Home Blog Page 78

मेहकर विधानसभा मतदारसंघात ‘तगडा’ उमेदवार देणार…मेहकरातील बैठकीत निर्धार…(Ravikanttupkar)

0

 

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाच्या तयारीला लागा...

Ravikanttupkar:मेहकर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज (ता.२२ सप्टेंबर २०२४) मेहकर येथे अतिशय उत्साहात पार पडली.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

या बैठकीत सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी होणाऱ्या आंदोलनाचे टप्पे ठरविण्यात आले, त्याचबरोबर आक्रमक आंदोलनाची दिशाही ठरविण्यात आली.

तसेच संघटनात्मक बांधणी व आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मेहकर विधानसभा मतदारसंघात शेतकरी-कष्टकऱ्यांचा अतिशय ताकदीचा उमेदवार असेल व मेहकर विधानसभा अतिशय ताकदीने लढविणार, अशी घोषणा यावेळी केली. याप्रसंगी अनेक तरुण या चळवळीच्या प्रवाहात सहभागी झाले, त्यांचे स्वागत केले.

Ravikanttupkar :डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्या पुढाकारातून या बैठकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. तर या बैठकीला मेहकर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंचायत समिती हिंगणघाटची नविन इमारतीचे भूमिपूजन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते संपन्न(Hingnghat )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :- पंचायत समिती हिंगणघाटच्या नवं निर्मित होणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण -: आमदार समीर कुणावार यांचे प्रतिपादन_

आज हिंगणघाट येथे पंचायत समितीच्या आवारामध्ये पंचायत समिती हिंगणघाट प्रशासकीय इमारतीचे बांधकाम १४ कोटी ९९ लक्ष रूपयांचे भूमिपूजन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते रहमान मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा व सुरेश वाघमारे माजी खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी सर्व मान्यवर सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना पुजेचा मान देण्यात आला.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

अविस्मरणीय क्षणांचे मानकरी होण्याचा मान मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच हिंगणघाट तालुक्यातील सर्व मान्यवर सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार आमदार कुणावार यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार कुणावार यांनी माझ्या दहा वर्षातील कारकिर्दीतील आज दिवस माझ्यासाठी अत्यंत बहुमोलाचां असून अविस्मरणीय आहे पंचायत समिती हिंगणघाटला नवीन प्रशासकीय इमारत शासनाकडून मंजूर करून घेण्याचा माझा सातत्याने प्रयत्न होता.

अखेर त्या प्रयत्नांना यश येत मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री व्दय, ग्राम विकास मंत्री आणि राज्य शासनाचे यावेळी त्यांनी आभार मानले आणि संबंधित अभियंता आणि कंत्राटदार यांना तातडीने काम सुरू करण्याचा सुचना देत उत्तम दर्जाचे काम करण्याचे निर्देश दिलेत. याप्रसंगी रहमान साहेब, मुख्य

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, सुरेश वाघमारे माजी खासदार, गंगाधरराव कोल्हे माजी सभापती पंचायत समिती हिंगणघाट, शारदा आंबटकर, माजी सभापती पंचायत समिती हिंगणघाट, प्रफुल्ल बाडे माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट, आकाश पोहाणे, डॉ पर्बत,

Hingnghat :अंजने गट विकास अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट, खैरे उपविभागीय अभियंता लघू पाटबंधारे विभाग, घनश्याम येरलेकर, ज्योत्स्ना सरोदे माजी जिल्हा परिषद सदस्य, वैशाली पुरके, वंदना मडावी, लता घवघवे, इंदिरा उरकुडकर, सुनंदा सांयकर, बेहेकर सहाय्यक गटविकास अधिकारी हिंगणघाट, गुडंतवार कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग वर्धा, अमोल चिरुटकर, सचिन सावरकर, नितीन सुकळकर आदी मान्यवर उपस्थित होते

माजी प.स.सदस्य साहेबराव येडे व भाजपचे पदाधिकारी चेतन काळे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश..(sharadpawar )

0

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

राष्ट्रवादिचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते स्विकारला राष्ट्रवादिचा शेला..

sharadpawar:हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे संघटन बळकट होत असून माजी प.स.सदस्य साहेबराव येडे व भाजपचे पदाधिकारी चेतन काळे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश केला.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्य शैलीला प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश केला. सर्वांचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पक्षाचा शेला व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, शहराध्यक्ष बालु वानखेडे, महिला शहर कार्याध्यक्ष सिमा तिवारी, जगदीश वांदिले यांची उपस्थिती होती.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळी माजी प.स. सदस्य, माजी संचालक कृ.उ. बा. समिती समुद्रपूर तथा माजी सरपंच साहेबराव येडे, भाजपचे पदाधिकारी चेतन काळे यांच्यासह नितीन भोयर रवींद्र शेंडे श्रीकांत येलेकर, रवींद्र थाटे, विनोदराव सावंत, सतीश सावंत, अभिषेक मोरे, संतोषराव नांदेकर, गजानन येन्नेकर, महेंद्र मोरे, विवेक सातपुते, राजू तेलहांडे, सुनील सूर, नितीन

sharadpawar:मिरुगवार, देवरावजी राऊत, समीर पिसदूरकर,प्रशांत विरुळकर, प्रमोदराव शेंडे, अंकुशराव आरोळे, नितेश शेंडे, नितीन कानकाते, लक्ष्मणराव येडे, प्रशांत झाडे, रवी मेश्राम, यांच्यासह विविध सामाजिक संघटनेत काम करणाऱ्या महिला पदाधिकारी प्रणितीताई टिपले, अरुणाताई ढाले, जयश्रीताई पाटील,शारदाताई काळे शशिकला काळे, शारदा काळे, मोनाली काळे, शितल येनेकर, जान्हवी मोरे, वैष्णवी काळे, संगीता येडे, विशाखा येलेकर, सुषमा रिगणे, शारदा मडावी, सपना डोमकावळे आदींनी पक्ष प्रवेश केला..

प्रदीपकुमार नागपुरकर यांचा प्राकृतिक विकास तथा स्वदेशी कार्यासाठी सन्मान (Hingnghat )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट 22/09/2024 राष्ट्रीय कृषि पत्रकार संघ द्वारा, हँलिपँड प्रदर्शन परिसर सेक्टर नं. 12 अहमदाबाद येथे आयोजित “राष्ट्रीय प्राकृतिक, कृषि, स्वदेशी वस्तु तथा पत्रकार पुरस्कार” समारोह 2024 चे वितरण समारंभ गुजरात राज्याचे महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रतजी,

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

यांचे हस्ते हिंगणघाट येथील अभिनव स्वदेशी वस्तु केन्द्राचे संचालक तथा राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय सचिव, भारतीय युवा संस्कार परीषदेचे संस्थापक प्रदीपकुमार नागपुरकर यांना प्राकृतिक विकासात्मक तथा स्वदेशी साहित्याचे प्रचारार्थ तीन दशकापासून सातत्यमय कार्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वदेशी प्राकृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक महाराष्ट्र शासनाचे कृषि मित्र पुरस्कार प्राप्त मानकरी तथा राष्ट्रीय कृषि पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन गिरोलकर, गुजरात राज्य कृषि आयोग चेयरमैन डाँ. भरत पटेल,अनाज इंडिया चेयन कमेटी अध्यक्ष विजय हुसूकले, जैन ऐरिगेशनचे मार्किटींग प्रमुख जयकुमार ठक्कर, आदी मान्यवर उपस्थित होते.

https://youtu.be/BZc_T7hdiu0?si=3gh3nFmnYm2_UtWT

मागील तीन दशकाहून अधिक कालखंडापासून प्रदीपकुमार नागपुरकर सामाजिक दायित्व सांभाळत समर्पित भावनेने युवा मध्ये रचनात्मक कार्य करीत स्वदेशी साहित्याचे प्रचारक तथा देशपातळी प्राकृतिक विकासाचे कार्यासाठी कार्यरत

असून पत्रकारिता युवा संस्कार मासिकाचे संपादनासह विद्यार्थी वर्गासाठी 40 वर्षापासून हस्ताक्षर सुधार शिबीराचे माध्यमातून लाखो विद्यार्थी बंधू-भगिनींचे हस्ताक्षर सुधार करणारे युवा-संस्कार मासिकाचे संपादक प्रदीपकुमार नागपुरकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व असून त्यांना विविध रचनात्मक गतिविधि करीता हा सन्मान प्रदान करण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याची ही पावती म्हणजे हा सन्मान असल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त केले.
हा सन्मान मिळाल्याबद्दल भा.यु.सं.प.केन्द्रीयध्यक्ष डाँ.प्रा. शरद कुहीकर, डाँ. शरद मद्दलवार,वासुदेव गौळकार,प्राचार्य मंजुषा सागर, निसर्ग साहित्यिक शरद शहारे, भिमसागर

Hingnghat:खैरकर,अँड. विजय ढेकले, अँड. रविन्द्र मद्दलवार, सुशांत बाराहाते, विजय डेकाटे, नरेंद्र हाडके, अविनाश आईटलावार, राम मेंढे, अमोल भोंमले, चेतन काळे, सचिन महाजन, नरेन्द्र पोहनकर, तारामावशी बगमारे, योगीराज कोहचाडे,पुनम ढगे, चेतना सातपुते, प्रिया भोंमले, निलीमा मोहमारे यासह शिक्षण, सामाजिक, स्वदेशी क्षेत्रातील संबंधित व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले.

IAS आणि IPS अधिकारी; पगार, पॉवर जबाबदाऱ्यांमध्ये काय फरक आहे?(IAS )

0

 

IAS:केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना देशाच्या नागरी सेवेतील अनेक मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळते.

यापैकी IAS आणि IPS या अधिकारी थेट नागरिकांशी जोडलेले असतात. काही फरकाने परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यानुसार ही पदे मिळतात.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

IAS आणि IPS या दोन सेवांमध्ये काम, पगार आणि अधिकार यात काय फरक असतो याबाबत माहिती घेऊयात.

IAS अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या

आयएएस अधिकाऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर हे अधिकारी प्रशासकीय काम, धोरण ठरवणे आणि सार्वजनिक सेवांमध्ये गुंतलेले असतात. आयएएस अधिकारी विविध सरकारी विभागांचे नेतृत्व करतात.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आयएएस अधिकारी विविध सरकारी विभागांचे प्रमुख असतात आणि राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरांवर धोरणांची अंमलबजावणी करतात. आयएएस अधिकारी जिल्हे, राज्ये, विभाग आणि मंत्रालयांच्या प्रशासनासाठी जबाबदार असतात.

IAS :जिल्हा स्तरावर, IAS अधिकारी जिल्हा दंडाधिकारी किंवा जिल्हाधिकारी म्हणून काम करतात, जे संपूर्ण प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था आणि विकासासाठी जबाबदार

डिजिटल मीडिया परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी अनिल वाघमारे यांची निवड (digital media)

0

 

 

digital media:पुणे / प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून डोंगरचा राजा चे संपादक अनिल वाघमारे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली. संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडीबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवर, स्नेही मित्रांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

याबाबत अधिक वृत्त असे की, पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे आचार्य अत्रे सभागृहात नुकतीच मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

या कार्यशाळेच्या कार्यक्रमात गेल्या अनेक वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात परिषदेचे काम करत असलेले

तसेच श्री.एस.एम.देशमुख यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे संपादक अनिल वाघमारे यांची डिजिटल मिडिया परिषदेचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

व्यासपीठावर उपस्थित असलेले परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांनी त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली जात असल्याचे जाहीर करताच सभागृहात टाळ्यांचा गजर करत उपस्थित हजारो पत्रकार बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

संपादक अनिल वाघमारे हे गेली अनेक वर्षे मराठी पत्रकार परिषदेच्या जडणघडणीत मोलाचं काम करत आले आहेत. बीड जिल्ह्यातल्या वडवणी या छोट्याशा तालुक्यात त्यांनी आपल्या पत्रकारीतेचा प्रारंभ केला. व सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीतून सतत पाठपुरावा केला. बीड जिल्ह्यातील सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांमध्ये त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

digital media:त्यांची एकनिष्ठता,संघटन कौशल्य आणि अनुभव या सर्वांचा विचार करून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांनी त्यांची निवड जाहीर केली आहे. संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडी बद्दल महाराष्ट्र राज्यातील पत्रकार,स्नेही मित्र व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

जळगाव जामोद शेगाव दंगल सुनीयोजीत कट/लोकप्रतिनिधी समाजकंटकांची सीबीआय चौकशीची मागणी..(cbi )

0

 

 

दुसऱ्या आक्रोश निषेध मोर्चाचा इशारा..

Cbi :बुलढाणा: जळगाव जामोद, शेगाव येथील गणपती विसर्जनादरम्यान घडलेली दंगल सुनियोजित कटकारस्थान आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व तथाकथित समाजकंटकांनी सदर दंगल घडवून आणली आहे. सदर दंगलीची सीबीआय चौकशी करावी. सीसीटीव्ही फुटेज, व्हायरल व्हिडिओ चेक करावे.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

मोबाईल टावर लोकेशन वरून सीडीआर फाईल चेक करावी. व्हिडिओ बातमी संकलन करणाऱ्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करावी. दोषींवर नियमानुसार गुन्हे दाखल करावे. निर्दोष व्यक्तींवरील गुन्हे खारीज करावे. आदी मागण्यांच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासोबत चर्चा करून सर्वपक्षीय सामाजिक संघटनांच्या वतीने 20 सप्टेंबरला सायंकाळी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तथाकथित लोकप्रतिनिधी समाजकंटकांकडून सदर दंगल जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा मोठाआरोप निवेदनात करण्यात आला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आठ दिवसात या अनुषंगाने कारवाई करून चौकशी करावी. अन्यथा सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील दुसरा आक्रोश निषेध मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Cbi :यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रबोधनकार अँड सतीशचंद्र रोठे, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष याकूब पठाण , अल्पसंख्यांक पिचडावर्गचे प्रदेशाध्यक्ष शेख सईद, आझाद हिंदचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष असलम शाह, महिला जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई ताथरकर, लियाकत खान सबदर खान, पत्रकार राजेंद्र ससाने, यासह पत्रकार बांधव, सर्वपक्षीय प्रतिनिधींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
————-

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

Lonar:मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त लोणार येथे डॉक्टर जाकीर हुसेन ज्युनियर कॉलेजमध्ये सिरत क्विज कॉम्पिटिशन आयोजित केले आहे.

हा कार्यक्रम रविवार,22 सप्टेंबर 2024 रोजी होणार असून, याचे निकालही त्याच दिवशी जाहीर केले जातील. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या मान्यवरांचे हस्ते विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत.

चिंताजनक : सीबीएसई पॅटर्न बाबत संभ्रमाची स्थिती..(cbse )

याच दिवशी ईद मिलादुन्नबी निमित्त एक भव्य कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून जमियते उलमाए हिंदचे राज्याध्यक्ष हाफीज नदीम सिद्दिकी आणि विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन शाह कासमी येणार आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यांच्यासोबत जिल्ह्यातील व राज्यातील अनेक पदाधिकारी व प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

Lonar :तरी सर्व बुलढाणा जिल्हा वासियांनी 22 सप्टेंबर रोजी दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत आपला अमूल्य वेळे काढून बहुसंख्येत उपस्थित रहावे,अशी विनंती जमीयतचे तालुकाध्यक्ष ऍड. मोहम्मद रिजवान जड्डा यांनी केली आहे.

आझाद समाज पार्टी( कांशीराम )च्या सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष पदी रामदास कहाळे(buldhana )

0

 

 

Buldhana : सिंदखेड राजा तालुक्यातील आडगाव राजा या गावचे माजी सरपंच तथा सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम सातत्याने करत राहणारे पत्रकार रामदास कहाळे यांची खासदार चंद्रशेखर आझाद संस्थापक अध्यक्ष आझाद समाज पार्टी ( कांशीराम) या पक्षाच्या सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष पदी निवड जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे यांनी जिल्हा सल्लागार पत्रकार सचिन खंडारे, यांच्या उपस्थितीत केली आहे.

रामदास कहाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून आडगाव राजा या गावचे सरपंच, उपसरपंच राहिले असून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करत आहे.

Education: ISRO मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे, कोणत्या विषयांचे ज्ञान हवे?(ISRO)

खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टी (कांशीराम) या पक्षाच्या सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष पदी रामदास कहाळे यांची निवड जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे यांनी केली आहे.

Buldhana :सिंदखेड राजा तालुक्यात पक्ष वाढीसाठी काम करून पक्षाला मजबूत करण्याचे जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे

नव्या पोषण आहारामुळे गुरुजींच्या डोक्याची खिचडी..(teacher )

0

 

teacher:सध्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेच्या तीन संरचित आहार पद्धती सुरू झाल्या आहेत. मात्र याचा हिशेब कसा ठेवावा याबाबत शिक्षण विभागाचे ठोस मार्गदर्शन मिळत नसल्याने गुरुजींचा तणाव वाढला असून त्यांना नाहक त्रासला सामोरे जावे लागत आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आठवडाभर दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी आता शिक्षण विभागाने मेन्यूचे प्रकार ठरवून दिले आहेत.

Education: ISRO मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे, कोणत्या विषयांचे ज्ञान हवे?(ISRO)

प्रत्येक दिवसाचे मेन्यू कार्ड शिक्षक व मुख्याध्यापकांना दिले आहे.

मात्र यातून मुलांना पोषण आहार मिळत असला, तरी हा मेन्यू आता शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांना पोषण आहारात सतत खिचडी दिली जात असल्यामुळे आता आहारात वैविध्य आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून योजनेत वैविध्यपूर्ण पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे.

teacher:विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मेन्यूचा निर्णय चांगला असला, तरी कडधान्य, तेल, मसाले, तांदूळ या सर्वांचा हिशेब शिक्षकांना ठेवावा लागणार आहे. मात्र याबाबत शिक्षण विभागाने त्याविषयी कोणतेही मार्गदर्शन केले नसल्याने हा हिशेब कसा ठेवावा, असा प्