कंत्राटी कर्मचाऱ्यांना वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर सामावून घ्या,! खा.जाधव यांना निवेदन ,शेगांवात १५ कंत्राटी कर्मचारी संपावर, ( prataprao jadhav )

 

इस्माईल शेखबुलढाणा जि.प्र.

शेगांव महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगार यांच्या वेतनात वाढ, रोजंदारी कामगार पद्धती द्वारे शाश्वत रोजगार इत्यादी प्रमुख दोन मागण्या सह महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटने कडून खा.प्रतापराव जाधव यांना दि.५/३/२०२४ रोजी निवेदन देण्यात आले.

खा.जाधव हे बचत गटांच्या विक्री केंद्राच्या उदघाटन निमित्त तहसील कार्यालय येथे आले असता त्यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात नमुद आहे.

की महावितरण, महानिर्मिती, व महापारेषण या कंपनीतील कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नये आणि ३० टक्के वेतनवाढ देण्यात यावी या कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.

नजर वाढवण्यासाठी तुमच्या आहारात करा या पदार्थांचा समावेश, होतील डोळ्यांच्या समस्या होतील दूर ( Health Eyescare )

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण,महानिर्मिती आणि महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांकरिता मध्य रात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत.यामध्ये शेगाव विज वितरण कंपनी चे विनीत मंगलसिंग चव्हाण,राहुल कोकाटे शवशंकर ठाकरे,स्वप्नील ठाकरे,मंगेश वाघमारे परमेश्वर दांडगे,मिलिंद बोदडे,रोहित शिनगारे ऋषिकेश झाडोकार,मनोज तेल्हारकर,राजेश बेलूरकर ,मो.तन्वीर,अविनाश भाकरे,गणेस मुळे,राजेश टाकरडे हे कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये राज्यातील सुमारे ४२ हजार कंत्राटी कर्मचारी आहेत.

त्यांना वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर सामावून
घ्या, हे कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका, यासह इतरही मागण्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आहेत.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्या मान्य होत नसल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी २८ आणि २९ फेब्रुवारीला लाक्षणिक संप केला होता आणि त्यांच्या
मागण्या मान्य न झाल्यास ५ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता.मागण्या मान्य न झाल्यामुळे सदर कंत्राटी कर्मचारी संपावर गेली आहेत.

Pratapravjadhav : विज वितरण कंपनीच्या व कंत्राटी कर्मचार्यांच्या भांडत मात्र सामान्य नागरिक नाहक भरडल्या जात आहे.

Leave a Comment