Home Blog Page 89

शेगांव येथे परीवर्तन आघाडीचा मेळावा संपन्न ( rajushetty )

0

 

जाती धर्माचा उपयोग सत्ता मिळवण्यासाठी – राजु शेट्टी

शेगांव ( प्रतिनिधी)

rajushetty:देशातील व राज्यातील शेतकरी , शेतमजूर व कामगारांना आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर ऊतरावे लागत आहे. स्वर्गीय शरद जोशी यांच्या विचाराने राज्यात आज विविध शेतकरी संघटना काम करत आहेत.

शरद जोशी यांचे काम ,विचार व भुमिकेची अमलबजावणी करण्यासाठी राज्यातील विविध शेतकरी संघटना एका झेंड्याखाली काम करणार असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज शेगांव येथे

झालेल्या परिवर्तन आघाडीच्या मेळाव्यात बोलताना केले.हार्दिक अभिनंदन
यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ नेते माजी आमदार वामनराव चटप हे होते.

 

बोलताना राजू शेट्टी म्हणाले की परिवर्तन आघाडीकडून राज्यातील शेतकरी , शेतमजूर व कामगार यांच्या प्रश्नाबाबत एकत्रित येवून लढा ऊभारण्याचा निर्णय झाला. शासन व प्रशासनाकडून राज्यामध्ये कायद्याच्या नावाखाली अनेक काळे धंदे सुरू आहेत. राजरोसपणे कुंपनच शेत खाऊ लागले आहेत. शेतकरी , कामगार , विद्यार्थी व शेतमजूरांचे प्रश्न दिवसेंदिवस चिंताजनक बनू लागले आहेत.

रुग्णमित्र गजू कुबडे यांचा वर्धा येथील स्पोर्ट्स कराटे संस्थेने केला जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान ( gajukubde )

जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली संवेदनशील वक्तव्ये करून जाती धर्मामध्ये फूट पाडून सत्ता मिळविले जात आहे. एक आघाडी उद्योगपतींचे हितरक्षण करणारी तर दुसरी आघाडी शेती व्यवसायावरील बांडगुळांचे सरंक्षण करणारे लोक सत्तेमध्ये येत आहेत. सत्तेमध्ये गेल्यानंतर विरोधातील लोक सगळे प्रश्न विसरतात.

४ वर्षे ११ महिने शेतकरी , शेतमजूर , विद्यार्थी , कामगार , असंघटित कामगार यांच्यासाठी रस्त्यावरची लढाई लढायची व निवडणूक जवळ आल्यानंतर तिसरी आघाडी म्हणून युती व महाविकास आघाडीने बारसे घालण्याचे धंदे बंद करावेत. याऊलट जनतेच्या प्रश्नावर सातत्याने लढणा-या संघटना याच पहिल्या आघाडीचे दावेदार आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ज्यांच्याकडे विचाराचे मूल्ये नाहीत त्यांनी मिडीया मॅनेज करून निवडणुकीच्या आधी दोन महिने जनतेला मुर्ख बनवित आहेत. यामुळे राज्यातील परिवर्तन आघाडी जनतेसमोर सक्षम पर्याय ठेवणार आहे.

rajushetty:या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार वामनराव चटप हे होते.महाराष्ट्र राष्ट्र समितीचे अध्यक्ष मा. आमदार शंकर आण्णा धोंडगे , शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळ , विदर्भ पक्षाचे अध्यक्ष जयकुमार चौधरी , ज्येष्ठ नेते गजानन अहमदाबादकर , विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर , गजानन बंगाळे पाटील ,युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले , किशोर ढगे , यांचेसह राज्याच्या विविध जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते. यानंतर ४ सप्टेंबर रोजी नांदेड येथे परिवर्तन आघाडीचा दुसरा महामेळावा होणार आहे.

महाराजा छत्रपती अग्रसेन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते संपन्न( sanjaygaikwad )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

sanjaygaikwad:आज दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी बुलढाणा शहरातील कारंजा चौक स्थित जागेमध्ये धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य स्मारक पूर्णत्वास आलेली आहे.

रुग्णमित्र गजू कुबडे यांचा वर्धा येथील स्पोर्ट्स कराटे संस्थेने केला जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान ( gajukubde )

आणि आज रोजी त्या जागी महाराजा छत्रपती अग्रसेन यांची पूर्णाकृती मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा धर्मवीर रामदास श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

महाराजा छत्रपती अग्रसेन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते संपन्न( sanjaygaikwad )

 

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी त्याठिकाणी सोबत महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे,मूर्तीदाता श्री अनिलशेठ अग्रवाल, स्मारक समिती अध्यक्ष गोवर्धनदास भडेच, कार्याध्यक्ष डॉक्टर दिनेश अग्रवाल, सचिव अनिलशेठ

sanjaygaikwad:अग्रवाल,कोषाध्यक्ष पप्पूसेठ अग्रवाल, राजेश अग्रवाल,सचिन चिराणीया, संदीप अग्रवाल,बबलूशेठ अग्रवाल, रितेशशेठ अग्रवाल, मनोजसेठ भडेच,अमितसेठ अग्रवाल यांच्यासह अग्रवाल समाजाचे असंख्य समाज बांधव, माता-भगिनीं तसेच शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीची लोणार तालुका बंदची हाक ( lonarnews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि  सय्यद जहीर

Lonarnews:महाविकास आघाडीच्या माध्यमाने लोणार बंदची हाक देण्यात आली याविषयीचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

रुग्णमित्र गजू कुबडे यांचा वर्धा येथील स्पोर्ट्स कराटे संस्थेने केला जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान ( gajukubde )

महाराष्ट्रात होणाऱ्या चिमुकल्या मुलींवर व महिलांवर अत्याचार करून दोषी मोकाट फिरत आहेत, राज्य शासनात बसलेले निष्क्रिय गृहमंत्री त्यांना अभय देत आहे.

त्यामुळे महाराष्ट्राच्या गृहmantryaaaच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने लोणार तालुका महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी लोणार तालुका व शहर बंद ठेवले जाणार आहे करिता सर्व जनतेने सहकार्य करावे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजूभाऊ मापारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन खरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप मापारी,आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक सचिव गणेश सोळंके, शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन जाधव, काँग्रेसचे शहर अध्यक्ष समद शेख, माजी

Lonarnews :नगराध्यक्ष भूषण मापारी, उपनगराध्यक्ष बादशाह खान, माजी नगराध्यक्ष साहेबराव पाटोळे, नगरसेवक तौफिक कुरेशी, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, अंबादास इंगळे, माऊली मोरे यांच्यासह सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.

अनुसूचित जाती अनुसूचित जमातीत वर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करा (Yavalnews ))

0

 

बहुजन समाज पार्टी पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी दिले यावल तहसीलदारांस निवेदन.

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

Yavalnews:मा. सुप्रिम कोर्टाने अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीत वगीॅकरण,व क्रीमीलेयबाबत जो असवैधानिक निणर्य दिला आहे तो रद्द करण्याची मागणी यावल रावेर तालुक्यातील बहुजन समाज पाटीॅ पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली.

रुग्णमित्र गजू कुबडे यांचा वर्धा येथील स्पोर्ट्स कराटे संस्थेने केला जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान ( gajukubde )

रावेर -यावल विधानसभेतील बहुजन समाज पार्टी पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मा.महामहीम राष्ट्रपती द्वारा जिल्हाधिकारी जळगाव यावल तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,

बहुजन समाज पाटीॅ रावेर लोकसभा अंतर्गत यावल तालुक्यातील व रावेर विधानसभेतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आपणास वरील विषयांवये आव्हान करतो की , सुप्रीम कोर्टाने दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी जो जातीयवाद दृष्टिकोनातून अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती वगीॅकरणाचा व क्रीमीलेयर अट लागू

करण्याचा असंवैधानिक निणर्य दिला आहे,आम्ही या निणर्याचा निषेध करतो,कारण या निणर्यामुळे जाती,जाती,मध्ये,संघर्ष निमार्ण होउन,जाती,जाती,मध्ये विध्वंस व दुरावा,मतभेद निर्माण होतील, तसेच हिंसा देखील होऊ शकतात म्हणुन ह्या सर्व बाबी लक्षात घेता हा निणर्य तात्काळ मागे घेण्यात यावा असे

Yavalnews:आव्हान वजा विनंती भारताच्या महामहीम राष्ट्रपती यांना दिलेल्या निवेदनावर नारायण अडकमोल,प्रमोद पारधे,मो.सादीक अ.नबी खान,प्रदीप गजरे,राजू सुरवाडे, हनिफखा हमीदखा, विलास अशोक मेढे,शशिकांत तायडे,हुसेनखा लालखा,फत्तु रज्जाक तडवी, सदानंद भालेराव, हनिफखान लाला, मिलिंद सोनवणे इत्यादी पदाधिकारी,कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे.

ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश ( Hingnghat )

0

 

जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता पात्र

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट : दिनांक: 20 ऑगस्ट 2024, क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि वर्धा जिल्हा क्रीडा परिषदेच्या

रुग्णमित्र गजू कुबडे यांचा वर्धा येथील स्पोर्ट्स कराटे संस्थेने केला जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान ( gajukubde )

वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या 14 वर्ष गटातील कुणाल कन्नाके व 17 वर्ष गटातील जयेश निमजे व शौर्य भगत या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयाचे संस्थापक मा. गिरधर राठी, अध्यक्ष अर्पणा राठी, सचिव रशेश राठी,

Hingnghat:मुख्याध्यापक अभिनव जैस्वाल, क्रीडा शिक्षक रोहन हुमाड पायल तलवटकर यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक करून पुढील स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या.

रुग्णमित्र गजू कुबडे यांचा वर्धा येथील स्पोर्ट्स कराटे संस्थेने केला जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान ( gajukubde )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Gajukubde:हिंगणघाट : वर्धा जिल्हा स्पोर्ट्स व कराटे असोसिएशन वर्धा यांच्या वतीने आज दि 21 आगस्टला वर्धा येथील सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचणालयाच्या सभागृहात संपूर्ण विदर्भात सुपरिचित असलेले रुग्णमित्र गजू कुबडे यांचा सत्कार खासदार अमर काळे, यांच्या हस्ते झाले.

बदलापुर ,मुंबई येथे झालेल्या दोन लहान मुलीवर निर्दयी अत्याचाराविरोधात हिंगणघाट शिवसेना पक्षाच्या वतीने निषेध ( crimenews )

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समजसेवक मोहन अग्रवाल, आनंदवन वरोराचे विश्वस्त सुधाकर कडू, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष परमानंद तापडिया, रंगभूमी प्रयोग परि निरीक्षण मंडळ मुंबईचे सदस्य डॉ रमेश थोरात,नवक्षितिज चरिटेबल मुंबई अध्यक्ष सुनील कुमरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल निमगडे,निम्नप्रकल्प चे उपकार्यकारी अभियंता अमोल आठवले हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खा. अमर काळे यांनी, गोरगरिबांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या आरोग्य विषयक ज्या शासकीय योजना आहेत त्यांची योग्य माहिती गरजू व वंचिताना देऊन त्यांना विनामूल्य शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते नेहमी जीवाचे रान करीत असतात.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व त्यांचे कार्य फार बहुमोलाचे आहे. असे गौरवदगार त्यांनी कुबडे यांच्या विषयी काढले.

प्रास्ताविक इमरान राही यांनी केले. संचालन मंगेश भोगाडे व कल्याणी भोगाडे यांनी केले.

Gajukubde:गजू कुबडे यांच्या आजवरच्या कार्यकाळात झालेला हा आजचा 50 वा सत्कार आहे हे विशेष.

हिंगणघाट तालुक्यातील येनोरा येथील असंख्य महिला व पुरुषांनी केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश ( bjpnews )

0

प्रतिनिधी सचिन वाघे

bjpnews:हिंगणघाट :- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत.

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
आज दि. २१ रोजी हिंगणघाट तालुक्यातील येनोरा गावातील असंख्य महिला व पुरुषांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रसंगी प्रामुख्याने अस्मिता रेवतकर, वनिता किरपाल, नीलिमा शेंडे, कुसुम सुटे, सुषमा अंबाडारे ,अलका खडसे, सोनाली वांदिले, गजानन शेंडे, राकेश रेवतकर, संगीता पाटील, माया वासेकर, नेहा राऊत, अमिता शंभरकर, यशोदा पाटील, शिल्पा पाटील , साधना भगत, वंदना साटोणे, जयश्री मून, अर्चना पाणताने , प्रदीप मून , सतीश पाटील, शांताराम धोटे, कविता धोटे ईत्यादीसह अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला.

उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे वेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे , माजी जिल्हा परिषद सदस्य (कोरा सर्कल) रोशन चौखे ,माजी

bjpnews:पंचायत समिती सदस्य वसंतराव घुमडे , समाजसेविका विजया तेलरांधे, दिलीप किरपाल, अरविंद कुकडे, संजयराव बोबडे, सतीश पाटील इत्यादी भाजपा व युवा मोर्चाचे पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.

स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारूविक्रेत्यावर धडक कार्यवाही “( brekingnews )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

समुद्रपूर :- , स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन समुद्रपुर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना,आज दी. 21 ऑगस्ट 2024 बुधवार सकाळी 5 वाजता च्या दरम्यान त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे मौजा शेडगाव

चौरस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 येथे सापळा रचुन नाकेबंदी करीत एका पांढ-या रंगाच्या महिद्रा XUV 500 कार क्र. MH-49/B-8446 यावर दारूबंदीबाबत प्रो.रेड कार्यवाही केली असता, मोक्कावर आरोपी कार चालक हा मिळुन आला व कारमध्ये त्याचे बाजुला बसुन असलेला त्याचा साथीदार यास पोलीसांचा सापळा लक्षात येताचं, तो अंधाराचा फायदा घेत मोक्कावरून पळुन पसार झाला,

पंचासमक्ष कारची पाहणी केली असता, कारमध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा माल मिळुन आल्याने आरोपी कार चालकास विचारपुस केली असता, सदर दारूचा माल हा हिंगणघाट येथे राहणारा आकाश उर्फ टिन्या गवळी याचे मालकिचा असुन ते त्याचेकडे दारूविक्री व वाहतुकीचे काम करीत असुन, सदरचा दारूचा माल त्याचे सांगणेवरून त्यांनी वडगाव जि. नागपुर येथील समीर जैयस्वाल यांचे ग्रीन

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

व्हिलेज बार मधुन आणल्याचे सांगितल्याने, जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून कार चालकाचे ताब्यातुन 1) एक पांढ-या रंगाच्या महिद्रा एक्स.यु.व्ही. 500 कार क्र. एम.एच. 49 बी. 8446 किं. 15,00,000 रू. 2) 52 खरड्याचे खोक्यात देशी दारूने भरलेल्या कोकण प्रिमियम नं. 1 व टॅंगो पंच कंपनीच्या प्रत्येकी 90 एम.एल.च्या 5,200 सिलबंद शिशा कि 5,20,000 रू 3) 02 खरड्याचे खोक्यात देशी दारूने भरलेल्या कोकण प्रिमियम नं. 1 कंपनीच्या

प्रत्येकी 180 एम.एल.च्या 96 सिलबंद शिशा कि 14,400 रू 4) 04 खरड्याचे खोक्यात विदेशी दारूने भरलेल्या रॉयल स्टॅग कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल.च्या 192 सिलबंद शिशा कि 67,200 रू 5) 01 खरड्याचे खोक्यात विदेशी दारूने भरलेल्या ओ.सी. ब्लु. कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल.च्या 24 सिलबंद शिशा कि 8,400 रू 6) एक विवो कंपनीचा ॲन्ड्राईंड मोबाईल कि. 10,000 रू. असा जु.किं. 21,20,000 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आरोपी नामे 1) अमरदिप अरूण जिवने, वय 26 वर्ष, रा. सिध्दार्थ नगर तुकुम चंद्रपुर ह.मु. संत कबीर वार्ड हिंगणघाट, 2) तेजस मेश्राम रा. इंदिरा नगर चंद्रपुर ह.मु. संत कबीर वार्ड हिंगणघाट (पसार), 3) आकाश उर्फ टिन्या गवळी रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट (पसार), 4) समीर जैयस्वाल ग्रीन व्हिलेज बार वडगाव जि. नागपुर चालक/मालक (पसार) यांचेवर पोलीस स्टेशन समुद्रपुर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

brekingnews:सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. उमाकांत राठोड, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, अभिषेक नाईक, विनोद कापसे, मुकेश ढोके यांनी केली.

डाॅ उमेश वावरे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथील म्हाडाच्या घरावर दिव्यांगकरणार कब्जा ( Hingnghat )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :- दि 24/6/2024 हिंगणघाट येथील म्हाडाच्या घर दिव्यांगांना देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.


त्यावर शासनाच्या वतिने कोणता ही निर्णय झालाचे दिसून येत नाही.त्या नंतर सुध्दा दिव्यांग बांधवा कडून दिनांक 27/7/2024 ला मा, मुख्यमंत्री महोदय यांना
जिल्हा अधिकारी वर्धा मार्फत निवेदन सादर करून लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

2 महिने नंतर ही दिव्यांग बांधव अमलबंजावनीची वाट पाहत आहे शासन दरबारी अजून काही हालचाली अजून पर्यन्त दिसून येत नाही.

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

तरी आपण येणारा 8 दिवसाच्या आता तोडगा काढला नाहीतर दिव्यांग बांधव स्वता कायदा हातात घेवून हिंगणघाट येथील म्हाडाच्या घरावर कब्जा करतील याची योग्य ती दखल घेवून रीतसर ताबा दिव्यांग बांधवाच्या नावावर करून दयावा.

डाॅ उमेश वावरे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथील म्हाडाच्या घरावर दिव्यांगकरणार कब्जा ( Hingnghat )

 

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अन्यथा दिव्यांग बांधव जबरदस्तीने ताबा मिळवतील व परस्थीती चिघळली तर शासन जबाबदार राहील
अशे निवेदन मा, उपविभागीय हिंगणघाट तसेच मा तहसीलदार व थानेदार साहेब व नगर परिषद हिंगणघाट यांना देण्यात आले

Hingnghat:मनिष कांबळे अरूण डेकाडे , दिव्या दुबे अकुश ठाकरे, मनोज बोटकवार शालीकराव भोयर, रमेश जामूनकर उमाकात कावडे अक्षय पवार मिनाताई निरब्ट कविता साहारे वसता गुळघाणे कलावती सहारे राजेन्द्र वानखेडे चंदा वानखेडे हसन अली प्रविण कावळे
प्रवीण आबडकर राजेश खानकूरे व कार्यकते उपस्थिति होते

फकीरवाडी वार्डातील रस्त्याची व नाल्याची समस्या घेऊन तहसील कार्यालयात अतूल वांदीलेंचा ठिय्या  (andolannews )

0

 

जाम येथील फकीरवाडी परिसरातील महिलांसह चिमुकल्यांचा देखिल आंदोलनात सहभाग…

समुद्रपूर तहसील कार्यालयातील ठिय्या आंदोलन तहसीलदारांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दोन तास केलें ठिय्या आंदोलन.

तहसीलदार यांनी कंत्राटदार यांना तात्काळ रस्ता दुरूस्तीचे दिले आदेश.

जाम येथील फकीरवाडी वार्डातील चिमुकल्यांचा हस्ते तहसीलदारांना दिले निवेदन.

प्रतिनिधी  हिंगनघाट सचिन वाघे

andolannews:समुद्रपूर:- जाम येथील फकीरवाडी वार्डातील रस्त्याची व नाल्याची समस्याबाबत तहसील कार्यालयात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केलें. तहसीलदार यांनी कंत्राटदार यांना तात्काळ रस्ता दुरूस्तीचे आदेश दिल्या नंतर आंदोलन मागें घेण्यात आले . यावेळी जाम येथील फकीरवाडी वार्डातील त्रस्त पुरुष महिला आपल्या चिमुकल्या मुलांना घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

जाम येथील फकीरवाडी वार्डातील नागरिकांना सतत रस्त्याच्या व पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. गावात शिरताच रस्ता दिसेनासा होतो. या गावात थोडासा जरी पाऊस आला कि नागरिकांच्या घराआत पाणी शिरतो व रस्ता पूर्ण पने बंद होतो. साचलेल्या पाण्याने व वाढेलेल्या घाणीचे गावातील नागरीक आजारी पडते आहे,

अश्या वेळेस त्या आजारी नागरिकास रूग्णालयात नेने देखिल यां असल्या रस्त्याने शक्य होत नाही यामुळें यां परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. रस्तातर नाहीच मात्र नावाला आसलेल्या रस्त्याच्या कडेला नाली देखील नाही. यामुळें हा रस्ता रस्ता नसून सांडपाणी वाहणारा नाला दिसुन येतो.

यामुळे या गावात पसरलेल्या अस्वच्छतेने व दूषित पाण्याने मोठी रोगराई वाढत आहे.. सध्या डेंगूजन्य परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली असून डेंगूचे डास निर्माण करणारी फॅक्टरी जणू हा रोड बनला असल्याचे या रोड मध्ये साचलेल्या सांड पाण्याने दिसून येते आहे..

अतिशय बिकट परिस्थिती झालेल्या या गावातील नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी म्हणून आज राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी चक्क तहसीलदार यांच्या केबिनमध्ये ठिय्या करून आंदोलनच केले.

तहसीलदारांनी देखील लगेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून ताबडतोब रस्त्याची करून रस्ता आता चालल्या योग्य करून देण्याबाबत हमी दिली तसेच पुढील दोन-तीन दिवसांमध्ये या रस्त्याबाबत व नालीबाबत मीटिंग बोलवित यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले..

यादरम्यान गावातील चिमुकल्या बालकांद्वारे तहसीलदारांना आपल्या तक्रारीचे निवेदन देण्यात आले. गावातील रस्ता ९५/५ अंतर्गत मंजूर झाला असून प्रस्ताव पास झाला; पण रस्ता अद्याप तयार झालेला नाही.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

याकरिता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी फकिरवाडी गावातील नागरिकांना घेऊन तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते व यां आंदोलना मुळे तहसीलदार यांनी तात्काळ यांची दखल घेऊन कंत्राटंदार यांना रस्ता बनविण्याकरीता आदेश दिले..

andolannews:याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले,विधानसभा बूथ प्रमुख अमोल बोरकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,जिल्हा सरचिटणीस सुभाष चौधरी, तालुका उपाध्यक्ष मंगेश गिरडे, जिल्हा सरचिटणीस गजानन शेंडे, युवक तालुका अध्यक्ष तुषार थुटे, महादेव वांदिले, रोशन थुटे,उपसरपंच अभिजीत गिरडकर, मंगेश पाटील, प्रमोद कुडमेथे, दत्ता भिवनकर यांच्यासह फकिरवाडी वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…