प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- शहरातील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच इतर मिरवणुकींच्या विसर्जन मार्गांवर अनेक वर्षांपासून विद्युत तारा अडथळा ठरत होते. रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यानंतर हे तारा थेट विसर्जन मार्गाला लागत असल्यामुळे वेळोवेळी नागरिकांना काठीच्या सहाय्याने किंवा इतर उपाय करून मार्ग मोकळा करावा लागत होता. या धोकादायक परिस्थितीमुळे अपघात व जीवितहानीची शक्यता कायम होती.
या गंभीर समस्येची दखल घेऊन आमदार समीर कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे वारंवार पत्रव्यवहार करून आवश्यक निधीची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, पालकमंत्री मा. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने तातडीने 48 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
निधी मंजूर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली असून, या कामामुळे यंदाचा गणेशोत्सव व नवरात्रोत्सवातील विसर्जन सोहळा निर्विघ्न व सुरक्षित पार पडणार आहे. त्यामुळे हिंगणघाटातील गणेशोत्सव मंडळे व नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडत पालकमंत्री पंकज भोयर आणि आमदार समीर कुणावार यांचे आभार मानले आहेत.
Sameerkunavar/काम सुरू असताना काही काळाकरिता वीजपुरवठा खंडित राहणार असल्याने संबंधित प्रभागातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी केले आहे.







