बिबी सुलतानपूर रोडवरील ए एस पेट्रोल पंपावर रात्री जबरी चोरी बिबी पोलिसांनी चार तासात लावला अज्ञात आरोपीचा छडा(policenews)

0
2

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

policenews:आज दिनांक 16 10 2024 वार रोज बुधवार ला सकाळी पोलीस स्टेशन बिबी हद्दीत बिबी ते सुलतानपूर वरील इंडियन ऑइल (ए. एस. पेट्रोल पंप) रात्री1 वाजून 35 मिनिटाचे सुमारास आज्ञात आरोपीने पंपावरील सेल्समन ला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील 71हजार 550 रुपये जबरदस्तीने चोरून नेले याबाबत पोलीस स्टेशन बिबी येथे भारतीय न्याय संहिता व शस्त्र अधिनियमन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस स्टेशन बिबीचे ठाणेदार संदीप पाटील व पोलीस अंमलदार यांचे पथकाने माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री विश्व पानसरे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा बी.बी.महामुनी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील साहेब तसेच माननीय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अशोक लांडे साहेब यांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले पूर्ण पणे ओळख लपवून आलेला असताना बिबी पोलिसांनी आरोपीचा कसोशीने शोध घेऊन आरोपी नामे

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

बाळू उर्फ विश्वनाथ परसराम तेजनकर वय 30 वर्ष राहणार वल्लूर ता लोणार जि बुलढाणा या ताब्यात सदर आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने फिर्यादी सोबत सगणमत करून पेट्रोल पंपावरील पैसे चोरी करण्यासाठी जबरी चोरीचा बनाव केल्याचे आरोपीच्या चौकशीत निष्पन्न झाले सदर आरोपी बाळू उर्फ विश्वनाथ तेजनकर याचे कडून गुन्ह्यातील गेलेला माल 71550 रुपये

गुन्ह्यात वापरलेले हत्यार वापरलेली दुचाकी (स्कुटी) तसेच घटनेवेळी आरोपीने ओळख लपविण्यासाठी वापरलेले कपडे असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर घटना घडल्याच्या माहितीवरून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तात्काळ भेट दिली व बिबी पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकास मार्गदर्शन केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री विश्व पानसरे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री बी.बी. महामुनी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री अशोक थोरात साहेब माननीय

policenews:उपविभागीय पोलिस अधिकारी श्री प्रदीप पाटील साहेब तसेच माननीय पोलीस निरीक्षक स्थानी गुन्हे शाखा अशोक लांडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बिबी चे ठाणेदार संदीप पाटील पोलीस अंमलदार परमेश्वर शिंदे- अरुण सानप -नितीन मापारी -यशवंत जैवळ -बद्रि कायंदे- चालक अशोक अंभोरे -अरुण मोहिते -रवी बोरे -आकाश काळदाते यांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here