाळावे, अर्धवट कच्चे शिजलेले अन्न खाऊ नये, प्राण्यांचा संपर्कात राहू नये, उघड्यावर थूंकू नये, बाहेरून आल्यावर अथवा शौचास जाऊन आल्यावर हात साबणाने धूणे, शिंक व खोकला आल्यावर तोंडावर रुमाल किंव्हा हात ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे.विनाकारण कुठेही बाहेर फिरु नये,शाररीक संपर्क टाळावा,तर व्यापारीवर्गानी दुकानात गर्दी न करता,ग्राहकांच्या तोंडावर माक्स बांधुन आल्यावरच वस्तु देऊन व्यापार करावा,तसेच सुरक्षित अंतर ठेऊनच राहावे,अशा अनेक आरोग्यसंदर्भात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी डोणगांवआरोग्य विभागाचे वैधकीय अधिकारी अमोल गवई यांनी
अशा प्रकारची काळजी घेणे, अशी माहिती दिली आहे. —