राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी.ऍड.ज्योतीताई ढोकणे यांची नियुक्ती OBC 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

जळगाव (जामोद):दि.८ बुलढाणा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष तथा काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी ,माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड.ज्योतीताई ढोकणे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव तायवाडे, राष्ट्रीय महिला महासंघाच्या अध्यक्षा सुषमाताई भड यांनी दिनांक ३ डिसेंबर रोजी नागपूर येथे राष्ट्रीय महिला अधिवेशनामध्ये ऍड.ज्योतिताई ढोकणे यांच्या नावाची घोषणा केली. ह्यापूर्वी प्रदेश अध्यक्ष असलेल्या सौ.कल्पनाताई मानकर यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.

ऍड.ज्योतीताई ढोकणे ह्या गत तीन दशकापासून सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय आहेत. तालुक्यातील अग्रगण्य अशा क्रांतीज्योती महिला पतसंस्थेच्या त्या बऱ्याच काळापासून अध्यक्ष सुद्धा आहेत.

राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये सुद्धा गेल्या पाच वर्षापासून सक्रिय आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महिला विभागाचे संघटन अधिक मजबूत होईल, असा आशावाद यावेळी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ OBC

Leave a Comment