कमालच! पोलीस दादाने ‘सोशल मीडिया’ वर टाकली जातीयवादी पोस्ट ; पोलीस अधीक्षकांनी केले निलंबित! ( Policenews )

0
8

 

बुलढाणा: Policenews: समाजमाध्यमावर कार्यकर्ते वा नागरिकांनी आक्षेपार्ह मजकूर टाकण्याच्या घटना आपण वाचतो.

मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याने असा मजकूर टाकल्याचे निदर्शनास आले असून त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

गजानन खेर्डे असे या बहाद्धराचे नाव असून तो खामगाव येथील पोलीस नियंत्रण कक्षात सहायक फौजदार या पदावर कार्यरत आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

त्याने सामाजिक माध्यमावर दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल असा मजकूर समाज माध्यमावर टाकला. ही बाब निदर्शनास आल्यावर याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी खामगाव नियंत्रण कक्षाकडून मागविला. पडताळणी नंतर खेर्डे याला आज निलंबित करण्यात आले. याचे आदेश आज संध्याकाळी काढण्यात आले.

 

तसेच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदारांना याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

Policenews: दरम्यान आज पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या नियमित गुन्हे आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे निर्देश करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here