लग्नसराईचा मौसम झाला सुरू, चला करू या आकर्षक पारंपरिक दागिन्यांची खरेदी..( oxidejweellary )

 

स्त्रियांना नटायची भारी हौस असते बुवा… त्यासाठी त्या नवनवीन काहीतरी ट्राय करून पाहत असतात. आजकाल ऑक्साईड ज्वेलरीची खूप क्रेझ आहे. हल्ली तर बहुतेक साड्यांना चंदेरी रंगाचे काठ आपल्याला पाहायला मिळतात.

त्यामुळे अशा साड्यांवर ऑक्साईड ज्वेलरी तुम्ही हमखास घालून मिरवू शकता. लग्नसराईच्या सिझनमध्ये काही पारंपरिक दागिने तुमच्या कलेक्शन मध्ये आवर्जून असायलाच हवेत.

यापैकी सर्वात पहिला दागिना म्हणजे नथ.. पारंपारिक तसेच आधुनिक ऑक्साईड ज्वेलरी मध्ये आपल्याला अनेक नथीचे नवनवीन प्रकार पाहायला मिळतात.oxidejweellary

महाराष्ट्राची ओळख गाजवणारा दुसरा दागिना म्हणजे कुड्या…
काही वर्षांपर्यंत फक्त मोत्याच्याच कुड्या पाहायला मिळत होत्या. परंतु आता ऑक्साईड मध्ये देखील कुड्यांचे नवनवीन प्रकार पाहायला मिळतात. ऑक्साईड ठुशीचे अनेक प्रकार तुम्हांला बाजारात मिळतील.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने चामोर्शी येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धि तालुका स्तरीय प्रशिक्षण.

तसेच ऑनलाईन साईट्स वर देखील हमखास मिळतील.
आजकाल ट्रेण्ड मध्ये असलेली बुगडी…

बुगडीची भारी हौस बाई या स्त्रियांना… कानाला जड का होईना… पण बुगडी मात्र हवी. हल्ली तर नवनवीन डिझायनर बुगड्या मार्केट मध्ये आलेल्या आहेत.

शोभून दिसणारी चिंचपेटी….
चिंचपेटीला गुलाबी खडा असतो, त्याला वर- खाली मोती असतात. तो खडा चिंचपेटी म्हणून ओळखला जातो. पारंपरिक चिंचपेटीला १६ पेट्या असतात. हेवी दागिने घालणार्यांना चिंचपेटी घालायला नक्कीच आवडते.
असा ठसठशीत कोल्हापूरी शृंगार लग्नकार्यात खूपच सुरेख दिसतो.

यामधील एकच दागिना घातला तरी पुरेसे आहे. आपल्या पारंपरिक दागिन्यांमध्ये एकदाणी, बोरमाळ, ठुशी यांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. लग्नसमारंभात असे दागिने साडीवर खूपच आकर्षक दिसतात.

oxidejweellary:बाजारात आता तर पारंपरिक मॉर्डन लक्ष्मीहार सुद्धा पाहायला मिळतात.

Leave a Comment