Home Blog Page 96

शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे माता पिता पालक शिक्षक सभेचे आयोजन !!!( Yavalnews )

0

 

. यावल तालुका प्रतिनिधी :- विकी वानखेडे

दिनांक 6 जुलै 2024 शनिवारी शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे माता पिता पालक शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर जे महाजन हे होते तर व्यासपीठावर पर्यवेक्षक एस जे पवार, बी ई महाजन, सदाशिव पी निळे, जी एल चौधरी,आर सी जगताप माता पिता पालक हे उपस्थित होते.

यावेळी माता पिता पालक शिक्षक यांची कार्यकारणी निवड पुढीलप्रमाणे आर जे महाजन (अध्यक्ष)मिलिंद साहेबराव जंजाळे (पिता-पालक उपाध्यक्ष )वंदना नितीन सुतार (माता-पालक उपाध्यक्षा) एम ए महाजन( सचिव)संतोष भाऊलाल बाविस्कर सहसचिव देवानंद सुरेश लोधी सदस्य प्रीती भरत लोधी- सदस्य भारती प्रवीण जैन- सदस्य स्वाती हेमंत जोशी -सदस्य रेखा रामदास बडगुजर -सदस्य यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

यावेळी नवनिर्वाचित कार्यकारणीचे मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक एस जे पवार यांनी केले.

यानंतर विद्यालयातील उपशिक्षक बी इ महाजन यांनी खेळीमेळीच्या वातावरणात पालकांशी विषयवार चर्चा केली
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आर जे महाजन यांनी स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास , अभ्यासाचे नियोजन, याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी एल चौधरी यांनी केले तर आभार आर सी जगताप यांनी मानलेत. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Yavalnews:विशेष म्हणजे मिलिंद साहेबराव जंजाळे यांची साकळी पंचोकृषित प्रथमच माता पिता शिक्षक पालक या समितीत शिक्षण विभागात अनु. जातींचे तसेच पत्रकार, त्याच प्रमाणे फुले शाहु आंबेडकर विचारधारेचे मिलिंद जंजाळे यांची शारदा विद्या कनिष्ठ महाविद्यालय माता पिता शिक्षक समन्वयक समितीमध्ये एकमताने उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्याचे संपूर्ण जाती धर्मातून अभिनंदन केले जात आहे

भारतीय कायद्यात झालेला बदल आपण स्वीकारला पाहिजे – सपोनी संतोष चव्हाण ( policenews )

0

 

विकी वानखेडे यावल / जळगाव

policenews:भारतीय कायद्यात झालेला बदल हा आपण स्वीकारला पाहिजे ग्रामीण भागात कायद्याचे नियमांचे पालनही अधिक काटेकोर पणे केले पाहिजे यात फौजदारी कायदा,भारतीय पुरावा कायदा , हिट अँड रन ,मॉब लिचिंग या कायद्यात झालेला बदल तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देखील काही विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत.

एखाद्याला जामीनदार होण्यासाठी देखील आपण त्याबाबतची माहिती ठेवने आवशयक आहे. जूने गुन्हे देखील आता नवीन कायद्याने चालणार आहे.रस्ता अपघात यातही बदल झालेला आहे.

प्रत्येकाने गाडीचे कागदपत्रे व्यवस्थितपणे ठेवणे गरजेचे आहे. गुन्हेगारास पळवाटा कमी आहेत. गाडीचा अपघात होऊन पळाला तर त्याला जामीन ही लवकर मिळणार नाही.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

आहे अशी माहिती अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी दिली यामुळे आपण स्वतः ही या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि सोबतचे नातेवाईक यांना देखील याविषयीची माहिती द्यावी.

तसेच शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांनी तर गुन्हेगारी प्रवृत्ती पासून दूर रहावे अशी मागणी सपोनी चव्हाण यांनी दिली अजूनही गावा गावात कोर्टा मार्फत जनजागृती करण्यात येणार आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

याबाबत असे की चोपडा तालुक्यातील धानोरा येथील ग्राम पंचायत कार्यालयात दिनांक ६ रोजी संध्याकाळी अडावद पोलीस ठाण्याकडून नवीन कायद्याविषयी ची माहिती देण्यात आली

policenews:यावेळी अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण माजी उपसभापती माणिकचंद महाजन सरपंच रज्जाक तडवी उपसरपंच विजय चौधरी भुसावळ पतपेढी संचालक प्रशांत सोनवणे पोलीस हवालदार नाशीर शेख सतीश भोई ग्राम पंचायत सदस्य सावन महाजन रवींद्र शिरसाठ क्रीडाशिक्षक देविदास महाजन पोलीस पाटील रविंद्र कोळी सावदा तलाठी रशीद तडवी राजू पाटील आरिफ तडवी आशाबाई बोदडे हितेंद्र पाटील दिपक गुजर प्रवीण कोळी सिकंदर तडवी विजय पाटील जितेंद्र कुंभार मस्तुफा शेख तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते

शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी.( formernews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर

बीबी, कीनगाव जटुटु,भुमराळा परिसरात वन्य प्राण्यांची संख्या खूपच वाढली असून जंगली प्राण्यांचा जास्तच उद्रेक वाढला आहे .त्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान होत आहे.

तरी संबंधित वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरीही बीबी, कीनगाव जटुटु,भुमराळा महसूल मंडळात समाधानकारक पाऊस झालेला नसला तरीही शेतकरी कुठवर वाट पाहणार या आसेने सावकाराचे बँकेचे कर्ज काढून सोयाबीन, कपाशी, तूर , मुंग, उडीद अशा पिकांची पेरणी केली आहे.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

मात्र पीक जमिनीच्या वर येताच वन्यप्राणी या पिकाची नासाडी करीत आहेत. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्याला सावकाराचे ,बँकेचे कर्ज काढावे लागले ते येणाऱ्या पिकाच्या आधारावर फेडायचे असते ,मात्र शासन शेतकऱ्याला फक्त घोषणा देत आहे .

त्या पाठोपाठ वन्यप्राणीही शेतकऱ्याची पाठ सोडायला तयार नसून मोठ्या प्रमानात नीलगाय ,रोहि, हरीन रानडुक्कर, माकड मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला असून चिंतातूर झाला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी.( formernews )

खरीप हंगामात सुद्धा शेतकऱ्यांला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

formernews:तरी वन विभागाने वन्य प्राण्यांची प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी आणि वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत असून झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई तात्काळ लवकरात लवकर वन विभागाने द्यावी .अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार आणी युवक कल्याण व क्रीडा केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे केन्द्रात मंत्री झाल्यावर प्रथम आगमन झाल्यावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुष्पगुच्छ देवुन उत्साहाच्या वातावरणात स्वागत सत्कार करण्यात आले.

केन्द्रीय मंत्री रक्षा खडसे या चोपडा येथे कार्यक्रमास जात असतांना यावल येथील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विनंतीला मान देऊन त्या यावल शहरातील भुसावळ टी पाँईटवर स्वागत स्विकारण्यासाठी काही वेळ थांबल्या होत्या.

यावेळी माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, भुषण फेगडे , भाजपाचे शहराध्यक्ष राहुल बारी, योगेश चौधरी, सचिन मोरे, उज्वल कानडे, स्नेहल फिरके, सागर चौधरी, अनिकेत सोरटे, मनोज बारी, दिपक फेगडे यांच्यासह मोठया संख्येत पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

 

rakshatai khadse:या धावत्या भेटीत केन्द्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आपल्या पक्षाचे पदधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून यावल तालुक्यातील समस्यांविषयी विविध शासकीय कार्यालयांशी संबधित अधिकाऱ्यांशी त्यांनी स्वता भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करीत तातडीने समस्याचे निराकरण करण्याविषयी सुचना दिल्यात

सैलानी मध्ये भोंदू बाबाचा ‘पर्दाफाश’,अन् पोलिसांनी केलं ‘स्टिंग ऑपरेशन’ जादू टोना प्रतिबंध कायदा नुसार रायपूर ठाण्यात पहिला गुन्हा दाखल ( crimenews )

0

 

जावेद शाह बुलढाणा

crimenews:रायपूर. सैलानी दर्गा येथे भोंदू बाबांचा हैदोस वारंवार वाढत चाललेला आहे त्याला आढा घालण्या साठी रायपूर पोलिसानी कंबर कसली आहे नुकतीच एक घटना घडली आहे.

घटना अशा प्रकारे आहे की, यातील नमुद आरोपी -इरफान शहा रमजान शहा रा. सैलानी याने फिर्यादी- सौ.सुमनबाई विठठल जाधव, वय 72 वर्षे धंदा-शेती जात बंजारा
रा.येनोली तांडा. जिंतुर जि.परभणी. यांचा नातु विकी पुडंलिक जाधव यांचेवर सैलानी बाबा दर्गा येथे जंतर मंतर करून त्याचे आंगावर लिंबु कापून उतरून घेवून पैशाची
मागणी करून भिती दाखवून फसवणुक केली.

व फिर्यादी. यांचे नातावाचे हात पायाला बेड्या टाकून
साखळी ने बांधून अघोरी उपचार करून पिळवणुक केली आहे फिर्यादी यांचे तोडी रिपोर्ट वरून भोंदू बाबा इरफान शहा रमजान शहा रा. सैलानी यांच्या विरुद्ध कायमी अप.क्रं. 148/24 कलम 3(1).3(2) महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रतीबंध घालण्या बाबत व तयांचे समुळ उचटन करणे बाबत अधिनियम 2013 नुसार गुन्हा
दाखल केला आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

यात पो स्टे चे राजेश गवई व ओमप्रकाश साळवे यांचा सहभाग होता. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस अधीक्षक कडासने साहेब , पोलिस उपअधीक्षक महामुनी साहेब, dysp सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपास api दुर्गेश राजपूत करीत आहेत ..

सैलांनी मध्ये या पूर्वी कधीच जादूटोणा प्रतिबंधक कायदा बाबत कोणताही गुन्हा दखल नसून सदरची घटना ही पहिलीच असून या पुढे देखील असे आघोरी प्रकार बोंधू बाबा आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच जनतेला आव्हान आहे की अशा भोंदू बाबा यांना कोणताही प्रतिसाद न देता यांना बळी ना पडता रुग्णावर वैद्यकीय उपचार करावे तसेच बाबा दर्गा चे फक्त दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना करावी ..

crimenews:तसेच अशा बाबा विरुद्ध समोर येऊन पोलिसांना माहिती द्यावी ..तसेच रायपूर पोलीस देखील याबाबत कठोर कारवाई करीत आहे..

शाळा आरंभ दिवस उत्साहात साजरा व माता पालकांचा गौरव…!जिल्हा परिषद मरेगाव शाळेचा उपक्रम.( newsupdate )

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

newsupdate:गडचिरोली:-पंचायत समिती गडचिरोली अंतर्गत अभिंर्झा केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मरेगाव येथे आज शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक दोनच्या शुभ पर्वावर विविध उपक्रम राबविण्यात आले.उन्हाळी सुट्‌या संपून विदर्भातील सर्व शाळा 1 जुलै पासून सुरु झाल्या.

त्या निमित्त्याने दिनांक 1 जुलै ला जि प उच्च प्राथ शाळा मरेगाव येथे शाळा आरंभ दिन शाळा प्रवेशोत्सव नवागतांचे स्वागत कार्यक्रम घेण्यात आला.या निमित्याने सकाळी गावातून शैक्षणिक प्रभातफेरी काढण्यात आली.

यामध्ये सर्व भरती पात्र बालकांच्या घरा पर्यत प्रभातफेरी नेवून सजविलेल्या बैलबंडीत नवागतांना बसवून शाळेत आणण्यात आले.शाळेच्या प्रवेश ‌द्वारावर त्यांचे पाय धुवून औक्षण करण्यात आले. शाळेच्या दुतफो उभे असलेल्या वि‌द्याथ्यर्थ्यानी नवागतांवर फुलांचा वर्षाव केला.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वि‌द्यार्थ्यांना फुलांचे गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.सोबतच मोफत पाठ्यपुस्तके,बुट व चाकलेट देवून स्वागत करण्यात आले.तसेच शाळा पूर्व तयारी मेळाव्यातील सात स्टालच्या माध्यमातून नवागत बालकांची कृतियुक्त गुणवत्ता तपासण्यात आली.

गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांच्या प्रेरणेतून कार्यक्रम घेण्यात आले.सोबतच केंद्र प्रमुख यांचे सहकार्य लाभले.
मागील शैक्षणिक सत्रात वर्ग 1 ली च्या माला पालकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यास शाळेला सहकार्य केले त्याबद्दल शाळेतील शिक्षिका सौ मंगला सुरकार यांनी सर्व मातांना साडी व चोळी देवून मान्यवरांच्या हस्ते शाळेतर्फे गौरव करून इतर सर्व माता व पालकांना शैक्षणिक कार्याची प्रेरणा दिली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कार्यक्रम निमित्याने शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक गुणवंत हेडाऊ यांनी प्रास्ताविकातून माता पालकांना,वि‌द्यार्थी दैनदिन उपस्थिती शालेय गुणवत्ता वाढ,विविध शालेय योजना यांचे मार्गदर्शन केले. मान्यवरांनी शाळेबद्दल मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला गावच्या सरपंचां सौ आविका मडावी, उपसरपंच श्री नेताजी अलाम.ग्रा.पं.स. नितीन टेकाम, शा.व्य.स. अध्यक्ष अडभंगी बावणे,उपाध्यक्षा सौ शितल हरडे, सदस्य श्री अविनाश सेलोटे, सौ विद्या दिवटे, सौ. अलाम,श्रीमती येरमे, अंगणवाडी ताई श्रीमती कांबळे,गावातील इतर मान्यवर तसेच वर्ग 1 ते 7 च्या माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

newsupdate:सौ सुरकार ताई यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.आभार कु. टेकाम ताई यांनी मानले तर कार्यक्रम पार पडण्यासाठी श्री मडावी सर यांनी सहकार्य केले

तेलंगणात काँग्रेस सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला, महाराष्ट्रातही कर्जमाफी व्हावी,रयत शेतकरी संघटनेची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कृषिमंत्र्याकडे मागणी (Buldhananews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

Buldhananews:तेलंगणात काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीचा करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रात देखील कर्जमाफी व्हावी, शेतकरी रयत संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके


महाराष्ट्र :तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात देखील कर्जमाफी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषिमंत्री यांचे कडे रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी केलं आहे.

याआधी कर्जमाफी करण्यात आली मात्र, त्यात अटी शर्ती इतक्या लागू केल्या की लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते.

त्यामुळं आता जर सरकार कर्जमाफी करणार असेल तर अटी शर्तींच्या बाबतीत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांची फसवणूक करु नये असे पुर्णाजी खोडके म्हणाले…

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी

तेलंगणामधील काँग्रेस सरकारने 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रेवंथा रेड्डी यांनी 31 हजार कोटींच्या शेती कर्जमाफीला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याची घोषणा काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती. त्याप्रमाणं सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

तेलंगणा मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. यात 34 हजार कोटी रुपयांच्या कृषी कर्ज माफीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 15 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज सरकार माफ करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी दिले आहे…..

शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारनं चांगली योजना राबवावी

https://youtu.be/CQjoFXhVtqA?si=cCWxNagRJjs3KCDu

तेलंगणा सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी केली आहे. राज्यात शेतकरी संपानंतर आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर दोन वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र, अटी शर्तींमुळं अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. नियमित कर्ज भरणारे शेतकरी देखील प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असल्याचे पुर्णाजी खोडके म्हणाले. लोकसभा निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब उमटल्याचे खोडके म्हणाले.

बातमी सविस्तर पहा  लाईव्ह 

आता पुन्हा एकदा राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करणार अशी चर्चा सुरू आहे. मागील दोन कर्जमाफीच्या वेळी झालेला घोळ पाहता अगोदरच्या कर्जमाफीत पात्र शेतकऱ्यांचा आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांचा शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार करावा असे खोडके म्हणाले. जे अपात्र ठरले त्या त्रूटी दूर कराव्यात.

Buldhananews :तसेच कर्जमाफीची नुसती घोषणा करु नये, तर त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे ईमेल पाठवून द्वारे मागणी केली आहे…

आंतरजातीय प्रेम विवाह केल्याचे कारणावरून दोन गटात हाणामारी दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल ( crimenews )

0

 

यावल : विकी वानखेडे

crimenews:आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून बुधवारी पावणे अकरा वाजेचे सुमारास येथील बस स्थानक समोर दोन गटात वाद होऊ तुफान हाणामारी झाली यात दोन्ही गटाकडील प्रत्येकी एक एक जण असे दोन जण जखमी झाले आहेत दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल केल्या.

असून एका गटातील अठरा आरोपींविरुद्ध तर दुसऱ्या गटातील ११ जणांविरुद्ध अशा २९ जनाविरुद्ध जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आकाश मधुकर बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी आंतरजातीय प्रेमविवाह केला असून या विवाहास पत्नीच्या कुटुंबाकडून प्रचंड विरोध आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

आंतरजातीय विवाह केल्याने पत्नीच्या नातेवाईकाकडून रस्त्याने जाता येता शिवीगाळ व जिवे ठार मारण्याचे धमक्या दिल्या जात होत्या. मात्र पत्नीचे नातेवाईक असल्याने व तिचे सांगण्यावरून मी पोलिसात फिर्याद दिली नव्हती. २६ जून रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास मी यावल बस स्टॅन्ड कडे माझी खाजगी कामानिमित्ताने जात असताना बस स्टॅन्ड समोर प्रवीण उर्फ पल्या सुरेश बारसे, निलू सुरेश बारसे व अन्य १६ जनांनी माझी मोटरसायकल अडवत माझेवर बंदुक रोखत अचानक मला पकडून गाडीवरून ओढून खाली पाडले

त्याच वेळी हातातील लोखंडी फायटरने छातीवर पाठीवर जोरजोराने मारहाण करून सुरुवात केली . इतरांनी लाथा बुक्क्यांनी तुडविले व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादित नोंद असून १८ संशयित आरोपी विरूध्द भादवि कलम३०७ सह, आर्म अॅक्ट ३,२५ सह दंगली चा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

परस्पर विरोधी गटाकडून चंद्रकांत ऊर्फ अजय नेमीचंद सारसर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी यावल नगरपालिकेत सफाई कर्मचारी असून माझेसोबत प्रविण सुरेश बारसे हा सफाई कर्मचारी होता आम्ही दोघे बस स्टॅंड चौकात साफसफाई करत असताना आकाश मधुकर बिऱ्हाडे हा त्याचे मोटर सायकलने आमचे जवळ येवून ए साले ए साले आम्हाला चिडवू लागला आम्ही त्याला सांगितले.

की, लोकांसमोर तु आम्हाला असे हिनवू नकोस आमची इज्जत कमी होते. तेव्हा आकाश त्यांच्या साथीदारांनी आम्हाला पुन्हा शिवीगाळ करत आम्हाला शिवीगाळ करत फायटरसह लाथा-बुक्यांनी मारहाण केली.

crimenews:फिर्यादीत आकाश मधुकर बिऱ्हाडे यांचेसह ११ संशयित आरोपींचा समावेश आहे.पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली यावल पोलीस तपास करीत आहे.

बुधनेश्वर केमिकल प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करा -आमदार गायकवाड च्या दणक्याने पाडळीत शेकडो शेतकऱ्यांना मिळाला लाभ ( sanjaygaikwad )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

sanjaygaikwad:विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या बुद्धनेश्वर परिसरात अज्ञात व्यक्तीने केमिकल फेकल्याने परिसरातील शेतकऱ्याचा सात एकर शेताचे नुकसान झाले आहे, याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपीला अटक करावी असे आदेश बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांनी दिले.

सदर आदेश मंगळवारी बुधवनेश्वर दौऱ्या दरम्यान दिले….!मागील काही दिवसापूर्वी विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर असलेले बुद्धनेश्वर या भागात अज्ञात आरोपीने रासायनिक केमिकलयुक्त डबे परिसरातील शेतात आणून फेकून दिले त्यामुळे बुद्धनेश्वर येथील शेतकरी राहुल जाधव यांची तब्बल सात एकर शेतीचे प्रचंड नुकसान झाले या केमिकलमुळे परिसरात विषारी वायू तयार झाला होता, त्याची दुर्गंध दूरवर पसरली होती.परिणामी परिसरातील शेकडो नागरिक घाबरले होते,भयभीत होते. पीडित शेतकऱ्यांनी या संदर्भात आमदार संजय गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना आपल्या झालेल्या नुकसानाची व सदर घटनेची संपूर्ण माहिती दिली.

त्यावर आमदार संजय गायकवाड यांनी तत्काळ बुद्धनेश्वर येथील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी लगेच तहसीलदार,कृषीअधिकारी व संबंधित धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार, वनविभागाचे कर्मचारी यांना घटनास्थळी बोलावून घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश दिले व पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या. तसेच ठाणेदार यांना या प्रकरणाचा तत्काळ तपास करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले….!

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

दरम्यान परतयेत असतानाच पाडळी परिसरातून काही शेतकऱ्यांनी त्यांना संपर्क करून पाडळी सेंट्रल बँक शाखा अधिकारी हे शेतकऱ्यांना मिळत असलेल्या पिकविमा,अनुदाना संदर्भात अडवणूक करून सदर व इतर अनुदान हे कर्ज खात्यात वर्ग करण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती दिली. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सदर अधिकाऱ्यास घेराव देखील केला…!
ही माहिती मिळताच आमदार धर्मवीर श्री संजय गायकवाड यांनी लगेच पाडळी येथील सेंट्रल बँक शाखेत भेट देऊन अधिकाऱ्यास चांगलेच फटकारले…!

यावेळी अचानक आमदार संजय गायकवाड यांना आपल्या शाखेत पाहू सदर शाखा अधिकारी यांची तारांबळ उडाली.
यावेळी आमदार संजय गायकवाड यांना प्रत्यक्ष उपस्थित पाहून सर्व शेतकऱ्यांनी त्यांना आपल्या अडचणी सांगितल्या व शाखा अधिकाऱ्याची तक्रार केली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यावर आमदार संजय गायकवाड यांनी शाखाधिकार्‍यास चांगलेच धारेवर धरले. त्यावर शाखा अधिकारी उपस्थित पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही शेतकऱ्याचा पिक विमा अथवा इतर शासकीय अनुदान कर्ज वळती न करता कोणाचेही खाते गोठण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिले.

sanjaygaikwad:त्यावर शेतकऱ्यात आनंद पसरला यावेळी गावातील शेकडो शेतकऱ्यांनी आमदार संजय गायकवाड यांचे आभार मानले….!यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्यासह जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत तालुकाप्रमुख धनंजय बारोटे आदी उपस्थित होते…!

वहिनीची हत्या करणाऱ्या नराधम दिराला जन्मठेप! बुलढाणा प्रमुख जिल्हा न्यायालयाचा निकाल ( crimenews )

0

 

अनिलसिंग चव्हाण / बुलढाणा

crimenews:बुलढाणा: वहिनीने चोरीचा आरोप केला म्हणून तिच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या दिरास बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे.

मागील २८ डिसेंबर २०२० रोजी ही घटना घडली होती. आज २५ जून २०२४ रोजी आरोपी दिर राजू गवई याला जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खटल्याची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे आहे. भादोला( तालुका बुलढाणा) येथील रहिवासी संतोष चिंकाजी गवई यांच्या पत्नीने दिर राजू गवई याच्यावर चोरीचा आरोप केला.

त्यामुळे संतापलेल्या राजूने वहिनी बेबीबाई यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार केला . डोक्यात जबर मार लागल्याने बेबीबाई यांच्या डोक्यातुन रक्तस्त्राव सुरू झाला. त्यावेळी संदीप गवई हा तिथे पोहोचला. संदीपने विचारल्यानंतर राजूने मारहाण केल्याचे बेबीबाई म्हणाल्या.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

त्यांनतर बेबीबाई गवई यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. २७ डिसेंबर रोजी ही तक्रार देण्यात आली होती. राजू गवई याच्या विरोधात ३०७ कलमेनुसार गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या बेबीबाई यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, २८ डिसेंबर रोजी त्यांचा उपचारा दरम्यानच मृत्यू झाला.

त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये कलम ३०२ व कलम ४५२ समाविष्ट केल्या गेल्या. सदर गुन्हयाचा तपास प्रथम पोलीस उपनिरीक्षक रामपुरे, तसेच निरीक्षक नवलकार त्यानंतर
उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी केला. आरोपीविरूध्द पुरेसा पुरावा मिळून आल्याने बुलढाणा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सरकारी वकील ॲड. संतोष खत्री यांचेकडे सरकार पक्षाची बाजू मांडण्याची जवाबदारी सोपविण्यात आले. प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी साक्षीदार संदिप गवई यांचा पुरावा महत्वाचा ठरला. कारण बैबीबाई हिने मृत्यूआधी राजुने हल्ला केल्याचे साक्षीदार संदीप गवई यांना सांगीतले होते. त्यामुळे साक्षीदार संदिप गवई यांचा पुरावा विशेष ठरला.

त्याप्रमाणे इतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सरकारी वकील ॲड. संतोष खत्री यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. मृतक बेबीबाई ह्या घराच्या टीणावरून लाकडे काढत असताना पडल्या आणि डोक्याला मार लागून त्या मरण पावल्या असा युक्तिवाद आरोपीच्या विधिज्ञांनी केला होता. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री स्वप्निल खटी यांनी कलम ३१० सी. आर. पी. सी नुसार घटनास्थळाचे अवलोकन करण्याकरीता आदेश पारीत केले.

https://youtu.be/_f6FMjyszSE

व त्यानुसार सरकारी वकील तसेच आरोपींचे वकिलांना नोटीस देवुन प्रत्यक्षरीत्या घटनास्थळाचे अवलोकन केले. आतापर्यंतच्या न्यायालय इतिहासात बुलढाण्यात हे प्रथमच घडले होते. दस्तरखुद्द न्यायाधीशांच्या अवलोकनानंतर आरोपीचा बचाव योग्य नसल्याचे न्यायनिर्णयात नमूद केले. आरोपी राजू गवई याच्या विरोधात गुन्हा सिद्ध होत असल्याने कलम ३०२ भा.दं.वि. मध्ये आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा व रू. ५०० दंड ठोठावला. दंड न भरल्यास २ वर्षापर्यंत सश्रम कारावासची शिक्षा ठोठावली. तसेच कलम ४५२ भा.दं.वि. मध्ये ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रू. ५०० दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांपर्यंत सश्रम कारावासची शिक्षा ठोठावली.

crimenews:सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. संतोष खत्री यांनी कामकाज पाहिले. बुलडाणा ग्रामीण पोलिसांमधील हेड कॉन्स्टेबल बोरकर, झगरे, मिसाळ यांनी सहकार्य केले.