अभिनेता सलमान खान याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात, चित्रपटाचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यातच ( salmankhannewmovie )

 

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. सलमान खान हा साजिद नाडियालवालाच्या मेगा बजेट ॲक्शन चित्रपटात दिसणार आहे.

ज्याचे दिग्दर्शन ए मुरुगादास करणार आहेत. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नाडियालवाला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली.


या पोस्टच्या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिले आहे की, “सलमान खान सोबतचे आमचे दीर्घकालीन कामकाज पूढे नेण्यासाठी उत्सुक आहोत. सलमान सोबतचा आमचा हा चित्रपट महत्त्वकांक्षी चित्रपटांपैकी एक आहे.

जो २०२५ च्या ईद ला प्रदर्शित होणार आहे. परंतु त्याचे नाव मात्र अजूनही उघड केले गेले नाही.”
या चित्रपटाची बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू होती.salmankhannewmovie

लग्नसराईचा मौसम झाला सुरू, चला करू या आकर्षक पारंपरिक दागिन्यांची खरेदी..( oxidejweellary )

मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा साजिद नाडियालवालाने दिग्दर्शक ए आर मुरुगादास यांसोबत चित्रपटाची चर्चा केली, तेव्हा त्यांच्या मनात सर्वात पहिल्यांदा सलमान खानचे नाव आले.

पुढे साजिद यांनी सलमान खान सोबत चित्रपटाविषयी चर्चा केली व त्यानंतर सलमानने या चित्रपटासाठी होकार दिला.

या चित्रपटाचे शूटिंग भारतात तसेच पोर्तुगाल आणि इतर युरोपीय देशांमध्ये करण्यात येईल.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

salmankhannewmovie: या चित्रपटाच्या बजेटविषयी म्हणायचे झाले, तर सुमारे ४०० कोटी बजेटमध्ये हा चित्रपट होणार आहे. परंतु या चित्रपटाच्या शूटिंग शेड्युल्ड आणि बजेटविषयी पुरेशी माहिती समोर आली नाही. एकंदरीत १० वर्षांनंतर साजिद नाडियालवाला आणि सलमान खान हे एकत्र काम करणार आहेत.

Leave a Comment