Home Blog Page 704

जळगाव ते जामोद रोडचे काम निकृष्ठ दर्जाचे

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव ते जामोद या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून चालू होते या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता तसेच भ्रष्टाचार बोळकावल्याने या रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे तसेच हे काम करताना ठेकेदाराने व बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालू होते यामध्ये जळगाव ते सुनगाव या सहा किमी रोडचे काम हे आता तीन महिने अगोदर झालेले आहे हे जळगाव ते सुनगाव रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या रस्त्यावरील अंथरलेले डांबर चे कोटिंग पूर्णता उखडून गेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे ज्यावेळेस ह्या रोड चे काम चालू होते त्यावेळी गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी या निकृष्ट दर्जाच्या रोजच्या कामाला विरोध केला होता परंतु ठेकेदार व अधिकारी यांनी त्यांचा विरोध झुगारून रोडचे काम सुरू ठेवले होते याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी या रोडच्या कामातील काही मोठी रक्कम कमिशन स्वरूपात घेतल्याचे बोलले जात आहे त्यामुळेच या रोडवर कोणत्याच अधिकाऱ्यांचे नियंत्रण नव्हते त्यामुळे हा रोड अवघ्या तीनच महिन्यात पडलेला आपणास दिसत आहे गावातील काही सुज्ञ नागरिकांनी याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिनांक आठ सप्टेंबरला रोडचे काम करणारे अधिकारी व ठेकेदार यांच्या तक्रारीचे सुद्धा निवेदन दिले आहे निवेदनामध्ये सुनगाव ते जळगाव या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम गेल्या तीन महिने अगोदरच झाले आहे व पहिल्या पावसामध्ये या रोडवरील पुर्ण उघडुन रोडच्या साईडला पडलेली आहे व जागोजागी या रोडच्या खड्डे सुद्धा पडले आहेत सदर रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाच्या बनविल्याने रोडची दयनीय अवस्था बघायला मिळत आहे तसेच रोडवरील निघालेल्या गिट्टिमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे तरी निवेदनाद्वारे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची आमच्या समक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई व पुन्हा या रोडची दुरुस्ती करण्यात यावी व संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद यांना देण्यात आले आहे सदर निवेदनावर पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण धर्मे, कृषी मित्र मोहन सिंह राजपूत, पत्रकार गजानन सोनटक्के, गजानन देशमुख, गजानन कोथळकर संदीप धर्मे,महेश बोरले,रामेश्वर ठोसर,विष्णु येउल,प्रविण कपले, राजु खोंड, शालीग्राम भगत,महेश घोलप,योगेश घोलप,राजाराम धुळे यांच्यासह बहुसंख्य नागरिकांच्या सह्या आहेत.

चान्नी येथील दिव्याग लाभार्थ्यांना पाच टक्के निधी देण्यात टाळा टाळ !

 

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाची पायमल्ली संबधीताचे दुर्लक्ष

नासिर शहा
पातू प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील चान्नी येथे दिव्यागाणा पाच टक्के निधी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप दिव्याग लाभार्थ्यांना कडून होत आहे.
पाच टक्के निधी मिळवण्यासाठी दिव्याग्या लाभार्थ्यांनी संबंधित वरिष्ठ ग्रामपंचायत कडे निवेदन दिले परंतू संबधीताकडून तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे दिव्याग्य लाभार्थ्यांना उपास मारीची वेळ आली आहे.
ग्रामपंचायत मध्ये अनेक वेळा निधी जमा झाला परंतु लाभार्थ्यांना त्यांच्या दरकाचे पाच टक्के निधी देण्याची तरतूद देखील ग्रामपंचायत कडून करण्यात आली नाही.जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नगर पालीका स्तरावर दिव्यागाचा पाच टक्के राखीव निधी खर्च करण्यात अलटिमेट पालकमंत्री बच्चु कडू भाऊ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्ह्यातील गट विकास अधिकारी यांना दिले होते. गेल्या जुलै महीन्या मध्ये जिल्हा अधिकारी कार्यालया सभागृहात एका बैठकीत दिव्याग लाभार्थ्यांयांच्या पाच टक्के निधी पंधरा दिवसात देण्यात यावा अश्या संबंधीतावर निलबताची कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देखील पालकमंत्री यांनी दिला.
परंतु चान्नी येथील दिव्याग लाभार्थ्यांना पाच टक्के पालकमंत्री बच्चु भाऊ कडू यांच्या आदेशाची पायमल्ली होत आहे.पालकमंत्री बच्चु भाऊ कडू जिल्ह्यातील गोर गरीबाची आक्रमण मुमीका घेऊन संबंधित अधीकाऱ्यांना निदेश देतात परंतु त्यांच्या आदेशाची पायमल्ली करून येत आहे.त्यामुळे चान्नी येथील दिव्यागाचे नाराजीचे सुर उमटत आहे.तसेच पालकमंत्री बच्चु भाऊन कडून दिव्यांग जनतेला खुप अपेक्षा आहे.त्यांनी या गंभीर बाबी कडे तज्ञ देऊन दिव्यागाणा त्यांच्या हक्काचा निधी मिळऊन देण्यासाठी संबंधीताना आदेश दयावे

पोलिस अधीक्षकांच्या पथकाची जूगार अड्यावर धाड

 

तामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एस पी च्या पथकाने तिसर्यांदा केली कारवाई.

अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ भूजबळ पाटील यांच्या आदेशान्वये संग्रामपूर तालुक्यात तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संग्रामपूर तालुक्यात एकलारा ( बानोदा ) शिवारातील एका शेतात दि. ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ए. पी. आय गजानन वाघ यांच्या नेतृत्वातील पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकली आहे. या धाडीत २५ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २५ हजार २० रूपये रोख रक्कम तर ८७० रूपांचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार एकलारा (बानोदा) शिवारातील एका शेतात मोठ्या प्रमाणात जुगार सुरू होते. यासंदर्भात गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली. त्यांनी पथकाला संग्रामपूर तालुक्यात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर धाड टाकण्याचे आदेश दिले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने एकलारा शिवारात धाड टाकली असता शेतामध्ये जुगार खेळत असतांना संतोष गिरी, सचिन राऊत, शेख सादिक, साहेबराव कोकाटे, अशोक बावस्कार, राजेश चोपडे, भागवत अस्वार, संजय बोदडे या ८ आरोपींना अटक केली आहे. यापूर्वीही दोन वेळा तामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने कारवाई करून स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. रविवारी रोजी तिसऱ्यांदा तामगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करण्याची आली आहे.

 

एस पी साहेब जरा सोनाळा पोलीस स्टेशनकडेही लक्ष द्या.

नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात बहुचर्चेत असलेल्या सोनाळा पोलिस स्टेशनचाच कारभार सद्यस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाहेर गेला आहे. पोलिस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचाय्रांमध्ये  कोणताही समन्वय नाही. त्यामुळे ज्यांनी वाद सोडवायचे, लोकांना न्याय द्यायचा, त्यांचीच अंतर्गत कुरबुर आणि वाद पोलिस स्टेशनच नव्हे जिल्हाभर चव्हाट्यावर येत आहेत.  कर्मचाय्रांवर ठाणेदारांचा कोणताही एक अंकुश नसल्याचे निदर्शनास येताच, परिसरातील अवैध धंद्यांनी तसेच गौण खनिज माफीयांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तामगाव पोलीस स्टेशन प्रमाणेच सोनाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पथकाकडून कारवाई होणे गरजेचे झाले आहे.

शेतकऱ्यांना पीक कर्जा बद्दल मार्गदर्शन कृषी दूत शुभम बावस्कार यांनी दिले

 

 

शेतकऱ्यांना पीक कर्जा बद्दल मार्गदर्शन
कृषी दूत शुभम बावस्कार यांनी दिले

पातुर्डॉ येथील कृषी दूत बी एस ऍग्री चा विद्यार्थी शुभम बावस्कार यांनी शेतकर्यांना कृषी कर्जा बद्दल मार्गदर्शन करून त्याला लागणारी कागदपत्रे सांगितली व शेतकरी यांची मदत केली
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जळगाव येथील डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालया मधील कृषी दूत शुभम अशोक बावस्कार यांनी कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम द्वारे पातुर्डॉ बु येथे शेतकऱ्यांना पीक कर्जाबद्दल मार्गदर्शन केले व त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा या करता बँक मध्ये जाऊन पीक कर्जाची संपूर्ण प्रकिया व त्या करिता लागणारे महत्वाचे कागदपत्रे याची माहिती शेतकय्रांना दिली आणि या कार्यक्रमा चे कौतुक बँक शाखा व्यवस्थापक धिरज पाटील, व इतर कर्मचारी यांनी कौतुक केले कृषी अभ्यास दौरा पूर्ण करण्यासाठी शुभम बावस्कार याना प्राचार्य डॉ एस रान पाटील,उपप्राचार्य पी एम देवरे,कार्यक्रम समानव्यय प्रा रा डि फाळके,यांचे मार्गदर्शन लाभले

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या. आमदार संतोषराव बांगर साहेब यांचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना निवेदन

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

हिंगोली जिल्ह्यासह *कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे* व *अतिवृष्टीमुळे सोयाबीन उडीद मूग हळद ऊस व केळी पिकांचे मोठे नुकसान झाले* आहे त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आला असून शेतकरी बांधवांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी *नुकसान झालेल्या पिकांचे भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार संतोषराव बांगर साहेब* यांनी *कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली आहे.*

राज्यस्तरीय हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी खासदार श्री.हेमंत पाटील यांची निवड.

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

हिंगोली: राज्यातील हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.हिंगोली येथे हळद संशोधन आणि प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यात यावेयाकरिता खासदार हेमंत पाटील मागील काही दिवसापासून सतत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. याबाबत राज्य शासनाने 22 जुलै रोजी बैठक आयोजित करुन अभ्यास समिती गठित करण्याचे सांगितले होते. त्यानुसार अभ्यास समिती तयार करण्यात आले आहे.खासदार हेमंत पाटील यांचे सातत्यपूर्ण पाठपुरावा ची ही फलश्रुती म्हणावी लागेल. त्यातील हिंगोली नांदेड बुलढाणा यवतमाळ वाशीम सांगली सातारा चंद्रपूर व परभणी या जिल्ह्यामध्ये हळदीचे पीक जास्त प्रमाणात घेतले. परंतु प्रक्रिया साठवणूक विक्रीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे राज्यातील हळद इतर राज्यांमध्ये निर्यात केली जाते,हळदीच्या लागवडीपासून प्रक्रिया विक्रीपर्यंत सर्व सुविधा राज्यातच उपलब्ध झाल्यास राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल आणि हळद लागवडी पासून प्रक्रिया आणि विक्री पर्यंत येणाऱ्या अडचणी विचारात घेता खासदार हेमंत पाटील यांनी मागील अनेक दिवसांपासून केंद्रीय,संसदीय व वाणिज्य आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच या अनुषंगाने 22 जुलै रोजी राज्यशासनाने बैठक आयोजित करून लवकरच हळद प्रक्रिया आणि संशोधन अभ्यास समिती गठित करण्यात येणार असल्याचे सांगितले होते त्याच बैठकीची फलश्रुती म्हणून अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील यांची तर सचिवपदी कृषी आयुक्तालय पुणे विभाग (फलोत्पादन) संचालक यांची निवड केली आहे. तर सदस्य म्हणून पुणे कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्यासह परभणी, दापोली, राहुरी या कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक, स्पायसेस बोर्डाचे उपसंचालक, हळद आयात-निर्यात संघाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र कृषी उद्योग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी, पणन मंडळाचे संचालक,अन्न औषध प्रशासन विभागाचे प्रतिनिधी, हळद उत्पादक शेतकरी, उत्पादक कंपनी यांची निवड करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील हळद उत्पादक शेतकरी यांच्याशी संपर्क साधून लेखी अथवा प्रत्यक्ष स्वरूपात समस्या मागवून त्यावर सखोल चर्चा करून त्यावर काय उपाययोजना करता येतील याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे हिंगोली येथील हळद संशोधन प्रक्रिया महामंडळाचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीन विकासासाठी खासदार हेमंत पाटील सदैव कार्यशील असल्याचे यावरून दिसून येते.

जळगाव जा विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

आज दि 8/9/20
ला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने
रोजगार दो अभियान अंतर्गत बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात यावा याकरिता आंदोलन करण्यात आले.
व तहसीलदारयाना निवेदन देण्यात आले.
वर्षाला दोन कोटीरोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर आले पण या दिलेल्या आश्वासनाचे काय झाले या मागणीसा आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदारांना निवेदन देउन थेट केंद्र सरकारला जाब विचारण्यात आला.
याप्रसंगी युवक काँग्रेस प्रदेश सचिव अभिजीत अवचार विधानसभा अध्यक्ष शेख अफरोजजळगाव जा युवक काँग्रेस शहर अध्यक्ष शे राजीक*जिल्हा काँग्रेस कार्यकारणी सदस्य अमर पाचपोर अजय ताठे,
मयुर राऊत, श्रीकांत वानखडे, योगेश जाधव,
महिला काँग्रेस शहर अध्यक्ष मिनाताई सातव, परवीन ताई देशमुख
माणिक खोद्रे,आनंद पाटील,
जुनेद शेख येवले, हरिषभाई इमरान खान, वैभव वरगे,
सौरभ अवचार,धनंजय बोबटकार, गोपाल कोथळकार, सचिन हरमकार, मोहन बोडखे, शिवदास जाने, राजा दमदार, तस्लीम मिर्झा,शे शाकीर शहनवाज अमहद मतीन पटेल शफीकभाई अकबर शेख आरीफ शेख मोडीन भाई आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

ग्राम उसरा येथे कोरोणाचा शिरकाव

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यात कोरोणा चा संसर्ग वाढत असताना ग्रामीण भागात कोरोणाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे असेच ग्रामपंचायत सूनगाव अंतर्गत येत असलेल्या ग्राम उसरा बु येथे कोरोनाचा शिरकाव झालेला आहे 7ऑगस्ट रोजी आलेल्या एका 40 वर्षीय पुरुष रिपोर्ट कोरोना बाधित आल्याने उसरा येथील जनतेत भीतीचे वातावरण आहे ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या वतीने रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे व उसरा येथील जनतेने विनाकारण बाहेर फिरू नये व फिरताना तोंडाला मास्क बांधावे असे सुनगाव ग्रामपंचायतीच्या वतीने उसरा येथील नागरिकांना संदेश दिला आहे

70/30 चा फार्मूला रद्द करा: आमदार.संतोषराव बांगर

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय प्रवेश 70/30 टक्क्याचे विभागवार धोरण शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून साध्य करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मराठवाड्यात वैद्यकीय प्रवेशाच्या जागा कमी असल्याने अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहत आहेत. देशपातळीवर एकच परीक्षा घेतली जाते व देशातील इतर कुठल्याही राज्यात 70/30 हे धोरण राबविले जात नाही. तरी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करण्याकरिता आज शिवसेनेचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तसेच युवा सेना प्रमुख श्री. आदित्यजी ठाकरे यांच्याकडे 70/30 चे विभागवार धोरण शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून रद्द करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख हिंगोली श्री.संतोषराव बांगर यांच्यासोबत परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर हे उपस्थित होते. यावेळी युवा सेना प्रमुख श्री.आदित्यजी ठाकरे यांनी आपला प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे आश्वासन दिले.

जनविकास संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष साईनाथ गिरी यांच्याकडून हिंगोली जिल्ह्यामधे पार्थ पवार फाऊडेशन ची सुरुवात गरजू लोकांपर्यंत मदतीचा हात मिळावा म्हणून पार्थ फाउडेशन ची हिंगोली जिल्ह्यात सुरुवात

जनविकास संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष साईनाथ गिरी यांच्याकडून हिंगोली जिल्ह्यामधे पार्थ पवार फाऊडेशन ची सुरुवात गरजू लोकांपर्यंत मदतीचा हात मिळावा म्हणून पार्थ फाउडेशन ची हिंगोली जिल्ह्यात सुरुवात

 

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

पार्थ फाऊंडेशन चा माध्यमातून महाराष्ट्र भरामध्ये विकासाची कामे अतिशय चांगल्या पद्धतीने केली जात आहे त्याचेच एक प्रयत्न म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये मी साईनाथ गिरी जनविकास संघटना महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हाध्यक्ष
हिंगोली जिल्ह्यामध्ये गरजू व्यक्ती पर्यंत मदतीला हात मिळावा यासाठी पार्थ फाऊंडेशन चा माध्यमातून विकासाचा वसा पुढे नेत आहे