पंतप्रधान मोदींची शरद पवारांबद्दल दाखवलेली सौहार्दपूर्ण वृत्ती व्हायरल (Prime Minister Narendra Modi)

0
6

 

अनिलसिंग चव्हाण ( संपादक )

Prime Minister Narendra Modi:दिल्लीत 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्याशी दाखवलेली सौहार्दपूर्ण वृत्ती सर्वांच्या मनात ठसा उमटवून गेली.

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची दिली आणि स्वत:च्या हातानं त्यांच्यासमोरच्या ग्लासात पाणी ओतलं. हा प्रसंग आता प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोकांच्या प्रशंसेचा विषय बनला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

ट्रकमध्ये संसार मांडलेले दाम्पत्य: सिंदखेड राजा तालुक्यातील एकनाथ पवार यांची संघर्षमय कहाणी(Truck driver)

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मराठी भाषेच्या महत्त्वाबद्दल बोलताना म्हटलं, “आज दिल्लीमध्ये मराठी भाषेचा हा गौरवशाली कार्यक्रम आयोजित होत आहे. संघामुळेच मला मराठी भाषा अवगत झाली. काही दिवसापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. देशात आणि जगात १२ कोटींहून अधिक मराठी भाषिक लोक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही कोट्यवधी मराठी भाषिकांची इच्छा होती. दशकांपासून हे काम अपूर्ण होतं. मला ते पूर्ण करण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्य आहे.”

  1. बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यांनी आणखी म्हटलं, “भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही, तर भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. भाषा समाजात जन्म घेत असते. पण भाषा समाजाच्या निर्माणात देखील तेवढीच महत्त्वाची भूमिका निभावते.

Prime Minister Narendra Modi:केसरी आणि मराठा सारख्या वृत्तपत्रांनी, गोविंदाग्रजांच्या कविता, राम गणेश गडकरींचे नाटक यातून राष्ट्रप्रेमाची धारा निघाली. त्यातून स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा मिळाली. सामाजिक मुक्तीचे द्वार उघडण्याचं काम मराठी भाषेनं केलं.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here