शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाच्या तयारीला लागा...
Ravikanttupkar:मेहकर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज (ता.२२ सप्टेंबर २०२४) मेहकर येथे अतिशय उत्साहात पार पडली.
या बैठकीत सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी होणाऱ्या आंदोलनाचे टप्पे ठरविण्यात आले, त्याचबरोबर आक्रमक आंदोलनाची दिशाही ठरविण्यात आली.
तसेच संघटनात्मक बांधणी व आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मेहकर विधानसभा मतदारसंघात शेतकरी-कष्टकऱ्यांचा अतिशय ताकदीचा उमेदवार असेल व मेहकर विधानसभा अतिशय ताकदीने लढविणार, अशी घोषणा यावेळी केली. याप्रसंगी अनेक तरुण या चळवळीच्या प्रवाहात सहभागी झाले, त्यांचे स्वागत केले.
Ravikanttupkar :डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्या पुढाकारातून या बैठकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. तर या बैठकीला मेहकर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)




