Polanews/ज्ञानदीप विद्या निकेतन, हिंगणघाट येथे तान्हा पोळ्याचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा

0
62

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:-आपल्या संस्कृतीतील, पारंपरिक सणांची लहान वयापासून ओळख मिळावी व बालकांच्या मनात शेती व शेतकऱ्यांविषयी आदरभाव निर्माण व्हावा या हेतूने ज्ञानदीप विद्या निकेतन, हिंगणघाट येथे प्रि-प्रायमरी विभागामध्ये  तान्हा पोळा उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

या विशेष कार्यक्रमासाठी शाळेचे प्रांगण रंगीबेरंगी फुलांनी, कागदी पताका व आकर्षक सजावटींनी सजवले गेले होते. लहानग्या मुलांनीही रंगीत पोशाख घालून उत्सवात सहभाग घेतला. बऱ्याच मुलांनी पारंपरिक शेतकरी वेशभूषा धारण केली होती.

Hingnghatnews /राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धेसाठी ज्ञानदा स्कूल सातेफळ चे 5 खेळाडूंची निवड

विद्यार्थ्यांनी छोट्या लाकडी नंदीबैलांना फुलांचे हार, रंगीत झुल, कागदी मुकुट आणि आकर्षक सजावट करून सजवले होते. तर काही मुलांनी खऱ्या बैलाची वेशभूषा धारण केली होती. सजावटीमुळे शाळेचे वातावरण सणावाराच्या रंगात न्हाऊन निघाले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी सर्व मुलांचे स्वागत केले.

त्यानंतर लहानग्यांनी सजवलेल्या तान्ह्या बैलांची शाळेच्या प्रांगणात मिरवणूक काढण्यात आली. उत्कृष्ट नंदीबैलाच्या सजावटीला पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यात आला. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, निरागस हसू आणि उत्साह पाहून उपस्थित शिक्षक भारावून गेले.

जाहिरात

या कार्यक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक अभिनव जयस्वाल यांनी बालकांना सोप्या भाषेत तान्हा पोळ्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, शेती ही आपल्या देशाची खरी ताकद आहे आणि बैल हे शेतकऱ्यांचे विश्वासू साथीदार आहेत. शेतकरी आपल्या बैलांची काळजी घेतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा व तान्हा पोळा हे सण साजरे केले जातात.

अखेरीस सर्व विद्यार्थ्यांना गोडधोड व फुगे देण्यात आले. मुलांच्या हातात फुगे व चेहऱ्यावरचे निरागस हास्य पाहून संपूर्ण शाळा आनंदाने भरून गेली. शाळेचे संस्थापक गिरधर राठी, अध्यक्षा अर्पणा रशेश राठी, सहसचिव रशेश राठी, कोषाध्यक्ष प्रवीण धोबे, प्राचार्य अभिनव जयस्वाल व शिक्षकांनी अशा उपक्रमांमुळे बालकांना भारतीय संस्कृतीची मोलाची शिकवण मिळते, असे मत व्यक्त केले. तसेच सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Polanews/ज्ञानदीप विद्या निकेतन शाळेच्या प्रांगणात झालेला हा तान्हा पोळ्याचा कार्यक्रम केवळ मुलांच्या आनंदापुरता मर्यादित न राहता, शेतकऱ्यांच्या कष्टांचे व परंपरेचे महत्त्व पटवून देणारा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here