bharat band:हिंगणघाट :- या देशातील संत महापुरुषांनी सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी आयुष्य खपविले त्यांच संताची शिकवण स्वातंत्र्य प्राप्ती नंतर संविधानिक दृष्टिगत घटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी.
जातीपातीचे मुळ तोडून विविध जातीचा प्रवर्ग निर्माण केला व त्यास भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जाती, अनूसूचित जमाती, ओबीसी, लोकांमध्ये एकतेचा भाव निर्माण होऊन अन्यायाविरुध्द लढून शिका, संघटीत व्हा,अधिकार गाजवा, माणुस म्हणून जगा, नौकरीदार बना यासाठी ह्या प्रवर्गाना न्याय मिळाला, पण इंग्रजाप्रमाणे फोडा-तोडा राज्य करा.
ह्या नितीप्रमाणे केन्द्रीय सरकार व सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा अनुसूचित जाती, अनूसूचित जमाती यांच्या प्रवर्गात फूट पाडून त्यातच उपवर्ग निर्माण करुन सर्व प्रवर्गाना क्रिमिलेअर लावण्याचा निर्णय हा उपरोक्त प्रवर्गाला दिलेले संविधानिक आरक्षण संपुष्टात येणार आहे, या निर्णयाविरोधात सर्व आरक्षित जाती प्रवर्ग समाजाचे वतीने दिनांक 21 आँगष्ट 2024 रोज बुधवारला भारत बंद.
सह हिंगणघाट शहर बंद तथा महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 12:00 वाजता डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून हा मोर्चा निघणार असून इंदिरा गांधी पुतळा चौक मुख्य मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालय येथे धडकणार आहे
तेव्हा हा मोर्चा व बंद यशस्वीतेसाठी सर्व व्यापारी वर्गाने आपले प्रतिष्ठान, दुकानें बंद ठेऊन सहकार्य करण्याचे आव्हान विजय तामगाडगे, गोरख भगत, शंकर मुंजेवार, रवी भगत, नरेंद्र हाडके,नितेश कुमार कांबळे, मोरेश्वर जवादे,
bharat band:विक्रांत भगत, विक्की वाघमारे, सुरेंद्र टेंभुर्णे, अशोक रामटेके, सुरेश गायकवाड़, सोनु गेडाम, अरुण डांगे,मयुर धाबर्डे, अतुल नंदागवळी, नितीन सुटे, संजय धाबर्डे, प्रविण वाणे, सुहास जीवनकर,प्रदीप हाडके, अखिल धाबर्डे, सचिन तेलंग दिलिप भगत,अनुला सोमकुंवर, संध्या जगताप, प्रमोदनी नगराळे, तेजस्विनी पाटील, सिमा मेश्राम, यांनी केले आहे.
policenews:मुस्लिम धमचे धर्म गुरु व संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या वर वादग्रस्त वत्कव्य करणार्या रामगिर महाराज गोदावरी धाम बेट सरालाचे मठाधिपती यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या वर आक्षेपार्ह वत्कव्य करुन समाजाच्या भावना दुखावल्या आहे.
सिन्नर तालुक्यातील पंचाळ गावात प्रवचन दरम्यान इस्लाम धर्माचेच नाही तर संपुरण जगाला शांती अहींसा व प्रेमाचे संदेश देणारे हजरत मुहम्मद पैगम्बर यांच्या विषयी व मुस्लिम धर्मा विषयी आक्षेपार्ह वत्कव्य केल्या प्रकरणी सरला बेटचे महंत रामगिर महाराज यांचे वत्कव्यामुळे लोणार शहराच्या सामाजिक कार्यकत्यानी पोलीस स्टेशन बिबी येथे ठानेदार पाटील सर यांच्या कडे तक्रार दिली.
या वेळी मुस्लिम बांधवानी महंत रामगिर महाराज दोन समाजात तेढ निर्माण करुन हिंदु मुस्लिम एकतेला भंग करण्याचा प्रयत्न करत आहे.
रामगिरी महाराजचे आक्षेपार्ह वत्कव्य बिबि पोलीस स्टेशनला केली गुन्हा नोंद करण्याची मागणी ( policenews )
तरी त्यांनी केलेल्या व्यक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झालेला आहे.करीता यावर कठोर कार्रवाई करण्यात यावी असे बिबी शहराच्या मुस्लिम समाजा कडुन सांगण्यात आले आहे.
policenews:यावेळी उपस्थित शेख.अमान, शेख.अनिस, शेख.जाकेर, शेख.समद, सय्यद.एजास व गावाती मुस्लिम बांधव उपस्थित होते.
dr.utkrshadeshai:दातासंबंधी चिंता म्हणजे डेंटल एन्जायटी सतावतेय का? ही चिंता तुमच्या तोंडाच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते! वेदनेची भीती, अज्ञात किंवा भूतकाळातील नकारात्मक अनुभव दंतचिकित्सेसाठी आवश्यक ती काळजी घेण्यात अडथळा निर्माण करू शकतात. पण इथे एक चांगली बातमी आहेः दंत चिंतेवर मात करणे पूर्णपणे शक्य आहे. या लेखात, डॉ. उत्कर्षा बसाखेत्रे देसाई, बीडीएस, दंतचिकीत्सक, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ तुम्हाला तुमची भीती व्यवस्थापित करण्यात आणि आरामशीर डॉक्टर भेटीत मदत करण्यासाठी प्रभावी धोरणे.
दातासंबंधी चिंतेचे व्यवस्थापन करण्याची पहिली पायरी म्हणजे स्वत:ला वाटत असलेली भीती लक्षात घेऊन ती समजावून घेणे. तुमच्या चिंतेचे विशिष्ट कारण ओळखणे उपयुक्त ठरू शकते. दंत उपचारातील ड्रिलचा आवाज, सुया टोचण्याची भावना की भूतकाळातील नकारात्मक अनुभव? तुमची नेमकी चिंता समजून घेतल्याने ती प्रभावीपणे हाताळण्यासाठीची साधने तुम्हाला सुसज्ज करू शकतात.
तुमच्या दंतवैद्याशी खुलेपणाने संवाद साधा
तुमच्या दंत चिकित्सकासोबत विश्वासाचे नाते निर्माण करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या भावना आणि चिंता उघडपणे सांगण्यास अजिबात संकोच करू नका. तुमचे दंत चिकित्सक तुमच्यासारख्या रुग्णांना दंत चिंतेवर मात करण्यास मदत करणारे प्रशिक्षित मानसशास्त्र तज्ज्ञ असू शकतात. तुमच्या विशिष्ट गरजा भागविण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आश्वासक उपचार योजना तयार करू शकतात.
शांततेसाठी आरामदायी तंत्रे तुमच्या दिनचर्येत विश्रांतीची तंत्रे समाविष्ट केल्याने चिंतेची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. खोल श्वासोच्छ्वास, ग्राउंडिंग व्यायाम, ध्यान आणि प्रगतीशील स्नायू शिथिलता या प्रभावी पद्धती आहेत. खोल श्वासोच्छ्वास आणि ग्राउंडिंग मज्जासंस्थेला शांत करण्यास मदत करतात, तर ध्यानधारणा माइंडफुलनेस आणि लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन देते. प्रगतीशील स्नायू शिथिलतेमध्ये शारीरिक तणाव कमी करण्यासाठी ताणणे आणि नंतर विविध स्नायू गटांना शिथिल करणे समाविष्ट आहे.संज्ञानात्मक-वर्तणुकीशी निगडीत उपचार पद्धती (कॉग्नेटीव्ह बिहेविरिअल ट्रीटमेंट)
दंत चिंतेचे व्यवस्थापन करण्यासाठी शक्तिशाली साधने असू शकतात.
कॉग्नेटीव्ह बिहेविरिअल ट्रीटमेंट दंतचिकित्सेविषयीचे नकारात्मक विचार आणि विश्वास ओळखणे आणि त्यांना आव्हान देण्यावर लक्ष केंद्रित करते. या विचारांच्या जागी अधिक वास्तववादी आणि सकारात्मक विचार ठेवून तुम्ही हळूहळू चिंता कमी करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला वेदनेची भीती वाटत असेल, तर तुम्ही स्वतःला आठवण करून देऊ शकता की आधुनिक दंत तंत्रांचे प्राधान्य आरामाला असते.
दंत व्यवस्थेशी हळूहळू संपर्क साधणे
दातांची तीव्र चिंता असलेल्या लोकांसाठी, हळूहळू एक्सपोजर थेरपी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये दंतसंस्थेशी तुमचा संपर्क वाढवणे, कमी भीतीदायक प्रक्रियांपासून सुरुवात करणे आणि अधिक गुंतागुंतीच्या प्रक्रियांपर्यंत प्रगती करणे समाविष्ट आहे. हा दृष्टिकोन तुम्हाला दंत वातावरणाशी असंवेदनशील बनवण्यास आणि भारावून गेलेली भावना कमी करण्यास मदत करू शकतो.
आरामदायक कॉन्शियस सेडेशन पर्याय
काही प्रकरणांमध्ये, दाताविषयी चिंतेचे व्यवस्थापन करण्यासाठी कॉन्शियस सेडेशन पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. या शक्यता तुमच्यासाठी योग्य आहेत की नाही हे ठरवण्यासाठी तुमच्या दंत चिकित्सकासोबत चर्चा करा. तुम्हाला किमान अस्वस्थता किंवा स्मरणशक्तीसह प्रक्रिया करता येतात.
योग्य दंतवैद्य शोधणेदंतविकार समजून घेणारा आणि त्यावर उपाय सांगणारा दंतवैद्य निवडणे आवश्यक आहे. अशा दंतवैद्यांचा शोध घ्या, ज्यांना दाताशी निगडीत भीतीचे व्यवस्थापन करण्याचा अनुभव आहे. ज्या रुग्णांना सकारात्मक अनुभव आले आहेत त्यांच्याकडून अनुभव तपास आणि उपचारात मिळालेले यश जाणून घ्या. एक दयाळू आणि समजूतदार दंतवैद्य चिकित्सक तुमच्या एकूण दंतचिकित्सा अनुभवात लक्षणीय बदल घडवून आणू शकतो.
dr.utkrshadeshai:लक्षात ठेवा, दाताविषयी चिंतेवर विजय मिळवणे हा एक प्रवास आहे आणि वेगवेगळ्या लोकांसाठी प्रगती वेगवेगळी असू शकते. खुल्या संवादासह आणि दंतवैद्यांच्या सहाय्यक टीमसह या मुद्यांची चर्चा करून तुम्ही स्वत:च्या भीतीवर मात करून तोंडाचे इष्टतम आरोग्य प्राप्त करू शकता.
—
uddhavthakre:दुधा वलांडेश्वर उद्धव भाऊ माझा पाठीराखा या डॉ. गोपाल बछिरे यांच्या संकल्पनेतून उद्धव साहेबांच्या प्रतिकृती राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
दुधा वलांडेश्वर येथील शिव मंदिरात अभिषेक करून उद्धव भाऊ माझा पाठीराखा या संकल्पनेस सुरुवात करण्यात आली ही संकल्पना म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे हा भाऊ माझा पाठीराखा आहे.
व त्यांना प्रत्यक्षात राखी बांधू शकत नाही परंतु त्यांच्या प्रतिकृतीस राखी बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांच्या माध्यमातून साड्यांचे वाटप दुधा वालांदेश्वर व बाऱ्हई या या दोन ठिकाणी करण्यात आले.
सुरुवातीला तळपत्या उन्हात व नंतर भर पावसात हजारो महिलांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रतिकृती व डॉ. बछिरे यांना राख्या बांधून आपलं रक्षाबंधन हा कार्यक्रम पार पडला.
महिलांनी उद्धव साहेबांना, “जनमनातील मुख्यमंत्री उद्धव साहेब, आपल्या शासन काळात महिला सुरक्षित अनुभवात होत्या शेतकरी आर्थिक दृष्ट्या सबळ होता, शेतमालाला भाव होता, शेतकऱ्यांवरील कर्ज माफ केले.
त्यामुळे आपले राज्य पुन्हा येवो आपल्या हातून समाज व देश सेवा घडो हीच रक्षाबंधन निमित्त बहिणीचा आशीर्वाद व शुभेच्छा या आशयाचा संदेश लिहून ग्रीटिंग्स च्या माध्यमाने जमा करण्यात आले व सदरील ग्रीटिंग्स व प्रतिकृतीस बांधलेल्या राख्या ह्या मातोश्रीवर उद्धव साहेबांना डॉ. गोपाल बछिरे यांच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे.
मेहकर विधानसभा क्षेत्रातील किमान ५० गावातील २५ हजार महिलांनी उद्धव साहेबांना राखी बांधाव्या व त्यांचा संदेश ग्रिटींग च्या माध्यमातून उद्धव साहेबांना पाठवावा असा मानस डॉ. बछिरेंचा आहे, हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम सतत पोळा या सनापर्यंत मेहकर विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी चालणार आहे.
uddhavthakre:याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन जाधव नगरसेविका सिंधुताई जाधव किसान सेनेचे जिल्हा उपप्रमुख नारायण बळी, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, महिला तालुका संघटिका पार्वतीताई सुटे, शहर संघटिका शालिनीताई मोरे, सौ. रंजना बछिरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते
Hingnghat:हिंगनघाट: रोटरी क्लब हिंगनघाटच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष जितेंद्र वर्मा यांनी सांगितले की, “रक्तदान महादान आहे, आणि रक्तदान म्हणजे जीवनदान आहे.”
यावर्षी 500 युनिट रक्तदान करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.शिबिराच्या यशस्वी आयोजनात प्रकल्प संचालक केदार जोगलेकर आणि किशोर चांदनी यांनी इतर रोटेरियन सदस्यांसह महत्त्वाची भूमिका बजावली.
क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक मुखी यांनी रक्तदानाबद्दल पसरलेल्या गैरसमजुती दूर केल्या आणि आजच्या काळात प्रत्येक रुग्णालयात रक्ताची गरज असते असे सांगितले. अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते, आणि रक्ताला कोणताही पर्याय नाही.
त्यामुळे सर्वांनी नियमित रक्तदान करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रक्तदान केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यामुळे, महिलांनाही जर त्यांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असेल, तर त्यांनीही नियमितपणे रक्तदान करणे गरजेचे आहे.
या शिबिरात रक्तसंकलनासाठी खंडेलवाल ब्लड बँकेच्या टीम्सना आमंत्रित करण्यात आले होते.
buldhananews:ऐतिहासिक वारसा आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याला शोभुन दिसेल असा दिमाखदार सोहळा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु एवं मध्यम मंत्रालय वतीने सोहळा काल पार पडला.
राज्यभरातील विविध क्षेत्रातील विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अवलियांना ७८व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सह्याद्री रत्न पुरस्कार २०२४ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील मातब्बर या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील उत्कृष्ट ४० सह्याद्री रत्नांना या सोहळ्यात आमंत्रित करण्यात आले होते.विदर्भातुन सतत अग्रेसर असलेलं युवा नेतृत्व आणि आपली ओळख ही जिल्हा नव्हे तर गल्ली ते दिल्ली पर्यंत नेउन ठेवणारं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मा.अनिल मोरे यांचा ही या ४० सह्याद्री रत्नांमध्ये समावेश होता.
आपल्या सामाजिक कार्यातुन सतत गोरगरीब, शेतकरी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच अनाथांना मदतीचा हात अनिल मोरे यांचा समोर असतो .
चार वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक कार्य आणि बेरोजगार महीला साठी सतत काम करत असतात.
ग्रामीण भागातील स्त्रियांना महिला उद्योजिका बनविण्यासाठी यांनी अतोनात मेहनत घेतली आहे..
अशा व्यक्तीमवाला आज सह्याद्री रत्न पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी पुरस्कार समिती अध्यक्ष डॉ दिपक जाधव, सिनेअभिनेत्री आर्या यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती.
buldhananews :महाराष्ट्रातील ४० रत्नांमध्ये माझं नाव येण्यासाठी संबंध महाराष्ट्रातील माझे सामाजिक क्षेत्रातिल सहकारी, मित्र, आणि परिवार या सर्वांचा खुप सिंहाचा वाटा आहे , असे यावेळी अनिल मोरे यांनी सांगितले .
मुंबई पोलीस कायदा १३५ अन्वये कलम ३७ (१) (३) नुसार गुन्हा दाखल.
परवा आ.संजय गायकवाड यांनी आपल्या चिरजिवांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजरो नागरिकांसमोर तलवारीने केक कापून आपल्या पत्नीला व इतरांना तलवारीनेच भरवला होता केक.
policenews:मुस्लिम धमचे धर्म गुरु व संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या वर वादग्रस्त वत्कव्य करणार्या रामगिर महाराज गोदावरी धाम बेट सरालाचे मठाधिपती यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या वर आक्षेपार्ह वत्कव्य करुन समाजाच्या भावना दुखावल्या आहे.
सिन्नर तालुक्यातील पंचाळ गावात प्रवचन दरम्यान इस्लाम धर्माचेच नाही तर संपुरण जगाला शांती अहींसा व प्रेमाचे संदेश देणारे हजरत मुहम्मद पैगम्बर यांच्या विषयी व मुस्लिम धर्मा विषयी आक्षेपार्ह वत्कव्य केल्या प्रकरणी
सरला बेटचे महंत रामगिर महाराज यांचे वत्कव्यामुळे लोणार शहराच्या सामाजिक कार्यकत्यानी पोलीस स्टेशन लोणार येथे पि.आय.नीमीश मेहेत्रे यांना तक्रार दिली.
murdernews:शेगाव.महिला वरील अत्याचार बंद करण्याकरिता केंद्र शासनाने हस्तक्षेप करण्याची केली मागणी..
शेगाव: संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या कलकत्ता येथील मेडिकल कॉलेज मधील प्रशिक्षु महिला डॉक्टर यांच्यावर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केल्याच्या घटने प्रकरणी दोषी असलेल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी.
या मागणीसाठी शेगाव शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भव्य कॅण्डल मार्च काढून पश्चिम बंगाल शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला व या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.
शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या शेगाव शहर अध्यक्ष अंजलीताई जोशी, डॉक्टर अंजुषा भुतडा, मंजू अशोक शर्मा लखपती गल्ली शेगाव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्थानिक अग्रेशन महाराज चौक परिसरात असलेल्या माहेश्वरी भवन समोरून महिलांचा भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला
अग्रेशन चौक येथून प्रारंभ करण्यात आलेला हा कॅन्डल मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन रोड, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक टी पॉईंट जवळुन शेगाव नगरपालिका कार्यालया जवळील गांधी चौक परिसरात पोहोचला.
कलकत्ता येथील महिला डॉक्टर वर बलात्कार करून हत्या केल्याच्या निर्घृण घटनेच्या विरोधात शेगाव शहरात महिलांचा आक्रोश.. कॅन्डल मार्च काढून महिलांनी केला पश्चिम बंगाल सरकारचा जाहीर निषेध.( murdernews )
यावेळी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या शेगाव शहर अध्यक्ष अंजलीताई जोशी, डॉक्टर अंजुषा भुतडा, डॉक्टर निदा हुसेन यांनी कोलकत्ता येथे महिला डॉक्टराच्या हत्येच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून केंद्र सरकारने याप्रकरणी दोषी असलेल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी सुद्धा केली आहे.
murdernews:कॅन्डल रॅलीत भारतीय जनता पक्षाचे शेगाव शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, संजय त्रिवेदी, राजकुमार व्यास, दीपक शर्मा, कीर्ती संघानी आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
किनगाव जटुटु येथे बॅंकेत ई के वायसी साठी लाड क्या बहिंणीची गर्दी होत आहे.
काहींचे झाले आहे.जमा तर काहिंचे के वायसी मुळे प्रतीक्षेत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महीलांच्या बॅंक खात्यावर दर महिन्याला 3000 हजार रूपये जमा करण्यात आले आहे.
व ज्या लाडकी बहिणिंच्या केवयासी केलेली नाही अशा लाडकी बहीणीचे केवायसी साठी बॅंकत रांगा लागले आहे.31 जुलै पर्यंत अर्ज मंजूर झालेल्या बहिणींनी लिभ मिळणार आहे.
योजनेचा अर्ज मंजूर झालेल्या लाडक्या बहीणींना बॅंक खात्याला आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे.बॅंक खात्याला आधार क्रमांक जोडण्यासाठी किनगाव जटुटु येथे स्टेट बॅकेच्या शाखेत लाडक्या बहिणींची गर्दी होता आहे.
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली या योजनेअंतर्गत रक्षाबंधनच्या आधी लाडक्या बहिणींची खात्यात दोन हपत्यांची तीन हजार रूपये जमा करण्यात आले आहे.
या भोजने साठी अर्ज मंजूर झालेल्या लाडक्या बहीणींना ई के वायसी करणे अवश्यक आहेत.तसेच काही महीलांचे अर्जच भरले गेले नसल्याने नवीन खाते उघडण्या साठी महिलांची बॅंकेत गर्दी होते.
ladkibahinyojna:अनेक महिलांच्या बॅंक खात्या विषयी अडचणी आहेत.त्या दुर करण्यासाठी महिलांची किनगाव जटुटु येथील स्टेट बैंकच्या शाखेत एकच गर्दी होत आहे.