Home Blog Page 86

Teachers Day 2024 : शिक्षक दिन ” 5 ” सप्टेंबरलाच का साजरा केला जातो ???( Teachers Day )

0

 

Teachers Day:शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण आणि ज्ञान देत असतात. शिक्षक हे समाजात एक महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. एक संपूर्ण पिढी शिक्षित बनवण्याचं काम शिक्षक करत असतात. विद्यार्थ्यांचे भविष्य घडण्यात शिक्षकांचाही मोठा वाटा असतो.

त्यामुळेच शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी शिक्षण दिन साजरा केला जातो. दरवर्षी ५ सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पुण्यतिथी दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. ठिकठिकाणच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन मोठया उत्साहात पार पाडला जातो. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

तसेच बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थीच एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत असतात. जेणेकरून त्यांना शिक्षकांच्या जबाबदाऱ्या आणि आव्हान लक्षात येऊ शकतील.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे माजी राष्ट्रपती, विद्वान आणि कुशल राजकारणी होते. दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करतो. डॉ. राधाकृष्णन हे १९६२ ते १९६७ पर्यंत भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.

याआधी त्यांनी कलकत्ता विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शैक्षणिक पदे भूषवली. गुरु शिष्याचे नाते असलेली अनेक मोठी उदाहरणे आपल्याकडे होऊन गेली आहेत.

भारतात पहिल्यांदा शिक्षण दिन कधी साजरा केला होता ?
शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना सुचली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान ठरले आहे.

बातमी लाईव्ह. पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला, ते एक उत्कृष्ट शिक्षक होते. ते जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना वाढदिवस साजरा करण्याची कल्पना सुचवली.

Teachers Day:तेव्हा त्यांनी हा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे सुचवले. तेव्हापासून ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जाऊ लागला.

बोर्ड परीक्षेत आता क्षमताधिष्ठित प्रश्न..( exam news for students )

0

 

exam news for students:विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण राहू नये, अभ्यासातील घोकंपट्टी थांबावी, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केला आहे.

तो आराखडा तथा मसुदा नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून त्यावर ३ जूनपर्यंत हरकती मागविल्या होत्या. आता तो आराखडा अंतिम करण्यात आला असून त्यात परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर सर्वाधिक भर दिला आहे.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

सुरवातीला नववी ते अकरावीसाठी आणि त्यानंतर दहावी-बारावीसाठीही तो लागू होईल.विद्यार्थ्यांना बदलत्या जगाची आव्हाने पेलण्यासाठी मानवी मूल्ये, जीवन कौशल्ये व नैतिकतेवर आधारित तार्किक विचार करणारे शिक्षण दिले जाणार आहे.

तिसरी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा दोन सत्रात होतील. नवीन आराखड्यात आरोग्य, कला व व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे.

पुस्तकी ज्ञानापेक्षा आता कृतीतून ज्ञाननिर्मिती व ज्ञानवृद्धी हा त्यामागील हेतू आहे. इयत्ता तिसरीपासून व्यावसायिक शिक्षण, तिसरी ते आठवीसाठी व्यावसायिक कौशल्ये आणि नववीपासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय असणार आहे.

व्यावसायिक शिक्षणांतर्गत कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी असे नावीन्यपूर्ण विषय असतील. आगामी शैक्षणिक वर्षापासून तो आराखडा दहावी-बारावी सोडून इतर वर्गांसाठी लागू होईल. त्यानंतर नवीन आराखड्यानुसार दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न बदलेल, अशी माहिती बोर्डाकडून मिळाली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी एक क्लिक करा 

पारंपारिक परीक्षा पद्धतीनुसार एखादा नियम विचारून किंवा प्रश्न विचारून त्यावर विद्यार्थ्यांकडून पाठांतर केलेले विस्तृत उत्तर लिहिणे अपेक्षित होते.

exam news for students:मात्र, आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्न सर्वाधिक असतील. एखादा विषय विद्यार्थ्यांना किती समजला, प्रत्यक्ष जीवनात तो त्या शिक्षणाचा वापर करतोय का, ही क्षमता पडताळली जाणार आहे. २०२५-२६ नंतर परीक्षा पद्धतीत हा बदल अपेक्षित आहे.#exam #परीक्षा

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद सण शांततेत नव्हे जल्लोषात साजरा करा : अशोक नखाते.(Yavalnews)

0

 

यावल पंचायत समिती येथे शांतता समितीची बैठक.

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

Yavalnews:आज यावल येथे दि.४गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सण नियमांचे काटेकोर पालन करीत तसेच कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता बाळगून शांततेत नव्हे तर मोठ्या जल्लोषात साजरा करावे असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

शनिवार दि. ७ सप्टेंबर आणि सोमवार दि.१६ सप्टेंबर २०२४ रोजी यावल शहरात अनुक्रमे गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद उत्सव सण हिंदू मुस्लिम बांधव साजरा करणार असल्याने उत्सव शांततेत आणि मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी गणेश मंडळाच्या सदस्यांच्या व मुस्लिम बांधवांच्या काय काय अडचणी आणि समस्या आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी एक क्लिक करा 

या ऐकून घेण्यासाठी यावल पंचायत समिती सभागृहात आज बुधवार दि.४ सप्टेंबर २०२४ रोजी तालुक्यातील पोलीस पाटील आणि गणेश मंडळासह राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते, शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग,पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी उपस्थित शांतता समिती सदस्य गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या.

Yavalnews :गणेश विसर्जन रात्री बारा वाजेपर्यंत करता येणार असल्याची माहिती दिली.ज्या समस्या आहेत त्या यावल नगरपरिषद, वीज वितरण कंपनी,महसूल विभाग यांच्यामार्फत सोडवून गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद उत्सव सण शांततेत नव्हे तर मोठ्या जल्लोसा साजरा होईल याबाबत काही सूचना देऊन मार्गदर्शन केले.

१५ दिवसात घंटागाडी कामगाराचा समस्या निकाली न काढल्यास कामगार करणार कामबंद आंदोलन…( andolannews )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : हिंगणघाट नगर परिषदेतील घंटागाडी, महिला, ट्रॅक्टर कामगारांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी करत स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी भेट देत आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आपण तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.

घंटागाडी कामगाराच्या प्रमुख मागण्या किमान वेतन कायदा 1948 प्रमाणे सर्व कत्राटी कर्मचारी यांना पगार देण्यात यावा, कर्मचारी भविष्य निधी योजना 1995-36, क नुसार EPF पावती देण्यात यावी, कर्मचारी भविष्य निधी योजना सुटलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव समाविष्ट करून त्या कर्मचायांना EPF नंबर देउन EPF पावती देण्यात यावी,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कंत्राटी कर्मचारी यांना पगाराची पावती देण्यात यावी, पगाराची तारीख निश्चित करावी. कुंदन चांदुरकर यांना घंटागाडी सुपरवायजर या पदावर पूर्ववत कामावर घेण्यात यावे. या पूर्वी घंटागाडी कर्मचारी यांना कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे.

या मागण्या येत्या १५ दिवसात पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलन करणार असा इशारा स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियन हिंगणघाट शाखेचे अध्यक्ष विक्की केशवराव सहारे यांनी संघटनेच्या वतीने दिला.

andolannews:यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बालु वानखेडे, विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर, सामाजिक कार्यकर्ते शाम इडपवार, शाहरुख असलम शेख, दिलीप सुनांनी, अर्जुन जुमडे, सचिन कांबळे, रमेश कांबळे, सुमित बागेश्वर ,जॉनी दुर्गे, चित्रु महानंद, रत्नकेतु दुर्गे, अब्दुल रविश रज्जाक शेख, धर्मपाल तावडे, गणेश मेसेकर, नितेश मोगरे, मयुर जांभुळकर, कैलास कोटकर, गौरव चाफळे आदी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वाभिमानीच्या शिवजन स्वराज्य यात्रेचा नागझरी येथून शुभारंभ( prashantdikkar )

0

 

कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही! प्रशांत डिक्कर

prashantdikkar:शेतकरी शेतमजुरांसाठी फक्त घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात लाभ काहीच नाही. अशा अवस्थेची कोंडी फोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला आहे.

त्याची सुरुवात आज दि. ४ सप्टेंबर बुधवार रोजी संत गोमाजी महाराज श्री क्षेत्र नागझरी येथून करण्यात आली. त्यासाठी आज पासून पुढील १५ दिवस शिव जनस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

शेगाव संग्रामपूर जळगाव या ३ तालुक्यातील १९१ गावातून ही यात्रा जाणार आहे. आज श्री संत नगरी नागझरी येथे गोमाजी महाराजांच्या चरणी माता टेकवून विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शुभारंभाची नारळ फोडला यावेळी मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील बुलढाणा जिल्हा अध्यक्ष उज्वल पाटील चोपडे , सय्यद बाहोद्दीन, गोपाल तायडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर ही यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली आहे.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

जळगाव जा. विधानसभा मतदार संघ भ्रष्टाचार मुक्त करून शेती मातीची नाळ जोडलेल्या शेतकरी शेतमजुरांना न्याय देण्याचा संकल्प या यात्रेतून व्यक्त करण्यात आला आहे.

प्रस्थापिता विरोधात दंड थोपटून यात्रेच्या आयोजन केलेल्या स्वाभिमानीच्या या कार्याला प्रत्येक गावातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे हे पहिल्याच दिवशी दिसून आले शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या कापसाला १५ हजार तर सोयाबीनला ९ हजार रुपये भाव द्या सोयाबीन व कापसाच्या गाठी आयात करू नका मागील वर्षीचा पिक विम्याची थकीत रक्कम, व यावर्षी मोठ मोठ्या बैठका घेऊन पीक विम्याचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले हे शुद्ध धूळफेक आहे,

म्हणून पीक विम्याचा लाभ देऊन सरकारने शब्द पाळावा शेतमजूर कल्याण मंडळाची स्थापना करा , संग्रामपूर जळगाव तालुक्यात उद्योग उभे करून बेरोजगारांच्या हाताला काम द्या, अशा एकूण १३ मागण्या या यात्रेतून करण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्याचा डाव या सरकारचा असून तसे झाल्यास गोरगरिबांचे मुले शिकणार कुठे असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या यात्रेतून प्रस्थापित सरकारला विचारला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आदिवासी बांधवांना जातीचे दाखले नाहीत जळगाव जा. तालुक्यात अनुदान वाटपात ४ ते ५ कोटीचा घोटाळा झाला, अनुदान भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटून पात्र शेतकरी उपाशी ठेवल्या गेले, असे एक नव्हे तर शेकडो समस्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जन स्वराज्य यात्रेचे हत्यार उपसले आहे,

prashantdikkar:स्वाभिमानीच्या म्हणण्यात सत्यता असल्यामुळेच जनतेतून या यात्रेला भक्कम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे २० सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजुरांचा महामेळावा घेऊन या यात्रेचा संग्रामपूर येथे समारोप होणार आहे. यावेळी स्वाभिमानी चे प्रचंड पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

आईची ममता कशी जातीभेद विसरते हे पाहेला मिळाले! किनगाव जटुटु येथे ( cownews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

cownews:आईची ममता कशी जातीभेद विसरते मग तो प्राणी असो की मानव जात प्रत्येकाच्या जीवनात आईचे अनन्य साधारण महत्व आहे.

प्रत्येक प्राण्याला आईचे प्रेम मिळते असे नाही मात्र लहानपणी बाळाला पाहुन आईला पान्हा फुटतो हे तेव्हढेच खरे याचा प्रत्यक्ष 3.9.2024 मंगळवार ला किनगाव जटुटु येथील शेतशीवारात पहायला मिळाला.

लोणार तालुक्यातील किनगाव जटुटु येथील शेतकरी विठल रामप्रसाद गीरी यांचे किनगाव जटुटु येथे शेती असुन शेतात गाईचा गोठा आहे.गाई असुन

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

शेतशिवारात माकड,रुही,हरीश,व चौरट्या पासुन स्वरक्षन लक्षात घेता त्यानी रखवाली साठी कुत्र्याला गोठ्यावर आणले

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

रोज कुत्र्याला दुध देने हा दिनक्रम असुन मंगळवारी सकाळी शेतात त्यांचा सरकती अलीम शाह बशीर शाह गेल्यानंतर चक्क गाईच्या दुधाला तोंड लाऊन दुध पितांना पाहुन त्यांना आश्चर्याच वाटले अनेक शेतकरी जात असतांना हा प्रकार पाहुन थक्क झाले.

cownews:कुत्र्याला शांत पणे दुध पाजत असल्याने आईची ममता प्राणिभेद विसरुन वेडी माया असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मराठवाड्या चे जालना रेल्वे ते विदर्भ च्या वाशिम रेल्वे मार्ग करा राजेश श्रीराम मापारी लोणार तालुकाध्यक्ष कॉंग्रेस कमिटी( Congressnews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर 

Congressnews:विदर्भातील बुलडाणा जिल्हा रेल्वेच्या बाबतीत मागासलेला असल्याने संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात एकच रेल्वे मार्ग कार्यरत आहे,

त्यामुळे संपूर्ण बुलडाणा जिल्हा नेहमीच सुविधांपासून वंचित राहिला आहे. देशातील रेल्वे कनेक्टिव्हिटी जलद वाहतुकीला चालना देण्यासाठी, भारत सरकारच्या रेल्वे विभागाकडून दररोज नवीन प्रकल्प सुरू केले जात आहेत,

ज्यामुळे देशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होत आहे.केंद्रीय रेल मंत्री श्री.अव्श्रिनजी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या बदलांबद्दल कॉंग्रेस कमिटी चे लोणार तालुकाध्यक्ष राजेश श्रीराम मापारी यानी केंद्रीय मंत्री चे कौतुक केले.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

व विदर्भातील वाशीम जिल्हा मराठवाड्यातील जालना जिल्ह्याला रेल्वे मार्गाने जोडल्यास, स्वातंत्र्यानंतर प्रथमच या भागात रेल्वेचा विस्तार होईल. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना या रेल्वेमार्गाचा फायदा होणार असून या एका रेल्वे मार्गामुळे विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात वसलेला महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या स्वराज्याचे निर्माते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पूर्वजांचा परिसर आहे.

त्याचप्रमाणे देशाची शान असलेले ‘अ’ दर्जाचे पर्यटन स्थळ खार्या पाणीचे लोणार सरोवर हे देशातील सर्वात मोठे तलाव आणि बालाजी मंदिरही या मार्गाने जोडले जाणार आहे.
त्याचाही फायदा सर्वसामान्य नागरिकांना होतो.

या रेल्वे मार्गाद्वारे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या रेल्वे मार्गाने मराठवाड्यातील नागरिकांना विदर्भात जाणे आणि विदर्भात राहणाऱ्या नागरिकांना मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणे सोपे होणार आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

रेल्वेच्या विस्तारासाठी केलेल्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. देशातील सर्व महत्त्वाची ठिकाणे रेल्वेने जोडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गतिमान करण्यात येत आहे.
जालना ते वाशिम हे अंतर केवळ 160 किमी असून त्यामध्ये भरपूर ई वर्ग जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे या नवीन रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी कमीत कमी पैसा खर्च होणार आहे.

Congressnews:या भागातील मागासलेला भाग दूर होऊन या भागातील लाखो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मंजुरी द्यावी, आपल्या सकारात्मक दृष्टीमुळे या भागाचा आणि यामध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा विकास होईल त्यामुळे हा रेल्वे मार्ग बांधण्यात यावा अशी नम्र विनंती कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेश श्रीराम मापारी यानी केंद्रीय रेल मंत्री श्री.अव्श्रिनजी वैष्णव याना केली आहे.

डॉ मुजुमदार वार्ड मधील मारबतीची परंपरा कायम.( Hingnghat )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट दी. 3 सप्टेंबर 2024 स्थानिक डॉ मुझुमदार वार्ड परिसरातील युवकांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मारबत काढून महाराष्ट्राची पोळ्याची संस्कृती नवीन तरुणांना कळावी आणि ती कायम राहावी.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

मारबतीचे महत्व समाजात जागृती करून रोगराई, माशा मुरकुटे घेऊन जा गे मारबत या जायघोषात घराच्या दारा समोर असलेले मेढे घेऊन गावाच्या वेशीवर नेऊन विल्हेवाट लावणे

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Hingnghat :ही परंपरा वार्डातील युवकांनी केले त्यात संदीप पोटरकर, स्वप्नील वाघे, प्रवीण कारळकर, राजू धात्रक, गणेश हंबर्डे, निखिल वकील, यांनी उपक्रमाचे आयोजन केले.

४ सप्टेंबर च्या शिव जनस्वराज्य यात्रेत शेतकरी शेतमजुरांनी सहभागी व्हा-जिल्हाध्यक्ष उज्वल पाटील यांचे आवाहन.(Prashantdikkar)

0

 

Prashantdikkar:शेगाव/कापुस-सोयाबिन भाववाढ कर्जमाफी व पिकविमा सह विविध प्रश्नांवर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात उद्या बुधवार ४ सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र नागझरी येथुन शिव जनस्वराज्य यात्रेचा प्रारंभ होणार असुन या यात्रेत शेतकरी शेतमजूर व युवकांनी सहभागी व्हा.

असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाअध्यक्ष उज्वल पाटील चोपडे यांनी केले आहे. शेतकरी,शेतमजूर,महिला बचत गट, व युवकांच्या प्रश्नावर आक्रमक लढणारे प्रशांत डिक्कर यांनी पुन्हा सरकारला आवाहन करित उद्या बुधवार दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी श्री क्षेत्र नागझरी येथुन शिव जनस्वराज्य यात्रा काढणार असल्याचा ईशारा सरकारला दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यात्रेची जय्यत तयारी केली आहे. हि जनस्वराज्य यात्रा १६ दिवसात १९१ गावात जाणार असुन कापुस सोयाबीन भाववाढ कर्जमाफी व पिकविमा सह विविध मागण्यांबाबत माजी खासदार राजु शेट्टी यांच्या उपस्थित लाखो शेतकऱ्यांच्या संख्येने शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी संग्रामपूर तहसिलच्या मैदानावर यात्रा धडकणार आहे.

सोयाबीन भाववाढ कर्जमाफी व पिकविमा सह विविध प्रश्नांवर सरकारने निर्णायक भूमिका न घेतल्यास दि.२० सप्टेंबर च्या संग्रामपुरच्या महामेळाव्यात सरकार विरोधात क्रांतीचा नवा संग्राम होणार आहे.

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

सप्टेंबर च्या शिव जनस्वराज्य यात्रेत शेतकरी शेतमजुरांनी सहभागी व्हा-जिल्हाध्यक्ष उज्वल पाटील यांचे आवाहन.(Prashantdikkar)

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

जोपर्यंत मागण्यांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेणार नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही यापध्दतचे नियोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात केलेले आहे.

Prashantdikkar :तरी या ऐतिहासिक शिव जनस्वराज्य यात्रेत शेतकरी शेतमजूर व युवकांनी सहभागी व्हा असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष उज्वल पाटील चोपडे यांनी केले आहे.

ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थिनीचे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश( Hingnghat)

0

 

विभागीय स्पर्धेकरिता पात्र

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- Hingnghat:दिनांक: 29 ऑगस्ट, 2024, क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि वर्धा जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या 17 वर्ष गटातील मुलींमध्ये यशोदा राजूरकर या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विजय प्राप्त करून विभागीय बुद्धिबळ स्पर्धे करिता आपले स्थान निश्चित केले.

ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थिनीचे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश( Hingnghat)

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयाचे संस्थापक मा. गिरधर राठी, अध्यक्षा अर्पणा राठी, सहसचिव रशेश राठी, कोषाध्यक्ष प्रवीण ढोबे,

Hingnghat :मुख्याध्यापक अभिनव जैस्वाल, क्रीडा शिक्षक रोहन हुमाड व पायल तलवटकर यांनी या विद्यार्थिनीचे कौतुक करून पुढील स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या.