इस्माईल शेख
Policenews:शेगाव – दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान शेगाव शहरातील डम्पिंग ग्राउंड येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत पाच आरोपींना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोउपनि. कुणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत खालील आरोपींना अटक करण्यात आली:1. पंकज सुभाषराव पाटील (वय 42, रा. जळका भडंग, ता. खामगाव)2. आकाश सुभाष भारसाकळे (वय 31, रा. एकलारा बानोदा,
ता. संग्रामपूर)3. सुनिल सुरेश माजोळकर (वय 34, रा. सुरभी कॉलनी, आकोट रोड, शेगाव)4. कृष्णा सुभाष सारवान (वय 28, रा. खळवाडी, आकोट रोड, शेगाव)5. अमोल भागवत दळी (वय35,रा. खेर्डा, ता. शेगाव)या छाप्यात पोलिसांनी आरोपींकडून 10,100 रुपयांची रोख रक्कम, 100 रुपयांचे जुगार साहित्य, चार मोबाईल फोन (एकूण किंमत अंदाजे
Policenews:21,000 रु.), तसेच दोन मोटारसायकली (किंमत अंदाजे 1,40,000 रु.) असा एकूण 1,71,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदर प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 230/2025, कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोहेका. संतोष गवई यांच्याकडे देण्यात आला आहे.