Home Blog Page 71

जिजाऊ ज्ञान मंदिरात डॉ ए. पि. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून संपन्न शा.प्र. दि.15 ऑक्टोंबर(buldhana)

0

 

buldhana:राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर येथे आज भारतरत्न डॉ. ए. पि. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून संपन्न करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट होते.सर्वप्रथम डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुष्पहार व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी ब-याच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य म्हणाले की, डॉ. अब्दुल कलाम साहेब हे एक महान शास्त्रज्ञ तर होतेच पण एक दुरदृष्टी असलेले गैर राजकीय राष्ट्रपती होते. त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून डॉक्टरेट प्राप्त केली व बॅलिस्टीक मिसाईल सारखे संरक्षणात्मक शोध आपल्या देशासाठी लावले. त्यामुळे त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आपल्याला त्यांच्याप्रमाणेच शास्त्रज्ञ व्हायचे असेल तर प्रत्येक कृती व अभ्यास वेगळ्या पद्धतीने करायला हवा. यावेळी त्यांचे नियम, निश्चित ध्येय ठेवा, सतत नविन ज्ञानाची भुक ठेवा, त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा, जिद्द व चिकाटी बाळगा यश नक्कीच मिळेल हे सांगताना, जिवनाचा खरा मार्ग ज्ञानात आहे.

buldhana:वाचन केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आजपासून आपण सर्वांनी दररोज दोन तास वाचन करून डॉ कलामांना आदरांजली वाहूया. यावेळी त्यांचे प्रत्यक्ष विचारही ऑडीओ क्लिप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गायकवाड यांनी केले. तर कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा खा. मुकुलजी वासनिक यांनी केली फोटोग्राफीची पाहणी(Lonar )

0

 

प्रतीनिधी सय्यद जहीर

 

Lonar:अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा खा.मुकुलजी वासनिक साहेब मुंबई येथील छत्रपती टर्मिनल 2 आंतरराष्ट्रीय विमान तळावर आले.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

असताबुलडाणा जिल्हा ओबीसी सेलच्यां वतीने व साहित्य अण्णाभाऊ सोशल फोरमच्या वतीने खा. मुकुलजी वासनिक साहेब याच्यां वाढदिवशा निमित्त त्यांनी यांनी काढलेले फोटोग्राफीची प्रदर्शनी लोणार शहरात करण्यात आली होती व सोशल फोरम ओबीसी सेल च्या वतीने उत्कृष्ट फोटो ग्राफी साठी छायाचित्रासाठी बक्षीस वितरण ठेवण्यात आला.

होता या पार्श्वभूमीवर आलेल्या काही फोटोची पाहणी आज खा.मुकुंलजी वासनिक यांनी लोणार येथील फोटोग्राफी स्पर्धेतील प्राप्त फोटोचे निरीक्षण केले त्यांनी सदर फोटोची स्तुती केली यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुरेश शेट्टी,

 

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजयजी अंभोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजयजी राठोड, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस

Lonar:साहेबरावजी पाटोळे, बुलढाणा जिल्हा ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, इटंक नेते राजाराम राटोड,व मान्यवर उपस्थित होते

डॉ. गोपाल बछिरे यांचा वाढदिवस समाज उपयोगी विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला(Lonar )

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar:महाविकास आघाडीच्या माध्यमाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोपाल बछीरे यांच्या वाढदिवसानिमित्त, गोशाळेमध्ये गाईंना चारा वैरण देण्यात आले,

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

वैदु गोंड पारधी महिला भगिनी यांना साड्यांचे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपण्यात आली, गरजवंतांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

हे उपक्रम दिवसभर चालले व सायंकाळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष यांचे नेते कार्यकर्ते व डॉ. बछिरे यांच्यावर प्रेम करणारे आप्त इष्ट लोकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे शैलेश सावजी, कलीम खान, नंदकुमार गोरे, देवानंद पवार,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

भूषणभाऊ मापारी, ज्ञानेश्वर चिभडे मामा, केशवराव फुके, शांतीलाल गोगलिया, अमोल सोनवणे, तोफिक कुरेशी, विकास मोरे, राष्ट्रवादीचे सदानंद पाटील तेजनकर, इब्राहिम शेख, दत्ता पाटील घनमट, विजय मोरे, वाजेद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नंदू कराडे, नारायण बळी,

Lonar:किसन पाटील, लिंबाजी पांडव, किशोरभाऊ गारोळे, संदीप गारोळे, ऍड दीपक मापारी, गजानन जाधव, परमेश्वर दहातोंडे, लुकमान कुरेशी, इक्बाल कुरेशी, सय्यद उमर, श्रीकांत मादनकर, गणेश सवडतकर, यांच्यासह मोठ्या संख्येने शुभेच्छा देणारे व डॉ. बछिरे यांच्यावर प्रेम करणारे शुभेच्छा देणारे उपस्थित होते.

हिंगणघाट येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला श्री संत नागाजी महाराज यांचे नांव..( Hingnghat)

0

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :-स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शसंत नगाजी महाराज यांचे नाव शासनाचे वतीने नुकतेच बहाल करण्यात आले. संत नगाजी महाराज तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील मोठे दैवत आहे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी(रेल्वे) विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांचे विशेष प्रयत्नाने शासनाने या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस नाव दिल्यामुळे अनेक संस्था संघटनांचेवतीने आ. समीर कुणावार यांचे आभार मानले आहेत.

आज दि. १४ ऑक्टोबर रोजी संत नगाजी महाराज संस्थान,पारडी (नगाजी)येथील सर्व विश्वस्तांनी आमदार समीर कुणावार यांची भेट घेऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे कपिक करा

Hingnghat:याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष नरेंद्र मांडवकर, सचिव रामभाऊ भोयर, उपाध्यक्ष प्रफुल बाडे, विश्वस्त सारंग दौड, डॉ.अतुल घोरपडे, राजेंद्र ठाकरे, शरद भोयर, संजय इंगोले, श्याम भीमनवार, धनराज चिडे, मनोज चिडे, घनश्याम खुनकर,गजेंद्र पवार,यश भोयर इत्यादी विश्वस्तांनी आ.समीर कुणावार यांचे आभार मानले.

मेहकर लोणार तालुक्यातील प्रलंबित समस्या तत्काळ निकाली काढा,अन्यथा ठिय्या आंदोलन नागवंशी संघपाल पनाड मेहकर लोणार विधानसभा, वंचित नेते (Lonar )

0

 

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar:शेगाव पंढरपूर पालखी मार्ग लगतच्या वार्ड क्रमांक १,२,५,६,व ईतर वार्डामध्ये राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसून त्या कुटुंबाला उघड्यावर पाडणाऱ्या जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून,पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लाऊन,नुसकानग्रस्त कुटुंबीयांना तात्काळ मदत करण्यात यावी सध्या शासनाच्या वतीने बँकेमार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये लाडके बहिण योजना संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे.

त्यामध्ये बँकेमध्ये केवायसी च्या नावाखाली बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्याकडून महिलांची पिळवणूक होत आहे. त्यामध्ये महिलांना तूछपणाची वागणूक देण्यात येते.
कर्मचाऱ्याकडून होणारी पीळवनूक तत्काळ थांबवण्यात यावी. व सुलतानपूर तालुका लोणार येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये गावातील रहिवासी हे बँकेमध्ये कर्मचारी आहेत ते बँकेमध्ये येताना नशेमध्ये असतात त्यांची बँक ग्राहकांना बोलण्याची पद्धत वेगळी असते ते बॅक ग्रहाकाना उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्राहकांना बँकेतून हाकलून देतात.

अश्या बेजबाबदार बँक कर्मचाऱ्यावर निलंबनाची करून कारवाई करण्यात यावी. तथा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लोणार येथील कर्मचारी सुद्धा अशाच पद्धतीने बँक ग्राहकांसोबत अरेरावी भाषा करतात करतात. असे ह्या मेहकर – लोणार मतदारसंघातील सर्व बँकेच्या कर्मचाऱ्यांची बैठक बोलवून त्यांना समज देण्यात यावा व चांगली सेवा देणारे कर्मचारी बँकेमध्ये देण्यात यावे.

सध्या मेहकर – लोणार तालुक्यामध्ये महावितरण चे प्लास्टिक केबल बंच चे काम सुरू आहे. हे काम अंदाजपत्रकानुसार न करता अतिशय बोगस पद्धतीने सुरू आहे तत्काळ हे काम थांबून बोगस काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून अंदाजपत्रकानुसार काम करणाऱ्या ठेकेदाराला काम देण्यात यावे व सध्या नवरात्र सन उत्सवाचे दिवस आहेत तथा ओहरलोड घ्या नावाखाली अनेक ठिकाणी लोड शेडिंग घेण्यात येते ती तत्काळ थांबवून वीज ग्राहकांच्या अनेक समस्या आहेत त्यामध्ये फ्यूज जाणे,डिओ जाणे टाकण्यासाठी वायरमनला फोन करण्यात येतो परंतु फोन लागत नाही.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी गेल्या दोन ते तीन वर्षापासून शासनाच्या वतीने ई- पीक पाहणणीसाठी मोठा गाजावाजा करण्यात येत आहे. परंतु ई-पिक पाणीही शेतकरी वर्गासाठी डोकेदुखी ठरत आहे.कारण की प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे काही शेतकऱ्यांना मोबाईलची माहिती नसल्यामुळे ई- पीक पाहणी पासून हजारो शेतकरी मुकले आहेत.

म्हणून शासनाला विनंती असेल पूर्वीप्रमाणे तलाठ्या मार्फत पीक पेरा भरण्यात यावा ५ शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी अतिवृष्टी ग्रस्, आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात येते. परंतु ई- केवायसी च्या नावाखाली शेतकरी व नुकसानग्रस्त नागरिकाची मुस्कटदाबी होते. त्यामुळे शासनाच्या वतीने देण्यात येणारी मदत ही उदात्त हेतूने देऊन, ई- केवायसी अट रद्द करण्यात यावी.

अनेक वर्षापासून मेहकर लोणार तालुक्यातील नागरिकांचे रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना या योजनेमध्ये नावे समाविष्ट असून मंजूर आहेत. परंतु उद्दिष्टे नसल्यामुळे ते लाभार्थी घरकुल पासून वंचित आहेत. करिता घरकुलाचे उद्दिष्ट तात्काळ देण्यात यावे व अनेक मंजूर काही लाभार्थ्यांना १५ हजाराचा पहिला हप्ता मिळाला परंतु उर्वरित अनुदान आज पर्यंत मिळाले नाही. त्यामुळे त्यांना तत्काळ अनुदान देण्यात यावे, घरकुल धारकाच्या अनुदानामध्ये शासनाकडून दुजाभाव करण्यात येतो. तो म्हणजे शहरासाठी अडीच लाख व ग्रामीण साठी एक लाख २५ हजार हा दुजाभाव थांबून ग्रामीणसाठी व शहरासाठी सुद्धा ५ लाख अनुदान देण्यात यावे.

शेतकरी राजाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. यावर्षी शेतकरी राजाच्या पिकांवरती अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला. तसेच परतीच्या पावसानेही अतोनात नुकसान केले त्यामुळे शेतकरी राजाला सरसकट कर्जमाफी देऊन, हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी
कृषी केंद्र मार्फत शेतकरी राजाचे होणारी आर्थिक लूट थांबून कृषी केंद्राच्या दर्शनी भागावर रेट बोर्ड लावण्यात यावे. व शेतकरी राजाची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकाचा परवाना रद्द करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.

लोणार सरोवरे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे शासनाच्या वतीने कोट्यावधी रुपयाचा निधी येतो परंतु विकास होताना दिसत नाही येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वच्छतागृह,मुत्री घरे, राहण्याची व्यवस्था नाही. येजा करण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाहीत,मेहरबान साहेब वरिष्ठ स्तरावरून सरोवराच्या कामाकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन घेणाऱ्या निधीचा योग्य वापर करून पर्यटकाला चांगल्या सुविधा देण्यात याव्या व लोणार शहराचे मूळ रहिवासी यांना पाण्यासाठी आजही टँकरने पाणी विकत घ्यावे लागते व जे सर्वसाधारण गरीब कुटुंब आहेत त्यांना डोक्यावरती पाणी आणावे लागते नळाला येणारे पाणी हे दोन ते तीन महिन्यातून एकदा येते आणि तीही दूषित पाणी येते पाण्याचा विषय हा गांभीर्यपूर्वक घेऊन शहरवासीयाचे पाण्याची भटकंती थांबून शुद्ध पाणी देण्यात यावे.

लोणार येथील लोणार शहराला लागून २००८ पासून मंजुरात मिळाली परंतु कामाला सुरूवात झालेली नाही. शहरांमध्ये अनेक वाहनांची वर्दळ असते या शहरातून शेगाव पंढरपूर महामार्ग गेलेला आहे याच ठिकाणाहून पूर्णा नदी जवळ असल्यामुळे रेतीचे वाहने भरधाव वेगाने य जातात अनेक नागरिकांना रेतीच्या वाहनामुळे आपले प्राण गमावले लागले आहे. तरी बायपास रोडच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात यावी लोणार तालुक्याचे ग्रामीण भागाचे मुख्यालय म्हणजे पंचायत समिती कार्यालय हे कार्यालय अतिशय जिर्ण होऊन मोडकळीस आले आहे.

कार्यालयाच्या ठिकाणी तालुक्यातील नागरिकांची वर्दळ असते त्यामुळे इमारत कोसळून जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. करिता पंचायत समिती कार्यालय लोणार सरोवरच्या काठावरून हलवून हिरडव रोड वर्ती असलेल्या ई क्लास गट नं १३७,१३८,१३९ नंबर वरती रिंग रोड ला लागून नगर पालिका डिपी प्लॅन रोडला लागून, तत्काळ पंचायत समिती कार्यालयाचे काम सुरू करण्यात यावे लोणार शहराला लागून लिंबी तलावाला करोड रुपयाचा सौंदर्यकरणासंदर्भात शासनाकडून निधी आला आहे. त्यामध्ये लोणार शहराची मान उंचवण्यासाठी सर्व महापुरुषांचे पुतळे तलावाच्या मध्यभागी बसवण्यात यावे. व लोणार शहरातील बेरोजगारांचा विचार करून तलावाच्या तिन्ही साईडला गाळे काढण्यात यावे सुरेश राणे ऊर्फ रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द बोलून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भोंदू महाराजावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटकत करण्यात यावी.

समाजात समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भाजप आर एस.एस चा नेता नितेश राणे मुस्लिम धर्मीयांच्या मस्जीदीबद्दल, धर्माबद्दल अपशब्द वापरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. त्याच्यावर भाषण बंदी करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात यावा. व त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी भाषण बंदी करण्यात यावी.
सर्व खरेदी विक्रीचे कागदपत्रे नियमानुसार असतानाही आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी जाणीवपूर्वक खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या व परवानगी च्या नावाखाली खरेदी विक्री अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून होत असलेली नागरिकांची लूट थांबवून दोषी असणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सुलतानपूर ग्रामपंचायत तालुका लोणार अंतर्गत तांडा वस्ती अंतर्गत लाखो रुपयांचे काम शासनाच्या वतीने करण्यात आली परंतु तांडा वस्तीतले कामे तांडा वस्तीमध्ये न करता इतरत्र ओळवून अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आशा बेजबाबदार सरपंच अधिकारी व ठेकेदारावर गुन्हे दाखल करून तांडा वस्तीतीतिल कामे तांडा वस्तीत करण्यात यावे, व शासनाची दिशाभूल करून जे बिले काढण्यात आली ती बिले ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावे. अन्यथा आपल्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल‌, असा इशारा नागवंशी संघपाल पनाड होणार यांनी दिला.

Lonar:यावेळी निवेदन देताना नागवंशी संगपाल पनाड, मेहकर- लोणार विधानसभा वंचित नेते,दीपक अंभोरे,महेंद्र मोरे ,शे.अखतर भाई,शेख सरदार भाई, रंजीत मोरे, शेख जियाउल्ला, कैलास मोरे, दीपक पाडमक, राहुल पाडमुख, सिद्धार्थ अवसरमोल, ॲड ,बबन वानखेडे, शेख राजिक शेख सुभान, शेख अस्लम, गफार शाह भाई, शेख अमीर शेख अहमद, फिरोज भाई गवळी

ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थी भाविक सूर्यवंशी, पल्लवी मुडे स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर..(Hingnghat )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :- 11 आणि 13 सप्टेंबर 2024, क्रीडा व युवक सेना संचालनालाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि वर्धा जिल्हा क्रीडा परिषदच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या वयोगट 14 मुलीमध्ये

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

पल्लवी मुडे थाळी फेक या खेळत तर वयोगट 17 मुलामध्ये भाविक सूर्यवंशी 100 mt धावण्याच्या शर्यतिमध्ये या दोघांनीही प्रथम क्रमांक प्राप्त करून विभागीय स्पर्धे साठी आपले स्थान निश्चित केले.

ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थी भाविक सूर्यवंशी, पल्लवी मुडे स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर..(Hingnghat )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Hingnghat :विद्याथ्याच्या या यशाबद्दल ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयाचे संस्थापक गिरधर राठी, अध्यक्षा अर्पना राठी, सहसचिव रशेश राठी, कोषध्यक्ष प्रवीण धोबे, मुख्याध्यापक श्री. अभिनव जैस्वाल, क्रीडा शिक्षक रोहन हुमाड,पायल तलवटकर यांनी या विध्यार्थ्याचे कौतुक करून पुढील स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या

प्रवासात अडचण; थेट आगारप्रमुखांना फोन?महामंडळाचा निर्णय : प्रवाशांच्या अडचणीवर तोडगा(bus)

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

bus:एसटीच्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी ती तक्रार अथवा समस्या थेट आगारप्रमुखांना फोन करून निवारण करून घ्या, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीचे निराकरण करणे सोपे होणार आहे. त्यासाठी आगारप्रमुखांसह इतर महत्वाचे दूरध्वनी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

एसटी प्रवासात चालक अतिवेगाने गाडी चालवत आहे, चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत आहे, वाहक उध्दट वर्तन करत आहे, योग्य त्या ठिकाणी उतरवले जात नाही, अशा अनेक समस्यांचा यामुळे तोडगा निघणार आहे. यापूर्वी अशी यंत्रणा नव्हती.

मात्र, महामंडळाने आता संबंधित आगार व स्थानकाचा क्रमांक प्रसिध्द करून प्रवाशांना दिलासा दिला आहे. यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना अडचण अथवा समस्या निर्माण झाली तर त्या समस्या व तक्रारीचे तातडीने निराकरण होणार आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

bus:एसटी महामंडळाच्या नव्या निर्णयानुसार आता बसमधील चालक सीटच्या पाठीमागील जागेवर जिथं काही सूचना लिहिलेल्या असतात, आता तिथं संबंधित बसच्या आगारप्रमुखांचा मोबाइल नंबर देण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना प्रवासात काही अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांशी संवाद साधता येणार आहे.

समाज रक्षक श्रद्धेय,बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे समाजाने खंबीरपणे उभे राहावे :- अशोक भाऊ सोनोने..( Lonar )

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :बौद्ध समाज संवाद यात्रा मेहकर लोणार येथे, नागवंशी संघपाल पनाड मेहकर – लोणार वंचित विधानसभा नेते यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न, यावेळी प्रमुख मार्गदर्शक अशोक भाऊ सोनोने अमित भाई भुईगळ, राजेंद्र भाऊ पातोडे, युजी बोराडे ,प्रा.मनोज निकाळजे, यांच्या प्रमुख

मार्गदर्शनाखाली मेहकर-लोणार येथे बौद्ध समाज बांधवां सोबत संवाद करण्यात आला. यावेळी अशोक भाऊ सोनवणे यांनी आपल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले की श्रद्धेय,बाळासाहेब आंबेडकर हेच खरे समाजाचे रक्षक असून, समाज बांधवांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

संविधानाच्या नावाखाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समाजाचे मतदान घेऊन एका प्रकारे समाजाची दिशाभूल केली ज्यावेळेस एससी एसटीच्या आरक्षण वर्गीकरणाच, नॉन क्रिमिनल चा विषय येतो. त्यावेळेस सर्वात अगोदर अंमलबजावणी करण्यासाठी ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे ते सरकार अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही आहे.

हे समाज बांधवांनी लक्षात घ्यावे यांच्या बोलण्यात एक आणि करण्यात एक समाजाने ओळखावे. तदनंतर राजेंद्र भाऊ पातोडे यांनी समाज बांधवांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, जिल्हा महासचिव प्रशांत भाऊ वाघोदे, माजी जि. प्रा. डॉ. केबी इंगळे, आबाराव वाघ, युवा नेते अनित्य घेवंदे , बळीभाऊ मोरे,ॲड.सुजीत मोरे, मोबिन भाई, ॲड, बबन वानखेडे,दीपक पाडमुख, भुजंग शिरसाट, सिद्धार्थ

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अवसरमोल, शाकीर भाई पठाण,दीपक अंभोरे, महेंद्र मोरे,प्रशिस इंगळे, वसंतराव वानखेडे,राहुल पाडमुख, प्रदीप सरदार,नागशेन पनाड, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण पनाड ,बबन पनाड,विलास खरात,राजहंस जावळे, श्रीराम पनाड , विशाल कंकाळ,शुध्दोधन सरदार, मंगेश पनाड,बिंबीसार पनाड, महेंद्र मधुकर पनाड, तान्हाजी अंभोरे,गजानन शेजूळ,भारत सरदार,खंडू सरदार, देवानंद

Lonar:वानखेडे,मा पोलीस पाटील वानखेडे, समाधान भवाळ,अनिल‌ देबाजे,किरण ताजने, छगन खंदारे,रंजित मोरे, रमेश अवसरमोल,उषाताई नरवाडे,कमल शंकर निर्भय्य,सरकटे ताई, रूक्मिणीबाई पनाड,छायाबाई पनाड, अस्मिता पनाड ,रेश्माबाई पनाड ,हरणाबाई चव्हाण, केशरबाई जावळे,मथुबाई,सभादिंडे,तान्हाबाई पनाड,गौकर्णा मोरे,प्रयागबाई अंभोरे,गिताईबाई अंभोरे, उषाताई मोरे, पौर्णिमा पनाड यांनी परिश्रम घेतले.

महेश ज्ञानपीठ स्कूल ची विभाग स्तरिय क्रॉस कंट्री. स्पर्धेकरिता निवड(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा द्वारा जिल्हा स्तरिय क्रॉस कंट्री 4 km

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येधे संपन्न झाले या स्पधे मध्ये महेश ज्ञानपीठ स्कूल हिंगणघाटची अंडर 19 वर्ष वयोगटातील मुली पूर्वी धर्मदास गाडवे नि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विभागय स्पधे करिता आपले स्थान निश्चित केले.

मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी या विजयाचे श्रेय शाळेचे संचालक मंडळाचे अध्यक्ष गिरधर राठी, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, प्राचार्या वैशाली पोळ, उपप्राचार्य दिगंबर खटी, जिल्हा क्रीड़ा अधिकारी आशा मेश्राम , क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे क्रीड़ा अधिकारी निमगडे सर, क्रीडा

Hingnghat :मार्गदर्शक भोजराज चौधरी तालुका संयोजक खांडरे सर तथा क्रीड़ा शिक्षक मुस्तफा हबीब बख्श, सचिन मुळे, प्रणिता चिंतलवार व सर्व शिक्षक वृंदाना दिले.
त्यांचे यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

समुद्रपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी सदस्य अतुल गणेश बावणे यांनी केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश(Hingnghat)

0

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात युवा मोर्चा व भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील समुद्रपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अतुल गणेश बावणे यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. १२ ऑक्टोंबर २०२४ रोजी आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालय हिंगणघाट येथे करण्यात आले.
उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

Hingnghat :सदर कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार यांचे सह ज्ञानेश्वर भागवते, भास्कर शेंडे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास मोठया संख्येने उपस्थित होते.