प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट, दि. २५ सप्टेंबर:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष दिवंगत पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आमदार समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. या विशेष कार्यक्रमात पंडित उपाध्याय यांच्या सामाजिक कार्याचा व राष्ट्रहितासाठी दिलेल्या योगदानाचा आठवणींना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यशैलीचा आणि स्वदेशीच्या मूलमंत्राचा उल्लेख करत, तळागाळातील नागरिकांपर्यंत विकास पोहोचवण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीबद्दल गौरवोद्गार काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत याप्रसंगी वृक्षारोपणही करण्यात आले.
पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करत, समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
Sameerkunavar/या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा छायाताई सातपुते, भाजपा शहराध्यक्ष भूषण पिसे, समाजसेवक रवी रोहनकर, माजी नगरसेविका शारदा पटेल, रवीला आखाडे, धनश्री वरघणे, वैशाली सुरकार, प्रा. डॉ. राजू निखाडे, अनिता मावळे, शुभांगी गेडाम, नीता गेडेकार, नितीन गेडेकार, प्रेमिला हिवंज, उमा पानवटकर, प्रेमिला झिंगरे, रुबीना शेख, स्वप्निल सुरकार, अनिल चाफले यांचा समावेश होता.कार्यक्रम यशस्वीतेकडे नेण्यात सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी योगदान दिले.