अज्ञात तीन इसमांविरोधात तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार!
संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल परिसरात एका पत्रकारावर अज्ञात तीन इसमांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे.
या प्रकरणी संबंधित पत्रकाराने तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी अज्ञात आहेत.
Buldhanaurbanbank/कोट्यवधी रुपयाच्या शेकडो क्विंटल धान्य अफरातफरीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न !
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरवट बकाल येथील रहिवासी व दैनिक सेवा शक्ती या वृत्तपत्राचे उपसंपादक शेख कदीर (वय ४२) हे २२ डिसेंबर २०२५ रोजी दिवसभर न्यायालयात शासकीय जाहिरात संदर्भातील कामासाठी उपस्थित होते.
सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास ते आपल्या मोटारसायकल ने संग्रामपूरहून वरवट बकाल येथे घरी जात असताना मधुकर बकाल यांच्या शेताजवळील हनुमान मंदिर परिसरात विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून तीन अज्ञात इसम त्यांच्या जवळ आले.
त्यांनी “ओ पत्रकार” असे म्हणत शेख कदीर यांना थांबवले. त्यानंतर त्यांच्यावर शिवीगाळ करत “तू पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोलीस कशाला पाठविले?” असा जाब विचारत जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी एका इसमाने हातातील फावड्याने पत्रकारांच्या डोक्यात हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
हा घाव चुकवताना फावडा त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला लागून दुखापत झाली.
घटनेनंतर शेख कदीर यांनी आरडाओरड केल्याने तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पलायन झाले. सुरुवातीला उपचार न घेतल्याने दुसऱ्या दिवशी हाताला सूज आल्यावर त्यांनी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले.
या घटनेमुळे संबंधित पत्रकाराच्या जीवितास संबंधितांकडून धोका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली असून, आरोपी समोर आल्यास ओळख पटवू शकतो असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
Tahsilnews/सदर घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, तामगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास पीएसआय बोपटे करीत आहेत








